BASH/C2/Introduction-to-BASH-Shell-Scripting/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:19, 24 November 2014 by Manali (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Introduction to BASH Shell scripting

Author: Manali Ranade

Keywords: BASH, Shell, scripting



Time Narration
00:01 नमस्कार. Introduction to BASH shell scriptingवरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत,


00:10 Shellsचे विविध प्रकार
00:13 Bash Shell स्क्रिप्ट लिहीणे
00:16 आणि ते कार्यान्वित करणे.
00:18 ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:25 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.


00:32 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:35 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:39 GNU Bash वर्जन 4.1.10.
00:43 सरावासाठी कृपया GNU bash चे4किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:50 सुरूवातीला परिचय करून घेऊ.
00:53 Bash Shell म्हणजे काय ते पाहू.
00:56 * Bash Shell हे कमांड लँग्वेज इंटरप्रीटर आहे जे कमांडस कार्यान्वित करते.
01:02 * ह्या कमांडस स्टँडर्ड इनपुट डिव्हाईसमधून वाचल्या जातात.
01:07 * हे इनपुट डिव्हाईस
01:09 *तुमचा कीबोर्ड
01:11 * किंवा सिंपल टेक्स्ट फाईल असू शकते.
01:14 Bash Shell म्हणजे काय ते पाहू.
01:16 कीबोर्डवरील Ctrl+Alt+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
01:24 हे Gnome टर्मिनल उघडेल.
01:27 आपल्या shell चा प्रकार तपासण्यासाठी टाईप करा echo space dollar sign SHELL (कॅपिटलमधे)
01:38 एंटर दाबा.
01:40 slash bin slash bashअसे आऊटपुट पुढच्या ओळीवर प्रिंट झालेले दिसेल.
01:47 हे आपणBash Shellवापरत असल्याचे दाखवते.
01:51 आता उपलब्ध असलेल्या विविध Shells बद्दल जाणून घेऊ.
01:56 Bourne Shellच्या स्लाईडवर परत जाऊया.
02:00 * हे स्टीफन बोर्न ह्यांनी लिहिलेले ओरिजनल UNIX shellहोते.
02:06 *आजचे आधुनिक shells देत असलेल्या युजरशी संवाद करण्याच्या क्षमतेची यात उणीव होती.
02:11 C Shell
02:12 Bourne Shell मधे अभाव असलेली फीचर्स हे प्रदान करते.
02:16 K Shell
02:17 हे डेव्हिड कॉर्न ह्यांनी बनवले आहे.
02:20 ह्यामधे B Shellआणि C Shellह्या दोहोंची, तसेच काही अधिक फीचर्स समाविष्ट आहेत.
02:27 Bash Shell
02:30 * Bash Shell हे GNU प्रोजेक्टने विकसीत केले आहे.
02:32 * हे B Shell लँग्वेजवर आधारित आहे.
02:35 * ह्यामधे C आणि K Shellsची फीचर्स समाविष्ट आहेत.
02:40 TC Shell
02:41 *FreeBSD Shell मधे आणि त्यापासून निर्माण झालेल्या शेलमधे हे डिफॉल्ट असते.
02:46 Z shell
02:49 * युजरशी संवाद साधण्यासाठी ह्या Shell ची रचना केली आहे.
02:52 * ह्यामधेksh, bash आणि tcshच्या अनेक उपयुक्त फीचर्सचा समावेश आहे.
02:58 आता Bash Shell स्क्रिप्ट म्हणजे काय ते पाहू.
03:02 Bash Shell स्क्रिप्ट मधे साध्या text file मधे Bash कमांडसची मालिका असते.
03:08 * कमांडस टाईप करण्याऐवजी ही टेक्स्ट फाईल कार्यान्वित करण्यास हे Shell ला सांगते.
03:15 आता साधी Bash स्क्रिप्ट कशी लिहायची ते पाहू.
03:20 echo कमांड वापरून बघू जी टर्मिनलवर Hello World प्रिंट करेल.


03:25 टर्मिनलवर जा.
03:29 आता टाईप करा echo space डबल कोटसमधे Hello world
03:35 एंटर दाबा.
03:37 हे टर्मिनलवर Hello Worldप्रिंट करेल.
03:40 कमांडने अपेक्षेप्रमाणे कार्य केले आहे.
03:43 आता ही कमांड फाईलमधे वापरायची असल्यास,
03:47 ही कमांड फाईलमधे लिहून फाईल कार्यान्वित करा.
03:52 ह्यासाठी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरू.
03:57 तुम्ही आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
04:00 मला फाईल Desktopवर बनवायची आहे.
04:03 टाईप करा cd space Desktop
04:07 एंटर दाबा.
04:09 टाईप करा gedit space hello अंडरस्कोर world डॉट sh space &'(अँपरसँडचे चिन्ह)
04:20 Gedit हा टेक्स्ट एडिटर आहे. Hello अंडरस्कोर world डॉट sh हे फाईलचे नाव आहे.
04:27 प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी & (अँपरसँडचे चिन्ह)वापरले आहे.
04:32 एंटर दाबा.
04:33 geditद्वारे hello_world.sh नावाची नवी फाईल उघडली आहे.
04:40 टाईप करा hash exclamation mark front slash bin front slash bash
04:47 प्रत्येक bash स्क्रिप्टची ही पहिली ओळ असते.
04:51 याला shebang किंवा bang लाईन म्हणतात.
04:55 एंटर दाबा.
04:57 आता फाईलमधे कॉमेंट समाविष्ट करण्यासाठी टाईप करा
05:00 hash space my first Bash script
05:06 लक्षात ठेवा hash नंतर येणारी कुठलीही ओळ कॉमेंट समजली जाते.
05:11 Bash इंटरप्रीटरकडून commentsसोडून दिल्या जातील.
05:15 आता आपण आधी वापरलेल्या कमांड समाविष्ट करू शकतो.
05:19 एंटर दाबा.
05:20 टाईप करा echo space डबल कोटसमधे Hello world
05:27 एंटर दाबा.
05:28 टाईप करा echo space dollar sign SHELL (कॅपिटलमधे)
05:34 एंटर दाबा.
05:35 टाईप करा echo space backtick date backtick
05:41 backtickहे चिन्ह tilde हे चिन्ह असलेल्या बटणावर आहे.
05:47 फाईल सेव्ह करण्यासाठी Save वर क्लिक करा.
05:50 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
05:55 प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवायची आहे.
05:58 टाईप करा chmod space plus x space hello underscore world dot sh
06:09 एंटर दाबा.
06:12 टाईप करा
06:14 dot slash hello underscore world dot sh
06:19 एंटर दाबा.
06:22 आपल्याला टर्मिनलवर Hello Worldदिसेल.
06:27 पुढच्या ओळीवर shell चा प्रकार दाखवलेला आहे. म्हणजेच slash bin slash bash
06:32 आणि दिवस, महिना, वेळ, टाईम झोन आणि वर्ष दाखवलेले आहे.
06:38 प्रत्येक सिस्टीमनुसार हे आऊटपुट बदलू शकते.
06:43 स्लाईडसवर परत जाऊ. थोडक्यात,
06:46 आपण शिकलो,
06:48 * Shellsचे विविध प्रकार
06:50 * Bash Shell
06:51 *Bash Shell स्क्रिप्ट
06:52 सिंपलShell स्क्रिप्ट लिहून ती कार्यान्वित करणे.
06:57 “Welcome to Bash learning” असा मेसेज दाखवणारी सिंपल स्क्रिप्ट असाईनमेंट म्हणून लिहा.


07:03 * आणि वेगवेगळ्या ओळींवर (अॅस्टेरिक्स ).
07:06 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:10 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:13 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:17 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:22 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:26 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:34 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:39 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken tutorial.org\NMEICT-Intro
07:51 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
07:56 सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana