Linux/C2/Basic-Commands/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:20, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Basic commands

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Visual Clue
Narration
0:00 लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
0:05 या ट्युटोरियलमध्ये आपण काही प्राथमिक कमांडस् शिकणार आहोत.
0:10 आपण Ubuntu 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहोत.
0:12 लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी सुरू करायची हे तुम्ही जाणता असे आपण मानू या.
0:17 जर आपल्याला यासंबंधी माहिती हवी असेल तर http://Spoken-Tutorial.org येथील उपलब्ध ट्युटोरियलमध्ये पाहू शकता.
0:26 या ट्युटोरियलमध्ये आपण Command आणि Command Interpreter म्हणजे काय हे पाहणार आहोत.
0:33 नंतर आपण लिनक्समध्ये man या कमांडच्या सहाय्याने मदत कशी मिळवायची ते पाहू.
0:39 आता पहिला प्रश्न, Commands म्हणजे काय?
0:43 साध्या शब्दात सांगायचे तर लिनक्स कमांड म्हणजे असे शब्द की जे टाईप केल्यावर संगणक काही कार्य करतो.
0:52 लिनक्स कमांडस् सामान्यतः चार किंवा त्यापेक्षा कमी अक्षराच्या असतात. जसे की, ls, who, ps इत्यादी.
0:59 कमांडस् या Lowercase मध्ये असतात. तसेच त्या Case Sensetive देखील असतात. आपण उदाहरणाने पाहू या.
1:05 Application Menu मध्ये जा.
1:08 Accessories सिलेक्ट करा आणि त्यात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी Terminal वर क्लिक करा.
1:14 किंवा Terminal Window उघडण्यासाठी कीबोर्डवरील CTRL, ALT आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
1:20 आता आपल्याला Prompt म्हणून कंसात $ आणि त्याच्यापुढे लुकलुकणारा कर्सर दिसेल. इथेच आपल्याला कमांड टाईप करायच्या आहेत.
1:29 who असा शब्द टाईप करा आणि एंटर की दाबा.
1:34 आपण logged in असलेल्या उपयोगकर्त्यांची नावे बघू शकतो. आपण 'who' ही कमांड कार्यान्वित केल्यावर सिस्टीम वर कोण logged in आहे हे दिसते.
1:47 संगणकातील कोणत्या घटकामुळे काही अक्षरांनी बनलेली कमांड कार्यान्वित होते?
1:54 हे Command Interpreter चे काम आहे. त्याला Shell असे म्हणतात.
1:59 Shell हा एक प्रोग्रॅम असून तो आपल्याला आणि लिनक्स सिस्टीमला जोडण्याचे काम करतो.
2:08 तसेच Shell, ऑपरेटिंग सिस्टीमला कार्यरत करण्यासाठी कमांडस् स्वीकारतो.
2:13 लिनक्समध्ये एकापेक्षा जास्त Shell स्थापित केलेले असू शकतात. युजर त्याच्या आवडीप्रमाणे हवा तो Shell वापरू शकतो.
2:22 लिनक्सवर कायम स्वरूपी /bin/sh हे Standard Shell इन्स्टॉल केलेले असते. ज्याला bash म्हणजेच the GNU Bourne-Again SHell म्हणतात. जे GNU Suite of tool मधून घेतले आहे.
2:35 आपण या ट्युटोरियलमध्ये सर्वसामान्य कमांडस् ची माहिती घेणार आहोत. ज्या थोड्याशा फरकांनी बहुतांश सर्व लिनक्स Shells मध्ये वापरता येतात.
2:44 आपण या ट्युटोरियलमध्ये bash या Shell चा उपयोग करणार आहोत.
2:51 कारण bash हे सर्वात लोकप्रिय असलेले shell आहे. आणि जवळजवळ सर्वप्रकारच्या युनिक्सवर वापरता येते.
2:58 इतर वापरल्या जाणा-या shells पुढीलप्रमाणे. Bourne shell जे मुळात Unix shell आहे, C shell आणि Korn shell .
3:08 आपण कोणते Shellवापरत आहोत हे बघण्यासाठी
3:11 Terminal वर जा आणि echo space dollar in capital SHELL अशी कमांड टाईप करून एंटर दाबा.
3:27 साधारणपणे /bin/bash असा आऊटपुट मिळतो. याचा अर्थ आपण bash Shell मध्ये आहोत.
3:34 अनेक पध्दतींनी आपण वेगवेगळे Shells सक्रिय करू शकतो. ज्याबद्दल आपण ऍडव्हान्स ट्युटोरियलमध्ये जाणून घेऊ.
3:42 Commands या Program असलेल्या फाईल्स असतात. ज्या बहुतांशी C Language मध्ये लिहिल्या जातात.
3:47 या फाईल्स डिरेक्टरीमध्ये साठवलेल्या असतात. कमांडस् कुठे साठवलेल्या आहेत हे शोधण्यासाठी आपण type या कमांडचा उपयोग करू शकतो.
3:55 Command Prompt वर type space ps असे टाईप करून एंटर दाबा.
4:03 ps ही फाईल /bin या डिरेक्टरीमध्ये समाविष्ट केलेली आहे असे आपल्याला दिसते.
4:09 जेव्हा आपण Command Prompt वर Command देतो तेव्हा Shell, डिरेक्टरीतील फाईलच्या यादीमध्ये त्या कमांडच्या नावाची फाईल शोधतो.
4:18 ती फाईल सापडली तर त्या फाईलशी संबंधित प्रोग्रॅम कार्यान्वित करतो. नाहीतर Command not found ही error देतो.
4:27 आपण नंतर पाहूच की ज्या डिरेक्टरीजचा शोध घेतला जातो त्यांची यादी PATH या व्हेरिएबल मध्ये असते.
4:34 आता जर आपल्याला ती यादी बघायची असेल तर टाईप कराः echo space dollar कॅपिटल लेटरमध्ये PATH
4:44 आणि एंटर दाबा.
4:52 कमांडस् बद्दल जाणून घेताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहित असणे आवश्यक आहे.
4:57 लिनक्स कमांडस् चे दोन प्रकार आहेत. External command आणि Internal command.
5:02 External commands संबंधीत प्रोग्रॅम्स फाईल्स स्वतंत्र रूपात उपलब्ध असतात.
5:07 लिनक्स मध्ये बहुतांश कमांडस् अशाच प्रकारच्या आहेत. परंतु काही कमांडस् चे कार्य Shell मध्ये लिहिलेले असते. म्हणजेच त्याची स्वतंत्र रूपात फाईल उपलब्ध नसते.
5:18 त्यांना Internal commands म्हणतात.
5:20 echo कमांड ही वास्तवात एक Internal command आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊ.
5:25 Terminal वर जाऊन कमांड टाईप करा.
5:33 type space echoआणि एंटर दाबा.
5:40 echo is a shell built-in असे आऊटपुट दिसेल.
5:43 याचा अर्थ ही कमांड ही Shell मधूनच कार्यान्वित झाली आहे. म्हणून ही Internal command आहे आणि कमांडशी संबंधित फाईल नेम दिले गेलेले नाही.
5:56 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कमांडस् ची रचना समजून घेणे गरजेचे आहे.
6:01 कमांड ही एक शब्दाची किंवा space वापरून वेगळे केलेल्या अनेक शब्दांनी बनलेली असू शकते.
6:08 दुस-या प्रकारात पहिला शब्द ही खरी कमांड असते तर त्यानंतरचे शब्द हे arguments असतात.
6:16 Arguments हे कमांडमधील पर्याय किंवा expression किंवा फाईलचे नाव असू शकते.
6:20 आपण टाईप केलेल्या पर्यायानुसार एकच कमांड वेगवेगळे कार्य करू शकते.
6:26 साधारणपणे पर्यायाच्या आधी एक किंवा दोन वजाची चिन्हे असतात ज्याला क्रमशः short किंवा long पर्याय म्हणतात.
6:35 Terminal Window वर जाऊन कमांड टाईप करा आणि त्याचे आऊटपुट बघा.
6:40 Terminal Window रिकामी करण्यासाठी प्रथमclear असे टाईप करा.
6:44 नंतर ls असे टाईप करून एंटर दाबा.
6:49 पुन्हा clear असे टाईप करून एंटर दाबा.
6:55 ls space minus a असे टाईप करून एंटर दाबा.
7:04 Terminal Window रिकामी करण्यासाठी clear असे टाईप करा.
7:11 ls space minus all असे टाईप करून एंटर दाबा.
7:19 Terminal रिकामे करण्यासाठी clear असे टाईप करा.
7:23 ls space minus d असे टाईप करून एंटर दाबा.
7:32 आता पर्याय बदलल्यावर कमांडचे कार्य कसे बदलते हे समजण्यासाठी एवढे पुरेसे आहे.
7:40 लिनक्स मध्ये मोठ्या संख्येने कमांडस् आहेत.
7:45 प्रत्येकासाठी अनेक पर्याय आहेत.
7:48 कमांडस् संयुक्त रूपातदेखील वापरता येतात. ज्याबद्दल आपण नंतर जाणून घेणार आहोत. एवढ्या सर्व गोष्टी आपण कशा लक्षात ठेवायच्या?
7:55 असे करण्याची काहीच गरज नाही. कारण लिनक्सवर अतिशय उत्तम अशी 'online help' सुविधा उपलब्ध आहे.
8:01 man command आपल्याला सिस्टीमवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक कमांडचे डॉक्युमेंटेशन प्रदान करते.
8:08 उदाहरणादाखल ls कमांडबद्दल जाणून घेण्यासाठी Terminal वर जाऊ.
8:16 आणि ls या argument सहित man ही कमांड टाईप करा. म्हणजेच man space ls असे टाईप करून एंटर दाबा.
8:30 त्यातून बाहेर पडण्यासाठी q दाबा.
8:35 man हे सिस्टीमचे manual page आहे. manबरोबर दिले जाणारे प्रत्येक argument साधारणपणे एखाद्या प्रोग्रॅमचे नाव, utility किंवा function असते.
8:43 कमांड दिल्यानंतर या argumentशी संबंधित असलेले manual page शोधून ते दर्शवले जाते.
8:49 man command मध्ये सेक्शनचे नाव दिले असल्यास manualच्या त्या विभागात थेट जाऊन शोध घेतला जातो.
8:55 सामान्यतः जर विभागाचे नाव दिलेले नसले तर, man command ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार, उपलब्ध असलेले सर्व section शोधते. व प्रत्यक्षात अनेक पाने उपलब्ध असली तरी त्यातील फक्त पहिले पान स्क्रीनवर दाखवते.
9:07 man या कमांडबद्दल अजून अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही man याच कमांडचा उपयोग करू शकता.
9:14 Terminal वर जाऊन man space man असे टाईप करा. आणि एंटर दाबा.
9:23 त्यातून बाहेर पडण्यासाठी q दाबा.
9:26 man कमांडसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
9:30 येथे आपण सर्वात जास्त वापरल्या जाणा-या कमांडस् बघणार आहोत. काही वेळा आपल्याला माहित असते की आपल्याला काय करायचे आहे परंतु योग्य कमांड माहित नसते. अशावेळी आपण काय करू शकतो?
9:41 man ही कमांडminus k हा पर्याय प्रदान करते. जी एक keyword घेऊन आपल्याला संबंधित कमांडस् ची यादी आणि त्याचे कार्य संक्षिप्त रूपात दर्शवते.
9:50 उदाहरणार्थ आपल्याला एक डिरेक्टरी बनवायची आहे. परंतु त्यासाठीची योग्य कमांड आपल्याला माहित नाही.
9:56 मग Command promptवर जा आणि man space minus k space directories असे टाईप करून एंटर दाबा.
10:12 दिलेल्या यादीतील प्रत्येक कमांडचा अभ्यास करून योग्य ती कमांड वापरता येते.
10:17 वरील सर्व गोष्टी आपण apropos या कमांडच्या सहाय्याने सुध्दा करू शकतो.
10:21 Command prompt वर apropos space directories असे टाईप करून एंटर दाबा. आणि येणारे आऊटपुट बघा.
10:36 काही वेळा आपल्याला अधिक माहितीची आवश्यकता नसते. केवळ एखादी कमांड काय करते हे जाणून घेणे पुरेसे असते.
10:40 त्यावेळी आपण whatis किंवा man minus f या कमांडचा उपयोग करू शकतो.
10:52 Terminal Window रिकामी करण्यासाठी clear असे टाईप करा.
10:58 आता whatis space ls असे टाईप करून एंटर दाबा.
11:06 काही Commandना अनेक पर्याय असतात. जर आपल्याला त्या Commandना असलेल्या विविध पर्यायांची यादी हवी असेल
11:13 तर आपण minus help या पर्यायाचा उपयोग करू.
11:18 Command prompt वर जा आणि ls space minus minus help असे टाईप करा. आणि एंटर दाबा.
11:29 आपण वरच्या दिशेला स्क्रॉल करू या. म्हणजे आपल्याला या manual page वरील सर्व पर्याय बघता येतील.
11:45 अशा प्रकारे आपण ह्या लिनक्स ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
11:56 *यासंबंधी माहिती व्हीडीओमधे दिलेल्या साईटवर उपलब्ध आहे.
12:00 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha