Difference between revisions of "QGIS/C4/Create-Contour-Lines/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{|border=1 ||'''Time''' ||'''Narration''' |- ||00:01 ||QGIS मधील Create Contour Lines वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स...")
 
 
Line 2: Line 2:
 
||'''Time'''
 
||'''Time'''
 
||'''Narration'''
 
||'''Narration'''
 
  
 
|-  
 
|-  

Latest revision as of 13:11, 11 February 2022

Time Narration
00:01 QGIS मधील Create Contour Lines वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू,
00:11 Clipper टूल वापरून DEM मधील क्षेत्र क्लिप करणे.
00:16 DEM साठी contour लाइन्स दाखवणे.
00:20 आणि contour नकाशावर सर्वात उंच क्षेत्र चिन्हांकित करणे.
00:26 येथे मी वापरत आहे.Ubuntu Linux ओएस आवृत्ती 16.04
00:32 QGIS आवृत्ती 2.18
00:36 आणि कार्यरत इंटरनेट कनेक्शन.
00:40 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे.
00:46 या मालिकेतील पूर्व-आवश्यक ट्यूटोरियलसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या.
00:53 या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेला DEM डेटा Code files लिंकमध्ये प्रदान केला आहे.
01:00 कृपया फोल्डरमधील कंटेंट डाउनलोड आणि एक्सट्रॅक्ट करा.
01:05 मी हे फोल्डर Desktop वर सेव्ह केले आहे.
01:09 फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल-क्लिक करा.
01:13 srtm.tif फाइलवर राइट -क्लिक करा आणि Open with QGIS Desktop निवडा.
01:22 स्क्रीनवर नकाशा उघडतो.
01:25 तुम्ही Layer  मेनूमधील Add Raster Layer  पर्याय वापरून tif फाइल देखील उघडू शकता.
01:33 कॅनव्हासवर तुम्हाला भूप्रदेशाचा DEM दिसेल.
01:38 Raster menu मधील Contour tool वापरून या DEM साठी Contour lines  तयार केल्या जाऊ शकतात.
01:46 Contour lines बद्दल.
01:49 ही समुद्रसपाटीपासून वर किंवा खाली समान उंचीचे पॉइंटस जोडणारी नकाशावरील एक लाइन्स आहे.
01:57 contour लाइन्स आपल्याला नकाशावरील सर्वात उंच आणि कमी उंचीचे क्षेत्र निर्धारित करण्यात मदत करतात.
02:04 या नकाशावर निवडलेल्या क्षेत्रासाठी आपण contour लाइन्स काढू शकतो.
02:10 आपण क्षेत्र क्लिप करण्यासाठी Raster मेनूमधील Clipper टूल वापरू.
02:16 Raster मेनूवर क्लिक करा.ड्रॉप-डाउन मधून एक्सट्रॅक्शन वर क्लिक करा.
02:23 Clipper वर क्लिक करा.
02:26 Clipper डायलॉग बॉक्स उघडतो.
02:29 DEM  लेयर म्हणून  Input file  निवडा.
02:33 येथे, डीफॉल्टनुसार हा लेयर आधीच निवडलेला आहे.
02:38 Output file साठी Select  बटणावर क्लिक करा.
02:42 Select the raster file to save the results to डायलॉग बॉक्स उघडतो .
02:48 डायलॉग बॉक्समध्ये, फाइलला Clip-DEM.tif असे नाव द्या.
02:56 तळाशी उजव्या कोपर्यात असलेल्या Save बटणावर क्लिक करा.
03:01 Clipper डायलॉग बॉक्समध्ये, No data value साठी चेक-बॉक्स चेक करा.वैल्यू जीरो असू द्या.
03:10 Clipping mode या हैडिंग खाली,  Extent  रेडिओ बटणावर क्लिक करा.
03:16 QGIS विंडोवर स्विच करा.
03:19 कर्सर आता plus(+) चिन्ह म्हणून दिसत आहे.
03:23 तुमचे डावे माऊस बटण दाबून ठेवा आणि आवडीचे क्षेत्र कवर करणारा आयत काढा.
03:30 या प्रात्यक्षिकासाठी मी मुंबई प्रदेश निवडणार आहे.
03:35 Clipper डायलॉग बॉक्समध्ये, Load into canvas when finished पुढील चेक-बॉक्स चेक करा.
03:42 इतर डीफॉल्ट सेटिंग्ज अशाच ठेवा.
03:46 तळाशी उजव्या कोपर्‍यात OK बटणावर क्लिक करा.
03:51 प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, OK बटणावर क्लिक करून पॉप-अप विंडो बंद करा.
03:58 Clipper डायलॉग बॉक्समध्ये तळाशी उजव्या कोपऱ्यात असलेल्या Close बटणावर क्लिक करा.
04:05 कॅनव्हासवर तुम्हाला नवीन लेयर लोड झालेला दिसेल.
04:10 Clip-DEM   लेयर वगळता,Layers Panel मधील सर्व लेयर डिसेबल करा.
04:16 आता आपण Contour टूल वापरून या नकाशासाठी contour लाइन्स तयार करण्यास तयार आहोत.
04:23 Raster मेनूवर क्लिक करा.
04:26 Extraction पर्यंत खाली स्क्रोल करा.
04:29 सब-मेनूमधून, Contour वर क्लिक करा.
04:34 Contour डायलॉग बॉक्स उघडतो.Input file ड्रॉप-डाउन मधून, Clip-DEM  लेयर निवडा.
04:43 आउटपुट फाइलसाठी सिलेक्ट बटणावर क्लिक करा. डायलॉग बॉक्स उघडतो.
04:51 डायलॉग बॉक्समध्ये, फाइलला Contour.shp असे नाव द्या. Save बटणावर क्लिक करा.
05:00 contour डायलॉग बॉक्समध्ये,Interval between contour lines , ५० म्हणून निवडा.
05:07 हे 50 मीटर अंतरासाठी contour लाइन्स तयार करेल.
05:12 Attribute name च्या पुढील चेक-बॉक्सवर क्लिक करा.
05:17 प्रत्येक contour रेषेसाठी एलिव्हेशन व्हॅल्यू एक विशेषता E L E V म्हणून रेकॉर्ड केली जाईल.
05:24 Load into canvas when finished शेजारील बॉक्स चेक करा.
05:29 Contour डायलॉग बॉक्समध्ये उजव्या कोपऱ्यात तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा.
05:36 प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, OK बटणावर क्लिक करून पॉप-अप विंडो बंद करा.
05:43 Contour डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी  Close बटणावर क्लिक करा.
05:48  Layers panel मध्ये नवीन लेयर Contour जोडला आहे.
05:53 contour लाइन्सचा रंग बदलूया.
05:57 Contour लेयरवर राईट क्लिक करा. स्टाइल निवडा.
06:03 रंग बदलण्यासाठी त्रिकोण फिरवा.
06:07 तुमच्या आवडीचा रंग निवडा.
06:11 Layers panel मधील चेक-बॉक्स अनचेक करून इतर लेयर्स लपवा.
06:17 Contour लेयरसाठी attribute table उघडा.
06:21 एट्रीब्यूट टेबल मध्ये, प्रत्येक लाइन फीचरसमध्ये E L E V नावाची एट्रीब्यूट असते.
06:28 या कॉलममध्ये दिलेली वैल्यू हे त्या contour लाइनसाठी मीटरमधील उंची आहे.
06:35 वैल्यूज उतरत्या क्रमाने क्रमवारी लावण्यासाठी कॉलम शीर्षलेखावर काही वेळा क्लिक करा.
06:42 पहिली रो आपल्या डेटामधील सर्वोच्च उंची दर्शवते.
06:47 टेबल खाली स्क्रोल करा, शेवटची रो सर्वात कमी उंची दर्शवते.
06:54 वर स्क्रोल करा आणि ती निवडण्यासाठी पहिल्या रो वर क्लिक करा
06:59 टूलबारवरील Zoom map to the selected rows बटन वर क्लिक करा.
07:06 QGIS विंडोवर स्विच करा.
07:09 तुम्हाला निवडलेली contour लाइन्स पिवळ्या रंगात हायलाइट केलेली दिसेल.
07:14 या  data-set मधील हे सर्वोच्च उंचीचे क्षेत्र आहे.
07:20 हा प्रोजेक्ट सेव्ह करा.
07:23 टूलबारवरील "Save As" टूलवर क्लिक करा.
07:27 योग्य नाव द्या.
07:30 सोयीस्कर ठिकाणी सेव्ह करा. सेव्ह बटणावर क्लिक करा.
07:37 चला थोडक्यात बघू,
07:39 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो
07:42 Clipper टूल वापरून DEM मधील क्षेत्र क्लिप करणे .
07:47 DEM साठी contour लाइन्स दाखवणे .
07:51 contour नकाशावर सर्वात उंच क्षेत्र चिन्हांकित करणे .
07:56 येथे असाइनमेंट आहे.
07:59 DEM वर तुमच्या पसंतीच्या क्षेत्रासाठी contour लाइन्स तयार करा. क्षेत्रासाठी सर्वोच्च उंची शोधा.
08:09 हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाचा सारांश देतो. कृपया डाउनलोड करून पहा.
08:16 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्रे देते.अधिक तपशीलांसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:26 कृपया या फोरममध्ये तुमच्या वेळेनुसार प्रश्न पोस्ट करा.
08:30 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD सरकारने निधी दिला आहे.
08:38 या ट्यूटोरियलचे अनुवाद राधिका हुद्दार यांनी केले असून आवाज मैत्रेय बापट यांनी दिला आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Radhika