User:Latapopale

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 प्रथिनाने समृद्ध अशा शाकाहारी पाककृतींवरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत:
00:07 प्रथिनांचे फायदे,
00:09 प्रथिनांनी समृद्ध असलेल्या काही शाकाहारी पाककृती.
00:13 प्रथिने स्नायूंच्या ऊतींची वाढ, दुरुस्ती आणि देखभाल करण्यात मदत करते.
00:19 रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठीदेखील हे जबाबदार आहे.
00:24 दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये प्रथिनांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे.
00:30 त्या ट्युटोरिअलसाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
00:33 प्रथिनांचे शाकाहारी स्त्रोत पाहू.
00:37 दूध आणि दुधाचे पदार्थ,
00:39 डाळी,
00:41 बेदाणे आणि बियाणे हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.
00:44 आता प्रथिनांनी समृद्ध अशा काही शाकाहारी पाककृती पाहू.
00:49 आपली पहिली पाककृती आहे पनीर मसाला
00:52 ही पाककृती बनविण्यासाठी, आपल्याला लागतील :
00:55 70 ग्रॅम किंवा ½ कप पनीर,
00:58 70 ग्रॅम किंवा ½ कप दही,
01:02 १ चमचा भाजलेले चण्याचे पीठ.
01:06 आपल्याला हेदेखील लागतील : 1 चमचा लाल तिखट
01:11 ½ चमचा हळद
01:15 ½चमचा कढीपत्त्याची पूड
01:19 ½ चमचा गरम मसाला
01:22 1 चमचा तेल किंवा तूप
01:25 चवीनुसार मीठ.
01:28 कृती : एका वाडग्यात दही एकजीव होईपर्यंत हलवा.
01:32 त्यात मसाले, मीठ, कढीपत्त्याची पूड आणि चण्याचे पीठ घाला.
01:38 पुन्हा सर्व मिसळा.
01:40 त्यात पनीरचे तुकडे घालून चांगले मिसळा.
01:45 वाडगे झाकणाने झाकून 30 मिनिटे बाजूला ठेवा.
01:51 एका पसरट भांड्यात 1 चमचा तेल किंवा तूप गरम करा.
01:54 दह्याच्या मिश्रणासोबत पनीर घाला.
01:58 यात ½ ग्लास पाणी घाला.
02:01 हे मिश्रण घट्ट होईपर्यंत 2 ते 5 मिनिटे शिजवा.
02:07 पनीर मसाला तयार आहे.
02:09 ½ वाडगेपनीर मसाल्यात22 ग्रॅम प्रथिनेअसतात.
02:14 पुढची पाककृती आहे मुगाची रस्सा भाजी.
02:18 ही पाककृती बनविण्यासाठी, आपल्याला लागेल:
02:21 100 ग्रॅम किंवा 3/4 कप दही
02:25 30 ग्रॅम किंवा 1/4 कप मोड आलेले मूग
02:30 ¼ कप धुऊन चिरलेली कोथिंबीर
02:35 4 चमचे चण्याचे पीठ
02:38 ½ चमचा हळद
02:41 1 चमचा लाल तिखट.
02:44 आपल्याला हेदेखील लागतील :½चमचा मोहरी,
02:49 ½चमचा जिरे,
02:52 1 हिरवी मिरची,
02:54 1 चमचा तेल,
02:56 4 ते 5 कढीपत्त्याची पाने,
02:59 आणि चवीनुसार मीठ.
03:02 मी आता कृती समजावून सांगते -
03:04 प्रथम आपण मोड आणण्यापासून सुरूवात करू.
03:07 मूग रात्रभर पाण्यात भिजवा.
03:11 सकाळी त्यातील पाणी काढून टाका आणि
03:13 स्वच्छ मलमलच्या कपड्यात बांधा.
03:16 मोड येईपर्यंत ते1 दिवस उबदार ठिकाणी ठेवा.
03:23 मिक्सर मध्ये मोड आलेले मूग आणि हिरव्या मिरचीचे जाडसर वाटण तयार करा.
03:28 मिक्सर नसेल तर आपण दगडी ग्राइंडर वापरू शकता.
03:33 हे वाटण एका वाडग्यात काढा.
03:36 त्यात कोथिंबीर, दोन चमचे चण्याचे पीठ आणि मीठ घालून चांगले एकत्र करावे.
03:43 वाटणाचे छोटे गोळे बनवा
03:45 आणि वाफेच्या ताटलीत वाफवा .
03:48 हे वाफेच्या ताटलीत 6 ते 8 मिनिटे वाफवा.
03:53 वाफवलेले गोळे थंड होऊ द्या.
03:56 दह्याची करी बनवण्यासाठी, एका वाडग्यात दही घुसळा.
03:59 त्यात दोन चमचे चण्याचे पीठ आणि मसाले घाला
04:04 आणि सगळे एकजीव करण्यासाठी चांगले मिसळा.
04:08 1 कप पाणी घाला, पुन्हा एकत्र करा आणि हे मिश्रण बाजूला ठेवा.
04:13 भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घाला.
04:18 एकदा ते तडतडले की त्यात कढीपत्त्याची पाने आणि दह्याचे मिश्रण घाला.
04:23 हे मध्यम आचेवर शिजू द्यावे.
04:26 मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.
04:30 मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वाफवलेले गोळे घाला आणि 1 मिनिट शिजवा.
04:36 मुगाची रस्सा भाजी तयार आहे.
04:39 अर्धे वाडगे ह्या रस्सा भाजीत सुमारे 17 ग्रॅम प्रथिने असतात.
04:44 तिसरी पाककृती म्हणजे तीळ घालून केलेला ज्वारी आणि सोया डोसा.
04:50 ही पाककृती बनविण्यासाठी, आपल्याला लागतील -
04:53 दीड चमचा सोयाबीन,
04:57 2 चमचा ज्वारी,
04:59 दोन चमचे काळी उडदाची डाळ,
05:02 आणि 1 चमचा मेथीचे दाणे.
05:06 तीळाच्या मिश्रणासाठी आपल्याला आवश्यक असेल -
05:09 2 चमचे भाजलेले हरभरे,
05:12 2 चमचे काळी उडदाची डाळ,
05:15 2 चमचे तीळ,
05:18 2सुक्या लाल मिरच्या,
05:21 कढीपत्त्याची 1 फांदी
05:23 आणि चवीनुसार मीठ.
05:25 आपल्याला 1 चमचा तेल किंवा तूपदेखील लागेल.
05:30 कृती : ज्वारी,
05:32 काळी उडदाची डाळ,
05:34 सोयाबीन धुवा आणि ते पाण्यात 8 तास भिजत ठेवा.
05:39 त्याच भांड्यात मेथीचे दाणे भिजवा.
05:43 8 तासांनंतर, त्याचे बारीक वाटण तयार करा.
05:47 हे एका वाडग्यात काढा.
05:50 आंबण्यासाठी हे वाडगे उबदार ठिकाणी 7 ते 8 तास ठेवा.
05:57 दरम्यान, तवा गरम करून लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने कुरकुरीत होईपर्यंत कोरडे भाजून घ्या.
06:04 थंड होण्यासाठी ते बाजूला ठेवा.
06:06 त्याच तव्यामध्ये चण्याची डाळ, काळी उडदाची डाळ आणि तीळ भाजा.
06:12 ते हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.
06:17 हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
06:20 थंड झाल्यावर त्याची बारीक पूड करा.
06:23 आपण हे नंतर वापरू.
06:25 एकदा मिश्रण आंबले की त्यात मीठ घालून चांगले मिसळावे.
06:30 तव्यावर तेल किंवा तूप गरम करावे आणि मिश्रण घालावे आणि ते एकसारखे पसरावे.
06:36 एकदा डोसा अर्धवट शिजला की त्यावर 2 चमचे तयार केलेलीपूड घाला.
06:42 डोसा शिजेपर्यंत झाकणाने झाकून ठेवा.
06:45 ज्वारी आणि सोया डोसा तयार आहे.
06:48 2 डोशामध्ये सुमारे 17 ग्रॅम प्रोटीन असते.
06:53 पुढील पाककृती आहे हरभऱ्याची टिक्की.
06:57 ही पाककृती बनविण्यासाठी, आपल्याला आवश्यक असतील -
07:00 50 ग्रॅम मोड आलेले हरभरे,
07:03 40 ग्रॅम किंवा दीड चमचे दही,
07:08 एका लहान गाजराचे तुकडे,
07:10 बारीक चिरलेला 1 लहान कांदा,
07:14 15 ग्रॅम किंवा 1 चमचा भाजलेले चण्याचे पीठ,
07:18 आणि 20 ग्रॅम तीळ.
07:22 आपल्याला हेदेखील लागतील :
07:24 ½ चमचा हळद,
07:27 1 चमचा मिरची पूड,
07:31 1 चमचा आले-लसूण वाटण,
07:34 2 चमचे तेल किंवा तूप,
07:37 आणि चवीनुसार मीठ.
07:40 कृती - मोड आलेले हरभरे 3 शिट्याहोईपर्यंत शिजवा.
07:45 वाफ जाईपर्यंत बाजूला ठेवा.
07:49 एका वाडग्यात थंड झालेले मोड आलेले हरभरे घ्या आणि चांगले कुस्करा.
07:54 त्यात कांदा, गाजर आणि भाजलेले चण्याचे पीठ घालून चांगले मिसळावे.
08:01 आता त्यात मसाले, मीठ, आले लसणाचे वाटण आणि दही घाला.
08:07 सर्व साहित्य एकत्र करावे आणि त्याचे 4 गोळे बनवा.
08:12 चपटे करून त्याची टिक्की बनवा.
08:14 या टिक्कींना तीळामध्ये घुसळा आणि बाजूला ठेवा.
08:19 पसरट भांड्यात तेल किंवा तूप गरम करावे.
08:22 दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत टिक्की भाजा .
08:28 हरभऱ्याची टिक्की तयार आहे.
08:31 4 टिक्कींमध्ये 17 ग्रॅम प्रथिने असतात.
08:35 धान्य आणि डाळींमध्ये अपूर्ण प्रथिने असतात.
08:39 डाळींमध्ये कमी मेथॉयनिन असतात.
08:42 आणि धान्यांमध्ये कमी लायसीन आहे.
08:45 म्हणून, ह्या पाककृती तयार करण्यासाठी भिन्न खाद्य गट एकत्र केले आहेत.
08:51 ते एकत्र खाल्ल्यास अन्नातील अपूरे एमिनो एसिडस् भरून काढले जाईल.
08:57 ह्याला प्रथिनेची पूरक क्रिया म्हणतात.
09:01 ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद.
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज राधिका हुद्दार ह्यांनी दिला आहे.