PHP-and-MySQL/C4/User-Login-Part-1/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | user login आणि sessions वरील पाठात स्वागत. |
00:03 | या पाठात आपण phpमधील पुढील वैशिष्टये बघू. html formसबमिट करणे, युजर नेम आणि पासवर्ड तपासणे. |
00:14 | एंटर केलेली व्हॅल्यू डेटाबेस बरोबर तपासली जाईल. |
00:16 | युजरनेम व पासवर्डचा डेटाबेस सेटअप करणे, डेटाबेसला कनेक्ट करणे आणि logout फंक्शनच्या प्रक्रिया पाहू. |
00:25 | sessionsचा वापर करत असल्याने logoutबटण दाबेपर्यंत युजर logged-in राहिल. |
00:32 | आता html form बनवण्यापासून सुरूवात करू. |
00:35 | mySQL ची आपण सेटअप करत असलेली काही वैशिष्ट्ये पाहू. |
00:42 | html फॉर्ममधून "login dot php" नामक पेजवर जाऊन कार्य करू. |
00:47 | हे सोपे करण्यासाठी वेगवेगळी पेजेस ठेवू . |
00:49 | POST मेथड वापरू.
येथे फॉर्म संपवू. |
00:54 | टाईप करा input type equal to "text" आणि name equal to "username". |
01:06 | येथे line break द्या. |
01:09 | ही ओळ कॉपी-पेस्ट करा आणि "text"च्या जागी "password" लिहा. |
01:15 | name equal to "password" करा. ऑपरेटिंग सिस्टीमच्या वापरानुसार चांदणी किंवा गोल दिसणे अवलंबून असते. |
01:24 | शेवटी "submit" बटण बनवू ज्याची व्हॅल्यू "Log in" असेल. |
01:31 | हे करून बघू. रिफ्रेश केल्यावर पेज दिसेल, |
01:36 | युजरनेम आणि पासवर्ड असलेले "index dot php" . |
01:39 | log in वर क्लिक केल्यावर पेजवर जाईल, जे उपलब्ध नाही. |
01:43 | नीट समजण्यासाठी येथे labels समाविष्ट करू. |
01:54 | रिफ्रेश करू. आपल्याला असे दिसेल. |
01:59 | आता "login dot php" ही फाईल बनवू. |
02:01 | प्रथम "php my admin" उघडू. |
02:04 | "xampp" वापरत असल्यास हे "php my admin" लोकल होस्ट वापरून आपोआप इन्स्टॉल झालेले असेल. |
02:11 | नसल्यास, google ने शोधून तुमच्या local host directory मधे त्याची कॉपी करून ते सुरू करा. |
02:21 | आता नवा डेटाबेस बनवू. |
02:25 | येथे "php login" हा नवा डेटाबेस बनवू. createवर क्लिक करा. |
02:40 | हे येथे तयार झालेले दिसेल. आता tables बनवू शकतो. |
02:46 | तुम्ही sqlशी परिचित नसल्यास थोडक्यात जाणून घेऊ. |
02:50 | डेटाबेस हे बेसिक स्ट्रक्चर आहे. यातtables संचित केलेली असतात. tables मधे rows आणि rows मधे व्हॅल्यूज संचित असतात. |
03:00 | त्याला "users" नाव देऊन OKवर क्लिक करा. |
03:06 | number of fields न लिहिल्यामुळे error मिळाली आहे. |
03:10 | नवा डेटाबेस बनवताना नोटपॅड किंवा context editor वर हव्या असलेल्या सर्व fields ची सूची लिहिणे उपयोगी ठरते. |
03:20 | मी प्रथम "id", नंतर "user name" आणि शेवटी "password" घेणार आहे. एवढेच आवश्यक आहे. |
03:28 | प्रोग्रॅममधील गरजेनुसार "first name", "date of birth" इत्यादी देखील समाविष्ट करू शकतो. |
03:36 | परंतु येथे केवळ ही 3 fields वापरणार आहोत. |
03:42 | येथे परत जाऊन तीन टाईप करून टेबल बनवू. |
03:49 | आता पुढे फिल्डची नावे टाईप करायची आहेत. |
03:53 | येथे "id" टाईप करून त्याचा integer हा टाईप निवडू. |
03:57 | ही primary key आहे आणि हे ऑटो इन्क्रीमेंट होणे आवश्यक आहे. |
04:02 | आता प्रत्येक वेळी नवे रेकॉर्ड बनेल तेव्हा त्याची id valueएकने वाढेल. |
04:07 | उदाहरणार्थ पहिल्या रजिस्टर केलेल्या युजरचा id एक असेल तर दुस-या युजरचा दोन, पुढे तीन चार इत्यादी. |
04:15 | पुढचे फिल्ड user name आणि शेवटचे password असणार आहे. |
04:23 | ते दोन्ही VARCHARs म्हणून सेट करू आणि त्यास 25 अक्षरामध्ये सेट करू आणि पासवर्ड ही 25अक्षरामध्ये सेट करू. |
04:31 | ह्यासाठी अजून काहीही सेट करण्याची गरज नाही. |
04:34 | खाली scroll करून SAVE वर क्लिक करा. |
04:40 | आता हे खाली येऊन बघू शकतो. |
04:44 | ह्यात व्हॅल्यू समाविष्ट करू . |
04:48 | हे तपासू. |
04:50 | युजर registration फॉर्म बनवण्यासंबंधीचे पाठ बनवले आहेत. त्याबद्दलची चर्चा तिथे करू. |
05:01 | "id" ची व्हॅल्यू आपोआप वाढेल. त्यामुळे तिथे काहीही लिहिण्याची गरज नाही. |
05:05 | तिथे 1 लिहिला जाईल. |
05:07 | युजरनेम मध्ये "Alex" लिहा. |
05:10 | माझा पासवर्ड "abc" असेल. तुम्ही अजून चांगला पासवर्ड द्या. |
05:16 | युजरनेम "Alex" आणि पासवर्ड "abc" हे लक्षात ठेवायला सोपे आहे. हे संचित केले आहे. |
05:26 | browse करण्यासाठी browse tab क्लिक करा. |
05:28 | खाली scrollकरू. "Alex" आणि "abc" हे अनुक्रमे आपले युजरनेम व पासवर्ड आहेत. त्याचा id 1 आहे. |
05:37 | आता "login dot php" पेज बनवू. |
05:46 | "Login dot php" हे सेव्ह करू. |
05:51 | php tags कसे बनवायचे ते पाहू. |
05:55 | आता काही POST व्हेरिएबल्सचा वापर करू. |
05:59 | "index dot php" मधे POST मेथड वापरली होती. |
06:01 | आता टाईप करू user name equal to dollar underscore POST square bracket मधे "username". |
06:11 | आपल्याला हे मिळेल. आणि password equal to dollar underscore POST square bracket मधे "password". |
06:25 | प्रथम युजरनेम आणि पासवर्ड लिहिले गेले आहेत का ते तपासू. |
06:30 | आपण फॉर्म validate करणार नाही. कारण युजरने ही दोन्ही fields लिहिलेली आहेत. |
06:38 | आता "if" स्टेटमेंट लिहू. |
06:40 | हा मोठा block असेल कारण फिल्ड तपासल्यानंतर लागणारा सर्व code येथे लिहावा लागेल. |
06:45 | लिहा "username" म्हणजेच "username" मधे व्हॅल्यू असल्यास हे TRUE असेल. पुढे "password". |
06:56 | "username" आणि "password" लिहिल्यावर हे TRUE होईल आणि हा कोडचा block कार्यान्वित होईल. |
07:04 | आपल्याला डेटाबेसला कनेक्ट करायचे आहे. |
07:08 | त्यासाठी "connect" equal to "mysql_connect" नावाचे व्हेरिएबल बनवू. |
07:20 | येथे कंसात पहिले पॅरॅमीटर "host" आहे म्हणून मी "localhost" लिहित आहे. |
07:28 | दुसरे "username" म्हणून "root" लिहित आहे. |
07:31 | तिसरे "password" आहे. तो मी वापरलेला नाही. आपण ते तपासून घेऊ. |
07:37 | पुढे "or die" लिहून त्यात error मेसेज लिहू शकता. |
07:39 | उदाहरणार्थ "Couldn't connect" असे लिहू शकतो. |
07:44 | मला माझ्या पासवर्डबद्दल खात्री नाही. तो काहीतरी वेगळा आहे. |
07:48 | चूक केल्यास "Couldn't connect" हा मेसेज मिळेल. |
07:51 | आता टेबल, चुकले, डेटाबेस निवडणे आवश्यक आहे. |
07:58 | त्यासाठी "mysql select db" लिहा. इनस्टॉल केलेल्या php module मधील हे built-in function आहे. |
08:06 | हे XAMPP सोबतच येते. |
08:11 | येथे double quote मधे "phplogin" लिहा. |
08:19 | आता सर्व ठीक आहे असे समजू. मी येथे "Couldn't find db" हा एरर मेसेज समाविष्ट करू शकते. |
08:30 | पेज रिफ्रेश करून loginवर क्लिक करा. काहीच झाले नाही. |
08:37 | "if" स्टेटमेंट एडिट करू. "else" टाईप करून echo किंवा "die" फंक्शन समाविष्ट करू. |
08:47 | हे फंक्शन कॉल केल्यानंतर येथे काहीही कार्यान्वित होणार नाही. |
08:54 | आपल्याला हवा तसा मेसेज दिसेल. |
08:58 | येथे "Please enter a user name and a password" हा मेसेज लिहित आहे. |
09:08 | हे रिफ्रेश करा. डेटा रिसेंड करा. हा error मेसेज मिळेल. |
09:13 | पुढे "Alex" आणि "123", चुकले, "abc" टाईप करून log inवर क्लिक करा. |
09:18 | कुठलाही error मेसेज मिळाला नाही म्हणजे आपण डेटाबेसला कनेक्ट झालो आहोत. |
09:25 | हा भाग येथे संपत आहे. पुढील भागात डेटाबेसला कनेक्ट करून, user name आणि password कसा तपासायचा ते पाहू. |
09:34 | धन्यवाद. |