Netbeans/C2/Netbeans-Debugger/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार,Netbeans Debugger(नेटबिन्स डिबगर) वरील पाठात स्वागत.
00:06 तुम्ही Netbeans(नेटबिन्स ) पहिल्यांदा वापरत असल्यास सुरूवातीचे पाठ स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटवर पहा.
00:14 ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v12.04,
00:21 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
00:26 आपण जाणतो की प्रोग्रॅम डिबग करण्याचे काम काळजीपूर्वक करावे लागते.
00:31 debugging(डिबगिंग) टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.
00:39 debugging(डिबगिंग) टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते,
00:42 विशेषतः मोठा कोड लिहिताना किंवा तपासताना.
00:46 या पाठात Netbeans Debugger(नेटबिन्स डिबगर) ने प्रदान केलेली काही फीचर्स जाणून घेऊ.
00:53 येथे पाहू,
00:55 debugging(डिबगिंग) विंडो,
00:58 breakpoints(ब्रेक पॉइण्ट्स ) निश्चित करणे,
01:00 समीकरणे तपासणे आणि watches(वॉचस ) सेट करणे,
01:04 तुमच्या कार्यान्वित प्रोग्रॅमचा वेध घेण्याचा पर्याय,
01:07 आणि debugger कॉनफिगर करण्याचे उपलब्ध पर्याय.
01:12 आता सुरूवात करू आणि हा सँपल कोड debug(डेबॉग) करू.
01:17 Netbeans IDE वर जाऊ.
01:20 आपण ह्या पाठासाठी आधीच IDE मधे sampleDebug(सॅम्पल डिबॉग) हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे.
01:27 a, b, आणि c ना प्राथमिक व्हॅल्यूज देण्याचा हा छोटा प्रोग्रॅम आहे .
01:35 हे 'Hello World!' आणि 'a' ची व्हॅल्यू प्रिंट करेल.
01:40 तसेच हे 'SampleClass'(सॅम्पल क्लास ) नावाचे क्लास ऑब्जेक्ट तयार करेल. त्याची व्हॅल्यू पूर्णांक प्रकारची आणि private असेल.
01:52 नंतर हे 'b' ची व्हॅल्यू काढेल,
01:55 आणि c ची व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शन कॉल करेल,
02:00 आणि 'b' व 'c' च्या व्हॅल्यूज प्रिंट करेल.
02:05 debugging(डिबगिंग) ची सुरूवात breakpoint( ब्रेकपॉइण्ट) सेट करण्याने करू.
02:09 त्यासाठी लाईन नंबरवर क्लिक करा.
02:13 Hello World! प्रिंट करणा-या ओळीवर सेट करू.
02:18 ब्रेकपॉईंट सेट केलेल्या ओळीचा रंग गुलाबी झाला आहे. आणि ओळीचा नंबर छोट्या चौकोनाने मार्क केला गेला आहे.
02:28 debugging(डिबगिंग) मोड मधे टूलबारवरील
02:31 Debug Project(डिबॉग प्रॉजेक्ट) बटण क्लिक करून प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर,
02:35 breakpoint( ब्रेकपॉइण्ट) असलेल्या ओळीवर येऊन प्रोग्रॅम कार्यान्वित होणे थांबेल.
02:41 आत्तापर्यंत 'a' ची व्हॅल्यू सेट केलेली आहे.
02:45 व्हॅल्यू तपासण्यासाठी कर्सर 'a' वर न्या.
02:49 येथे 10 ही व्हॅल्यू दाखवत आहे .
02:52 वर्कस्पेस खाली आणखी एक विंडो उघडली आहे.
02:59 तिथे 'Variables'(वेरियबल्स) विंडो आहे जी व्हेरिएबल्स आणि त्यांच्या व्हॅल्यूजची सूची दाखवते.
03:07 आत्तापर्यंत केवळ 'a' व्हेरिएबलला प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
03:11 sample debug(सॅम्पल डिबॉग ) चे आऊटपुट असलेली 'Output'(आउटपुट) विंडो देखील पाहू शकतो .
03:17 तिथे अजून आऊटपुट नाही.
03:19 तसेच 'Debugger Console'('डिबगर कॉन्सोल) दाखवत आहे की प्रोग्रॅम 29 व्या ओळीवरील ब्रेकपॉईंटला थांबला आहे.
03:28 तसेच 'Breakpoints' विंडो 29 व्या ओळीवर ब्रेकपॉईंट सेट केल्याचे दाखवत आहे.
03:36 पुढे जाण्यापूर्वी watch कसे समाविष्ट करायचे ते पाहू.
03:40 उदाहरणार्थ समजा 'aSample' ह्या पूर्णांक व्हॅल्यूवर watch हवा आहे.
03:48 वर्कस्पेसखालील 'Variables'(वेरियबल्स) विंडोमधे, Enter new Watch(एंटर न्यू वॉच) पर्यायावर डबल क्लिक करा आणि व्हेरिएबलला 'aSample.value' नाव द्या.
04:02 OK क्लिक करा .
04:06 अजून 'aSample' बनले नसल्यामुळे ते त्याची व्हॅल्यू माहित नसल्याचे दाखवत आहे.
04:12 एकदा ही ओळ कार्यान्वित झाली की ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू समजेल.
04:16 अशाच प्रकारे पदावली, वॉच करून त्यांचे मूल्यमापन देखील करू शकतो.
04:21 येथे b=a+10 साठी तपासू.
04:25 a-4 किती ,ते बघायचे असेल तर काय करता येईल?
04:29 त्यासाठी मेनूबारवरील Debug(डिबॉग) मेनूमधे जाऊन Evaluate expression(इवॅल्यूयेट एक्सप्रेशन) पर्याय सिलेक्ट करा.
04:37 workspace मधे 'Evaluate Code'(इवॅल्यूयेट कोड) विंडो उघडेल.
04:41 येथे 'a-4' ही पदावली लिहा.
04:45 Evaluate Expression(इवॅल्यूयेट एक्सप्रेशन) बटणावर क्लिक करा. Variable(वेरियबल) विंडो 'a-4' ची व्हॅल्यू 6 दाखवत आहे.
04:56 आता पुढे एका ओळीचा कोड कार्यान्वित करू.
05:00 त्यासाठी टूलबारवरील Step-Over(स्टेप-ओवर) बटण निवडा.
05:06 हे केवळ “Hello World” प्रिंट करणारा एका ओळीचा कोड कार्यान्वित करेल.
05:12 आऊटपुट बघण्यासाठी आऊटपुट विंडोवर जाऊन sampleDebug आऊटपुटवर जा.
05:17 Hello World! a is 10 हे आऊटपुट दिसेल.
05:22 आता प्रोग्रॅम SampleClass ऑब्जेक्ट बनवण्यासाठी त्या ओळीवर थांबला आहे.
05:28 आता SampleClass च्या कन्स्ट्रक्टर मधे जायचे आहे.
05:32 त्यासाठी टूलबारवरील Step Into(स्टेप इंटू) पर्याय निवडा.
05:41 नंतर Step Over(स्टेप-ओवर) सिलेक्ट करा. कन्स्ट्रक्टर कॉलमधे आलेली व्हॅल्यू आता 10 वर सेट झाली आहे.
05:51 तुम्ही व्हेरिएबलवर कर्सर नेऊन देखील तपासू शकता.
05:55 पुन्हा Step Over(स्टेप-ओवर) सिलेक्ट केल्यावर this.variable देखील 10 वर सेट झाले आहे.
06:03 ह्या फंक्शनमधून बाहेर पडण्यासाठी Continue(कंटिन्यू), Step Over(स्टेप-ओवर) किंवा Step Out(स्टेप आउट) पैकी काहीही निवडू शकतो.
06:11 मेथडमधून बाहेर येण्यासाठी Step-Out(स्टेप आउट) निवडू.
06:14 जेथून फंक्शन कॉल केले होते तेथे आपण परत आलो आहोत.
06:19 पुन्हा Step-Over(स्टेप-ओवर) केल्यावर aSample.value आता 10 वर सेट झाल्याचे दिसेल.
06:27 जी आपण वॉचसाठी निवडली होती.
06:30 Breakpoints(ब्रेकपॉइण्ट्स ) आणि StepOvers(स्टेपओवर्स ) व्यतिरिक्त ज्या ओळीवर कर्सर ठेवला आहे तिथे प्रोग्रॅमचे कार्यान्वित होणे थांबवू शकतो.
06:38 उदाहरणार्थ येथे फंक्शनमधे जाऊ. d=b-5 असे लिहिलेल्या ओळीवर कर्सर सेट करू .
06:49 टूलबारवरील Run To Cursor(रन टू कर्सर) पर्याय निवडा.
06:54 प्रोग्रॅम कार्यान्वित होण्यासाठी ह्या फंक्शनमधे जाईल आणि कर्सर जिथे आहे तिथे प्रोग्रॅम थांबल्याचे दिसेल.
07:05 प्रोग्रॅमने b ची व्हॅल्यू 20 अशी काढली आहे.
07:10 व्हेरिएबल विंडोमधे 'b' ची व्हॅल्यू 20 वर सेट झाली आहे.
07:14 पुन्हा Step Over(स्टेप ओवर) निवडू. d ची प्राथमिक व्हॅल्यू 15 अशी होईल.
07:23 आता return(रिटर्न) निवडू शकतो किंवा प्रोग्रॅम संपूर्ण कार्यान्वित करू शकतो.
07:29 Step Out(स्टेप आउट) निवडा आणि फंक्शन कॉलवर परत जा.
07:36 getC() फंक्शनवर कर्सर नेल्यावर फंक्शनने रिटर्न केलेली 15 ही व्हॅल्यू दिसेल.
07:43 व्हेरिएबल 'c' ला अजून व्हॅल्यू प्रदान केलेली नाही.
07:47 त्यामुळे Step Over(स्टेप ओवर) करून ही ओळ कार्यान्वित करू तेव्हा 'c' ला 15 ही व्हॅल्यू मिळेल.
07:55 व्हेरिएबल विंडोमधे जाऊन किंवा व्हेरिएबलवर कर्सर नेऊन 'c' ची व्हॅल्यू तपासू शकतो.
08:03 debugging(डिबगिंग) सेशन थांबवायचे असल्यास टूलबारवरील Finish Debugger Session(फिनिश डिबगर सेशन) पर्याय निवडू.
08:12 पुढील breakpoint(ब्रेकपॉइण्ट ) पर्यंत कार्य चालू ठेवायचे असेल तर Continue(कंटिन्यू) पर्याय निवडा.
08:19 हे पूर्ण झाले की उर्वरित प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी Continue(कंटिन्यू) पर्याय निवडता येतो.
08:25 येथे Continue(कंटिन्यू) निवडा.
08:27 Output(आउटपुट) विंडोमधे: b is 20 आणि c is 15 हे आऊटपुट दिसत आहे.
08:34 आता netbeans(नेटबिन्स ) मधील debugging(डिबगिंग) पर्यायांचा आढावा घेऊ.
08:39 तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स सेट करायची असल्यास,
08:42 Tools(टूल्स) मेनूत Options(ऑप्षन्स) क्लिक करा. Miscellaneous(मिसलेनीयस) पर्यायावर जाऊन Java Debugger(जावा डिबगर) टॅबवर क्लिक करा.
08:53 येथे multi-threaded प्रोग्रॅमसाठी ब्रेकपॉईंट सेटींग पर्याय बदलता येतील.
08:59 किंवा कुठल्या मेथड मधे step in करायचे हे ठरवण्यासाठी फिल्टर्स देता येतील.
09:07 आता असाईनमेंट,
09:09 तुमचा कोणताही एक प्रोग्रॅम घ्या. त्यात आधीपासूनच एरर्स असतील तर अधिक चांगले.
09:16 नसल्यास लॉजिक किंवा अल्गोरिथम संबंधीच्या काही एरर्स समाविष्ट करा.
09:20 कोडमधे ब्रेकपॉईंट सेट करा. ज्या फंक्शनमधे एररची शक्यता आहे ते कॉल करण्याच्या ठिकाणी सहसा ब्रेक सेट करतात.
09:29 फंक्शनमधे जाण्यासाठी Step-Into(स्टेप-इंटू) वापरा.
09:32 ओळी कार्यान्वित करण्यासाठी Step-Overs(स्टेप-ओवर्स) वापरा आणि variable(वेरियबल) विंडोमधे त्याच्या व्हॅल्यूज तपासून खात्री करा.
09:41 एरर्स ओळखून दुरूस्त करतांना watches(वॉचस) समाविष्ट करा.
09:45 मेथडमधून Step-Out(स्टेप-आउट) करा.
09:48 पुढील breakpoint( ब्रेकपॉइण्ट ) पर्यंत जाण्यासाठी continue(कंटिन्यू) वापरा.
09:51 आणि शेवटी debugger(डिबगर) सेशन संपवून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा.
09:57 या पाठात netbeans debugger(नेटबिन्स डिबगर) विषयी,
10:02 तसेच breakpoints(ब्रेकपॉइण्ट्स ) आणि watches(वॉचस) सेट करणे,
10:06 कोड कार्यान्वित होत असताना तपासावयाची पदावली समाविष्ट करणे,
10:11 प्रोग्रॅमचे कार्य ट्रेस करण्यासाठी Step-Into(स्टेप-इंटू), Step-Over(स्टेप-ओवर), Step-Out(स्टेप-आउट) आणि Run-to-Cursor(रन-टू-कर्सर) पर्यायांचा आढावा घेतला.
10:19 तसेच डिबगींगसाठी debugger(डिबगर) चे ऍडव्हान्स्ड पर्याय कॉनफिगर करायला शिकलो.
10:24 टेस्टिंग आणि डिबगींग करताना ह्या पाठामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.
10:30 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:33 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:36 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:46 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:49 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:55 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:59 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
11:05 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:14 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11:18 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana