QGIS/C4/Create-Contour-Lines/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | QGIS मधील Create Contour Lines वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू, |
00:11 | Clipper टूल वापरून DEM मधील क्षेत्र क्लिप करणे. |
00:16 | DEM साठी contour लाइन्स दाखवणे. |
00:20 | आणि contour नकाशावर सर्वात उंच क्षेत्र चिन्हांकित करणे. |
00:26 | येथे मी वापरत आहे.Ubuntu Linux ओएस आवृत्ती 16.04 |
00:32 | QGIS आवृत्ती 2.18 |
00:36 | आणि कार्यरत इंटरनेट कनेक्शन. |
00:40 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे. |
00:46 | या मालिकेतील पूर्व-आवश्यक ट्यूटोरियलसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या. |
00:53 | या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेला DEM डेटा Code files लिंकमध्ये प्रदान केला आहे. |
01:00 | कृपया फोल्डरमधील कंटेंट डाउनलोड आणि एक्सट्रॅक्ट करा. |
01:05 | मी हे फोल्डर Desktop वर सेव्ह केले आहे. |
01:09 | फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल-क्लिक करा. |
01:13 | srtm.tif फाइलवर राइट -क्लिक करा आणि Open with QGIS Desktop निवडा. |
01:22 | स्क्रीनवर नकाशा उघडतो. |
01:25 | तुम्ही Layer मेनूमधील Add Raster Layer पर्याय वापरून tif फाइल देखील उघडू शकता. |
01:33 | कॅनव्हासवर तुम्हाला भूप्रदेशाचा DEM दिसेल. |
01:38 | Raster menu मधील Contour tool वापरून या DEM साठी Contour lines तयार केल्या जाऊ शकतात. |
01:46 | Contour lines बद्दल. |
01:49 | ही समुद्रसपाटीपासून वर किंवा खाली समान उंचीचे पॉइंटस जोडणारी नकाशावरील एक लाइन्स आहे. |
01:57 | contour लाइन्स आपल्याला नकाशावरील सर्वात उंच आणि कमी उंचीचे क्षेत्र निर्धारित करण्यात मदत करतात. |
02:04 | या नकाशावर निवडलेल्या क्षेत्रासाठी आपण contour लाइन्स काढू शकतो. |
02:10 | आपण क्षेत्र क्लिप करण्यासाठी Raster मेनूमधील Clipper टूल वापरू. |
02:16 | Raster मेनूवर क्लिक करा.ड्रॉप-डाउन मधून एक्सट्रॅक्शन वर क्लिक करा. |
02:23 | Clipper वर क्लिक करा. |
02:26 | Clipper डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:29 | DEM लेयर म्हणून Input file निवडा. |
02:33 | येथे, डीफॉल्टनुसार हा लेयर आधीच निवडलेला आहे. |
02:38 | Output file साठी Select बटणावर क्लिक करा. |
02:42 | Select the raster file to save the results to डायलॉग बॉक्स उघडतो . |
02:48 | डायलॉग बॉक्समध्ये, फाइलला Clip-DEM.tif असे नाव द्या. |
02:56 | तळाशी उजव्या कोपर्यात असलेल्या Save बटणावर क्लिक करा. |
03:01 | Clipper डायलॉग बॉक्समध्ये, No data value साठी चेक-बॉक्स चेक करा.वैल्यू जीरो असू द्या. |
03:10 | Clipping mode या हैडिंग खाली, Extent रेडिओ बटणावर क्लिक करा. |
03:16 | QGIS विंडोवर स्विच करा. |
03:19 | कर्सर आता plus(+) चिन्ह म्हणून दिसत आहे. |
03:23 | तुमचे डावे माऊस बटण दाबून ठेवा आणि आवडीचे क्षेत्र कवर करणारा आयत काढा. |
03:30 | या प्रात्यक्षिकासाठी मी मुंबई प्रदेश निवडणार आहे. |
03:35 | Clipper डायलॉग बॉक्समध्ये, Load into canvas when finished पुढील चेक-बॉक्स चेक करा. |
03:42 | इतर डीफॉल्ट सेटिंग्ज अशाच ठेवा. |
03:46 | तळाशी उजव्या कोपर्यात OK बटणावर क्लिक करा. |
03:51 | प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, OK बटणावर क्लिक करून पॉप-अप विंडो बंद करा. |
03:58 | Clipper डायलॉग बॉक्समध्ये तळाशी उजव्या कोपऱ्यात असलेल्या Close बटणावर क्लिक करा. |
04:05 | कॅनव्हासवर तुम्हाला नवीन लेयर लोड झालेला दिसेल. |
04:10 | Clip-DEM लेयर वगळता,Layers Panel मधील सर्व लेयर डिसेबल करा. |
04:16 | आता आपण Contour टूल वापरून या नकाशासाठी contour लाइन्स तयार करण्यास तयार आहोत. |
04:23 | Raster मेनूवर क्लिक करा. |
04:26 | Extraction पर्यंत खाली स्क्रोल करा. |
04:29 | सब-मेनूमधून, Contour वर क्लिक करा. |
04:34 | Contour डायलॉग बॉक्स उघडतो.Input file ड्रॉप-डाउन मधून, Clip-DEM लेयर निवडा. |
04:43 | आउटपुट फाइलसाठी सिलेक्ट बटणावर क्लिक करा. डायलॉग बॉक्स उघडतो. |
04:51 | डायलॉग बॉक्समध्ये, फाइलला Contour.shp असे नाव द्या. Save बटणावर क्लिक करा. |
05:00 | contour डायलॉग बॉक्समध्ये,Interval between contour lines , ५० म्हणून निवडा. |
05:07 | हे 50 मीटर अंतरासाठी contour लाइन्स तयार करेल. |
05:12 | Attribute name च्या पुढील चेक-बॉक्सवर क्लिक करा. |
05:17 | प्रत्येक contour रेषेसाठी एलिव्हेशन व्हॅल्यू एक विशेषता E L E V म्हणून रेकॉर्ड केली जाईल. |
05:24 | Load into canvas when finished शेजारील बॉक्स चेक करा. |
05:29 | Contour डायलॉग बॉक्समध्ये उजव्या कोपऱ्यात तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा. |
05:36 | प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, OK बटणावर क्लिक करून पॉप-अप विंडो बंद करा. |
05:43 | Contour डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
05:48 | Layers panel मध्ये नवीन लेयर Contour जोडला आहे. |
05:53 | contour लाइन्सचा रंग बदलूया. |
05:57 | Contour लेयरवर राईट क्लिक करा. स्टाइल निवडा. |
06:03 | रंग बदलण्यासाठी त्रिकोण फिरवा. |
06:07 | तुमच्या आवडीचा रंग निवडा. |
06:11 | Layers panel मधील चेक-बॉक्स अनचेक करून इतर लेयर्स लपवा. |
06:17 | Contour लेयरसाठी attribute table उघडा. |
06:21 | एट्रीब्यूट टेबल मध्ये, प्रत्येक लाइन फीचरसमध्ये E L E V नावाची एट्रीब्यूट असते. |
06:28 | या कॉलममध्ये दिलेली वैल्यू हे त्या contour लाइनसाठी मीटरमधील उंची आहे. |
06:35 | वैल्यूज उतरत्या क्रमाने क्रमवारी लावण्यासाठी कॉलम शीर्षलेखावर काही वेळा क्लिक करा. |
06:42 | पहिली रो आपल्या डेटामधील सर्वोच्च उंची दर्शवते. |
06:47 | टेबल खाली स्क्रोल करा, शेवटची रो सर्वात कमी उंची दर्शवते. |
06:54 | वर स्क्रोल करा आणि ती निवडण्यासाठी पहिल्या रो वर क्लिक करा |
06:59 | टूलबारवरील Zoom map to the selected rows बटन वर क्लिक करा. |
07:06 | QGIS विंडोवर स्विच करा. |
07:09 | तुम्हाला निवडलेली contour लाइन्स पिवळ्या रंगात हायलाइट केलेली दिसेल. |
07:14 | या data-set मधील हे सर्वोच्च उंचीचे क्षेत्र आहे. |
07:20 | हा प्रोजेक्ट सेव्ह करा. |
07:23 | टूलबारवरील "Save As" टूलवर क्लिक करा. |
07:27 | योग्य नाव द्या. |
07:30 | सोयीस्कर ठिकाणी सेव्ह करा. सेव्ह बटणावर क्लिक करा. |
07:37 | चला थोडक्यात बघू, |
07:39 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो |
07:42 | Clipper टूल वापरून DEM मधील क्षेत्र क्लिप करणे . |
07:47 | DEM साठी contour लाइन्स दाखवणे . |
07:51 | contour नकाशावर सर्वात उंच क्षेत्र चिन्हांकित करणे . |
07:56 | येथे असाइनमेंट आहे. |
07:59 | DEM वर तुमच्या पसंतीच्या क्षेत्रासाठी contour लाइन्स तयार करा. क्षेत्रासाठी सर्वोच्च उंची शोधा. |
08:09 | हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाचा सारांश देतो. कृपया डाउनलोड करून पहा. |
08:16 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्रे देते.अधिक तपशीलांसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:26 | कृपया या फोरममध्ये तुमच्या वेळेनुसार प्रश्न पोस्ट करा. |
08:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD सरकारने निधी दिला आहे. |
08:38 | या ट्यूटोरियलचे अनुवाद राधिका हुद्दार यांनी केले असून आवाज मैत्रेय बापट यांनी दिला आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. |