Health-and-Nutrition/C2/Complementary-food-for-6-to-24-month-old-babies/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:00 | 6 ते 24 महिन्याच्या बाळांसाठी पूरक अन्न ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:09 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण घरगुती पौष्टिक पूरक अन्नाबद्दल शिकणार आहोत. |
00:16 | आपण त्याचे प्रमाण, |
00:18 | प्रकार |
00:20 | आणि वारंवारता ह्यावर चर्चा करणार आहोत. |
00:23 | 6 महिन्याच्या बाळाच्या पूरक अन्नासह सुरुवात करू. |
00:29 | लक्षात ठेवा, बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर पूरक अन्न देण्यास सुरवात केली पाहिजे. |
00:38 | बाळाचे पहिले जेवण म्हणजे एकाच पदार्थाचा बनवलेली घट्ट पेस्ट किंवा लगदा असावा. |
00:46 | या जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची काही उदाहरणे पाहू. |
00:52 | मोड आलेले, शिजवलेले आणि घट्ट पेस्ट केलेले अख्खे चणे जसे काबुली चणेदेखील वापरू शकता |
01:00 | मोड आलेले, शिजवलेले आणि घट्ट पेस्ट केलेले नाचणीसारखे धान्यदेखील निवडू शकता. |
01:07 | भिजवलेल्या, शिजवलेल्या आणि घट्ट पेस्ट केलेल्या हिरव्या हरभऱ्यासारख्या डाळीदेखील वापरू शकता. |
01:16 | मांसाहारी पदार्थ जसे शिजवलेले आणि घट्ट पेस्ट केलेले अंडी, कोंबडी, मासेदेखील वापरू शकता. |
01:25 | घट्ट लगदा तयार करण्यासाठी त्यापैकी एक निवडा. |
01:30 | येथे, मोड आलेले, शिजवलेले आणि घट्ट पेस्ट केलेला राजमा पहिला पदार्थ म्हणून निवडला आहे. |
01:38 | आवश्यक असल्यास, लगदा तयार करण्यासाठी पदार्थात थोडे आईचे दूध घाला. |
01:45 | आईचे दूध उपलब्ध नसल्यास केवळ उकळून थंड केलेले पाणी वापरा. |
01:53 | घट्ट पेस्ट किंवा लगद्याची सुसंगतता अत्यंत महत्वाची आहे. |
01:59 | चमचा तिरका केल्यावरदेखील पेस्ट चमच्यावर सहज राहील इतका तो पुरेसा घट्ट असला पाहिजे. |
02:06 | पहिल्या दिवशी बाळाच्या पहिल्या जेवणासाठी पहिल्या पदार्थाचा 1 चमचा भरवा. |
02:14 | त्याच दिवशी दुसऱ्या जेवणासाठी पहिल्या अन्नाचा दुसरा चमचा द्या. |
02:21 | पहिल्या दिवशी ह्या दोन जेवणांसह, बाळाला पुरेसे आईचे दूध पाजा. |
02:29 | कृपया लक्षात घ्या की ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरलेल्या चमच्यात सुमारे 15 ग्रॅम अन्न मावते. |
02:37 | दुसर्याक दिवशी, प्रत्येक जेवणात त्याच पदार्थाचे 2 चमचे भरवा. |
02:44 | त्या दिवशी आईच्या दुधासोबत अशा प्रकारचे दोन वेळा जेवण द्या. |
02:50 | तिसऱ्या दिवशी, प्रत्येक जेवणात त्याच पदार्थाचे 3 चमचे भरवा. |
02:57 | त्या दिवशी आईच्या दुधासोबत अशा प्रकारचे दोन वेळा जेवण द्या. |
03:03 | चौथा दिवस म्हणजे दुसरा नवीन पदार्थ देण्यास सुरू करण्याचा दिवस. |
03:09 | कोणत्याही खाद्य गटातून एक नवीन पौष्टिक घट्टसर अन्नपदार्थ निवडा. |
03:15 | त्याच मालिकेच्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये खाद्य गटांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. |
03:22 | येथे मोड आलेली, शिजवलेली आणि घट्ट पेस्ट केलेली नाचणी दुसरा पदार्थ म्हणून निवडला आहे. |
03:30 | आईचे दूध किंवा उकळून थंड केलेले पाणी वापरून या पदार्थाचा घट्ट लगदा बनवा. |
03:38 | प्रत्येक जेवणाची सुरवात दुसऱ्या अन्न लगद्याच्या 1 चमच्याने करा. |
03:44 | हे पहिल्या अन्न लगद्याच्या 3 चमच्यासोबत द्या. |
03:50 | प्रत्येक जेवणात एकूण 4 चमचे अन्नाचा लगदा देणे आवश्यक आहे. |
03:57 | चौथ्या दिवशी आईच्या दुधासोबत असे दोन वेळा जेवण द्या. |
04:03 | पाचव्या दिवशी, प्रत्येक जेवणात दुसऱ्या लगद्याचे प्रमाण 2 चमचे करा. |
04:11 | प्रत्येक जेवणात ते पहिल्या अन्न लगद्याच्या 2 चमच्यासोबत द्या. |
04:18 | आईच्या दुधासोबत पाचव्या दिवशी असे 2 वेळा जेवण द्या. |
04:24 | सहाव्या दिवशी, प्रत्येक जेवणात दुसऱ्या लगद्याचे प्रमाण 3 चमचे करा. |
04:32 | प्रत्येक जेवणात ते पहिल्या अन्न लगद्याच्या 1 चमच्यासोबत द्या. |
04:39 | सहाव्या दिवशी आईच्या दुधासोबत असे 2 वेळा जेवण द्या. |
04:45 | सातव्या दिवशी, तिसऱ्या नवीन पौष्टिक घट्ट अन्नाचा लगदा देणे सुरू करा. |
04:53 | ह्या चित्रात तिसऱ्या नवीन अन्नाचा लगदा बनविण्यासाठी अंडे निवडले आहे. |
04:59 | प्रत्येक जेवणाची सुरवात तिसऱ्या अन्न लगद्याच्या 1 चमच्याने करा. |
05:05 | हे पहिल्या आणि दुसऱ्या अन्न लगद्याच्या 3 चमच्यासोबत द्या. |
05:12 | प्रत्येक जेवणात एकूण 4 चमचे अन्नाचा लगदा देणे आवश्यक आहे. |
05:19 | सातव्या दिवशी आईच्या दुधासोबत अशा प्रकारचे 2 वेळा जेवण द्या. |
05:25 | हळूहळू प्रत्येक जेवणात तिसऱ्या अन्न लगद्याचे प्रमाण 3 चमच्यांपर्यंत वाढवा. |
05:33 | हे नेहमीच आधी दिलेल्या सर्व लगद्यांसोबत द्या. |
05:38 | प्रत्येक जेवणात एकूण 4 चमचे अन्नाचा लगदा भरवा. |
05:45 | 6 महिन्याच्या बाळाला दिवसाला आईच्या दुधासोबत अशा प्रकारचे 2 वेळा जेवण द्या. |
05:53 | त्याचप्रमाणे, दहाव्या दिवशी चौथ्या नवीन पोषक घट्ट अन्नाचा लगदा द्या. |
06:00 | ह्या चित्रात, चौथ्या नवीन अन्नाचा लगदा तयार करण्यासाठी मासा वापरला आहे. |
06:07 | त्यानंतर, 13 व्या दिवशी पाचवा नवीन पदार्थ द्या. |
06:14 | दर चौथ्या दिवशी नवीन पदार्थाची भर घालत रहा. |
06:19 | सर्व खाद्य गटांकडून विविध प्रकारचे पदार्थ बाळ खात नाही तोपर्यंत सुरू ठेवा. |
06:26 | नवीन तृणधान्ये आणि कडधान्ये देण्यास सुरवात केल्यानंतर, नेहमीच ते बाळाच्या जेवणात देत रहा. |
06:34 | वयाच्या 6 महिन्यांनंतर अशा प्रकारचे मिश्रण शक्य तितक्या लवकर द्या. |
06:41 | ते बाळाला संपूर्ण प्रथिने देतील. |
06:46 | अन्नातील पोषक द्रव्यांचे शोषण वाढविणारी विविध तंत्रे वापरा. |
06:53 | उदाहरणार्थ जसे, भाजणे, भिजविणे, मोड आणणे, आंबवणे आणि शिजवणे. |
07:02 | त्याच मालिकांच्या इतर ट्युटोरिअलमध्ये ह्या पद्धतींची विस्तृतपणे चर्चा केली आहे. |
07:10 | स्वच्छपणे तयार केलेले, ताजे शिजवलेले घरगुती अन्न बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. |
07:17 | जर बाळाचे अन्न साठवायचे असेल तर कृपया शिफारस केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा. |
07:25 | दुसर्याच ट्युटोरिअलमध्ये बाळाच्या अन्नाची सुरक्षित तयारी आणि साठा ह्याचे स्पष्टीकरण केले आहे. |
07:32 | त्याच ट्युटोरिअलमध्ये बाळाचे अन्न सुरक्षितपणे वाढणे ह्याविषयीदेखील चर्चा आहे. |
07:39 | कृपया अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. |
07:44 | आता, 7 महिन्याच्या बाळाला पूरक आहार देण्याविषयी चर्चा करू. |
07:51 | ह्या वयात प्रत्येक जेवणात हळूहळू अन्नाचे प्रमाण अर्ध्या कपापर्यंत वाढवा. |
07:58 | दररोज आईच्या दुधासोबत 3 वेळा जेवण द्या. |
08:06 | कृपया लक्षात घ्या की ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरलेल्या कपाची क्षमता 250 मिली आहे. |
08:14 | ह्या वयात, पदार्थाची सुसंगतता बदललीच पाहिजे. |
08:21 | 7 महिन्याच्या बाळाला दिलेला आहार कुस्करलेला किंवा गुठळ्या असलेला असावा. |
08:28 | अशा पदार्थाचे उदाहरण म्हणजे फणसाच्या गऱ्यांची लापशी. |
08:33 | जेव्हा बाळ 8 महिन्याचे होईल तेव्हा जेवणाची संख्या दररोज 4 पर्यंत वाढवा. |
08:41 | प्रत्येक जेवणात अर्धा कप अन्न देणे सुरू ठेवा. |
08:46 | स्तनपान सुरू ठेवा. |
08:49 | ह्या वयात, बाळाला अन्नाची घट्ट पेस्ट आणि लगदा देणे थांबवा. |
08:56 | मऊ कुस्करलेले पौष्टिक आहार देणे सुरू करा. |
09:01 | अशा पदार्थाचे उदाहरण म्हणजे मोड आलेले आणि शिजवलेले चणे. |
09:08 | जेव्हा बाळ 9 ते 11 महिन्यांचे होईल तेव्हा त्याला मऊ बोटाने पकडून खाता येतील असे पदार्थ देणे सुरू करा. |
09:15 | बोटाने पकडून खाता येतील असे पदार्थ म्हणजे थेट हातांनी खावयाचे पदार्थ. |
09:22 | उकडलेले अंडे आणि शिजवलेल्या भाज्यांचे तुकडे अशा पदार्थाची उदाहरणे आहेत. |
09:29 | या वयात, जेवणाची संख्या दररोज 5 पर्यंत वाढवा. |
09:35 | प्रत्येक जेवणात अर्धा कप अन्न देणे सुरू ठेवा. |
09:41 | स्तनपान सुरू ठेवा. |
09:44 | 12 महिने पूर्ण झाल्यानंतर, बाळ कुटुंबाच्या जेवणातील काही भाग खाण्यास सुरुवात करू शकते. |
09:52 | ह्या वयात, प्रत्येक जेवणात अन्नाची 1 कप मात्रा वाढवा. |
09:59 | आईच्या दुधासोबत दिवसाला 5 वेळा जेवण देणे सुरू ठेवा. |
10:05 | 3 मुख्य जेवण आणि 2 हलकेफुलके पदार्थ म्हणून दिवसाला 5 वेळा जेवणदेखील दिले जाऊ शकते. |
10:12 | हलक्याफुलक्या पदार्थासाठी १ कप पौष्टिक आहार द्यावा. |
10:19 | फळ, दही, शिजवलेले पनीर आणि शिजवलेल्या भाज्या ही हलक्याफुलक्या पदार्थाची उदाहरणे आहेत. |
10:28 | शिजवताना ह्या हलक्याफुलक्या पदार्थामध्ये पौष्टिक मेवा, बियाणे आणि पानांची पावडर घाला. |
10:36 | पौष्टिक पावडरच्या पाककृतीबद्दल त्याच मालिकेच्या दुसर्याष ट्युटोरिअलमध्ये चर्चा केली आहे. |
10:44 | लक्षात ठेवा, कमीतकमी 2 वर्षांपर्यंत आईचे दूध पाजत रहा. |
10:51 | बाळ एक वर्षाचे होईपर्यंत कोळंबी आणि कवच असलेले (खेकडा) मासे भरवू नका. |
10:58 | तसेच, बाळासाठी तयार केलेल्या अन्नात मीठ घालू नका. |
11:05 | बाळ 2 वर्षाचे होईपर्यंत बाळाला कोणत्याही प्रकारची साखर देऊ नका. |
11:13 | त्या प्रकारात गूळ, मध आणि फळांचा रस समाविष्ट आहे. |
11:19 | तसेच, चहा, कॉफी, बंद पाकिटातील पदार्थ किंवा पेय |
11:25 | आणि बाहेरील कोणतेही पदार्थ देऊ नका. |
11:29 | बाळाच्या वयानुसार ही विशिष्ट पूरक आहार मार्गदर्शक तत्त्वे होती. |
11:36 | सर्व वयोगटातील मुलांसाठी अजून बरेच महत्त्वाचे आहार मार्गदर्शक तत्त्वे आहेत. |
11:43 | त्याच मालिकेतल्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये त्यांची सविस्तर चर्चा आहे. |
11:50 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.सहभागासाठी धन्यवाद. हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज राधिका हुद्दार ह्यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |