STEMI-2017/C2/Introduction-to-Maestros-Device/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
NARRATION
00:01 नमस्कार, Maestros STEMI Kit वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत-

Maestros STEMI Kit चे घटक आणि त्यांचा उद्देश.

00:16 या पाठासाठी आपल्याकडे

Maestros STEMI Kit असावे.


00:22 या कीटचे हॉस्पिटल मॉडेल या घटकांनी बनले आहे- मेटल केसिंगमधील अँड्रॉईड टॅब

NIBP, ECG आणि SPO2 मॉनिटर असलेले Maestros डिव्हाईस, सर्व गोष्टी एकाच डिव्हाईसमधे वाय-फाय प्रिंटर ट्रॉली

00:46 या कीटचे अँब्युलन्स मॉडेल या घटकांनी बनले आहे-

मेटल केसिंगमधील अँड्रॉईड टॅब त्यासोबत NIBP, ECG आणि SPO2 मॉनिटर, सर्व गोष्टी एकाच डिव्हाईसमधे आणि पॉवर स्ट्रिप

01:05 अँब्युलन्स मॉडेल मधे वाय-फाय प्रिंटर नसतो आणि हे ट्रॉलीवर बसवलेले नसते.
01:13 अँब्युलन्स मॉडेलमधे टॅबचे मेटल केसिंग क्लँप वापरून बसवलेले असते.
01:20 HP टॅब्लेट हे डेटा एंट्रीचे साधन आहे. त्यामधे-

टॅबच्या वरील बाजूला पॉवर बटण आहे खालच्या बाजूला 2 micro USB पोर्टस आणि HDMI पोर्ट आहेत.

01:36 2 USB पोर्टसपैकी, सर्वात उजव्या बाजूला असलेले पोर्ट हे टॅब चार्ज करण्यासाठी वापरले जाते.
01:44 अँड्रॉईड टॅब स्टँडर्ड Micro USB चार्जर किंवा Maestros Device ला जोडलेल्या USB केबलच्या सहाय्याने चार्ज करू शकतो.
01:58 ह्या केबलचा उपयोग करताना टॅब चार्ज करण्यासाठी Maestros डिव्हाईसकडून वीज घेतली जाते.
02:06 पॉवर पॉईंटला जोडणी करून टॅब चार्ज करण्याची आवश्यकता भासू नये म्हणून ही सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे.
02:15 त्या उलट टॅब चार्ज होत असताना डिव्हाईस बरोबर घेऊन दुसरीकडे जाता येऊ शकते.
02:21 मेटल केसिंग असलेल्या Maestros डिव्हाईसला टॅब जोडलेली असते.
02:27 टॅब आणि Maestros डिव्हाईस ही स्वतंत्र यंत्रे आहेत.
02:32 परंतु त्यांच्याभोवती असलेल्या मेटल केसिंगमुळे ती एकच युनिट म्हणून काम करतात.
02:39 Maestros डिव्हाईसला 5 पोर्टस आहेत-

1 – चार्जिंग पोर्ट 2 - ECG पोर्ट 3 - BP पोर्ट 4 - SpO2 पोर्ट आणि 5- Temp

02:51 त्याला डाव्या बाजूला चार्जिंग पोर्टसोबत पॉवर बटण आहे.
02:57 आणि ECG, BP आणि SpO2 ही पोर्ट उजव्या बाजूला आहेत.
03:04 Maestros डिव्हाईसवर डाव्या बाजूला दोन हिरवट पिवळ्या रंगाचे LED आहेत. त्यातील एक दिवा Maestros डिव्हाईस सुरू केल्यावर लागतो आणि जेव्हा डिव्हाईस चार्जिंग मोडवर असेल तेव्हा दुसरा दिवा लागतो
03:23 आता Non Invasive Blood Pressure युनिट म्हणजेच NIBP युनिटबद्दल जाणून घेऊ.
03:32 B.P cuff चे B.P cuff केबल आणि extension केबल हे दोन भाग आहेत.
03:39 प्रथम B.P cuff केबल extension केबलला जोडा.
03:46 नंतर extension केबलचे दुसरे टोक B.P पोर्टला जोडा.
03:52 पूर्वी नमूद केल्याप्रमाणे हे पोर्ट Maestros डिव्हाईसच्या खालच्या बाजूला डावीकडे आहे.
04:00 आता आपण B.P. तपासू शकतो.
04:05 आता SpO2 युनिटबद्दल जाणून घेऊ.

SpO2 केबलचे दोन भाग आहेत - extension केबल आणि SpO2 probe

04:18 दाखवल्याप्रमाणे, extension केबल SpO2 probe ला जोडा.
04:24 पारदर्शक कव्हर केबल्स जोडणीच्या जागी सरकवून ती सुरक्षित करा.
04:31 extension केबलचे दुसरे टोक Maestros डिव्हाईसला जोडणे आवश्यक आहे.
04:38 Maestros डिव्हाईसच्या डावीकडे वरील बाजूला असलेल्या पोर्टला ती जोडा.
04:45 आता आपण SpO2 मोजण्यासाठी सज्ज आहोत.
04:50 आता ECG युनिटबद्दल जाणून घेऊ.

येथे दाखवल्याप्रमाणे Maestros डिव्हाईसच्या डाव्या बाजूला वरती असलेल्या ECG पोर्टला ECG केबल जोडा .

05:04 कनेक्टर हेडच्या दोन्ही बाजूचे स्क्रू घट्ट करून जोडणी नीट झाल्याची खात्री करा.
05:11 आता आपण ECG घेण्यासाठी सज्ज आहोत.
05:15 थोडक्यात,
05:16 आपण या पाठात - Maestros STEMI Kit बरोबर येणा-या विविध युनिटसबद्दल आणि ती Maestros डिव्हाईसबरोबर कशी जोडायची हे जाणून घेतले.
05:29 STEMI INDIA

संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे हे आहे

05:44 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.

06:00 हा पाठ

STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे. हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya