PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-4/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:27, 2 January 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: User-Registration-Part-4

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 "User Registration" च्या चौथ्या भागात स्वागत. ह्यात प्रोसेसेस नीट समजून घेऊ. "username" आणि "password" साठी सुरक्षा व चांगल्या चाचण्या वापरू.
0:10 ह्याबाबतच्या सूचना email किंवा "youtube" द्वारे पाठवू शकता .
0:20 युजर रजिस्ट्रेशन प्रोसेसमधे जाऊ.
0:23 प्रथम डेटाबेसला कनेक्ट करणे गरजेचे आहे. आपले टेबल उघडून त्यात व्हॅल्यूज भरू.
0:29 हे सोपे आहे असे तुम्हाला वाटेल.
0:33 प्रथम येथे "Success" हा मेसेज लिहू.
0:39 पेजवर जाऊ. आपण बनवलेल्या चाचण्या तपासू.
0:48 "Register" वर क्लिक करा. "Please fill in all the fields". हा मेसेज मिळाला.
0:55 जर वेगवेगळी फिल्डस भरली, एखादे विसरलो आणि रजिस्टरवर क्लिक केले तरी हाच मेसेज मिळाला आहे.
1:04 येथे "alex" लिहू. प्रथम fullname टाईप करून युजरनेम निवडणार आहोत. येथे "abc" पासवर्ड लिहिणार आहोत.
1:16 येथे मिश्र अक्षरे टाईप करा. registerवर क्लिक केले "Your passwords does not match" हा मेसेज मिळाला.
1:26 पुन्हा मागे जाऊन येथे "Alex Garrett" टाईप करू. युजरनेम निवडू आणि "abc" पासवर्ड निवडा.
1:40 हा पासवर्ड 6 अक्षरांपेक्षा कमी आहे. "Register" क्लिक केल्यावर - "Passwords must be between 25 and 6 characters" हा मेसेज मिळाला. ही चाचणी कार्य करत आहे.
1:52 आता "Alexxxxxx Garrettttttttttttttt" हे लांबलचक फुलनेम , "alex" हे युजरनेम आणि पूर्ण लांबीचा पासवर्ड लिहू.
02:05 म्हणजे 6 अक्षरांपेक्षा जास्त. "Register" वर क्लिक करा. "Length of the username or fullname is too long!" हा मेसेज मिळाला.
2:15 तुम्हाला हवे असल्यास हे checks लिहू शकता. हे मी तुमच्यावर सोडत आहे.
2:20 आत्ता यशस्वी फॉर्म validation मिळाले.
2:27 आता युजर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पुढे चालू ठेवू.
2:32 ह्या फॉर्म validation मधे उणीव आहे. प्रत्येक वेळी एरर मिळाल्यावर सर्व फिल्डस पुसली जातात.
2:40 युजरला ती परत टाईप करावी लागतात.
2:43 समजा आपल्याला fullname, username आणि password ही व्हेरिएबल्स येथे मिळाली आहेत.
2:50 हे php page विचारात घेता आपण येथील html codeमधे php कोड लिहू.
2:58 येथे fullname खाली लिहा "value equal to" मधे phptag ओपन करा .
3:07 पुढे php tag क्लोज करा. त्याच्या आत येथे fullnameकिंवा username एको करू.
3:12 आपण युजरनेमसाठीही असेच करू. म्हणजेच value equals, open php tags, close php tags आणि मधे username एको करू.
3:23 line terminator दिल्याची खात्री करा.
3:28 समजा येथे खूप मोठे नाव टाईप केले आणि "alex" हे युजरनेम टाईप केले.
3:37 आपल्याला पासवर्ड संचित करायचा नसेल. ते मी युजरवर सोडत आहे.
3:43 आपण खूप मोठे युजरनेम टाईप केल्यामुळे पुन्हा एरर मिळाली .
3:49 registerक्लिक केल्यावर आपले फुलनेम आणि युजरनेमही दिसत आहे.
3.55 हा नियम आहे. एरर मिळाली आणि आपले युजरनेम, फुलनेम, पासवर्ड किंवा आपले firstname, middle name, surnameयासारखी फॉर्ममधील अनेक फिल्डस पुन्हा टाईप करावी लागली तर,
4:10 हे पुन्हा पुन्हा लिहिणे त्रासदायक होऊ शकते.
4:14 याप्रकारे php tagsमधील php echoवापरून, html inputसाठी व्हॅल्यू घेण्याने आपला फॉर्म user friendly, उपयोगी व वापरण्यास सोपा झाला आहे.
4.28 ठीक. अन्यथा "Success!!" असे एको करू. आपण अजून successful फॉर्म दिलेला नाही.
4:35 टाईप करा "Alex Garret" आणि 6 पेक्षा अधिक 25 पेक्षा कमी अक्षरे असलेला पासवर्ड लिहा.
4:44 "Register" वर क्लिक करा. आपल्याला एरर मिळाली आहे! बघू या.
4:50 एरर आहे.... - जर पासवर्डची string length 25पेक्षा अधिक असेल.....
4:56 ...किंवा पासवर्डची string length 6पेक्षा कमी असेल.... तर पासवर्ड एको करणे पुरेसे आहे- पण आपल्याला तीच अडचण येत आहे.
5:05 माझ्या लक्षात आले की पासवर्डची व्हॅल्यू encrypted आहे. आणि md5 ने encryptकेलेली string खूप मोठी आहे. ती 25 अक्षरांपेक्षा जास्त आहे.
5:19 आता आपल्याला हा block of code,जो encrypt करत आहे तो येथून काढून "register the user" च्या खाली लिहू.
5:31 यावरून कळेल की गोष्टींचा क्रम महत्त्वाचा असतो. अशा एरर्स मिळाल्यास तुमचा कोड नीट तपासा. म्हणजे नेमके काय करत आहात ते कळेल.
5:43 चुका शोधण्यासाठी युजर्स कोडच्या मधे गोष्टी एको करून पहात असतात.
5:49 मी आता फॉर्मवर परत जाऊन योग्य लांबीचा पासवर्ड टाईप करत आहे.
5:56 "Register" वर क्लिक करा. आपल्याला "Success" मेसेज मिळाला आहे.
6:03 कोड तपासल्यामुळे अडचण सोडवण्यास मदत होऊ शकते.
6:07 ही चूक माझ्या पटकन लक्षात आली पण कधीकधी व्हिडिओ pauseकरून मला चुका शोधाव्या लागतात. पण दर्शकांना ताटकळत ठेवणे योग्य नाही.
6:20 तुम्हालाही चुका समजतील. आपल्याला "Success" मिळाला आहे. कमेंट लिहा "open database".
6:29 टाईप करा, variable connect equal to my "sql connect".
6:37 आणि लोकल होस्ट सर्व्हर म्हणजेच माझ्या संगणकाला कनेक्ट करत आहे, पुढे root आणि password काही नाही.
6:45 टाईप करा " mySQL select db". हे आपला डेटाबेस सिलेक्ट करेल. समजण्यासाठी "select data base" ही कमेंट टाईप करू.
6:55 अर्थातच येथे php login आहे जे आपल्या डेटाबेसचे नाव आहे. येथे query लिहू.
7:04 टाईप करा variable query reg equal to mysql_query".
7:11 हा ह्या पाठाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जेथे व्हॅल्यूज भरून आपले युजरनेम रजिस्टर करतो.
7:18 येथे खाली जाऊ म्हणजे नीट दिसेल. लिहा "INSERT INTO users". आपण पाहिले तर "php login" डेटाबेस निवडला आहे. हे आपले टेबल आहे. त्यामुळे "mySQL select db php login".
7:38 आपण डेटाबेसमधील "users" टेबलमधे डेटा समाविष्ट करत आहोत .
7:44 आणि पुढे लिहा values कंसात टेबलमधील प्रत्येक व्हॅल्यू म्हणजेच टेबलमधे उपलब्ध असलेले प्रत्येक फिल्ड.
7:52 त्यासाठी मागे जाऊन structure वर क्लिक करा. आपल्याला id, name, username, password, date दिसत आहेत. म्हणजे 1 2 3 4 5.
8:05 येथेही 1 2 3 4 5 फिल्डस आवश्यक आहेत. id हे ऑटो इन्क्रीमेंट करेल. ह्याबद्दल आपण मागील पाठात पाहिले होते.
8:14 येथे क्रम अतिशय महत्त्वाचा आहे.
8:18 आपले name, username, password, date मिळाले आहे. येथे name, username, passwordआहे. repeat password नको. तो फक्त तपासण्यासाठी आहे. आणि ही date असणार आहे.
8:33 येथे ही व्हेरिएबल्स आहेत. जर खात्री नसेल तर आपण येथून fullname, username, password आणि date घेऊ शकतो.
8:44 हे बदलून fullname करा. आता ह्याने काम व्हायला हवे. नंतर "You have been registered" असे एको करणार आहोत. याऐवजी "die" फंक्शन वापरू.
8:57 त्यामधे "You have been registered return to login page" मेसेज लिहू. युजरला login करता यावे यासाठी index page वर नेणारी लिंक बनवू.
9:10 हे काही सेकंदात कार्यान्वित होत असल्याचे दिसेल. हे आपले आधीचे पेज आहे.
9:16 लिहा "Alex Garret". "alex" हे युजरनेम आणि हा पासवर्ड. "You have been registered. Return to login page" दिसेल.
9:26 आता डेटाबेस तपासण्यासाठी "browse" वापरू. आपल्याला दिसेल की "Alex Garret", आपला id 3 आणि युजरनेम "alex" आहे.
9:37 आपला पासवर्ड encrypted असून ही आपली date आहे.
9:42 ठीक आहे. पुढील भागात आणखी काही छोट्या गोष्टी एकत्र करू आणि login processची चाचणी घेऊ.
9:50 पुन्हा भेटू. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आवाज रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana