STEMI-2017/C2/Introduction-to-Maestros-Device/Marathi
|
|
00:01 | नमस्कार, Maestros STEMI Kit वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत-
Maestros STEMI Kit चे घटक आणि त्यांचा उद्देश. |
00:16 | या पाठासाठी आपल्याकडे
Maestros STEMI Kit असावे.
|
00:22 | या कीटचे हॉस्पिटल मॉडेल या घटकांनी बनले आहे- मेटल केसिंगमधील अँड्रॉईड टॅब
NIBP, ECG आणि SPO2 मॉनिटर असलेले Maestros डिव्हाईस, सर्व गोष्टी एकाच डिव्हाईसमधे वाय-फाय प्रिंटर ट्रॉली |
00:46 | या कीटचे अँब्युलन्स मॉडेल या घटकांनी बनले आहे-
मेटल केसिंगमधील अँड्रॉईड टॅब त्यासोबत NIBP, ECG आणि SPO2 मॉनिटर, सर्व गोष्टी एकाच डिव्हाईसमधे आणि पॉवर स्ट्रिप |
01:05 | अँब्युलन्स मॉडेल मधे वाय-फाय प्रिंटर नसतो आणि हे ट्रॉलीवर बसवलेले नसते. |
01:13 | अँब्युलन्स मॉडेलमधे टॅबचे मेटल केसिंग क्लँप वापरून बसवलेले असते. |
01:20 | HP टॅब्लेट हे डेटा एंट्रीचे साधन आहे. त्यामधे-
टॅबच्या वरील बाजूला पॉवर बटण आहे खालच्या बाजूला 2 micro USB पोर्टस आणि HDMI पोर्ट आहेत. |
01:36 | 2 USB पोर्टसपैकी, सर्वात उजव्या बाजूला असलेले पोर्ट हे टॅब चार्ज करण्यासाठी वापरले जाते. |
01:44 | अँड्रॉईड टॅब स्टँडर्ड Micro USB चार्जर किंवा Maestros Device ला जोडलेल्या USB केबलच्या सहाय्याने चार्ज करू शकतो. |
01:58 | ह्या केबलचा उपयोग करताना टॅब चार्ज करण्यासाठी Maestros डिव्हाईसकडून वीज घेतली जाते. |
02:06 | पॉवर पॉईंटला जोडणी करून टॅब चार्ज करण्याची आवश्यकता भासू नये म्हणून ही सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. |
02:15 | त्या उलट टॅब चार्ज होत असताना डिव्हाईस बरोबर घेऊन दुसरीकडे जाता येऊ शकते. |
02:21 | मेटल केसिंग असलेल्या Maestros डिव्हाईसला टॅब जोडलेली असते. |
02:27 | टॅब आणि Maestros डिव्हाईस ही स्वतंत्र यंत्रे आहेत. |
02:32 | परंतु त्यांच्याभोवती असलेल्या मेटल केसिंगमुळे ती एकच युनिट म्हणून काम करतात. |
02:39 | Maestros डिव्हाईसला 5 पोर्टस आहेत-
1 – चार्जिंग पोर्ट 2 - ECG पोर्ट 3 - BP पोर्ट 4 - SpO2 पोर्ट आणि 5- Temp |
02:51 | त्याला डाव्या बाजूला चार्जिंग पोर्टसोबत पॉवर बटण आहे. |
02:57 | आणि ECG, BP आणि SpO2 ही पोर्ट उजव्या बाजूला आहेत. |
03:04 | Maestros डिव्हाईसवर डाव्या बाजूला दोन हिरवट पिवळ्या रंगाचे LED आहेत. त्यातील एक दिवा Maestros डिव्हाईस सुरू केल्यावर लागतो आणि जेव्हा डिव्हाईस चार्जिंग मोडवर असेल तेव्हा दुसरा दिवा लागतो |
03:23 | आता Non Invasive Blood Pressure युनिट म्हणजेच NIBP युनिटबद्दल जाणून घेऊ. |
03:32 | B.P cuff चे B.P cuff केबल आणि extension केबल हे दोन भाग आहेत. |
03:39 | प्रथम B.P cuff केबल extension केबलला जोडा. |
03:46 | नंतर extension केबलचे दुसरे टोक B.P पोर्टला जोडा. |
03:52 | पूर्वी नमूद केल्याप्रमाणे हे पोर्ट Maestros डिव्हाईसच्या खालच्या बाजूला डावीकडे आहे. |
04:00 | आता आपण B.P. तपासू शकतो. |
04:05 | आता SpO2 युनिटबद्दल जाणून घेऊ.
SpO2 केबलचे दोन भाग आहेत - extension केबल आणि SpO2 probe |
04:18 | दाखवल्याप्रमाणे, extension केबल SpO2 probe ला जोडा. |
04:24 | पारदर्शक कव्हर केबल्स जोडणीच्या जागी सरकवून ती सुरक्षित करा. |
04:31 | extension केबलचे दुसरे टोक Maestros डिव्हाईसला जोडणे आवश्यक आहे. |
04:38 | Maestros डिव्हाईसच्या डावीकडे वरील बाजूला असलेल्या पोर्टला ती जोडा. |
04:45 | आता आपण SpO2 मोजण्यासाठी सज्ज आहोत. |
04:50 | आता ECG युनिटबद्दल जाणून घेऊ.
येथे दाखवल्याप्रमाणे Maestros डिव्हाईसच्या डाव्या बाजूला वरती असलेल्या ECG पोर्टला ECG केबल जोडा . |
05:04 | कनेक्टर हेडच्या दोन्ही बाजूचे स्क्रू घट्ट करून जोडणी नीट झाल्याची खात्री करा. |
05:11 | आता आपण ECG घेण्यासाठी सज्ज आहोत. |
05:15 | थोडक्यात, |
05:16 | आपण या पाठात - Maestros STEMI Kit बरोबर येणा-या विविध युनिटसबद्दल आणि ती Maestros डिव्हाईसबरोबर कशी जोडायची हे जाणून घेतले. |
05:29 | STEMI INDIA
संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे हे आहे |
05:44 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
06:00 | हा पाठ
STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे. हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |