Health-and-Nutrition/C2/Importance-of-Calcium/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:00 | कॅल्शिअमचे महत्त्व ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : |
00:09 | कॅल्शिअमची भूमिका आणि आपल्या शरीरात त्याची आवश्यकता, |
00:13 | त्याच्या कमतरतेची लक्षणे |
00:16 | आणि कॅल्शिअमने समृद्ध असे अन्न स्रोत. |
00:20 | कॅल्शिअम हे आपल्या शरीरातील सर्वात विपुल खनिज आहे. |
00:24 | शरीरातील 99% कॅल्शिअम हाडे आणि दातांमध्ये आढळते. |
00:31 | उर्वरित 1% आपल्या रक्तात आहे. |
00:34 | हे मल, मूत्र आणि घाम यांद्वारे आपल्या शरीरातून उत्सर्जित होते. |
00:41 | कॅल्शिअम आपल्या शरीरात अनेक कार्य करते. |
00:45 | हाडांचा विकास आणि त्यांची देखभाल हे मुख्य कार्य आहे. |
00:51 | जर शरीरात कॅल्शिअम जास्त असेल तर ते हाडांमध्ये जमा होते. |
00:58 | कमतरता झाल्यास ते हाडांपासून घेतले जाऊ शकते. |
01:03 | कॅल्शिअम हे आपल्या शरीरातील मज्जातंतूंच्या संकेतांच्या हस्तांतरणासाठी आवश्यक आहे. |
01:09 | हे स्नायूचे आकुंचन आणि त्याच्या हालचालीस मदत करते. |
01:14 | कापल्यावर रक्तप्रवाह थांबविण्यातदेखील हे मदत करते. |
01:18 | इन्सुलिन आणि एड्रेनालाईनसारख्या हार्मोन्सच्या स्त्रावासाठी कॅल्शिअम आवश्यक आहे. |
01:27 | इतर फायदे म्हणजे शरीराचे वजन, रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य राखणे. |
01:34 | कॅल्शिअमसाठी रोज शिफारस केलेले सेवन वेगवेगळ्या वयोगटांसाठी बदलते. |
01:41 | बालपण आणि तारुण्यासारख्या जलद वाढीच्या कालावधीत हे जास्त असते. |
01:49 | शिशूंसाठी, 12 महिन्यांपर्यंत दररोज 500 मिलीग्राम कॅल्शिअमची शिफारस केली जाते. |
01:57 | 9 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी, दररोज 600 मिलीग्राम कॅल्शिअमची शिफारस केली जाते. |
02:03 | पौगंडावस्थेत ह्याची गरज दररोज 800 मिलीग्रामपर्यंत वाढते. |
02:10 | प्रौढांसाठी, हे दररोज 600 मिलीग्राम आहे. |
02:15 | गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानाच्या काळात कॅल्शिअमची आवश्यकतादेखील जास्त असते. |
02:21 | गरोदरपण आणि स्तनपानाच्या काळात, 1,200 मिलीग्राम कॅल्शिअमची शिफारस केली जाते. |
02:29 | आता आपण कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल चर्चा करू. |
02:34 | गर्भधारणेदरम्यान कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे रक्तदाब वाढू शकतो. |
02:42 | हातापायांमध्ये सूज दिसून येते. |
02:46 | मातांनी अपुरे कॅल्शिअम घेण्यामुळे बाळावरही परिणाम होतो. |
02:53 | त्यांचे जन्माचे वजन कमी असू शकते आणि त्यांची वाढ मंदावू शकते. |
02:58 | त्यांच्या शारीरिक आणि संज्ञानात्मक विकासास बाधा येऊ शकते. |
03:03 | कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे मुलांना मुडदूस होऊ शकतो. |
03:08 | मुडदूस हा कंकाल प्रणालीचा विकार आहे. |
03:12 | वाढ खुंटते आणि मणक्याच्या आकारात बदल होतात. |
03:18 | इतर लक्षणे आहेत - खोल गेलेल्या बरगड्या, वाढलेले किंवा पुढे आलेले कपाळ आणि धनुष्याच्या आकारात वाकलेले पाय. |
03:26 | कमी उंची, मनगट, कोपर, गुडघा आणि घोट्याचे सांधे रुंद होऊ शकते. |
03:34 | प्रौढांमध्ये कॅल्शिअमच्या कमतरतेची सुरुवातीची लक्षणे म्हणजे स्नायूमधील पेटके |
03:40 | बोटे सुन्न होणे किंवा मुंग्या येणेदेखील दिसून येते. |
03:46 | तसेच मानसिक गोंधळ, चिडचिड, |
03:49 | कोरडी त्वचा, ठिसूळ नखे |
03:51 | आणि दात किडणे हेदेखील होऊ शकते. |
03:55 | दीर्घ काळ कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते. |
04:01 | ऑस्टियोपोरोसिसमध्ये, हाडांची घनता कमी होते. |
04:06 | हाडे नाजूक होऊन ती मोडण्याचा धोका असू शकतो. |
04:10 | इतर लक्षणे म्हणजे पुढे वाकलेले शरीर, उंची कमी होणे आणि पाठदुखी. |
04:18 | पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो. |
04:23 | कारण रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन पातळी कमी होते. |
04:29 | त्यामुळे, कॅल्शिअमचे शोषण कमी होते आणि मूत्रमार्गातून त्याचे उत्सर्जन वाढते. |
04:37 | कॅल्शिअमची कमतरता टाळण्यासाठी, कॅल्शिअमने समृद्ध अन्नाचे पुरेसे सेवन करणे आवश्यक आहे. |
04:44 | उत्तम स्त्रोत आहेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. |
04:48 | यात दही, पनीर (मीठ नसलेले भारतीय चीज), चीज आणि खवा यांचा समावेश आहे. |
04:55 | त्यातून मिळवलेले कॅल्शिअम आपल्या शरीरात सहज शोषित होते. |
05:00 | गाईचे 200 मिलीलीटर दूध 236 मिलीग्राम कॅल्शिअम पुरवते. |
05:07 | गाईच्या दुधाच्या 100 ग्रॅम दह्यामध्ये 150 मिलीग्राम कॅल्शिअम असते. |
05:14 | गाईच्या दुधाच्या 30 ग्रॅम पनीरमध्ये 142 मिलीग्राम कॅल्शिअम असते. |
05:21 | काही मांसाहारी अन्नदेखील कॅल्शिअमने समृद्ध असतात. |
05:25 | उदाहरणार्थ - सुकी सुकट, बोंबील, कोळंब्या, शेवंड(लॉबस्टर) आणि सुके बोनी मासे. |
05:34 | 100 ग्रॅम कोळंब्या 67 मिलीग्राम कॅल्शिअम देतील. |
05:40 | 20 ग्रॅम सुक्या सुकटीमध्ये, 73 मिलीग्राम कॅल्शिअम असते. |
05:46 | सुक्या बोंबीलमध्ये 15 ग्रॅममध्ये 208 मिलीग्राम कॅल्शिअम असते. |
05:54 | बिया हे कॅल्शिअमचे उत्कृष्ट स्रोत आहेत. |
05:58 | उदाहरणार्थ : तीळ, कारळे, आळशी(जवस), बाळंतशेपू आणि खसखस. |
06:05 | 1 चमचा किंवा 5 ग्रॅम तीळामध्ये 64 मिलीग्राम कॅल्शिअम असते. |
06:14 | याव्यतिरिक्त बदाम आणि अक्रोडसारख्या ह्यासारखे बियाणेदेखील कॅल्शिअमने समृद्ध असतात. |
06:21 | बर्याच हिरव्या पालेभाज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शिअम असते. |
06:26 | उदाहरणार्थ : राजगिरा, अगस्ती, शेवगा आणि मेथीची पाने. |
06:33 | आणि मुळ्याची पाने, काळ्या अळूची पाने आणि मोहरीची पानेदेखील चांगले स्त्रोत आहेत. |
06:39 | 100 ग्रॅम राजगिराच्या पानांमध्ये 330 मिलीग्राम कॅल्शिअम असते. |
06:46 | 100 ग्रॅम मेथीच्या पानांमध्ये 274 मिलीग्राम कॅल्शिअम असते. |
06:52 | सोयाबीन, कुळीथ आणि मटकी यासारख्या काही कडधान्यांमध्ये कॅल्शिअम आहे. |
07:00 | 50 ग्रॅम कुळीथ 135 मिलीग्राम कॅल्शिअम देते. |
07:07 | नाचणीदेखील कॅल्शिअमचे समृद्ध स्त्रोत आहे. |
07:11 | 30 ग्रॅम नाचणी 110 मिलीग्राम कॅल्शिअम पुरवते. |
07:18 | अन्नसेवनासोबतच कॅल्शिअम शोषणदेखील तितकेच महत्वाचे आहे. |
07:24 | ऑक्सलेट्स, फिटाट्स आणि फायबरची उपस्थिती कॅल्शिअमच्या शोषणावर परिणाम करते. |
07:30 | ते बियाणे, बिया, शेंगा आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये आहेत. |
07:38 | हे पदार्थ अद्राव्य मिश्रण बनविण्यासाठी कॅल्शिअमसोबत एकत्र असू शकतात. |
07:45 | परिणामी, शरीरात कॅल्शिअमचे शोषण रोखले जाते. |
07:50 | स्वयंपाकाच्या विविध तंत्राचा वापर करून शोषण वाढवता येते. |
07:56 | उदाहरणार्थ : भिजवणे, मोड आणणे, उकळणे, भाजणे आणि आंबवणे. |
08:05 | कॅल्शिअम शोषणासाठी, कॅल्शिअमने समृद्ध अन्नासोबत चहा, कॉफी व कोला टाळा. |
08:13 | त्यामध्ये कॅफिन असते जे मूत्रमार्गातून कॅल्शिअमचे उत्सर्जन वाढवते. |
08:20 | जास्तीत जास्त कॅल्शिअम शोषणासाठी, इतर काही पौष्टीक पदार्थ आवश्यक आहेत. |
08:25 | उदाहरणार्थ : ड-जीवनसत्त्व, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि फॉस्फरस. |
08:32 | पौष्टीक पदार्थांव्यतिरिक्त, पुरेशा शारीरिक हालचाली आणि व्यायामदेखील आवश्यक आहे. |
08:39 | हे हाडांचे वजन आणि हाडांची ताकद वाढवेल. |
08:44 | याव्यतिरिक्त, वयाचादेखील कॅल्शिअम शोषणावर परिणाम होतो. |
08:50 | हे बाल्यावस्था आणि बालपणात सर्वाधिक आहे. |
08:55 | प्रोढावस्थेच्या दरम्यान, शोषण मध्यम असते आणि नंतर ते वयानुसार कमी होते. |
09:02 | म्हणूनच, लहान वयातच कॅल्शिअमने समृद्ध अन्नाचे पुरेसे सेवन करणे आवश्यक आहे. |
09:09 | यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. |