PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-4/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 "User Registration" च्या चौथ्या भागात स्वागत. ह्यात प्रोसेसेस नीट समजून घेऊ. "username" आणि "password" साठी सुरक्षा व चांगल्या चाचण्या वापरू.
00:10 ह्याबाबतच्या सूचना email किंवा "youtube" द्वारे पाठवू शकता .
00:20 युजर रजिस्ट्रेशन प्रोसेसमधे जाऊ.
00:23 प्रथम डेटाबेसला कनेक्ट करणे गरजेचे आहे. आपले टेबल उघडून त्यात व्हॅल्यूज भरू.
00:29 हे सोपे आहे असे तुम्हाला वाटेल.
00:33 प्रथम येथे "Success" हा मेसेज लिहू.
00:39 पेजवर जाऊ. आपण बनवलेल्या चाचण्या तपासू.
00:48 "Register" वर क्लिक करा. "Please fill in all the fields". हा मेसेज मिळाला.
00:55 जर वेगवेगळी फिल्डस भरली, एखादे विसरलो आणि रजिस्टरवर क्लिक केले तरी हाच मेसेज मिळाला आहे.
01:04 येथे "alex" लिहू. प्रथम fullname टाईप करून युजरनेम निवडणार आहोत. येथे "abc" पासवर्ड लिहिणार आहोत.
01:16 येथे मिश्र अक्षरे टाईप करा. registerवर क्लिक केले "Your passwords does not match" हा मेसेज मिळाला.
01:26 पुन्हा मागे जाऊन येथे "Alex Garrett" टाईप करू. युजरनेम निवडू आणि "abc" पासवर्ड निवडा.
01:40 हा पासवर्ड 6 अक्षरांपेक्षा कमी आहे. "Register" क्लिक केल्यावर - "Passwords must be between 25 and 6 characters" हा मेसेज मिळाला. ही चाचणी कार्य करत आहे.
01:52 आता "Alexxxxxx Garrettttttttttttttt" हे लांबलचक फुलनेम , "alex" हे युजरनेम आणि पूर्ण लांबीचा पासवर्ड लिहू.
02:05 म्हणजे 6 अक्षरांपेक्षा जास्त. "Register" वर क्लिक करा. "Length of the username or fullname is too long!" हा मेसेज मिळाला.
02:15 तुम्हाला हवे असल्यास हे checks लिहू शकता. हे मी तुमच्यावर सोडत आहे.
02:20 आत्ता यशस्वी फॉर्म validation मिळाले.
02:27 आता युजर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पुढे चालू ठेवू.
02:32 ह्या फॉर्म validation मधे उणीव आहे. प्रत्येक वेळी एरर मिळाल्यावर सर्व फिल्डस पुसली जातात.
02:40 युजरला ती परत टाईप करावी लागतात.
02:43 समजा आपल्याला fullname, username आणि password ही व्हेरिएबल्स येथे मिळाली आहेत.
02:50 हे php page विचारात घेता आपण येथील html codeमधे php कोड लिहू.
02:58 येथे fullname खाली लिहा "value equal to" मधे phptag ओपन करा .
03:07 पुढे php tag क्लोज करा. त्याच्या आत येथे fullnameकिंवा username एको करू.
03:12 आपण युजरनेमसाठीही असेच करू. म्हणजेच value equals, open php tags, close php tags आणि मधे username एको करू.
03:23 line terminator दिल्याची खात्री करा.
03:28 समजा येथे खूप मोठे नाव टाईप केले आणि "alex" हे युजरनेम टाईप केले.
03:37 आपल्याला पासवर्ड संचित करायचा नसेल. ते मी युजरवर सोडत आहे.
03:43 आपण खूप मोठे युजरनेम टाईप केल्यामुळे पुन्हा एरर मिळाली .
03:49 registerक्लिक केल्यावर आपले फुलनेम आणि युजरनेमही दिसत आहे.
03:55 हा नियम आहे. एरर मिळाली आणि आपले युजरनेम, फुलनेम, पासवर्ड किंवा आपले firstname, middle name, surnameयासारखी फॉर्ममधील अनेक फिल्डस पुन्हा टाईप करावी लागली तर,
04:10 हे पुन्हा पुन्हा लिहिणे त्रासदायक होऊ शकते.
04:14 याप्रकारे php tagsमधील php echoवापरून, html inputसाठी व्हॅल्यू घेण्याने आपला फॉर्म user friendly, उपयोगी व वापरण्यास सोपा झाला आहे.
04:28 ठीक. अन्यथा "Success!!" असे एको करू. आपण अजून successful फॉर्म दिलेला नाही.
04:35 टाईप करा "Alex Garret" आणि 6 पेक्षा अधिक 25 पेक्षा कमी अक्षरे असलेला पासवर्ड लिहा.
04:44 "Register" वर क्लिक करा. आपल्याला एरर मिळाली आहे! बघू या.
04:50 एरर आहे.... - जर पासवर्डची string length 25पेक्षा अधिक असेल.....
04:56 ...किंवा पासवर्डची string length 6पेक्षा कमी असेल.... तर पासवर्ड एको करणे पुरेसे आहे- पण आपल्याला तीच अडचण येत आहे.
05:05 माझ्या लक्षात आले की पासवर्डची व्हॅल्यू encrypted आहे. आणि md5 ने encryptकेलेली string खूप मोठी आहे. ती 25 अक्षरांपेक्षा जास्त आहे.
05:19 आता आपल्याला हा block of code,जो encrypt करत आहे तो येथून काढून "register the user" च्या खाली लिहू.
05:31 यावरून कळेल की गोष्टींचा क्रम महत्त्वाचा असतो. अशा एरर्स मिळाल्यास तुमचा कोड नीट तपासा. म्हणजे नेमके काय करत आहात ते कळेल.
05:43 चुका शोधण्यासाठी युजर्स कोडच्या मधे गोष्टी एको करून पहात असतात.
05:49 मी आता फॉर्मवर परत जाऊन योग्य लांबीचा पासवर्ड टाईप करत आहे.
05:56 "Register" वर क्लिक करा. आपल्याला "Success" मेसेज मिळाला आहे.
06:03 कोड तपासल्यामुळे अडचण सोडवण्यास मदत होऊ शकते.
06:07 ही चूक माझ्या पटकन लक्षात आली पण कधीकधी व्हिडिओ pauseकरून मला चुका शोधाव्या लागतात. पण दर्शकांना ताटकळत ठेवणे योग्य नाही.
06:20 तुम्हालाही चुका समजतील. आपल्याला "Success" मिळाला आहे. कमेंट लिहा "open database".
06:29 टाईप करा, variable connect equal to my "sql connect".
06:37 आणि लोकल होस्ट सर्व्हर म्हणजेच माझ्या संगणकाला कनेक्ट करत आहे, पुढे root आणि password काही नाही.
06:45 टाईप करा " mySQL select db". हे आपला डेटाबेस सिलेक्ट करेल. समजण्यासाठी "select data base" ही कमेंट टाईप करू.
06:55 अर्थातच येथे php login आहे जे आपल्या डेटाबेसचे नाव आहे. येथे query लिहू.
07:04 टाईप करा variable query reg equal to mysql_query".
07:11 हा ह्या पाठाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जेथे व्हॅल्यूज भरून आपले युजरनेम रजिस्टर करतो.
07:18 येथे खाली जाऊ म्हणजे नीट दिसेल. लिहा "INSERT INTO users". आपण पाहिले तर "php login" डेटाबेस निवडला आहे. हे आपले टेबल आहे. त्यामुळे "mySQL select db php login".
07:38 आपण डेटाबेसमधील "users" टेबलमधे डेटा समाविष्ट करत आहोत .
07:44 आणि पुढे लिहा values कंसात टेबलमधील प्रत्येक व्हॅल्यू म्हणजेच टेबलमधे उपलब्ध असलेले प्रत्येक फिल्ड.
07:52 त्यासाठी मागे जाऊन structure वर क्लिक करा. आपल्याला id, name, username, password, date दिसत आहेत. म्हणजे 1 2 3 4 5.
08:05 येथेही 1 2 3 4 5 फिल्डस आवश्यक आहेत. id हे ऑटो इन्क्रीमेंट करेल. ह्याबद्दल आपण मागील पाठात पाहिले होते.
08:14 येथे क्रम अतिशय महत्त्वाचा आहे.
08:18 आपले name, username, password, date मिळाले आहे. येथे name, username, passwordआहे. repeat password नको. तो फक्त तपासण्यासाठी आहे. आणि ही date असणार आहे.
08:33 येथे ही व्हेरिएबल्स आहेत. जर खात्री नसेल तर आपण येथून fullname, username, password आणि date घेऊ शकतो.
08:44 हे बदलून fullname करा. आता ह्याने काम व्हायला हवे. नंतर "You have been registered" असे एको करणार आहोत. याऐवजी "die" फंक्शन वापरू.
08:57 त्यामधे "You have been registered return to login page" मेसेज लिहू. युजरला login करता यावे यासाठी index page वर नेणारी लिंक बनवू.
09:10 हे काही सेकंदात कार्यान्वित होत असल्याचे दिसेल. हे आपले आधीचे पेज आहे.
09:16 लिहा "Alex Garret". "alex" हे युजरनेम आणि हा पासवर्ड. "You have been registered. Return to login page" दिसेल.
09:26 आता डेटाबेस तपासण्यासाठी "browse" वापरू. आपल्याला दिसेल की "Alex Garret", आपला id 3 आणि युजरनेम "alex" आहे.
09:37 आपला पासवर्ड encrypted असून ही आपली date आहे.
09:42 ठीक आहे. पुढील भागात आणखी काही छोट्या गोष्टी एकत्र करू आणि login processची चाचणी घेऊ.
09:50 पुन्हा भेटू. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आवाज रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana