OpenModelica/C2/Arrays-in-Modelica/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:29, 26 April 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Arrays वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - array व्हेरिएबल्स कसे घोषित करायचे, arrays कसे बनवायचे, for आणि while लूप्स कसे वापरावे आणि OMShell कसे वापरावे.
00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 वापरत आहे.
00:26 आपण ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग करू शकता.
00:32 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी, कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेमध्ये आपल्याला arrays चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:40 Modelica मध्ये class कसे परिभाषित करायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
00:50 Vector हा एक डायमेन्शनल array आहे.
00:53 त्यात एक इंडेक्स आहे.
00:55 वेक्टर घोषित करण्यासाठी Syntax दर्शविले आहे.
00:59 दाखवलेली उदाहरणे व्हेक्टर व्हेरिएबल a ची घोषणा करतात, ज्याची साईज 2 आहे.
01:05 एक व्हेक्टर कर्ली ब्रैसेसमध्ये समाविष्ट करून बनविले जाऊ शकते.
01:11 हे उदाहरण एक vector पॅरामीटर a सहित 2 आणि 3 ला त्याच्या एलिमेन्ट्सच्या रूपात परिभाषित करते.
01:19 vector चे एलिमेन्ट्स एक्सेस करण्यासाठी, indexing समजून घेणे आवश्यक आहे.
01:25 vector indexing साठी सिन्टेक्स दाखवले गेले आहे.
01:29 Vector indexing हे 1 ने सुरू होते आणि Indices पूर्णांक (integers)असणे आवश्यक आहे.
01:35 polynomialEvaluatorUsingVectors नावाचे फंक्शन बनवू.
01:41 हे फंक्शन polynomialEvaluator फंक्शनचे एक एक्सटेंशन आहे जे मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चिले होते.
01:49 आपण polynomialEvaluator च्या a,b आणि c ची पॅरामीटर्स वेक्टर a शी बदलणार आहोत.
01:58 कृपया आमच्या Code Files लिंकवर उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्स डाऊनलोड करा आणि सेव्ह करा.
02:05 आपल्या सोयीसाठी, polynomialEvaluator फंक्शनदेखील उपलब्ध आहे.
02:12 आता मी हे फंक्शन प्रदर्शित करण्यासाठी OMEdit वर जाते.
02:17 आता OMEdit, Welcome परस्पेक्टिव्हमध्ये खुले आहे.
02:21 मी सर्व आवश्यक फाईल्स उघडल्या आहेत.
02:25 लक्षात ठेवा की, खालील क्लास किंवा फंक्शन्स आता OMEdit मध्ये खुले आहेत : functionTester, matrixAdder, polynomialEvaluator आणि polynomialEvaluatorUsingVectors.
02:42 आता, ते पाहण्यासाठी मी त्या प्रत्येक आयकॉनवर डबल क्लिक करते.
02:49 चांगल्या दृश्यतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे स्थानांतरित करते.
02:56 polynomialEvaluator टॅबवर जा.
03:00 ते Text View मध्ये उघडा.
03:03 ह्या function वर अधिक माहितीसाठी, मागील ट्युटोरिअल पाहा.
03:09 मी polynomialEvaluatorUsingVectors वर जाते. हे Text View मध्ये उघडा.
03:16 Input आणि output व्हेरिएबल्स, polynomialEvaluator फंक्शनप्रमाणेच आहेत.
03:23 polynomialEvaluator चे a,b आणि c पॅरामीटर्स, वेक्टर a शी बदलले आहेत.
03:32 ह्या वेक्टरची साईज 3 आहे.
03:36 दाखवल्याप्रमाणे ह्या वेक्टरचे एलिमेंट्स कर्ली ब्रेसेसमध्ये समाविष्ट केले आहेत.
03:42 एलिमेंट्स comma ने वेग वेगळे केले आहेत.
03:46 assignment स्टेटमेंटमध्ये a वेक्टरचे एलिमेंट्स, त्यांचे निर्देशक वापरून एक्सेस केले जातात.
03:54 a[1] हा वेक्टरचा a पहिला एलिमेंट आहे.
03:59 त्याचप्रमाणे, वेक्टर a चा दुसरा एलिमेंट आणि तिसरा एलिमेंटही एक्सेस केला गेला आहे.
04:08 आता मी functionTester टॅबवर जाते.
04:13 ते Text View मध्ये उघडा.
04:16 हा क्लास functionTester क्लाससारखाच आहे ज्याची आपण मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चा केली होती.
04:24 z हे Real व्हेरिएबल आहे.
04:27 polynomialEvaluatorUsingVectors फंक्शनला 10 युनिट्सच्या input आर्ग्युमेंटसह कॉल केले जाते.
04:35 ह्या फंक्शनद्वारे मिळणारी वॅल्यू z प्रमाणे आहे.
04:40 आता मी हा क्लास सिम्युलेट करते.
04:43 Simulate बटणावर क्लिक करा.
04:46 पॉप अप विंडो बंद करा.
04:49 variables ब्राऊझरमध्ये z निवडा.
04:53 हे लक्षात घ्या की z ची वॅल्यू, x = 10 वर f(x) च्या समान आहे.
05:00 हे प्लॉट polynomialEvaluator फंक्शनमध्ये दाखवलेल्या केसप्रमाणे आहे.
05:07 आता मी z डी-सिलेक्ट करते आणि रिझल्ट डिलीट करते.
05:13 Modeling perspective वर पुन्हा जा.
05:16 आता मी स्लाईड्सवर जाते.
05:19 for लूप स्टेटमेंट्सची पुनरावृत्ती करण्यासाठी वापरले जाते.
05:24 हे algorithm आणि equation सेक्शन्समध्ये वापरले जाऊ शकते.
05:29 Syntax हे, for लूपसाठी एका उदाहरणसह दाखवले गेले आहे.
05:34 for लूप कसे वापरायचे हे सादर करण्यासाठी मी OMEdit वर परत जाते.
05:40 polynomialEvaluatorUsingVectors टॅबवर क्लिक करा.
05:45 assignment स्टेटमेंटमध्ये fx साठी, आपण वेक्टर a च्या एलिमेंट्स एक्सेस करत आहोत.
05:52 हे for लूप वापरूनदेखील करता येऊ शकते.
05:55 आता algorithm सेक्शनमध्ये, for लूप कसे समाविष्ट करावे ते पाहू.
06:01 सर्वप्रथम, सुरुवातीस आणि शेवटी डबल स्लॅश घालून fx साठी असाईनमेंट स्टेटमेंट कमेंट करा.
06:10 Ctrl+S दाबून हे फंक्शन सेव्ह करा.
06:15 प्रविष्ट केला जाणारा for लूप, for-loop.txt नावाच्या एका टेक्स्ट फाईलमध्ये देण्यात आला आहे.
06:23 हे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मी gedit वापरून ही फाईल उघडली आहे.
06:29 विंडोज वापरणारे, हे उघडण्यासाठी notepad किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
06:35 मी gedit वर जाते.
06:38 Ctrl+C दाबून सर्व स्टेटमेन्ट्स कॉपी करा.
06:44 OMEdit वर परत जा.
06:46 Enter दाबा. Ctrl + V दाबून सर्व स्टेटमेन्ट्स पेस्ट करा.
06:53 Ctrl + S दाबून हे फंक्शन सेव्ह करा.
06:57 आता मी ह्या लूपचे प्रत्येक स्टेटमेंट समजावून सांगते.
07:02 लूप सुरू होण्याआधी हे स्टेटमेंट शून्याच्या प्राथमिक व्हॅल्यूला fx लागू करते.
07:09 येथे, i लूप काऊंटर म्हणून कार्य करते.
07:12 i ची वॅल्यू 3 होईपर्यंत लूप रन होते.
07:16 हे वापरले जाण्यापूर्वी i घोषित करणे आवश्यक नाही.
07:21 मी थोडे खाली स्क्रोल करते.
07:24 हे स्टेटमेंट वारंवार polynomial f(x) च्या टर्म्स जोडते.
07:30 polynomialEvaluator फंक्शनवरील चर्चा करताना Polynomial f(x) ची चर्चा झाली आहे.
07:37 हे स्टेटमेंट for लूपची समाप्ती दर्शविते.
07:41 आता हे फंक्शन पूर्ण झाले आहे.
07:44 ह्या फंक्शनची चाचणी करण्यासाठी, आपण क्लास functionTester वापरू.
07:49 मी ह्या फंक्शनमध्ये class साठी काहीही बदल केले नाहीत.
07:54 टूलबारमधील Simulate बटण दाबून मी हा क्लास सिम्युलेट करते.
07:59 variables browser मध्ये z निवडा.
08:03 लक्षात घ्या की, z ची वॅल्यू ही फंक्शनमध्ये बदल झाल्यानंतरदेखील समान राहते.
08:10 मी z डी-सिलेक्ट करून रिझल्ट डिलीट करते.
08:14 Modeling perspective वर परत जा.
08:17 आता मी पुन्हा एकदा स्लाईड्सवर परत जाते.
08:21 while लूपचा वापर स्टेटमेंटला पुनरावृत्त करण्यासाठी केला जातो, जोपर्यंत एखादी दिलेली स्थिती समाधानकारक होत नाही.
08:27 equation सेक्शनमध्ये while लूप वापरू शकत नाही.
08:31 while च्या तुलनेने for लूपचा वापर Modelica मध्ये वारंवार केला जातो.
08:37 आता Arrays बद्दल चर्चा करू.
08:40 multi-dimensional डेटा प्रदर्शित करण्यासाठी Arrays वापरले जातात.
08:44 vector नोटेशन वापरून ते तयार करता येऊ शकते.
08:48 array घोषित करण्यासाठी आणि इंडेक्सिंगसाठी Syntax दाखवले आहे.
08:55 array बनविण्याविषयी आणि इंडेक्सिंगविषयी अधिक जाणण्यासाठी,
09:00 मी matrixAdder नावाचा क्लास लिहिते, जो mySum देण्यासाठी myMatrix आणि adder matrices जोडतो. myMatrix आणि adder matrices दर्शविल्याप्रमाणे आहेत.
09:14 आता मी matrixAdder क्लास सादर करण्यासाठी OMEdit वर जाते.
09:19 हे आधीपासून OMEdit मध्ये उघडलेले आहे.
09:23 matrixAdder टॅबवर क्लिक करा.
09:26 ते Text view मध्ये उघडा.
09:29 myMatrix हा एक Real पॅरामीटर अॅरे आहे.
09:33 स्क्वेर ब्रॅकेटमधील संख्या, ह्या array ची साईज दर्शवितो.
09:39 पहिल्या डायमेन्शनची साईज 3 आहे.
09:42 याचप्रकारे दुसऱ्या डायमेंशनची साईज 2 आहे.
09:46 myMatrix अॅरेची निर्मिती प्रत्येक दोन एलिमेंट्सच्या तीन वेक्टर्सचा उपयोग करून केली आहे.
09:53 {1,2} प्रथम वेक्टर
09:57 {3,4} दुसरा वेक्टर आणि
10:00 {5,6} तिसरा वेक्टर प्रदर्शित करतो.
10:04 ह्या प्रत्येक वेक्टरची साईज ह्या अॅरेच्या दुसऱ्या डायमेंशनच्या साईजइतकी आहे.
10:11 म्हणून, myMatrix च्या दुसऱ्या डायमेंशनची साईज 2 आहे.
10:16 वेक्टरची संख्या प्रथम डायमेंशनच्या साईजइतकी आहे. म्हणून पहिल्या डायमेंशनची साईज 3 इतकी आहे.
10:25 adder मॅट्रिक्स समान पद्धतीने तयार केले आहे.
10:29 हे दोन arrays किंवा matrices जोडण्यासाठी आपल्याला दोन डायमेंशनमधील एलिमेन्ट्स एक्सेस करणे आवश्यक आहे.
10:35 त्यामुळे nested for लूप आवश्यक आहे.
10:40 हे for लूप प्रथम डायमेंशनने रन होते.
10:44 त्याचप्रमाणे हे for लूप दुसऱ्या डायमेंशनने रन होते.
10:49 मी थोडे खाली स्क्रोल करते.
10:52 myMatrix आणि adder matrices चे संबंधित एलिमेंट्स mySum साठी जोडले गेले आहेत.
11:00 हे स्टेटमेन्ट प्रत्येक for लूपची समाप्ती दर्शवते. क्लास आता पूर्ण झाला आहे.
11:07 मी Simulate बटणावर क्लिक करून ते सिम्युलेट करते.
11:11 आढळल्यास पॉप अप विंडो बंद करा.
11:15 मी variables कॉलम विस्तारित करते.
11:18 adder[1,1], myMatrix[1,1], आणि mySum[1,1] निवडा.
11:25 लक्षात घ्या की adder[1,1] plus myMatrix[1,1] हे mySum[1,1] देते, ह्याचा अर्थ असा होतो की रिझल्ट अचूक आहे.
11:35 मी ते डी-सिलेक्ट करते आणि रिझल्ट डिलीट करते.
11:40 मी पुन्हा स्लाईड्सवर जाते.
11:43 असाईनमेंट म्हणून, वेक्टरमध्ये एलिमेंट्सची क्रमवारी बदलण्यासाठी vectorReversal नावाचे एक फंक्शन लिहा.
11:51 त्याचप्रमाणे, मेट्रिक्सच्या प्रत्येक ओळीतील एलिमेंट्सची क्रमवारी बदलण्यासाठी matrixReversal नावाचे फंक्शन लिहा.
12:00 हे दोन फंक्शन्स तपासण्यासाठी functionTester क्लास लिहा.
12:05 ह्यासह आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:09 कृपया खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial . हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला सारांशित करतो.
12:15 आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
12:21 जर तुम्हांला ह्या स्पोकन ट्युटोरिअलशी संबंधित प्रश्न असतील, तर कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
12:28 आम्ही लोकप्रिय पुस्तकांची सोडवलेल्या उदाहरणांचे कोडींगचे समन्वय करतो.
12:33 आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
12:39 आम्ही वाणिज्यिक सिम्युलेटर लॅब OpenModelica वर स्थलांतरित करण्यास मदत करतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
12:48 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.
12:55 त्यांनी दिलेल्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
13:00 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana