LibreOffice-Suite-Draw/C2/Common-editing-and-print-functions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:41, 27 May 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00.01 LibreOffice Draw मधील सामान्य संपादन आणि छपाई कार्य या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.08 या मध्ये तुम्ही,
00.10 Draw पेज मर्जीन सेट करणे,
00.13 पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
00.16 Undo आणि Redo कृती,
00.18 पेज नामांतर,
00.20 पेज प्रिंट करणे शिकाल.
00.22 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरणार आहोत.
00.33 WaterCycle फ़ाइल उघडून WaterCycle diagram असलेले पेज निवडू.
00.40 या चित्रासाठी पेज मार्जिन सेट करू.
00.44 पेज मार्जिन ची आवश्यकता.
00.46 पेज च्या आत कोणते ऑब्जेक्ट स्थित होतील त्यासाठी Page Margins अंतर निश्चित करते.
00.43 उदाहरणार्थ, चित्र प्रिंट करून फ़ाइल करायची गरज असल्यास.
00.57 मार्जिन खात्री करते कि या बाजूवर पुरेशी जागा आहे.
01.01 म्हणजे प्रिंट केल्यावर चित्राचा भाग कापला किंवा लपला जाणार नाही.
01.07 Page Margins सेट करून WaterCycle चित्राची प्रिंट काढू.
01.11 हे चित्र प्रिंट करण्यास जो पेपर आकार वापरणार आहोत, तो प्रमाणित नाही.
01.18 त्याची रुंदी आणि उंची 20 cms आहे.
01.23 त्याचा तळ भागाची मार्जिन1.5 cms असणे आवश्यक आहे.
01.29 हे माप सेट करण्यास Main मेन्यु वरून Format निवडून Page' वर क्लिक करा.
01.35 Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
01.38 Page tab निवडा.
01.41 Width आणिHeight फिल्ड मध्ये value “20” एंटर करा.
01.47 Margins खाली Bottom फिल्ड मध्ये, 1.5 एंटर करा.
01.54 उजव्या बाजूस Draw पेज चा (preview)पूर्वेक्षण दिसेल.
01.58 हा preview, Draw पेज मध्ये केलेले बदल दर्शविते.
02.02 OKवर क्लिक करा.
02.04 चित्र कसे दिसते?
02.06 चित्र पेजच्या बाहेर आले आहे.
02.08 याचा अर्थ, प्रिंट झाल्यावर चित्राचा भाग नाहीसा होईल.
02.14 खात्री असावी,
02.15 चित्र नेहेमी मार्जिन च्या आत असावे.
02.18 चित्र काढताना, चित्राचा कोणताही भाग मार्जिन बाहेर जाणार नाही.
02.23 म्हणून चित्र काढण्यापूर्वी मार्जिन सेट करणे चांगला सराव आहे.
02.29 पुन्हा Main मेन्यु वरून Format निवडून Page' वर क्लिक करा.
02.35 Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
02.38 Page tab वर क्लिक करा.
02.40 drop-down यादीतील Format वर क्लिक करून A4 निवडा.
02.45 हि खरी मार्जिन आहे जी सेट केली होती.
02.48 OK वर क्लिक करा.
02.52 चित्र मार्जिन सह स्थित झाले आहे.
02.55 Draw page वरून Page setup डायलॉग बॉक्स उपलब्ध करू शकता.
03.00 पेज वर right-click करून आणि context मेन्यु वापरून.
03.05 Cancel वर क्लिक करून डायलॉग बॉक्स च्या बाहेर येऊ.
03.09 आता, पेज क्रमांक, दिनांक, वेळ, निर्मात्याचे नाव निविष्ट करू.
03.15 WaterCycle चित्रासह पेज निवडून पेज क्रमांक देऊ.
03.21 Main मेन्यु वर जा, Insert निवडून Fieldsवर क्लिक करा.
03.27 Fields यादी दिसेल.
03.31 Fields , Draw द्वारे आपोआप उत्पन्न झालेले values अंतर्भाव करते.
03.35 आपल्याला केवळ Draw द्वारे उत्पन्न झालेले Fields आणि values निविष्ट करावे लागेल.
03.41 Page number वर क्लिक करू.
03.43 text बॉक्स 1नंबर सह Draw पेज वर निविष्ट झाला आहे.
03.48 टेक्स्ट बॉक्स जुळवून घेऊन थोडासा लहान करू.
03.55 बॉक्स drag करून पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित करा.
04.01 नंबर बॉक्स अलगद हलविण्यास , त्यास निवडून Shift key दाबा.
04.07 त्यास आणखीन खाली घेऊ.
04.11 Draw फ़ाइल मधील पेज 2वर पुढील नंबर निविष्ट झाला का ते तपासू.
04.17 त्यास पेज नंबर नाही.
04.20 जेथे आपण फिल्ड निविष्ट केली आहे फक्त त्याच पेज मध्ये नंबर निविष्ट झाला आहे.
04.26 पेज नंबर रूपरेषा बदलणे शिकू.
04.30 Main मेन्यु वरून, Formatवर क्लिक करून Page निवडा.
04.36 Page Setup डायलॉग दिसेल.
04.39 Page tab वर क्लिक करा.
04.41 Layout settingsखाली, Format निवडा.
04.45 drop-downयादी वरून a,b,c निवडा.
04.49 OK वर क्लिक करा.
04.52 पेज नंबर 1, 2, 3 हून बदलून a, b, c झाला आहे.
04.58 यास कोणत्याही format मध्ये बदलू शकता.
05.01 Date आणि Time फिल्ड निविष्ट करणे शिकू.
05.05 Draw पेज वरDate आणि Time stamps निविष्ट करू शकता.
05.10 'Insert आणिFieldsवर क्लिक करून करू शकता.
05.14 पहिले, Date (fixed) आणि Time (fixed) आहे.


05.18 इतर Date (variable) आणि Time (variable)आहे.
05.23 Date (fixed) आणि Time (fixed) पर्याय सध्याची दिनांक आणि वेळ निविष्ट करते.
05.29 हे दिनांक आणि वेळ अपडेटेड नसते.
05.33 दुसऱ्या बाजूला Date (variable) आणि Time (variable)पर्याय,
05.37 जेव्हा ही फ़ाइल उघडाल तेव्हा आपोआप अपडेटेड होते.
05.42 येथे Time (variable) निविष्ट करू.
05.46 पेज च्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात असलेल्या पेज नंबर च्या वर बॉक्स dragआणि स्थित करू.
05.56 जेव्हाही Draw Page उघडाल, निविष्ट केलेली वेळ सध्याच्या वेळेत अपडेट होईल.
06.03 हि फ़ाइल तयार करणाऱ्या निर्मात्याचे नाव एंटर करू.
06.08 येथे, पेज नंबर one वर निर्मात्याचे नाव जसे “Teacher. A. B.” रचायचे आहे.
06.17 पेज one वर जा.
06.19 Main मेन्यु वर जा, Tools' निवडून Optionsवर क्लिक करा.
06.24 Options डायलॉग बॉक्स दिसेल.
06.27 Options डायलॉग बॉक्स मध्ये, LibreOfficeवर क्लिक करून, User Dataवर क्लिक करा.
06.34 डायलॉग बॉक्स च्या उजव्या बाजूवर, युजर डेटा माहिती प्रविष्ट करू शकता.
06.40 आवश्यकतेनुसार विवरण प्रविष्ट करू शकता.
06.44 First/Last Name/Initials, मध्येTeacher,टेक्स्ट A,आणि B अनुक्रमे एंटर करू.
06.53 OK' वर क्लिक करा.
06.55 Main मेन्यु वरून, Insertवर क्लिक करूनFields निवडा आणि Authorवर क्लिक करा.
07.02 टेक्स्ट बॉक्स मध्ये Teacher A B नाव निविष्ट झाले आहे.
07.07 या बॉक्स ला drag करून Draw पेज च्या खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या Time फिल्ड च्या थोडेसे वर स्थित करू.
07.15 जर आपल्याला Draw पेज मधील निविष्ट केलेली फिल्ड काढायची असेल तर?
07.21 टेक्स्ट बॉक्स निवडून Delete key दाबा.
07.25 Author Name फिल्ड डिलीट करू.
07.28 हि कृती undo करायची असल्यास?
07.31 कोणतीही कृती CTRL आणि Z key सोबत दाबून undo करू शकता.
07.38 शेवटी केलेली Author' फिल्ड वगळण्याची कृती पूर्ण झालेली नाही.
07.45 फिल्ड पुन्हा दिसेल.
07.48 Main मेन्यु वरून सुद्धा कृती undo किंवा redo करू शकता.
07.53 Main मेन्यु वरून, Edit निवडून Redoवर क्लिक करा.
07.57 निर्मात्याचे नाव दिसणार नाही.
08.00 आपण केलेल्या सर्व फिल्ड चे निवेशन CTRL+Z keys दाबून undo करू.
08.06 undo आणि redo commands साठी कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरू शकता.
08.13 undo करण्यास CTRL आणि Z key सोबत दाबा.
08.18 redo करण्यास CTRL आणि Y key सोबत दाबा.
08.23 टयूटोरियल थांबवून Assignment करा.
08.26 निर्मात्याचे नाव बदलून सेव करा.
08.29 पेज वर आणखीन दोन बाण जोडा.
08.33 पेज two वर पेज क्रमांक आणि दिनांक निविष्ट करा.
08.38 शेवटच्या पाच कृती undo आणि redo करा.
08.42 Undo आणि Redo पर्यायाने केलेल्या सर्व कृती undo झाल्या का नाही तपासा.
08.51 या पेज ला “WaterCycleSlide” नाव देऊ.
08.54 Pages pane मधील स्लाईड निवडा. right-click करून Rename Page निवडा.
09.00 Rename Slide डायलॉग बॉक्स दिसेल.
09.03 Name फिल्ड मध्ये, WaterCycleSlide'” नाव एंटर करू.
09.08 OK वर क्लिक करा.
09.10 या पेज वर कर्सर ठेवा.
09.14 तुम्ही “WaterCycleSlide” नाव पाहू शकता का?
09.18 पेज च्या संबंधित नाव देणे चांगला सराव आहे.
09.23 प्रिंटींग पर्याय सेट करून WaterCycle चित्राला प्रिंट देऊ.
09.28 Main मधील, File वर क्लिक करून Printवर क्लिक करा.
09.33 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
09.36 General आणिOptions tabs च्या खालील सेटिंग्स जाणून घेण्यास,
09.41 कृपया LibreOffice Writer सिरीज मधील Viewing and printing Documents वरील टयूटोरियल पहा.
09.48 डाव्या बाजूवर तुम्हाला पेज प्रीव्युव क्षेत्र दिसेल.
09.53 उजव्या बाजूच्या “Print डायलॉग बॉक्स मध्ये चार बटन समाविष्ट आहेत.
09.58 General, LibreOffice Draw,Page Layout,Options
10.04 LibreOffice Draw मधील विशिष्ट पर्याय पाहू.
10.09 LibreOffice Draw tab वर क्लिक करा.
10.13 Page name , Date आणि Time बॉक्सेस तपासू.
10.17 हे चित्रासहpage name, date आणि time प्रिंट करेल.
10.23 चित्र प्रिंट करण्यास Original colors and Fit to printable page निवडू.
10.29 WaterCycle चित्र प्रिंट करण्यास Print वर क्लिक करा.
10.34 प्रिंटर अचूक कॉनफिगर्ड असल्यास, चित्र प्रिंट देण्यास सुरु करेल.
10.40 हे टयूटोरियल येथे संपत आहे.
10.45 या टयूटोरियल मध्ये तुम्ही,
10.48 Draw पेज मर्जीन सेट,
10.50 पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट,
10.54 Undo आणि Redo कृती,
10.57 पेज नामांतर,
10.58 पेज प्रिंट करणे शिकलात.
11.01 तुमच्यासाठी Assignment आहे.
11.03 आणखीन दोन पेज निविष्ट करा.
11.06 प्रत्येक पेज साठी वेगळी मार्जिन सेट करून अगोदरच्या टयूटोरियल मध्ये बनविलेले लेबल आणि इन्विटेशन प्रिंट करा.
11.14 प्रत्येक पेज मध्येPage count फिल्ड निविष्ट करून काय होते ते निरीक्षण करा.
11.21 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11.24 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
11.28 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
11.32 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
11.34 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.37 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
11.41 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11.47 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
11.52 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
11.59 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
12.10 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble