BOSS-Linux/C2/Simple-filters/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Simple Filters
Author: Manali Ranade
Keywords: Linux
Time | Narration |
00:02 | लिनक्सच्या Simple Filters वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:09 | येथे आपण head, tail, sort, cut आणि paste या बद्दल शिकणार आहोत. |
00:18 | ही सर्व कमांड लाईन मधून टेक्स्ट मॅन्युप्युलेशन करणारी टूल्स आहेत. |
00:22 | टर्मिनलवर hash चिन्ह असेल तर या कमांड देण्यासाठी root बनणे आवश्यक आहे. sudo su किंवा su root. |
00:29 | जर तुम्हाला टर्मिनलवर dollar ($) हे चिन्ह दिसत असेल तर तुम्ही सामान्य user म्हणून कमांडस देऊ शकता. |
00:38 | आपण असे मानू या की तुम्ही लिनक्सचे डिफॉल्ट इन्स्टॉलेशन केलेले असून फाईल्स जिथे सेव्ह होतात त्या पाथमध्ये कोणताही बदल केलेला नाही. |
00:46 | या ट्युटोरियलसाठी आपण लिनक्स चा उपयोग करणार आहोत. |
00:51 | या पाठात आपल्याला माऊस आणि कीबोर्ड तसेच विंडोवरील maximize आणि minimize ही बटणे वापरता येणे अपेक्षित आहे. |
01:02 | एखाद्या फाईलच्या पहिल्या १० ओळी default रूपात दाखविण्यासाठी headया कमांडपुढे ascii code मधील फाईलचे नाव दिले जाते. |
01:10 | आपण एक फाईल बनवू या. |
01:13 | मेनूतून माऊसच्या सहाय्याने Application-->Accessories-->Text editor वर जा. |
01:20 | वेळेच्या बचतीसाठी हे अंक मी आधीपासूनच एका फाईलमध्ये लिहिले आहेत. |
01:26 | आपण हे अंक कॉपी करून नवीन फाईलमध्ये पेस्ट करून घेऊ. |
01:34 | आता File वर जाऊन Saveवर क्लिक करा. |
01:37 | फाईलला numbers.txt असे नाव देऊन सेव्हवर क्लिक करा. |
01:44 | फाईल बंद करा. |
01:50 | आता मेनूतून Application-->Accessories-->Terminal वर जा. |
01:58 | आपण तयार केलेली फाईल आपल्याला बघता येते का ते पाहू. |
02:02 | lsटाईप करून एंटर दाबा. |
02:05 | त्यामुळे आपल्याला आपल्या home directory वरील सर्व फोल्डर आणि फाईलची यादी दिसेल. |
02:11 | आता आपण तयार केलेल्या फाईल मधला मजकूर cat या कमांडच्या सहाय्याने वाचू या. |
02:18 | फाईलचे नाव आपोआप लिहिले जाण्यासाठी cat आणि num असे टाईप करून टॅबचे बटण दाबा. मग एंटर दाबा. |
02:26 | असेच head कमांडसाठी देखील करा. |
02:30 | head numbers.txt असे टाईप करून एंटर दाबा. |
02:36 | आता आपल्याला पहिल्या 10 ओळी दिसत आहेत. |
02:39 | जर आपल्याला पहिल्या 5 ओळी बघायच्या असतील तर head कमांड आणि फाईलचे नाव यामध्ये hyphen n5 या पर्यायाचा उपयोग करा. |
02:49 | up ऍरोचे बटण दाबा. hyphen n5 असे टाईप करून एंटर दाबा. |
02:55 | आता आपल्याला केवळ 5 ओळी दिसत आहेत. |
02:59 | पुन्हा प्रेझेंटेशनवर जाऊ या. |
03:04 | tail कमांड head कमांडच्या अगदी उलट काम करते. Default रूपात ही कमांड आपल्याला शेवटच्या 10 ओळी दाखवते. |
03:12 | आपण alt आणि tab ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनलवर जाऊ. |
03:17 | tail numbers dot txt असे टाईप करा. |
03:21 | जर आपल्याला फक्त शेवटच्या 5 ओळी बघायच्या असतील तर tail कमांड आणि फाईलचे नाव यामध्ये hyphen n5 या पर्यायाचा उपयोग करा. |
03:31 | hyphen n5 टाईप करून एंटर दाबा. |
03:36 | पुन्हा स्लाईडवर जा. |
03:39 | log file मध्ये सिस्टीममध्ये झालेल्या प्रत्येक घडामोडींचा समावेश होतो. |
03:45 | Auth.log या फाईलमध्ये log in आणि log out करणा-यांचा log ठेवला जातो. |
03:51 | लॉग फाईलचा शेवटचा भाग बघण्यासाठी tail कमांडच्या hyphen f या पर्यायाचा सर्वात जास्त उपयोग होतो. |
03:59 | लॉग फाईलमध्ये नवीन ओळ जोडली गेल्यास tail कमांड ती ओळ शेवटची ओळ आहे असे समजते आणि default रूपात त्या ओळीच्या वरील १० ओळी दर्शवते. |
04:09 | आता Terminal वर जा. |
04:11 | tail space hyphen f space forward slash var log auth dot log असे टाईप करा. |
04:21 | आता टर्मिनलचा आकार बदलू या. |
04:28 | अजून एक टर्मिनल उघडू या. Application --> accessories --> terminal |
04:36 | या टर्मिनलचा आकार बदलू या. |
04:42 | अशाप्रकारे एकाच स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल की टेल कमांड log file ची शेवटची ओळ दाखवते. |
04:50 | आता su असे टाईप करून एंटर दाबा. |
04:54 | कुठलाही चुकीचा पासवर्ड देऊन एंटर दाबा. |
04:58 | आपल्याला दिसेल की ज्या टर्मिनलवर tail कमांड कार्यान्वित आहे तेथील log मध्ये नवीन ओळ आली आहे. |
05:05 | तारीख आणि वेळ यांच्या सहितAuthentication failure असे दाखविले जाईल. |
05:13 | सिस्टीमची तारीख आणि वेळ खात्री करण्यासाठी date टाईप करून एंटर दाबा. |
05:22 | टर्मिनल बंद करण्यासाठी exit टाईप करा. |
05:26 | कार्यान्वित असलेली tail कमांड बंद करण्यासाठी Ctrl आणि C ही बटणे दाबा आणि terminal maximize करा. |
05:42 | आपण आधीच्या उदाहरणात केवळ auth dot log फाईल पाहिली आहे. |
05:47 | सामान्यतः लिनक्समध्ये या लॉग फाईल्स वापरल्या जातात. |
05:51 | मशीनमध्ये काही समस्या आल्यास trouble shoot करताना Linux System Administrator अधिक माहितीसाठी log फाईलचा उपयोग करू शकतो. |
06:02 | sort command नावाप्रमाणेच आपली फाईल चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सॉर्ट करते. |
06:13 | आपली numbers dot txt ही फाईल चढत्या क्रमाने सॉर्ट करू या. |
06:21 | लक्षात घ्या इथे काही वेगळेच दिसत आहे. सॉर्ट करताना केवळ पहिलीच अक्षरे बघितली जातात. त्यामुळे आपल्याला 2 या अंकाच्या आधी 10, 11, 12 हे अंक दिसत आहेत. |
06:33 | हे टाळण्यासाठी hyphen n म्हणजेच नंबर या पर्यायाचा समावेश करा. hyphen n टाईप करून एंटर दाबा. |
06:43 | संपूर्ण संख्या बघून त्या सॉर्ट केले गेल्या आहेत. |
06:47 | numbers dot txt ही फाईल उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी hyphen r म्हणजेच रिव्हर्स या पर्यायाचा समावेश करा. |
06:59 | पुन्हा पुन्हा आलेले अंक काढून ते एकदाच दिसण्यासाठी hyphen u म्हणजेच युनिक हा पर्याय वापरा. |
07:07 | Terminal वर जा. |
07:09 | Up arrow चे बटण दाबा. |
07:11 | hyphen u टाईप करून एंटर दाबा. |
07:15 | पूर्वी 2 हा अंक 2वेळा दिसत होता जो आता केवळ एकदाच दिसत आहे. |
07:28 | आता आपण एखाद्या विशिष्ट कॉलमवर आधारित फाईल कशी सॉर्ट करतात ते पाहू. |
07:33 | एक नवीन फाईल बनवून त्यात खालीलप्रमाणे टाईप करू. |
07:38 | मेनूतून Application -->accessories --> text editor वर जा. |
07:46 | वेळ वाचवण्यासाठी आधी एका फाईलमध्ये डेटा एंटर केलेला आहे. तिथून कॉपी करून नवीन फाईल मध्ये पेस्ट करू या. |
08:01 | नवीन फाईल marks dot text हे नाव देऊन Saveवर क्लिक करा. |
08:11 | विद्यार्थ्यांच्या नावांच्या स्पेलिंग मध्ये असलेल्या स्पेशल कॅरॅक्टर्सकडे दुर्लक्ष करा. ती केवळ गंमत म्हणून टाईप केली आहेत. |
08:18 | ही फाईल बंद करा. |
08:24 | आता आपण marks dot text फाईलमधील दुसरा कॉलम सॉर्ट करू या. |
08:30 | Terminal वर जा. |
08:32 | sort space marks dot txt space hyphen t space open inverted commas space close inverted commas space असे टाईप करा. |
08:43 | इथे hyphen t द्वारे delimiter म्हणून मोकळी जागा वापरत आहोत हे अवतरण चिन्हात space ठेवून सांगितले आहे. |
08:52 | hyphen k2 आपल्याला दुसरा कॉलम दर्शवते. ज्यावर आपण सॉर्ट करणार आहोत. |
09:04 | आता एंटर दाबा. |
09:10 | cat marks dot text असे टाईप करा. |
09:14 | ही मूळ फाईल आहे. जेव्हा आपण दुस-या कॉलमवर सॉर्ट केल्यामुळे Avir हा शब्द वर आला आणि Bala हा शब्द खाली गेला आहे. |
09:33 | cut कमांडचा उपयोग फाईल मधील काही माहिती काढून टाकण्यासाठी केला जातो. |
09:41 | marks dot txt फाईलमधून काही नावे काढू या. |
09:44 | Alt व Tab ही बटणे दाबून Terminal वर जा. |
09:48 | cut space marks dot txt space hyphen d space open inverted commas space close inverted commas space टाईप करा. |
09:58 | येथे cut कमांडमध्ये hyphen d या पर्यायाद्वारे delimiter म्हणून मोकळी जागा वापरत आहोत हे आपण अवतरण चिन्हात space ठेवून सांगितले आहे. |
10:10 | hyphen f2 हे दुस-या कॉलमसाठी आहे. एंटर दाबा. |
10:21 | paste कमांड, संबंधित फाईल मधल्या पाठोपाठच्या ओळी एकमेकांना जोडेल. |
10:26 | आपण number dot txt आणि marks dot txt या दोन्ही फाईलचा उपयोग करू या. |
10:31 | Terminal वर जा. |
10:33 | paste number dot txt marks dot txt असे टाईप करून एंटर दाबा. |
10:40 | आता marks dot txt ची पहिली ओळ number dot txt च्या पहिल्या ओळीला जोडली गेली आहे. |
10:47 | आपण redirect key च्या सहाय्याने येणारे आऊटपुट concatefile.txt नामक दुस-या फाईलमध्ये नेऊ शकतो. |
10:56 | त्यासाठी पुन्हा Terminal वर जा. |
10:58 | up arrow बटण दाबा. redirect key म्हणजेच greater than (>) हे चिन्ह असलेले बटण दाबा आणि concatefile dot txt असे टाईप करून एंटर दाबा. |
11:07 | cat concatefile dot txt असे टाईप करा. |
11:12 | पुन्हा स्लाईडवर जा. |
11:15 | paste hyphen sया पर्यायाचा वापर करून आपण Tab ने delimitकेलेल्या संख्या क्रमानुसार प्रिंट करू शकतो. |
11:25 | paste hyphen s |
11:29 | numbers dot txt असे टाईप करा. |
11:33 | पुन्हा स्लाईडवर जा,"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:39 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:45 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:48 | *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |