KiCad/C2/Designing-circuit-schematic-in-KiCad/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Kicad वापरून circuit schematic डिझाईन करण्याच्या पाठात आपले स्वागत. |
00:08 | PCB designing मधे समाविष्ट असलेल्या पाय-या पाहू. |
00:12 | पहिली पायरी, आपल्या सर्किटचे schematic बनवणे. |
00:16 | दुसरी पायरी, netlist तयार करणे. |
00:19 | तिसरी पायरी, सर्किटमधील components ची चिन्हे map करणे. |
00:22 | चवथ्या पायरीत सर्किटचा ढोबळ आराखडा बनवणे. |
00:27 | या पाठात पहिली स्टेप जाणून घेऊ. |
00:32 | हव्या असलेल्या circuit चे schematic बनवणे . |
00:35 | आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम, |
00:40 | आणि KiCad version 2011, hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत. |
00:49 | तुम्हाला Electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. |
00:56 | ह्या पाठासाठी Astable multivibrator चे circuit उदाहरण म्हणून वापरू. |
01:04 | KiCad सुरू करण्यासाठी, |
01:05 | Ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा. |
01:08 | Dash Home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा. |
01:12 | सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा. |
01:19 | KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर दिसेल. |
01:22 | लक्षात घ्या, Ubuntu 12.04 मधे KiCad मेनूबार, Ubuntu desktop वरील पॅनेलमधे उघडतो. |
01:30 | नवे project सुरू करण्यासाठी आधी File आणि नंतर New वर क्लिक करा. |
01:35 | तुमच्या project ला नाव द्या. उदाहरणार्थ project1 . |
01:42 | लक्ष द्या, प्रोजेक्ट, .pro extension ने सेव्ह होईल. |
01:47 | स्पष्ट दिसण्यासाठी विंडोच्या आकारात बदल करू. |
01:52 | प्रोजेक्ट कुठे सेव्ह होते ते पहा. गरज असल्यास directory बदला. |
01:58 | Save वर क्लिक करा. |
02:01 | KiCad मधे Circuit schematics, EESchema द्वारे बनवले जातात. |
02:06 | EESchema कसे सुरू करायचे ते पाहू. |
02:10 | KiCad च्या मेन विंडोतील वरच्या पॅनेलमधील पहिल्या टॅबला EESchema किंवा Schematic editor म्हणतात. |
02:19 | EESchema क्लिक केल्यावर Schematic editor उघडेल. |
02:23 | it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल. |
02:28 | Ok वर क्लिक करा. |
02:32 | येथे circuit schematic बनवू. |
02:35 | EESchema विंडोच्या उजव्या पॅनेलवर जा. |
02:38 | Place a component बटणावर क्लिक करा. |
02:42 | रिकाम्या EESchema विंडोवर क्लिक करा. |
02:46 | component selection विंडो उघडेल. |
02:49 | EESchema विंडोमधे 555 timer IC schematic प्रस्थापित करू. |
02:56 | component selection विंडोच्या नेम फिल्डमधे 555 टाईप करून Ok वर क्लिक करा. |
03:05 | हे LM555N हा सर्च रिझल्ट दाखवेल. |
03:11 | हा रिझल्ट सिलेक्ट करून OK क्लिक करा. |
03:14 | EESchema विंडोवर component चे schematic दिसेल . |
03:19 | ते आपल्या कर्सरला जोडलेले असेल. |
03:22 | एकदा क्लिक करून ते component स्क्रीनच्या मध्यभागी ठेवा. |
03:27 | Zoom in आणि out करण्यासाठी माऊसचे scroll बटण वापरा. |
03:35 | जो Component झूम इन किंवा आऊट करायचा आहे त्यावर कर्सर ठेवा. |
03:39 | Zoom in आणि out करण्यासाठी अनुक्रमे F1 आणि F2 ही बटणे वापरू शकता. |
03:46 | तुम्हाला, 555 IC वर VCC आणि GND म्हणजेच ground टर्मिनल कदाचित दिसत असेल किंवा नसेल . |
03:56 | ती दिसत नसल्यास EESchema window च्या डाव्या पॅनेलवर जा. |
04:00 | Show hidden pins बटनावर क्लिक करा. |
04:04 | आपण EESchema विंडोमधे resistor ठेवणार आहोत. |
04:09 | आपण Place a component हा पर्याय निवडला होता. |
04:13 | EESchema वर क्लिक करा. तुम्हाला component selection विंडो दिसेल. |
04:21 | नेम फिल्डमधे 'r' टाईप करून OK क्लिक करा. |
04:26 | EESchema वर Resistor schematic दिसेल जे कर्सरला जोडलेले असेल. |
04:32 | EESchema वर कुठेही एका क्लिकद्वारे तो resistor ठेवा. |
04:37 | आपल्याला दोन resistors हवेत. |
04:39 | Place a component बटणाद्वारे ते मिळू शकतात. |
04:42 | आपल्याकडे एक resistor आहे. हा component कॉपी कसा करायचा ते पाहू. |
04:48 | त्यासाठी त्यावर राईट क्लिक करून Copy Component हा पर्याय निवडा. |
05:01 | Component कॉपी cursor ला जोडलेली असेल. |
05:05 | EESchema वर कुठेही एकदा क्लिक करून resistor तेथे ठेवा. |
05:11 | कीबोर्डवरील 'c' बटणाद्वारे हे अधिक लवकर करू शकता. |
05:16 | त्यासाठी, component वर कर्सर ठेवून 'c' बटण दाबा. |
05:22 | पुन्हा तो तुमच्या कर्सरला जोडला जाईल. |
05:27 | त्यास ठेवण्यास एकदा क्लिक करा. |
05:30 | shortcuts ची यादी मिळवण्यासाठी Shift आणि question mark ही बटणे दाबा. |
05:36 | ही कीबोर्डवरील shortcuts ची यादी आहे. |
05:40 | ही विंडो बंद करा. |
05:43 | component selection विंडो उघडण्यासाठी EESchema विंडोवर क्लिक करा. |
05:49 | आपल्याला Electrolytic आणि Ceramic हे दोन capacitors हवे आहेत. |
05:53 | Electrolytic capacitor समाविष्ट करण्यासाठी CP1 टाईप करून OK क्लिक करा. |
06:00 | Ceramic capacitor समाविष्ट करण्यासाठी 'c' टाईप करून OK क्लिक करा. |
06:06 | आपल्याला Light Emitting Diode म्हणजेच LED हवा आहे. |
06:10 | component selection विंडो मधे LED टाईप करून OK वर क्लिक करा. |
06:17 | आपल्याला power supply म्हणजेच VCC आणि Ground terminals हवे आहेत. |
06:22 | EESchema च्या उजव्या पॅनेलवरील Place a power port बटना वर क्लिक करा. |
06:29 | component selection विंडो उघडण्यासाठी EESchema वर एकदा क्लिक करा. |
06:34 | List All बटना वर क्लिक केल्यावर विविध power notations ची यादी दिसेल . |
06:40 | +5V (plus 5 volt) निवडा. OK वर क्लिक करा. |
06:48 | EESchema विंडोवर एकदा क्लिक करून component तिथे ठेवा. |
06:52 | ground terminal साठीही. |
06:54 | सूचीतून ground निवडून OK वर क्लिक करा. |
07:01 | ground terminal निवडू. |
07:08 | तसेच बाह्य वीज पुरवठा जोडण्यासाठी connector हवा आहे. |
07:14 | component selection विंडो उघडण्यासाठी EESchema वर क्लिक करा. |
07:19 | List All बटनावर क्लिक करा. तुम्हाला list दिसेल. |
07:24 | 'conn' पर्याय निवडून OK क्लिक करा. |
07:31 | खाली स्क्रोल करून सूचीतून CONN_2 निवडून OK क्लिक करा. |
07:41 | दोन terminal चा connector माऊसच्या pointer ला जोडलेला दिसेल. |
07:48 | तो ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा. |
07:56 | सर्व components ची योग्य मांडणी करण्यासाठी ते हलवू. |
08:01 | त्यासाठी 'm' ही shortcut key वापरू. |
08:04 | componentहलवण्यासाठी माऊसचा कर्सर त्यावर ठेवा. उदाहरणार्थ resistor. 'm' हे बटण दाबा. |
08:15 | आपण EESchema वर एकदा क्लिक करून हा resistor, IC 555 च्या उजवीकडे ठेवू. |
08:28 | LED फिरवून तो उभा करण्यासाठी कीबोर्डवरील 'R' ही shortcut key वापरू . |
08:40 | आता सर्किट डायग्रॅमनुसार components एकमेकांना wire ने जोडू. |
08:45 | आंतरजोडणीची सुरूवात करू. |
08:48 | EESchema च्या उजव्या पॅनेलवरील Place a wire बटणावर क्लिक करा. |
08:56 | आता दोन resistors एकमेकांना जोडू. |
08:58 | दोन्ही resistors च्या कोणत्याही एका node वर क्लिक करून त्यांना wire जोडणार आहोत. |
09:11 | IC 555 ची सातवी pin दोन resistor ला जोडणा-या wire ला जोडू. |
09:18 | IC 555 च्या सातव्या pin वर क्लिक करा आणि नंतर दोन resistors ला जोडणा-या wire वर क्लिक करा. |
09:30 | हे आपोआप junction तयार करेल, node जे झालेला दिसेल. |
09:35 | मी हे components आधीच जोडून सेव्ह करून ठेवले आहेत. |
09:39 | वेळ वाचवण्यासाठी आधी बनवलेले schematic उघडून ते वापरू. |
09:44 | File menu वर जाऊन Open वर क्लिक करा. |
09:53 | Confirmation विंडो उघडेल. Yes वर क्लिक करा. |
10:04 | मी संबंधित डिरेक्टरीमधून project1.sch निवडणार आहे. |
10:18 | प्रथम विंडोचा आकार बदलू. |
10:22 | नंतर Open वर क्लिक करा. |
10:33 | हे आधी बनवलेले schematic आहे. |
10:36 | components ला नावे कशी द्यायची ते पाहू. |
10:39 | Annotation प्रत्येक component ला एक विशिष्ट ओळख देते. |
10:43 | ह्यामुळे components वरील प्रश्नचिन्हांच्या जागी unique अंक लिहिले जातील. |
10:50 | EESchema च्या वरच्या पॅनेलवरील “Annotate schematic” बटणावर क्लिक करा. |
10:58 | "Annotate Schematic" विंडो उघडेल. |
11:02 | ह्या विंडोमधे configuration default ठेवा. |
11:05 | Annotation बटणावर क्लिक करा. |
11:09 | फक्त नावे न दिलेले घटक Annotate होतील असा मेसेज मिळेल. |
11:13 | OK वर क्लिक करा. |
11:15 | "Annotate schematic" विंडोवरील Close बटणावर वर क्लिक करा. |
11:20 | components वरील प्रश्नचिन्हाच्या जागी unique अंक आल्याचे लक्षात येईल. |
11:30 | File वर क्लिक करा. |
11:37 | हे schematic सेव्ह करण्यासाठी "Save whole schematic Project" निवडा. |
11:43 | File वर क्लिक करा. Quit निवडा. |
11:48 | हे EESchema window बंद करेल. |
11:50 | KiCad च्या main विंडोवर जा. |
11:53 | File वर क्लिक करा. Quit निवडा. |
11:56 | KiCad द्वारे circuit schematic बनवण्याचा पाठाचा उद्देश पूर्ण झाला आहे . |
12:01 | पाठात काय शिकलो |
12:05 | ते थोडक्यात, |
12:07 | KiCad मधे circuit schematic बनवण्यासाठी EESchema वापरणे. |
12:11 | circuit schematic ला Annotation (टीप ) देणे. |
12:15 | खालील असाईनमेंट करा. |
12:17 | component selection विंडो वापरुन EESchema वर Inductor हा component ठेवा. |
12:24 | 'a', 'x' आणि 'y' ह्या shortcut keys वापरून बघा. |
12:31 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:35 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
12:37 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
12:43 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
12:45 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12:48 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
12:52 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
12:59 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
13:03 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:09 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13:13 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
13:20 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
13:25 | सहभागासाठी धन्यवाद . |