Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C2/Introduction-to-gedit-Text-Editor/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 187: Line 187:
 
|  05:44
 
|  05:44
 
| आपण आपल्या टायपिंगसह पुढे जाऊ शकता कारण हे आपोआप सेव्ह करते.
 
| आपण आपल्या टायपिंगसह पुढे जाऊ शकता कारण हे आपोआप सेव्ह करते.
|
+
|-
 
|  05:49
 
|  05:49
 
|अन्यथा, आपण बदल सेव्ह करण्यासाठी डाऊन-एरोसह '' Toolbar '' आयकॉनवर क्लिक करू शकता.
 
|अन्यथा, आपण बदल सेव्ह करण्यासाठी डाऊन-एरोसह '' Toolbar '' आयकॉनवर क्लिक करू शकता.

Revision as of 14:44, 4 October 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरिअलमध्ये ' Introduction to gedit Text Editor वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण gedit Text Editor, Ubuntu Linux आणि ' Windows OS मध्ये gedit चे इन्टॉलेशन शिकणार आहोत.
00:17 आपण नवीन फाईल तयार करणे, अस्तित्वात असलेली फाईल ओपन, सेव्ह आणि बंद करणेदेखील शिकणार आहोत.
00:25 हे ट्युटोरिअल रेकॉर्डिंग करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे.
00:36 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:42 प्रथम gedit Text Editor कसे इन्टॉल करायचे ते पाहू.
00:47 दर्शविलेल्या लिंकला भेट देऊन Windows वर gedit Text Editor कसे इन्टॉल करावे यावरील सूचना मिळवू शकता.
00:56 gedit Text Editor'हे Ubuntu Linux OS मध्ये आधीच इन्टॉल आहे.
01:02 हे Ubuntu Linux वर उबंटु सॉफ्टवेअर सेंटर वापरून इन्टॉल केले जाऊ शकते.
01:08 'उबंटू सॉफ्टवेअर सेंटर' वर अधिक माहितीसाठी, आमच्या वेबसाइटवरील लिनक्स स्पोकन ट्युटोरियल पाहा.
01:15 gedit Text Editor माझ्या सिस्टमध्ये आधीच इन्टॉल केलेले आहे.
01:20 gedit Text Editor उघडू.
01:24 कॉम्प्यूटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यावरील Dash Home वर क्लिक करा.
01:29 Search box, मध्ये "gedit" टाईप करा. text Editor आयकॉन दिसते. त्यावर क्लिक करा
01:37 हे नवीन gedit Text Editor विंडो उघडेल.
01:41 अन्यथा, Terminal वापरून आपण Text Editor उघडू शकता.
01:47 आता मी ही विंडो बंद करेन.
01:50 'टर्मिनल' उघडण्यासाठी, 'CTRL + ALT + T' कीज एकत्र दाबा.
01:56 gedit टाईप करा आणि Enter दाबा.
02:00 एक नवीन gedit Text Editor विंडो उघडते.
02:04 सर्व मेनूजसह सर्वात वरच्या बारला Menu bar म्हटले जाते.
02:09 पुढे Tool bar मध्ये आयकॉनच्या स्वरूपात सर्वसामान्यपणे वापरले जाणारे मेनू आहेत.
02:16 डिसप्ले एरिआ आहे जेथे टायपिंग, एडिटिंग यासारख्या सर्व एक्टिव्हिटिज आहेत.
02:23 आपण Untitled Document 1 नावाचे टॅब पाहू शकता.
02:28 हे नव्याने उघडलेल्या डॉक्युमेंटमध्ये gedit Text Editor द्वारा दिले गेलेले पूर्वनिर्धारित नाव आहे.
02:35 टेक्स्ट एरियामध्ये Welcome to Spoken Tutorial टाईप करू.
02:42 खाली, येथे दर्शविल्याप्रमाणे आपण आणखी काही टेक्स्ट टाईप करू.
02:48 आता, टॅबमध्ये, आपण फाईलच्या नावाच्या पुढे asterisk पाहू शकता.
02:54 याचा अर्थ फाईल अजून सेव्ह केलेली नाही.
02:59 तळाशी असलेला बार Status bar आहे जो सध्याच्या एक्टिव्हिटीबद्दलची माहिती दर्शवितो.
03:06 Status bar लाइन नंबर आणि कॉलम नंबरचा कर्सर स्थान दर्शवितो.
03:13 ही मोड एकतर overwrite किंवा insert देखील प्रदर्शित करते.
03:19 बाय डिफॉल्ट , हे INS मध्ये आहे, म्हणजे, insert mode आहे.
03:24 आपण इतर दोन गोष्टींबद्दल नंतर जाणून घेऊ.
03:28 आता आपण फाईल कशी 'save'करावी ते पाहू.
03:31 त्यासाठी, Menu bar मधील' File ऑप्शनवर आणि नंतर Save वर क्लिक करा.
03:37 Save डायलॉग बॉक्स उघडते. मी Student.txt म्हणून फाईलचे नाव टाईप करीन.
03:45 आपण जिथे फाईल सेव्ह करू इच्छिता ते डेस्टिनेशन निवडा.
03:49 मी Desktop निवडेन.
03:52 Save बटणावर क्लिक करा.
03:55 लक्ष द्या की सेव्ह फाईलमध्ये आता फाईलचे नाव दिसत आहे.
04:01 तसेच लक्ष द्या की asterisk अदृश्य झाला आहे.
04:06 आता फाईल बंद करू.
04:09 मेनूबारमध्ये File वर क्लिक करा आणि Close निवडा.
04:14 आपण File आणि New क्लिक करून विंडोमध्ये नवीन फाईल इनसर्ट करू शकतो.
04:21 अन्यथा, आपण प्लस चिन्हासह Toolbar या आयकॉनवर क्लिक करू शकता.
04:27 आता आपण डॉक्युमेंट कसे उघडावे ते पाहू.
04:31 Menu bar मध्ये File वर क्लिक करा आणि Open निवडा.
04:36 Desktop फोल्डरमधून Students.txt फाईल निवडा जिथे आपण आधी फाईल सेव्ह केली होती.
04:44 Open बटणावर क्लिक करा.
04:47 आता काही अधिक विद्यार्थ्यांचे तपशील जोडू.
04:52 फाईल वारंवार सेव्ह करणे हा एक चांगला सराव आहे. त्यामुळे पावर कट किंवा सिस्टम क्रॅश झाल्यास डेटा गमावणे टाळले जाते.
05:02 Auto save ऑप्शन एखाद्या विशिष्ट वेळ मध्यांतर्गत आपोआप फाईल सेव्ह करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
05:09 auto save ऑप्शन कसे वापरावे ते पाहू.
05:14 Menu bar मध्ये Edit वर आणि नंतर Preferences क्लिक करा.
05:19 gedit Preferences डायलॉग बॉक्स प्रदर्शित होतो.
05:23 विंडोच्या वर Editor वर क्लिक करा.
05:27 File Saving पर्यायाखाली, Autosave चेकबॉक्स चेक करा.
05:33 आणि, minutes बॉक्समध्ये, 2 एन्टर करा. Close वर क्लिक करा.
05:39 आता फायली प्रत्येक 2 मिनिटांनंतर ऑटोसेव्ह होतील.
05:44 आपण आपल्या टायपिंगसह पुढे जाऊ शकता कारण हे आपोआप सेव्ह करते.
05:49 अन्यथा, आपण बदल सेव्ह करण्यासाठी डाऊन-एरोसह Toolbar आयकॉनवर क्लिक करू शकता.
05:56 शेवटी, gedit Text Editor विंडोमधून बाहेर जाण्यासाठी, File आणि Quit वर क्लिक करा.
06:03 आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:05 सारांशित करूया.
06:08 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये gedit चे इन्टॉलेशन शिकलो.
06:16 आपण नवीन फाईल कशी तयार करणे, ओपन, सेव्ह आणि अस्तित्वात असलेली फाईल बंद कशी करावी हेदेखील शिकलो.
06:27 खालील असाइनमेंट करा.
06:29 gedit Text Editor मध्ये एक नवीन विंडो उघडा.
06:33 इनव्हिटेशन लेटर टाईप करा.
06:36 Invitation.txt म्हणून सेव्ह करा.
06:39 आता फाईल बंद करा.
06:42 तिच फाईल उघडा आणि काही बदल करा.
06:46 फाईल सेव्ह करण्यासाठी Save as ऑप्शन वापरा आणि 'Invitation1.txt' फाईलचे नाव द्या.
06:54 Invitation.txt आणि Invitation1.txt फाईल्समधील बदलांवर लक्ष द्या.
07:02 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करून पाहा.
07:10 'स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट' टीम वर्कशॉप्स घेते आणि प्रमाणपत्रे देते.
07:19 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
07:23 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हाला प्रश्न आहेत का?
07:26 कृपया ह्या साईटला भेट द्या. जिथे आपल्याला प्रश्न आहे तेथील मिनिट आणि सेकंड निवडा. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा.
07:35 आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
07:39 Spoken Tutorial forum हे ह्या ट्युटोरिअलवरील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. कृपया त्यावर असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका. यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल. कमी गोंधळ करून, आपण ह्या चर्चेचा उपयोग शिकवण्याची सामग्री म्हणून करू शकतो.
07:58 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:11 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana