Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/PHP-String-Functions-Part-2/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': String Functions part-2 '''Author: Manali Ranade''' '''Keywords: '''PHP-and-MySQL {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <cente…')
 
Line 8: Line 8:
  
 
{| style="border-spacing:0;"
 
{| style="border-spacing:0;"
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Time</center>
 
! <center>Narration</center>
 
! <center>Narration</center>
  

Revision as of 11:51, 18 July 2014

Title of script: String Functions part-2

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Time
Narration
0:00 String Functions पाठाच्या दुस-या भागात स्वागत.
0:03 String Reverse ने सुरूवात करून नंतर बाकीची फंक्शन बघू.
0:08 स्ट्रिंग रिव्हर्स s-t-r-revअसे लिहिले जाते.
0:11 strrev हे string ला उलट्या बाजूने लिहिते.
0:20 जर 'Hello' उलट बाजूने लिहिला तर असा दिसेल "o-l-l-e-H".
0:30 हे काही ठिकाणी उपयोगी होऊ शकते. परंतु आपण हे फार वापरणार नाही.
0:36 एखादी स्ट्रिंग उलट लिहिण्यासाठी हे फंक्शन वापरतात.
0:41 असे हे उपयोगी आणि मजेदार फंक्शन आहे.
0:45 पुढे काही फंक्शन्सचा संच बनवला आहे. तो म्हणजे str to lower आणि str to upper.
0:54 ह्याचा अर्थ string to lower case आणि string to upper case असा आहे.
0:58 आपल्याकडे 'HELLO' ही स्ट्रिंग आहे, str to lower हे फंक्शन त्यावर वापरून एको करून स्ट्रिँग ची वॅल्यू दाखवू.
1:12 कॅपिटल लेटर्समधे लिहिलेले 'HELLO' आता lowercase मधे दिसेल.
1:15 तसेच जर 'hello' स्मॉलकेसमधे असेल आणि,
1:21 आपण str to upper असे लिहिले तर आपली स्ट्रिंग uppercase मधे मिळेल.
1:31 user-registration करताना हे उपयोगी होते.
1:35 आपल्याकडील वेबसाईटमधे userला registerकरताना युजरनेम नेहमी lowercase string मधे संचित करावे.
1:49 कारण जर मी युजरनेम सबमिट केले - हे काढून टाकू...
1:55 काही लोक असे करतात - टाईप करा variable user name equals to 'ALEX'.
2:01 आणि मी काही अक्षरे येथेच uppercase आणि smallcase मधे समाविष्ट करत आहे.
2:07 नाव वेगळ्याप्रकारे दिसण्यासाठी काहीजण असे लिहितात.
2:13 पण जर मी अशा मिश्र केसमधे युजरनेम लिहिले तर गोंधळ होण्याचा संभव असतो.
2:19 आपल्याकडे युजरनेमसाठी वेगळा पॅटर्न आहे.
2:23 त्यासाठी usernameहे str to lower फंक्शन वापरून नंतर संचित करू.
2:29 हे युजरनेम डेटाबेसमधे संचित केले जाईल.
2:33 loginकरताना युजरने दिलेले युजरनेम लोअरकेसमधे बदलून त्याची तुलना संचित केलेल्या लोअरकेस मधील युजरनेमशी करू शकतो.
2:48 आपण हे घेऊन त्याची lowercase value डेटाबेसमधे संचित करतो. त्याची तुलना टाईप केलेल्या व्हॅल्यूच्या लोअरकेसशी करतो.
2:58 त्यामुळे ह्यात चुका होत नाहीत आणि युजर्स त्यांची नावे चुकत नाहीत.
3:07 हे पासवर्डसाठी देखील करू शकतो.
3:14 आता पुढील फंक्शन पाहू.
3:22 Sub-string count. हे एखाद्या स्ट्रिंगमधे, दिलेली Sub-string किती वेळा येते हे तपासून मोजते.
3:31 येथे टाईप करा variable search equal to "My name is alex. What is your name?"
3:37 ही आपली स्ट्रिंग आहे.
3:41 जर sub-string count एको करायचा असेल,
3:49 हे sub-string-count फंक्शन आहे आणि आपल्याला ही 'search' string शोधायची आहे.
4:01 जी स्ट्रिंग शोधायची आहे ती लिहिणार आहोत. variable result मधे हा count ठेवू म्हणजे integer व्हॅल्यू मिळेल.
4:12 एखादा शब्द 1.2 वेळा उपलब्ध आहे असे उदाहरण मिळणार नाही.
4:20 तसेच variable result आपल्याला t-w-o असे रिटर्न करणार नाही. हे त्याच्या रूपात integer 2 उत्तर देईल.
4:30 उदाहरणार्थ 'alex' किती वेळा आला ते पाहण्यासाठी substring count वापरता येईल.
4:36 नंतर ते स्वतः एकोही करेल.
4:39 येथे 'alex' एकदाच असल्याचे दिसेल.
4:44 हे रिफ्रेश करू. 1 हे आऊटपुट दिसेल.
4:46 जर 'name' शब्द शोधायचा असेल तर तो येथे आणि येथेही आला आहे.
4:52 रिफ्रेश केल्यावर 2 ही व्हॅल्यू मिळाली पाहिजे.
4:55 काही optional parameters पाहू. स्ट्रिंगमधे सुरूवात कुठे करायची आणि शेवट कुठे करायचा.
5:02 हे करून पाहू.
5:05 समजा पहिल्या name नंतर शोध सुरू करायचा आहे.
5:11 म्हणजेच 0 1 2 3 4 5 6.
5:14 आपल्याला 7 पासून पुढे name हा शब्द शोधायचा आहे.
5:19 name शब्द 7 पासून पुढे आणि हायलाईट केलेल्या निळ्या रंगातील भागात शोधायचा आहे.
5:25 आपल्याला 1 हा रिझल्ट दाखवेल.
5:28 स्ट्रिंगमधे कुठपर्यंत शोधायचे तेही स्पष्ट करू शकतो.
5:30 येथे ते लिहू.
5:33 हे 7आहे. पुढे 8 9 10 11 12 13 14 15 16.
5:43 7 पासून 17पर्यंत कार्य करते का पाहू.
5:46 हे शून्य दाखवत आहे. 7 पासून 17 पर्यंत म्हणजेच येथपासून येथपर्यंत शून्यवेळा 'name' शब्द मिळाला.
5:55 जर 'alex' शब्द शोधला तर तो एकदा मिळेल.
6:01 अशाप्रकारे हे substring count फंक्शन आहे.
6:07 पुढचे substring replace ही तसेच आहे.
6:12 हे तेच फंक्शन नसले तरी स्ट्रिंगमधे बदल करू शकतो हा एक फायदा आहे.
6:18 replace टॅग्ज आहेत- My name is alex. मी पूर्णविराम मुद्दामहून समाविष्ट केला आहे.
6:28 पुढे variable result is equal to substring underscore replace.
6:33 आपल्याला variable replace मधे बदल करायचा आहे.
6:41 'alex' च्या जागी 'billy' लिहायचे आहे.
6:48 प्रथम ही अक्षरे आणि त्यातील स्पेस मोजू. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11पासून ...
7:01 मी पुन्हा मोजत आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11 पासून 14 पर्यंत.
7:14 आता 'alex' च्या जागी 'billy' लिहिले गेले पाहिजे.
7:19 रिप्लेस करून रिफ्रेश करू.
7:21 आपण रिझल्टecho केलेला नाही.
7:23 तो echo करून रिफ्रेश करू.
7:26 my name is billy असे मिळायला हवे.
7:30 येथे 12 आणि येथे 15असायला हवे.
7:34 खरे तर येथे 10 आणि 14 असायला हवे.
7:38 हे अजूनही बरोबर नाही. आपल्याला पूर्णविराम मिळालेला नाही.
7:43 येथे 11 आणि 14 करून बघू.
7:49 तरीही पूर्णविराम का मिळालेला नाही?
7:52 तरीही तुम्हाला समजले असेल अशी आशा करतो.
7:55 आपण सुरूवातीची आणि शेवटची व्हॅल्यू देऊन स्ट्रिंगमधे काहीही रिप्लेस करू शकतो.
7:59 हे तुम्ही मोजून बघा.
8:04 मोजताना माझ्या चुका होत आहेत.
8:09 येथे दिलेली स्ट्रिंग विशिष्ट व्हॅल्यूने बदलत आहोत.
8:14 ही सुरूवातीची आणि ही शेवटची व्हॅल्यू आहे.
8:17 ह्या पाठासाठी एवढेच.
8:19 अजून अनेक स्ट्रिंग फंक्शन आहेत ती 'google' वर शोधू शकता.
8:24 'php string functions' असे शोधल्यास अनेक फंक्शन मिळतील.
8:28 एखाद्या विशिष्ट गोष्टीसंबंधीचे फंक्शन उपलब्ध असू शकते.
8:33 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana