KiCad/C2/Designing-circuit-schematic-in-KiCad/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:30, 28 January 2014 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Designing-circuit-schematic-in-KiCad

Author: Manali Ranade

Keywords: KiCAD


Visual Clue
Narration
00.01 Kicad वापरून circuit schematic डिझाईन करण्याच्या पाठात आपले स्वागत.
00.08 PCB designing मधे समाविष्ट असलेल्या पाय-या पाहू.
00.12 पहिली पायरी, आपल्या सर्किटचे schematic बनवणे.
00.16 दुसरी पायरी, netlist तयार करणे.
00.19 तिसरी पायरी, सर्किटमधील components ची चिन्हे map करणे.
00.22 चवथ्या पायरीत सर्किटचा ढोबळ आराखडा बनवणे.
00.27 या पाठात पहिली स्टेप जाणून घेऊ.
00.32 हव्या असलेल्या circuit चे schematic बनवणे .
00.35 आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम,
00.40 आणि KiCad version 2011, hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत.
00.49 तुम्हाला Electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00.56 ह्या पाठासाठी Astable multivibrator चे circuit उदाहरण म्हणून वापरू.
01.04 KiCad सुरू करण्यासाठी,
01.05 Ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा.
01.08 Dash Home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
01.12 सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा.
01.19 KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर दिसेल.
01.22 लक्षात घ्या, Ubuntu 12.04 मधे KiCad मेनूबार, Ubuntu desktop वरील पॅनेलमधे उघडतो.
01.30 नवे project सुरू करण्यासाठी आधी File आणि नंतर New वर क्लिक करा.
01.35 तुमच्या project ला नाव द्या. उदाहरणार्थ project1 .
01.42 लक्ष द्या, प्रोजेक्ट, .pro extension ने सेव्ह होईल.
01.47 स्पष्ट दिसण्यासाठी विंडोच्या आकारात बदल करू.
01.52 प्रोजेक्ट कुठे सेव्ह होते ते पहा. गरज असल्यास directory बदला.
01.58 Save वर क्लिक करा.
02.01 KiCad मधे Circuit schematics, EESchema द्वारे बनवले जातात.
02.06 EESchema कसे सुरू करायचे ते पाहू.
02.10 KiCad च्या मेन विंडोतील वरच्या पॅनेलमधील पहिल्या टॅबला EESchema किंवा Schematic editor म्हणतात.
02.19 EESchema क्लिक केल्यावर Schematic editor उघडेल.
02.23 it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल.
02.28 Ok वर क्लिक करा.
02.32 येथे circuit schematic बनवू.
02.35 EESchema विंडोच्या उजव्या पॅनेलवर जा.
02.38 Place a component बटणावर क्लिक करा.
02.42 रिकाम्या EESchema विंडोवर क्लिक करा.
02.46 component selection विंडो उघडेल.
02.49 EESchema विंडोमधे 555 timer IC schematic प्रस्थापित करू.
02.56 component selection विंडोच्या नेम फिल्डमधे 555 टाईप करून Ok वर क्लिक करा.
03.05 हे LM555N हा सर्च रिझल्ट दाखवेल.
03.11 हा रिझल्ट सिलेक्ट करून OK क्लिक करा.
03.14 EESchema विंडोवर component चे schematic दिसेल .
03.19 ते आपल्या कर्सरला जोडलेले असेल.
03.22 एकदा क्लिक करून ते component स्क्रीनच्या मध्यभागी ठेवा.
03.27 Zoom in आणि out करण्यासाठी माऊसचे scroll बटण वापरा.
03.35 जो Component झूम इन किंवा आऊट करायचा आहे त्यावर कर्सर ठेवा.
03.39 Zoom in आणि out करण्यासाठी अनुक्रमे F1 आणि F2 ही बटणे वापरू शकता.
03.46 तुम्हाला, 555 IC वर VCC आणि GND म्हणजेच ground टर्मिनल कदाचित दिसत असेल किंवा नसेल .
03.56 ती दिसत नसल्यास EESchema window च्या डाव्या पॅनेलवर जा.
04.00 Show hidden pins बटनावर क्लिक करा.
04.04 आपण EESchema विंडोमधे resistor ठेवणार आहोत.
04.09 आपण Place a component हा पर्याय निवडला होता.
04.13 EESchema वर क्लिक करा. तुम्हाला component selection विंडो दिसेल.
04.21 नेम फिल्डमधे 'r' टाईप करून OK क्लिक करा.
04.26 EESchema वर Resistor schematic दिसेल जे कर्सरला जोडलेले असेल.
04.32 EESchema वर कुठेही एका क्लिकद्वारे तो resistor ठेवा.
04.37 आपल्याला दोन resistors हवेत.
04.39 Place a component बटणाद्वारे ते मिळू शकतात.
04.42 आपल्याकडे एक resistor आहे. हा component कॉपी कसा करायचा ते पाहू.
04.48 त्यासाठी त्यावर राईट क्लिक करून Copy Component हा पर्याय निवडा.
05.01 Component कॉपी cursor ला जोडलेली असेल.
05.05 EESchema वर कुठेही एकदा क्लिक करून resistor तेथे ठेवा.
05.11 कीबोर्डवरील 'c' बटणाद्वारे हे अधिक लवकर करू शकता.
05.16 त्यासाठी, component वर कर्सर ठेवून 'c' बटण दाबा.
05.22 पुन्हा तो तुमच्या कर्सरला जोडला जाईल.
05.27 त्यास ठेवण्यास एकदा क्‍लिक करा.
05.30 shortcuts ची यादी मिळवण्यासाठी Shift आणि question mark ही बटणे दाबा.
05.36 ही कीबोर्डवरील shortcuts ची यादी आहे.
05.40 ही विंडो बंद करा.
05.43 component selection विंडो उघडण्यासाठी EESchema विंडोवर क्लिक करा.
05.49 आपल्याला Electrolytic आणि Ceramic हे दोन capacitors हवे आहेत.
05.53 Electrolytic capacitor समाविष्ट करण्यासाठी CP1 टाईप करून OK क्लिक करा.
06.00 Ceramic capacitor समाविष्ट करण्यासाठी 'c' टाईप करून OK क्लिक करा.
06.06 आपल्याला Light Emitting Diode म्हणजेच LED हवा आहे.
06.10 component selection विंडो मधे LED टाईप करून OK वर क्लिक करा.
06.17 आपल्याला power supply म्हणजेच VCC आणि Ground terminals हवे आहेत.
06.22 EESchema च्या उजव्या पॅनेलवरील Place a power port बटना वर क्लिक करा.
06.29 component selection विंडो उघडण्यासाठी EESchema वर एकदा क्लिक करा.
06.34 List All बटना वर क्लिक केल्यावर विविध power notations ची यादी दिसेल .
06.40 +5V (plus 5 volt) निवडा. OK वर क्लिक करा.
06.48 EESchema विंडोवर एकदा क्लिक करून component तिथे ठेवा.
06.52 ground terminal साठीही.
06.54 सूचीतून ground निवडून OK वर क्लिक करा.
07.01 ground terminal निवडू.
07.08 तसेच बाह्य वीज पुरवठा जोडण्यासाठी connector हवा आहे.
07.14 component selection विंडो उघडण्यासाठी EESchema वर क्लिक करा.
07.19 List All बटनावर क्लिक करा. तुम्हाला list दिसेल.
07.24 'conn' पर्याय निवडून OK क्लिक करा.
07.31 खाली स्क्रोल करून सूचीतून CONN_2 निवडून OK क्लिक करा.
07.41 दोन terminal चा connector माऊसच्या pointer ला जोडलेला दिसेल.
07.48 तो ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा.
07.56 सर्व components ची योग्य मांडणी करण्यासाठी ते हलवू.
08.01 त्यासाठी 'm' ही shortcut key वापरू.
08.04 componentहलवण्यासाठी माऊसचा कर्सर त्यावर ठेवा. उदाहरणार्थ resistor. 'm' हे बटण दाबा.
08.15 आपण EESchema वर एकदा क्लिक करून हा resistor, IC 555 च्या उजवीकडे ठेवू.
08.28 LED फिरवून तो उभा करण्यासाठी कीबोर्डवरील 'R' ही shortcut key वापरू .
08.40 आता सर्किट डायग्रॅमनुसार components एकमेकांना wire ने जोडू.
08.45 आंतरजोडणीची सुरूवात करू.
08.48 EESchema च्या उजव्या पॅनेलवरील Place a wire बटणावर क्लिक करा.
08.56 आता दोन resistors एकमेकांना जोडू.
08.58 दोन्ही resistors च्या कोणत्याही एका node वर क्लिक करून त्यांना wire जोडणार आहोत.
09.11 IC 555 ची सातवी pin दोन resistor ला जोडणा-या wire ला जोडू.
09.18 IC 555 च्या सातव्या pin वर क्लिक करा आणि नंतर दोन resistors ला जोडणा-या wire वर क्लिक करा.
09.30 हे आपोआप junction तयार करेल, node जे झालेला दिसेल.
09.35 मी हे components आधीच जोडून सेव्ह करून ठेवले आहेत.
09.39 वेळ वाचवण्यासाठी आधी बनवलेले schematic उघडून ते वापरू.
09.44 File menu वर जाऊन Open वर क्लिक करा.
09.53 Confirmation विंडो उघडेल. Yes वर क्लिक करा.
10.04 मी संबंधित डिरेक्टरीमधून project1.sch निवडणार आहे.
10.18 प्रथम विंडोचा आकार बदलू.
10.22 नंतर Open वर क्लिक करा.
10.33 हे आधी बनवलेले schematic आहे.
10.36 components ला नावे कशी द्यायची ते पाहू.
10.39 Annotation प्रत्येक component ला एक विशिष्ट ओळख देते.
10.43 ह्यामुळे components वरील प्रश्नचिन्हांच्या जागी unique अंक लिहिले जातील.
10.50 EESchema च्या वरच्या पॅनेलवरील “Annotate schematic” बटणावर क्लिक करा.
10.58 "Annotate Schematic" विंडो उघडेल.
11.02 ह्या विंडोमधे configuration default ठेवा.
11.05 Annotation बटणावर क्लिक करा.
11.09 फक्त नावे न दिलेले घटक Annotate होतील असा मेसेज मिळेल.
11.13 OK वर क्लिक करा.
11.15 "Annotate schematic" विंडोवरील Close बटणावर वर क्लिक करा.
11.20 components वरील प्रश्नचिन्हाच्या जागी unique अंक आल्याचे लक्षात येईल.
11.30 File वर क्लिक करा.
11.37 हे schematic सेव्ह करण्यासाठी "Save whole schematic Project" निवडा.
11.43 File वर क्लिक करा. Quit निवडा.
11.48 हे EESchema window बंद करेल.
11.50 KiCad च्या main विंडोवर जा.
11.53 File वर क्लिक करा. Quit निवडा.
11.56 KiCad द्वारे circuit schematic बनवण्याचा पाठाचा उद्देश पूर्ण झाला आहे .
12.01 पाठात काय शिकलो
12.05 ते थोडक्यात,
12.07 KiCad मधे circuit schematic बनवण्यासाठी EESchema वापरणे.
12.11 circuit schematic ला Annotation (टीप ) देणे.
12.15 खालील असाईनमेंट करा.
12.17 component selection विंडो वापरुन EESchema वर Inductor हा component ठेवा.
12.24 'a', 'x' आणि 'y' ह्या shortcut keys वापरून बघा.
12.31 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12.35 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12.37 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12.43 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
12.45 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12.48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12.52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12.59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13.03 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13.09 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13.13 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
13.20 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
13.25 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana