Moodle-Learning-Management-System/C2/Forums-and-Assignments-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Moodle मधील Forums and Assignments वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :

वेगवेगळ्या प्रकारचे forums चर्चेसाठी forums कसे जोडावेत आणि Assignments कसे तयार करावेत?

00:21 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:

Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर

00:44 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे, कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात.
00:56 हे ट्युटोरिअल गृहीत धरते की,

site administrator ने तुमची teacher म्हणून नोंदणी केली आहे आणि तुम्हांला किमान एक कोर्स असाईन केला आहे.

01:08 हे देखील मानले जाते की,

तुम्ही तुमच्या कोर्ससाठी काही कोर्स सामग्री अपलोड केली आहे. नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल पहा.

01:22 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये एक विद्यार्थी जोडणे आवश्यक आहे.
01:28 विद्यार्थी कसा जोडावा हे जाणून घेण्यासाठी, कृपया Users in Moodle ट्युटोरिअलचा संदर्भ घ्या. मी आधीच माझ्या कोर्समध्ये एक विद्यार्थिनी, प्रिया सिन्हा जोडली आहे.
01:40 ब्राऊझरवर जा आणि teacher login वापरून आपल्या Moodle site वर लॉगिन करा.
01:47 डाव्या navigation menu मध्ये Calculus course वर क्लिक करा.
01:52 लक्षात घ्या की, आपण आधी काही course material आणि announcements जोडले होते.
01:59 Forums काय आहेत ते समजून घेऊ.
02:03 Forums शिक्षक आणि विद्यार्थ्यांद्वारे चर्चेसाठी आणि कल्पनांची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
02:12 ज्याअर्थी Announcements केवळ शिक्षकांद्वारेच पोस्ट केल्या जातात.
02:18 Teachers ह्या चर्चेचे मार्गदर्शन करतात, ही खात्री करून घ्या की, सर्व सदस्यांनी मार्गदर्शक तत्त्वे अनुसरल्या आहेत.
02:26 आता आपण Forums कसा जोडावा ते शिकू. Moodle page वर जा.
02:33 वरील उजव्या बाजूला gear icon वर क्लिक करा आणि नंतर Turn Editing On वर क्लिक करा.
02:40 कॉमन सेक्शनच्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource लिंकवर क्लिक करा.
02:47 खाली स्क्रोल करा आणि एक्टिव्हिटी चुजरमध्ये Forum निवडा.
02:53 एक्टिव्हिटी चुजरच्या तळाशी Add button वर क्लिक करा.
02:59 Forum name course page वर forum ची लिंक म्हणून प्रदर्शित होईल.
03:06 मी टाईप करेन Interesting web resources on evolutes and involutes.
03:13 Description हे विद्यार्थ्यांना forum चे उद्देश्य स्पष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. मी येथे दर्शविल्याप्रमाणे टेक्स्ट टाईप करेन.
03:23 ह्या टेक्स्ट एरियाच्या खाली Display description on course page वर क्लिक करा.
03:30 पुढील पर्याय आहे Forum type. डीफॉल्टनुसार, Standard forum for general use निवडला आहे.
03:40 Moodle मध्ये 5 forum types आहेत. Forums च्या types बद्दल वाचण्यासाठी ड्रॉप-डाऊनच्या पुढे Help icon वर क्लिक करा.
03:50 आपल्या आवश्यकतेनुसार, तुम्ही Forum type निवडू शकता. मी निवडेन Standard forum displayed in a blog-like format.
04:01 खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Save and display बटणावर क्लिक करा.
04:09 आपण एका नवीन पृष्ठावर आलो आहोत. येथे,Add a new topic बटणावर क्लिक करा.
04:17 येथे दर्शविल्याप्रमाणे मी Subject आणि Message टाईप करेन. उर्वरित पर्याय त्या घोषणेप्रमाणेच आहेत.
04:29 खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Post to forum वर क्लिक करा.
04:36 यशस्वी संदेश प्रदर्शित झाला आहे.
04:39 लक्ष द्या की मेसेज म्हणतो post चा लेखक 30 मिनिटांच्या आत post संपादित करू शकतो. तथापि, केवळ non-teacher profiles साठी ट्रू आहे.
04:54 शिक्षक जो course चा नियामक आणि निर्माता आहे, कोणत्याही वेळी post एडिट आणि डिलीट करू शकतो.
05:03 मी आता विद्यार्थी म्हणून PriyaSinha लॉगिन करणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की विद्यार्थी हा forum कसा पाहतो.
05:15 चर्चा पाहण्यासाठी resources च्या सूचीमध्ये forum वर क्लिक करा.
05:21 विद्यार्थी म्हणून, मी एकतर Add a new topic किंवा Discuss this topic करू shakte. मी तळाशी उजव्या बाजूला Discuss this topic वर क्लिक करेन.
05:35 नंतर Reply लिंक वर क्लिक करा. दर्शविल्याप्रमाणे, मी एक कमेंट जोडेन.
05:42 खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Post to forum बटणावर क्लिक करा. तुम्ही ह्या थ्रेडच्या शेवटी कमेंट जोडली असल्याचे पाहू शकता.
05:53 विद्यार्थ्याने पोस्ट केलेली comment पाहण्यासाठी मी पुन्हा शिक्षक Rebecca म्हणून लॉगिन करते.
06:01 forum च्या नावावर क्लिक करा. येथे लक्ष द्या, ह्या चर्चेच्या विषयासाठी आपण 1 reply so far पाहू शकतो.
06:12 तळाशी उजवीकडे, Discuss this topic लिंकवर क्लिक केल्यानंतर वास्तविक संदेश पाहिला जाऊ शकतो.
06:21 येथे Split नावाचा दुसरा पर्याय आहे. जर शिक्षकांना असे वाटते की उत्तर वेगळ्या चर्चेस पात्र आहे, तर ती, चर्चा विभाजित करू शकते.
06:34 चर्चा विभाजित करणे नवीन चर्चा तयार करते. नवीन चर्चा आणि त्या थ्रेडमधील नंतरची पोस्ट्स, नवीन चर्चा थ्रेडवर हलविली जातील. मी ते तसेच राहू देईन.
06:49 Calculus कोर्सवर पुन्हा जाऊ.
06:53 पुढे आपण शिकणार आहोत - assignment कसे तयार करावे.
06:58 Moodle मधील Assignment :

ऑनलाईन सबमिट केले जाऊ शकते, जे पेपर वाचवते विद्यार्थ्यांना ऑडिओ, व्हिडिओ, पावरपॉईंट प्रेझेंटेशन इत्यादीसारख्या मिडिआ फाईल्स समाविष्ट करण्यास सक्षम करते. आणि विद्यार्थ्यांना न बघितलेले grade निवडून शिक्षकांना निष्पक्ष राहण्यास मदत करते.

07:20 पुन्हा ब्राऊझरवर जाऊ.
07:23 अधिक रिसोर्सेस जोडण्यासाठी Turn editing on var ja.
07:28 Basic Calculus सेक्शनच्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource वर क्लिक करा.
07:35 नवीन assignment जोडण्यासाठी सूचीमधून Assignment वर डबल-क्लिक करा.
07:42 येथे दाखविल्याप्रमाणे, मी assignment चे नाव देते.
07:47 पुढे, assignment चे सविस्तर वर्णन करा आणि विद्यार्थ्यांनी काय सबमिट करावेत ह्यांचा उल्लेख करा.
07:55 हा एक सोपा स्वरूपित text editor आहे, तुम्ही tables, images इ. समाविष्ट करू शकता.
08:02 AssignmentResource.odt फाईलमधून मी येथे टाईप केलेला टेक्स्ट तुम्ही कॉपी करू शकता.
08:07 हे ह्या ट्युटोरिअलच्या Code filesलिंकमध्ये उपलब्ध आहे.
08:13 Availability सेक्शन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
08:17 पुढे, आपण तारीख आणि वेळ निर्दिष्ट करू, ज्यावरून सबमिशन्स केले जाऊ शकतात. Enable बॉक्स सक्षम करा.
08:28 तुम्ही तारीख निवडण्यासाठी कॅलेंडर आयकॉनदेखील वापरू शकता. मी ते 25 Nov 2018 म्हणून सेट करेन.
08:39 मग मी Due date म्हणून 15 Dec 2018 सेट करेन.
08:46 Cut-off date आणि Remind me to grade तारखे द्वारा अर्थ काढण्यासाठी Help icon वर क्लिक करा.
08:54 आवश्यक असल्यास सेट करा किंवा नसल्यास अक्षम करा. मी त्यांना अक्षम करेन.
09:02 Always show description चेकबॉक्स अनचेक करा. जर हे फिल्ड सक्षम असेल तर Allow submissions from date च्या आधी विद्यार्थी assignment चे वर्णन पाहू शकतात.
09:17 पुढील आहे Submission types सेक्शन. विद्यार्थ्यांना ऑनलाईन मजकूर सबमिट करण्याची परवानगी द्यायची किंवा त्यांना केवळ फाईल्स अपलोड करण्याची इच्छा आहे का ते ठरवा.
09:30 मी Online text आणि File submissions दोन्ही तपासेन. तुमच्या आवश्यकतेनुसार, तुम्ही एक किंवा दोन्ही पर्याय निवडू शकता.
09:42 मी Word limit' सक्षम करेन आणि येथे 1000 pravisht करेन.
09:48 आपण प्रत्येक विद्यार्थी अपलोड करू शकणाऱ्या फाईल्सची संख्यादेखील निर्दिष्ट करू शकता. याव्यतिरिक्त, आपण maximum फाईल आकार आणि फाईल्सचे types आपण स्वीकारू शकतो.
10:03 कृपया लक्षात ठेवाः

हे admin द्वारे सेट केलेले maximum फाईल आकार अधिलिखित(ओव्हरराईड) करेल, जे आपल्या बाबतीत 128 MB आहे.

10:14 Accepted file types' पुढे Help icon वर क्लिक करा. येथे आपण ह्या field ने स्विकारलेले file types बद्दल वाचू शकतो.
10:26 मी येथे टाईप करेन .pdf,.docx,.doc .
10:34 Feedback types आणि Submission settingsअंतर्गत fields चे रिव्ह्यूव्ह करा. तुम्ही तुमच्या आवश्यकतांनुसार ते सक्षम किंवा अक्षम करू शकता.
10:46 मी दर्शविल्याप्रमाणे सेटिंग्ज निवडले आहेत.
10:50 आता खाली स्क्रोल करा आणि ते vistrut करण्यासाठी Grade वर क्लिक करा.
10:57 डीफॉल्टनुसार, maximum grade 100 आहे. आपण हे आहे तसेच ठेवून देऊ.
11:04 नंतर मी Grade to pass म्हणून 40 एंटर करेन आणि Blind marking ला Yes सेट करेन.
11:13 हे मूल्यांकनकर्त्यांकडून विद्यार्थ्याची ओळख लपवेल. तर आता शिक्षक म्हणून मला माहित नाही की कोणत्या विद्यार्थ्याने assignment सबमिट केले आहे.
11:26 जे ग्रेडिंग करताना मला निष्पक्ष राहण्यास मदत करते.
11:31 कृपया लक्षात घ्या की,

Blind marking सेटिंग, कोणत्याही सबमिशननंतर ह्या असाईनमेंटसाठी बदलली जाऊ शकत नाही.

11:40 assignment साठी इतर अनेक सेटिंग्ज आहेत जे आपण स्वतः anveshan करू शकता.
11:46 आता खाली स्क्रोल करा आणि Save and display बटणावर क्लिक करा.
11:52 आपण येथे assignment बद्दल काही आकडेवारी पाहू शकता.

आणि View all submissions आणि Grade साठी लिंक.

12:03 ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो. सारांशित करूया.
12:09 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलोत :

वेगवेगळ्या प्रकारचे forums forum कसे जोडायचे आणि Assignments कसे तयार करावेत ?

12:20 तुमच्यासाठी येथे एक लहान असाईनमेंट आहे.

आधी तयार केलेल्या forum चर्चेला रिप्लाय जोडा. ह्या रिप्लायने चर्चेस विभाजित करा.

12:33 assignment तयार करा जे केवळ ऑनलाईन टेक्स्ट सबमिशन स्वीकारते.

अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या.

12:44 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करा आणि पहा.
12:52 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
13:02 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध क्वेरी पोस्ट करा.
13:06 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:20 आय.आय.टी. बॉम्बेतर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
13:31 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana