Difference between revisions of "C-and-C++/C2/Tokens/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{|border=1;
 
{|border=1;
! <center> Time</center>
+
|'''Time'''
! <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-

Revision as of 14:57, 15 July 2014

Time Narration
00:01 'Tokens-in-C-and-C-Plus-Plus च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्यात शिकणार आहोत
00:09 tokens चे स्वरूप आणि त्यांचा वापर.
00:12 हे उदाहरणाच्या सहाय्याने पाहू.
00:15 आपणcommon errors आणि solutions ही पाहणार आहोत.
00:20 ह्यासाठी
00:21 आपणUbuntu Operating system version 11.10, gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00:33 परिचयासहित सुरूवात करू या.
00:37 Token हा Data types, Variables, Constants आणि Identifiers साठी वापरला जाणारा शब्द आहे.
00:46 प्रोग्रॅमपासून सुरूवात करू.
00:49 मी एडिटरवर आधीचcode लिहिला आहे.
00:53 तो उघडू. फाईलचे नाव Tokens .c आहे.
01:04 प्रोग्रॅममध्ये व्हेरिएबल्स initialize करून त्यांच्या व्हॅल्यूज प्रिंट करू.
01:09 code समजून घेऊ. ही header file आहे.
01:16 हे मुख्य फंक्शन आहे.
01:20 int हा keyword आहे.
01:22 compiler ला keywordsचे अर्थ माहित असतात.
01:26 a हे integer variable आहे.
01:29 यास दोन ही व्हॅल्यू दिली आहे.
01:32 यास initialization म्हणतात.
01:35 जर व्हेरिएबलला कुठलीही व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्याला declaration of the variable म्हणतात.
01:43 b हा constant आहे.
01:46 bला चार ही व्हॅल्यू देऊन, तो initialize केला आहे.
01:53 read only variable बनवण्यासाठी const हा keyword वापरतात.
01:58 keywords आणि constant बद्दल जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर परत जाऊ.
02:06 Keywords चे अर्थ निश्चित असतात जे बदलता येत नाहीत.
02:11 variable चे नाव म्हणून Keywords वापरता येत नाहीत.
02:15 C मध्ये एकूण बत्तीस keywords आहेत.
02:18 auto, break, case, char, enum extern हे त्यापैकी काही.
02:28 Constants म्हणजे न बदलणा-या व्हॅल्यूज.
02:34 प्रोग्रॅम कार्यान्वित होते वेळी त्यात बदल होत नाही. constants चे दोन प्रकार आहेतNumeric आणि Character constants.
02:45 प्रोग्रॅमवर जाऊ.
02:47 variable c चा डेटा टाईप float आहे.
02:52 त्याला 1.5 ही व्हॅल्यू दिली आहे.
02:57 Data type हा नियम निश्चित केलेला finite म्हणजेच मर्यादित संच असतो.
03:05 येथे d हे variable आहे.
03:07 Char आणि single quotes आपण अक्षरे वापरत असल्याचे सुचवते.
03:13 d हे character variable असून त्यात 'A' ही व्हॅल्यू संचित केली आहे.
03:20 int, double float आणि char हे डेटाटाईप्स आपण सहज समजू शकतो.
03:30 a, c आणि d हे variables आहेत.
03:36 आता स्लाईडसवर जाऊ.
03:38 डेटाटाईप्स आणि व्हेरिएबल्सबद्दल अधिक जाणून घेऊ.
03:48 integer डेटाटाईप पासून सुरूवात करू.
03:51 हे int म्हणून घोषित केले जाते.
03:53 जर integer प्रिंट करायचा असेल तर %d हा format specifier वापरतात.
04:01 त्याप्रमाणे float point numbers साठी float आणि %f वापरला जातो.
04:09 character डेटाटाईपसाठी char आणि %c वापरले जाते.
04:15 double डेटाटाईपसाठी, double आणि %lf format specifier वापरला जातो.
04:25 डेटाटाईप्सची मर्यादा पाहू.
04:29 Integerडेटाटाईपची मर्यादा -32,768 ते 32,767
04:34 Floating point ची मर्यादा 3.4E +/-38
04:39 Character ची मर्यादा -128 to 127
04:42 आणि Double ची मर्यादा 1.7E +/-308
04:48 व्हेरिएबलमध्ये संचित होणा-या व्हॅल्यूज या मर्यादांपेक्षा जास्त किंवा कमी असता कामा नये.
04:56 व्हेरिएबल बद्दल अधिक जाणून घेऊ.
05:00 व्हेरिएबल म्हणजे data name.
05:03 ह्यात डेटा व्हॅल्यू साठवली जाते.
05:06 प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना व्हॅल्यूज बदलता येतात.
05:10 वापरण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करणे आवश्यक असते.
05:15 व्हेरिएबल्सला शक्यतो अर्थपूर्ण नावे द्यावीत.
05:19 उदाहरणार्थ john, marks, sum इत्यादी.
05:24 प्रोग्रॅमवर परत जाऊ.
05:27 printf हे फंक्शनचे identifier नाव आहे.
05:32 स्लाईडसवर जाऊ. identifiers बद्दल शिकू.
05:38 Identifiers ही user defined नावे असतात.
05:41 identifier ही अक्षरे व अंकांनी बनलेली असतात.
05:46 ह्यात uppercase आणि lowercase वापरता येतात.
05:51 पहिले अक्षर हे alphabet किंवा underscore असले पाहिजे.
05:55 प्रोग्रॅमवर जाऊ.
05:58 variables आणि constants initialized केले आहेत. ते प्रिंट करू.
06:05 हे return statement आहे. सेव्ह करा.
06:10 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06:12 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T keys एकत्रितपणे दाबा.
06:21 compile करण्यासाठी टाईप करा gcc tokens.c -o tok आणि Enter दाबा.
06:30 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./tok
06:35 आऊटपुट दाखवला जाईल.
06:39 दशांश चिन्हानंतर सहा व्हॅल्यूज बघू शकतो.
06:44 येथे दोन व्हॅल्यूज आहेत.
06:48 येथे काय झाले ते शोधून प्रोग्रॅमवर जाऊ.
06:54 कारण आपल्याकडे %.2f आहे.
06:59 ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो.
07:04 आपल्याला आउटपुट मध्ये दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज हव्या आहेत.
07:09 म्हणून %.2f च्या जागी %.3f टाईप करू.
07:16 Save करा.
07:20 टर्मिनलवर जाऊनcompile करून कार्यान्वित करा.
07:29 आता दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज दिसतील.
07:33 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
07:37 प्रोग्रॅमवर जाऊ.
07:40 ह्यात काही बदल करू.
07:42 प्रथम shift+ctrl+s keys एकत्रितपणे दाबा.
07:50 फाईलला .cpp हे extension देऊन save करा.
07:58 header file बदलून iostream करा.
08:03 using statement समाविष्ट करून save करा.
08:11 printf statement च्या जागी cout statement लिहा.
08:15 C++ मध्ये ओळ लिहिण्यास cout आणि दोन opening angle brackets << वापरतात.
08:21 Search for आणि replace text option वर क्लिक करा.
08:28 टाईप करा printf नंतरopening bracket "("
08:33 column मध्ये टाईप करा,
08:35 cout आणि two opening angle brackets "<<". Replace All वर क्लिक करून Close बटण दाबा.
08:45 format specifierआणि /n ची गरज नाही.
08:50 ते डिलिट करा. comma ही डिलिट करा.
08:54 टाईप करा two opening angle brackets.
09:01 Save करा. closing bracket डिलिट करा.
09:06 टाईप करा two opening angle brackets
09:09 पुढे double quotes मध्ये टाईप करा \n. Save करा.
09:20 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
09:24 compile करण्यासाठी टाईप करा g++ tokens.cpp -o tok 1
09:35 येथे tok1 आहे.
09:36 कारण tokens.c ह्या फाईलच्या tok ह्या output parameter वर आपल्याला overwrite करायचे नाही. Enter दाबा.
09:48 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./tok1 . Enter दाबा.
09:55 आपल्याला आऊटपुट दिसेल.
09:59 ह्या संबंधीच्या common errors पाहू.
10:03 प्रोग्रॅमवर जाऊ. समजा b ला आठ ही व्हॅल्यू दिली.
10:13 सेव्ह करा आणि पहा.
10:15 टर्मिनलवर जाऊनprompt क्लियर करा.
10:22 हे compile करा.
10:26 tokens. cpp file च्या सातव्या ओळीवर error दिसेल.
10:32 Assignment of read only variable b.
10:36 प्रोग्रॅमवर जाऊ.
10:40 कारण b हा constant आहे. Constants म्हणजे न बदलणा-या व्हॅल्यूज.
10:46 त्या प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना बदलत नाहीत.
10:49 हे error देत आहे. ती दुरूस्त करू.
10:54 हे डिलिट करून सेव्ह करा.
10:57 हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
11:01 Compile करून कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे.
11:09 आणखी एक common error बघू.
11:12 प्रोग्रॅमवर जाऊ.
11:15 समजा single quotes द्यायला विसरलो. सेव्ह करा.
11:21 हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
11:25 हे Compile करू.
11:28 tokens. cpp file च्या नवव्या ओळीवर error दिसेल .
11:34 A was not declared in the scope. प्रोग्रॅमवर जाऊ.
11:40 ह्याचे कारणsingle quotes मध्ये असलेले काहीही character value समजले जाते.
11:47 येथे d हे character व्हेरिएबल म्हणून घोषित केले आहे.
11:53 ही error दुरूस्त करू. नवव्या ओळीवरsingle quotes टाईप करू.
11:59 सेव्ह करून कार्यान्वित करा.
12:02 टर्मिनलवर जाऊ.
12:04 हे Compile करू.
12:06 हे कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे.
12:14 स्लाईडसवर जाऊ.
12:15 थोडक्यात
12:16 आपण शिकलो,
12:18 int, double, float इत्यादी डेटा टाईप्स.
12:24 Variables उदाहरणार्थ int a=2;
12:29 Identifiers उदाहरणार्थ printf() आणि
12:34 Constant उदाहरणार्थ double const b=4;
12:40 assignment
12:41 सरळव्याज calculate करणारा C program लिहा.
12:45 सूत्र: Simple Interest = principal * rate * time / 100
12:51 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12:57 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
13:01 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
13:03 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:07 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
13:20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:24 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana