BOSS-Linux/C2/Simple-filters/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:33, 9 January 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Simple Filters

Author: Manali Ranade

Keywords: Linux

Time Narration
00:02 लिनक्सच्या Simple Filters वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:09 येथे आपण head, tail, sort, cut आणि paste या बद्दल शिकणार आहोत.
00:18 ही सर्व कमांड लाईन मधून टेक्स्ट मॅन्युप्युलेशन करणारी टूल्स आहेत.
00:22 टर्मिनलवर hash चिन्ह असेल तर या कमांड देण्यासाठी root बनणे आवश्यक आहे. sudo su किंवा su root.
00:29 जर तुम्हाला टर्मिनलवर dollar ($) हे चिन्ह दिसत असेल तर तुम्ही सामान्य user म्हणून कमांडस देऊ शकता.
00:38 आपण असे मानू या की तुम्ही लिनक्सचे डिफॉल्ट इन्स्टॉलेशन केलेले असून फाईल्स जिथे सेव्ह होतात त्या पाथमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
00:46 या ट्युटोरियलसाठी आपण लिनक्स चा उपयोग करणार आहोत.
00:51 या पाठात आपल्याला माऊस आणि कीबोर्ड तसेच विंडोवरील maximize आणि minimize ही बटणे वापरता येणे अपेक्षित आहे.
01:02 एखाद्या फाईलच्या पहिल्या १० ओळी default रूपात दाखविण्यासाठी headया कमांडपुढे ascii code मधील फाईलचे नाव दिले जाते.
01:10 आपण एक फाईल बनवू या.
01:13 मेनूतून माऊसच्या सहाय्याने Application-->Accessories-->Text editor वर जा.
01:20 वेळेच्या बचतीसाठी हे अंक मी आधीपासूनच एका फाईलमध्ये लिहिले आहेत.
01:26 आपण हे अंक कॉपी करून नवीन फाईलमध्ये पेस्ट करून घेऊ.
01:34 आता File वर जाऊन Saveवर क्लिक करा.
01:37 फाईलला numbers.txt असे नाव देऊन सेव्हवर क्लिक करा.
01:44 फाईल बंद करा.
01:50 आता मेनूतून Application-->Accessories-->Terminal वर जा.
01:58 आपण तयार केलेली फाईल आपल्याला बघता येते का ते पाहू.
02:02 lsटाईप करून एंटर दाबा.
02:05 त्यामुळे आपल्याला आपल्या home directory वरील सर्व फोल्डर आणि फाईलची यादी दिसेल.
02:11 आता आपण तयार केलेल्या फाईल मधला मजकूर cat या कमांडच्या सहाय्याने वाचू या.
02:18 फाईलचे नाव आपोआप लिहिले जाण्यासाठी cat आणि num असे टाईप करून टॅबचे बटण दाबा. मग एंटर दाबा.
02:26 असेच head कमांडसाठी देखील करा.
02:30 head numbers.txt असे टाईप करून एंटर दाबा.
02:36 आता आपल्याला पहिल्या 10 ओळी दिसत आहेत.
02:39 जर आपल्याला पहिल्या 5 ओळी बघायच्या असतील तर head कमांड आणि फाईलचे नाव यामध्ये hyphen n5 या पर्यायाचा उपयोग करा.
02:49 up ऍरोचे बटण दाबा. hyphen n5 असे टाईप करून एंटर दाबा.
02:55 आता आपल्याला केवळ 5 ओळी दिसत आहेत.
02:59 पुन्हा प्रेझेंटेशनवर जाऊ या.
03:04 tail कमांड head कमांडच्या अगदी उलट काम करते. Default रूपात ही कमांड आपल्याला शेवटच्या 10 ओळी दाखवते.
03:12 आपण alt आणि tab ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनलवर जाऊ.
03:17 tail numbers dot txt असे टाईप करा.
03:21 जर आपल्याला फक्त शेवटच्या 5 ओळी बघायच्या असतील तर tail कमांड आणि फाईलचे नाव यामध्ये hyphen n5 या पर्यायाचा उपयोग करा.
03:31 hyphen n5 टाईप करून एंटर दाबा.
03:36 पुन्हा स्लाईडवर जा.
03:39 log file मध्ये सिस्टीममध्ये झालेल्या प्रत्येक घडामोडींचा समावेश होतो.
03:45 Auth.log या फाईलमध्ये log in आणि log out करणा-यांचा log ठेवला जातो.
03:51 लॉग फाईलचा शेवटचा भाग बघण्यासाठी tail कमांडच्या hyphen f या पर्यायाचा सर्वात जास्त उपयोग होतो.
03:59 लॉग फाईलमध्ये नवीन ओळ जोडली गेल्यास tail कमांड ती ओळ शेवटची ओळ आहे असे समजते आणि default रूपात त्या ओळीच्या वरील १० ओळी दर्शवते.
04:09 आता Terminal वर जा.
04:11 tail space hyphen f space forward slash var log auth dot log असे टाईप करा.
04:21 आता टर्मिनलचा आकार बदलू या.
04:28 अजून एक टर्मिनल उघडू या. Application --> accessories --> terminal
04:36 या टर्मिनलचा आकार बदलू या.
04:42 अशाप्रकारे एकाच स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल की टेल कमांड log file ची शेवटची ओळ दाखवते.
04:50 आता su असे टाईप करून एंटर दाबा.
04:54 कुठलाही चुकीचा पासवर्ड देऊन एंटर दाबा.
04:58 आपल्याला दिसेल की ज्या टर्मिनलवर tail कमांड कार्यान्वित आहे तेथील log मध्ये नवीन ओळ आली आहे.
05:05 तारीख आणि वेळ यांच्या सहितAuthentication failure असे दाखविले जाईल.
05:13 सिस्टीमची तारीख आणि वेळ खात्री करण्यासाठी date टाईप करून एंटर दाबा.
05:22 टर्मिनल बंद करण्यासाठी exit टाईप करा.
05:26 कार्यान्वित असलेली tail कमांड बंद करण्यासाठी Ctrl आणि C ही बटणे दाबा आणि terminal maximize करा.
05:42 आपण आधीच्या उदाहरणात केवळ auth dot log फाईल पाहिली आहे.
05:47 सामान्यतः लिनक्समध्ये या लॉग फाईल्स वापरल्या जातात.
05:51 मशीनमध्ये काही समस्या आल्यास trouble shoot करताना Linux System Administrator अधिक माहितीसाठी log फाईलचा उपयोग करू शकतो.
06:02 sort command नावाप्रमाणेच आपली फाईल चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सॉर्ट करते.
06:13 आपली numbers dot txt ही फाईल चढत्या क्रमाने सॉर्ट करू या.
06:21 लक्षात घ्या इथे काही वेगळेच दिसत आहे. सॉर्ट करताना केवळ पहिलीच अक्षरे बघितली जातात. त्यामुळे आपल्याला 2 या अंकाच्या आधी 10, 11, 12 हे अंक दिसत आहेत.
06:33 हे टाळण्यासाठी hyphen n म्हणजेच नंबर या पर्यायाचा समावेश करा. hyphen n टाईप करून एंटर दाबा.
06:43 संपूर्ण संख्या बघून त्या सॉर्ट केले गेल्या आहेत.
06:47 numbers dot txt ही फाईल उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी hyphen r म्हणजेच रिव्हर्स या पर्यायाचा समावेश करा.
06:59 पुन्हा पुन्हा आलेले अंक काढून ते एकदाच दिसण्यासाठी hyphen u म्हणजेच युनिक हा पर्याय वापरा.
07:07 Terminal वर जा.
07:09 Up arrow चे बटण दाबा.
07:11 hyphen u टाईप करून एंटर दाबा.
07:15 पूर्वी 2 हा अंक 2वेळा दिसत होता जो आता केवळ एकदाच दिसत आहे.
07:28 आता आपण एखाद्या विशिष्ट कॉलमवर आधारित फाईल कशी सॉर्ट करतात ते पाहू.
07:33 एक नवीन फाईल बनवून त्यात खालीलप्रमाणे टाईप करू.
07:38 मेनूतून Application -->accessories --> text editor वर जा.
07:46 वेळ वाचवण्यासाठी आधी एका फाईलमध्ये डेटा एंटर केलेला आहे. तिथून कॉपी करून नवीन फाईल मध्ये पेस्ट करू या.
08:01 नवीन फाईल marks dot text हे नाव देऊन Saveवर क्लिक करा.
08:11 विद्यार्थ्यांच्या नावांच्या स्पेलिंग मध्ये असलेल्या स्पेशल कॅरॅक्टर्सकडे दुर्लक्ष करा. ती केवळ गंमत म्हणून टाईप केली आहेत.
08:18 ही फाईल बंद करा.
08:24 आता आपण marks dot text फाईलमधील दुसरा कॉलम सॉर्ट करू या.
08:30 Terminal वर जा.
08:32 sort space marks dot txt space hyphen t space open inverted commas space close inverted commas space असे टाईप करा.
08:43 इथे hyphen t द्वारे delimiter म्हणून मोकळी जागा वापरत आहोत हे अवतरण चिन्हात space ठेवून सांगितले आहे.
08:52 hyphen k2 आपल्याला दुसरा कॉलम दर्शवते. ज्यावर आपण सॉर्ट करणार आहोत.
09:04 आता एंटर दाबा.
09:10 cat marks dot text असे टाईप करा.
09:14 ही मूळ फाईल आहे. जेव्हा आपण दुस-या कॉलमवर सॉर्ट केल्यामुळे Avir हा शब्द वर आला आणि Bala हा शब्द खाली गेला आहे.
09:33 cut कमांडचा उपयोग फाईल मधील काही माहिती काढून टाकण्यासाठी केला जातो.
09:41 marks dot txt फाईलमधून काही नावे काढू या.
09:44 Alt व Tab ही बटणे दाबून Terminal वर जा.
09:48 cut space marks dot txt space hyphen d space open inverted commas space close inverted commas space टाईप करा.
09:58 येथे cut कमांडमध्ये hyphen d या पर्यायाद्वारे delimiter म्हणून मोकळी जागा वापरत आहोत हे आपण अवतरण चिन्हात space ठेवून सांगितले आहे.
10:10 hyphen f2 हे दुस-या कॉलमसाठी आहे. एंटर दाबा.
10:21 paste कमांड, संबंधित फाईल मधल्या पाठोपाठच्या ओळी एकमेकांना जोडेल.
10:26 आपण number dot txt आणि marks dot txt या दोन्ही फाईलचा उपयोग करू या.
10:31 Terminal वर जा.
10:33 paste number dot txt marks dot txt असे टाईप करून एंटर दाबा.
10:40 आता marks dot txt ची पहिली ओळ number dot txt च्या पहिल्या ओळीला जोडली गेली आहे.
10:47 आपण redirect key च्या सहाय्याने येणारे आऊटपुट concatefile.txt नामक दुस-या फाईलमध्ये नेऊ शकतो.
10:56 त्यासाठी पुन्हा Terminal वर जा.
10:58 up arrow बटण दाबा. redirect key म्हणजेच greater than (>) हे चिन्ह असलेले बटण दाबा आणि concatefile dot txt असे टाईप करून एंटर दाबा.
11:07 cat concatefile dot txt असे टाईप करा.
11:12 पुन्हा स्लाईडवर जा.
11:15 paste hyphen sया पर्यायाचा वापर करून आपण Tab ने delimitकेलेल्या संख्या क्रमानुसार प्रिंट करू शकतो.
11:25 paste hyphen s
11:29 numbers dot txt असे टाईप करा.
11:33 पुन्हा स्लाईडवर जा.
11:34 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:39 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:45 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:48 *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana