Difference between revisions of "Netbeans/C2/Netbeans-Debugger/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
|  00.02  
 
|  00.02  
|  '''Netbeans Debugger''' वरील पाठात स्वागत.
+
|  '''Netbeans Debugger'''(नेटबीन्स डिबगर) वरील पाठात स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 29: Line 29:
 
|-
 
|-
 
|  00.31  
 
|  00.31  
|  '''debugging''' टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.
+
|  '''debugging'''(डिबगिंग) टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  00.39  
 
|  00.39  
|  '''debugging''' टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते,  
+
|  '''debugging'''(डिबगिंग) टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते,  
  
 
|-
 
|-
Line 49: Line 49:
 
|-
 
|-
 
|  00.55  
 
|  00.55  
|  '''debugging''' विंडो,
+
|  '''debugging'''(डिबगिंग) विंडो,
  
 
|-
 
|-
 
|  00.58  
 
|  00.58  
|  breakpoints निश्चित करणे,
+
|  breakpoints(ब्रेक पॉइण्ट्स ) निश्चित करणे,
  
 
|-
 
|-
 
|  01.00  
 
|  01.00  
|  समीकरणे तपासणे आणि watches सेट करणे,
+
|  समीकरणे तपासणे आणि watches(वॉचस ) सेट करणे,
  
 
|-
 
|-
Line 77: Line 77:
 
|-
 
|-
 
|  01.20  
 
|  01.20  
|  आपण ह्या पाठासाठी आधीच IDE मधे '''sampleDebug''' हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे.
+
|  आपण ह्या पाठासाठी आधीच IDE मधे '''sampleDebug'''(सॅम्पल डिबॉग) हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे.
  
 
|-
 
|-

Revision as of 15:52, 18 May 2014

Time Narration
00.01 नमस्कार.
00.02 Netbeans Debugger(नेटबीन्स डिबगर) वरील पाठात स्वागत.
00.06 तुम्ही Netbeans पहिल्यांदा वापरत असल्यास सुरूवातीचे पाठ स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटवर पहा.
00.14 ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v12.04,
00.21 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
00.26 आपण जाणतो की प्रोग्रॅम डिबग करण्याचे काम काळजीपूर्वक करावे लागते.
00.31 debugging(डिबगिंग) टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.
00.39 debugging(डिबगिंग) टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते,
00.42 विशेषतः मोठा कोड लिहिताना किंवा तपासताना.
00.46 या पाठात Netbeans Debugger ने प्रदान केलेली काही फीचर्स जाणून घेऊ.
00.53 येथे पाहू,
00.55 debugging(डिबगिंग) विंडो,
00.58 breakpoints(ब्रेक पॉइण्ट्स ) निश्चित करणे,
01.00 समीकरणे तपासणे आणि watches(वॉचस ) सेट करणे,
01.04 तुमच्या कार्यान्वित प्रोग्रॅमचा वेध घेण्याचा पर्याय,
01.07 आणि debugger कॉनफिगर करण्याचे उपलब्ध पर्याय.
01.12 आता सुरूवात करू आणि हा सँपल कोड debug करू.
01.17 Netbeans IDE वर जाऊ.
01.20 आपण ह्या पाठासाठी आधीच IDE मधे sampleDebug(सॅम्पल डिबॉग) हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे.
01.27 a, b, आणि cना प्राथमिक व्हॅल्यूज देण्याचा हा छोटा प्रोग्रॅम आहे .
01.35 हे 'Hello World!' आणि 'a' ची व्हॅल्यू प्रिंट करेल.
01.40 तसेच हे 'SampleClass' नावाचे क्लास ऑब्जेक्ट तयार करेल. त्याची व्हॅल्यू पूर्णांक प्रकारची आणि private असेल.
01.52 नंतर हे 'b' ची व्हॅल्यू काढेल,
01.55 आणि c ची व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शन कॉल करेल,
02.00 आणि 'b' व 'c' च्या व्हॅल्यूज प्रिंट करेल.
02.05 debugging ची सुरूवात breakpoint सेट करण्याने करू.
02.09 त्यासाठी लाईन नंबरवर क्लिक करा.
02.13 Hello World! प्रिंट करणा-या ओळीवर सेट करू.
02.18 ब्रेकपॉईंट सेट केलेल्या ओळीचा रंग गुलाबी झाला आहे. आणि ओळीचा नंबर छोट्या चौकोनाने मार्क केला गेला आहे.
02.28 debugging मोड मधे टूलबारवरील
02.31 Debug Project बटण क्लिक करून प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर,
02.35 breakpoint असलेल्या ओळीवर येऊन प्रोग्रॅम कार्यान्वित होणे थांबेल.
02.41 आत्तापर्यंत 'a' ची व्हॅल्यू सेट केलेली आहे.
02.45 व्हॅल्यू तपासण्यासाठी कर्सर 'a' वर न्या.
02.49 येथे 10 ही व्हॅल्यू दाखवत आहे .
02.52 वर्कस्पेस खाली आणखी एक विंडो उघडली आहे.
02.59 तिथे 'Variables' विंडो आहे जी व्हेरिएबल्स आणि त्यांच्या व्हॅल्यूजची सूची दाखवते.
03.07 आत्तापर्यंत केवळ 'a' व्हेरिएबलला प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
03.11 sample debug चे आऊटपुट असलेली 'Output' विंडो देखील पाहू शकतो .
03.17 तिथे अजून आऊटपुट नाही.
03.19 तसेच 'Debugger Console' ' दाखवत आहे की प्रोग्रॅम 29 व्या ओळीवरील ब्रेकपॉईंटला थांबला आहे.
03.28 तसेच 'Breakpoints' विंडो 29 व्या ओळीवर ब्रेकपॉईंट सेट केल्याचे दाखवत आहे.
03.36 पुढे जाण्यापूर्वी watch कसे समाविष्ट करायचे ते पाहू.
03.40 उदाहरणार्थ समजा 'aSample' ह्या पूर्णांक व्हॅल्यूवर watch हवा आहे.
03.48 वर्कस्पेसखालील 'Variables' विंडोमधे, Enter new Watch पर्यायावर डबल क्लिक करा आणि व्हेरिएबलला 'aSample.value' नाव द्या.
04.02 OK क्लिक करा .
04.06 अजून 'aSample' बनले नसल्यामुळे ते त्याची व्हॅल्यू माहित नसल्याचे दाखवत आहे.
04.12 एकदा ही ओळ कार्यान्वित झाली की ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू समजेल.
04.16 अशाच प्रकारे पदावली, वॉच करून त्यांचे मूल्यमापन देखील करू शकतो.
04.21 येथे b=a+10 साठी तपासू.
04.25 a-4 किती ,ते बघायचे असेल तर काय करता येईल?
04.29 त्यासाठी मेनूबारवरील Debug मेनूमधे जाऊन Evaluate expression पर्याय सिलेक्ट करा.
04.37 workspace मधे 'Evaluate Code' विंडो उघडेल.
04.41 येथे 'a-4' ही पदावली लिहा.
04.45 Evaluate Expression बटणावर क्लिक करा. Variable विंडो 'a-4' ची व्हॅल्यू 6 दाखवत आहे.
04.56 आता पुढे एका ओळीचा कोड कार्यान्वित करू.
05.00 त्यासाठी टूलबारवरील Step-Over बटण निवडा.
05.06 हे केवळ “Hello World” प्रिंट करणारा एका ओळीचा कोड कार्यान्वित करेल.
05.12 आऊटपुट बघण्यासाठी आऊटपुट विंडोवर जाऊन sampleDebug आऊटपुटवर जा.
05.17 Hello World! a is 10 हे आऊटपुट दिसेल.
05.22 आता प्रोग्रॅम SampleClass ऑब्जेक्ट बनवण्यासाठी त्या ओळीवर थांबला आहे.
05.28 आता SampleClassच्या कन्स्ट्रक्टर मधे जायचे आहे.
05.32 त्यासाठी टूलबारवरील Step Into पर्याय निवडा.
05.41 नंतर Step Over सिलेक्ट करा. कन्स्ट्रक्टर कॉलमधे आलेली व्हॅल्यू आता 10 वर सेट झाली आहे.
05.51 तुम्ही व्हेरिएबलवर कर्सर नेऊन देखील तपासू शकता.
05.55 पुन्हा Step Over सिलेक्ट केल्यावर this.variable देखील 10वर सेट झाले आहे.
06.03 ह्या फंक्शनमधून बाहेर पडण्यासाठी Continue, Step Over किंवा Step Out पैकी काहीही निवडू शकतो.
06.11 मेथडमधून बाहेर येण्यासाठी Step-Out निवडू.
06.14 जेथून फंक्शन कॉल केले होते तेथे आपण परत आलो आहोत.
06.19 पुन्हा Step-Over केल्यावर aSample.value आता 10 वर सेट झाल्याचे दिसेल.
06.27 जी आपण वॉचसाठी निवडली होती.
06.30 Breakpoints आणि StepOvers व्यतिरिक्त ज्या ओळीवर कर्सर ठेवला आहे तिथे प्रोग्रॅमचे कार्यान्वित होणे थांबवू शकतो.
06.38 उदाहरणार्थ येथे फंक्शनमधे जाऊ. d=b-5असे लिहिलेल्या ओळीवर कर्सर सेट करू .
06.49 टूलबारवरील Run To Cursor पर्याय निवडा.
06.54 प्रोग्रॅम कार्यान्वित होण्यासाठी ह्या फंक्शनमधे जाईल आणि कर्सर जिथे आहे तिथे प्रोग्रॅम थांबल्याचे दिसेल.
07.05 प्रोग्रॅमने bची व्हॅल्यू 20 अशी काढली आहे.
07.10 व्हेरिएबल विंडोमधे 'b' ची व्हॅल्यू 20 वर सेट झाली आहे.
07.14 पुन्हा Step Over निवडू. d ची प्राथमिक व्हॅल्यू 15 अशी होईल.
07.23 आता return निवडू शकतो किंवा प्रोग्रॅम संपूर्ण कार्यान्वित करू शकतो.
07.29 Step Out निवडा आणि फंक्शन कॉलवर परत जा.
07.36 getC() फंक्शनवर कर्सर नेल्यावर फंक्शनने रिटर्न केलेली 15 ही व्हॅल्यू दिसेल.
07.43 व्हेरिएबल 'c' ला अजून व्हॅल्यू प्रदान केलेली नाही.
07.47 त्यामुळे Step Over करून ही ओळ कार्यान्वित करू तेव्हा 'c' ला 15 ही व्हॅल्यू मिळेल.
07.55 व्हेरिएबल विंडोमधे जाऊन किंवा व्हेरिएबलवर कर्सर नेऊन 'c' ची व्हॅल्यू तपासू शकतो.
08.03 debugging सेशन थांबवायचे असल्यास टूलबारवरील Finish Debugger Session पर्याय निवडू.
08.12 पुढील breakpoint पर्यंत कार्य चालू ठेवायचे असेल तर Continue पर्याय निवडा.
08.19 हे पूर्ण झाले की उर्वरित प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी Continue पर्याय निवडता येतो.
08.25 येथे Continue निवडा.
08.27 Output विंडोमधे: b is 20 आणि c is 15 हे आऊटपुट दिसत आहे.
08.34 आता netbeans मधील debugging पर्यायांचा आढावा घेऊ.
08.39 तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स सेट करायची असल्यास,
08.42 Tools मेनूत Options क्लिक करा. Miscellaneous पर्यायावर जाऊन Java Debugger टॅबवर क्लिक करा.
08.53 येथे multi-threaded प्रोग्रॅमसाठी ब्रेकपॉईंट सेटींग पर्याय बदलता येतील.
08.59 किंवा कुठल्या मेथड मधे step in करायचे हे ठरवण्यासाठी फिल्टर्स देता येतील.
09.07 आता असाईनमेंट,
09.09 तुमचा कोणताही एक प्रोग्रॅम घ्या. त्यात आधीपासूनच एरर्स असतील तर अधिक चांगले.
09.16 नसल्यास लॉजिक किंवा अल्गोरिथम संबंधीच्या काही एरर्स समाविष्ट करा.
09.20 कोडमधे ब्रेकपॉईंट सेट करा. ज्या फंक्शनमधे एररची शक्यता आहे ते कॉल करण्याच्या ठिकाणी सहसा ब्रेक सेट करतात.
09.29 फंक्शनमधे जाण्यासाठी Step-Into वापरा.
09.32 ओळी कार्यान्वित करण्यासाठी Step-Overs वापरा आणि variable विंडोमधे त्याच्या व्हॅल्यूज तपासून खात्री करा.
09.41 एरर्स ओळखून दुरूस्त करतांना watches समाविष्ट करा.
09.45 मेथडमधून Step-Out करा.
09.48 पुढील breakpoint पर्यंत जाण्यासाठी continue वापरा.
09.51 आणि शेवटी debugger सेशन संपवून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा.
09.57 या पाठात netbeans debugger विषयी,
10.02 तसेच breakpoints आणि watches सेट करणे,
10.06 कोड कार्यान्वित होत असताना तपासावयाची पदावली समाविष्ट करणे,
10.11 प्रोग्रॅमचे कार्य ट्रेस करण्यासाठी Step-Into, Step-Over, Step-Out आणि Run-to-Cursor पर्यायांचा आढावा घेतला.
10.19 तसेच डिबगींगसाठी debugger चे ऍडव्हान्स्ड पर्याय कॉनफिगर करायला शिकलो.
10.24 टेस्टिंग आणि डिबगींग करताना ह्या पाठामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.
10.30 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10.33 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.36 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10.41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.46 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.49 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.55 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.59 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
11.05 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.14 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11.18 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana