Moodle-Learning-Management-System/C2/Forums-and-Assignments-in-Moodle/Marathi
Time | Narration |
00:01 | Moodle मधील Forums and Assignments वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :
वेगवेगळ्या प्रकारचे forums चर्चेसाठी forums कसे जोडावेत आणि Assignments कसे तयार करावेत? |
00:21 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:
Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर |
00:44 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे, कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात. |
00:56 | हे ट्युटोरिअल गृहीत धरते की,
site administrator ने तुमची teacher म्हणून नोंदणी केली आहे आणि तुम्हांला किमान एक कोर्स असाईन केला आहे. |
01:08 | हे देखील मानले जाते की,
तुम्ही तुमच्या कोर्ससाठी काही कोर्स सामग्री अपलोड केली आहे. नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल पहा. |
01:22 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये एक विद्यार्थी जोडणे आवश्यक आहे. |
01:28 | विद्यार्थी कसा जोडावा हे जाणून घेण्यासाठी, कृपया Users in Moodle ट्युटोरिअलचा संदर्भ घ्या. मी आधीच माझ्या कोर्समध्ये एक विद्यार्थिनी, प्रिया सिन्हा जोडली आहे. |
01:40 | ब्राऊझरवर जा आणि teacher login वापरून आपल्या Moodle site वर लॉगिन करा. |
01:47 | डाव्या navigation menu मध्ये Calculus course वर क्लिक करा. |
01:52 | लक्षात घ्या की, आपण आधी काही course material आणि announcements जोडले होते. |
01:59 | Forums काय आहेत ते समजून घेऊ. |
02:03 | Forums शिक्षक आणि विद्यार्थ्यांद्वारे चर्चेसाठी आणि कल्पनांची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. |
02:12 | ज्याअर्थी Announcements केवळ शिक्षकांद्वारेच पोस्ट केल्या जातात. |
02:18 | Teachers ह्या चर्चेचे मार्गदर्शन करतात, ही खात्री करून घ्या की, सर्व सदस्यांनी मार्गदर्शक तत्त्वे अनुसरल्या आहेत. |
02:26 | आता आपण Forums कसा जोडावा ते शिकू. Moodle page वर जा. |
02:33 | वरील उजव्या बाजूला gear icon वर क्लिक करा आणि नंतर Turn Editing On वर क्लिक करा. |
02:40 | कॉमन सेक्शनच्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource लिंकवर क्लिक करा. |
02:47 | खाली स्क्रोल करा आणि एक्टिव्हिटी चुजरमध्ये Forum निवडा. |
02:53 | एक्टिव्हिटी चुजरच्या तळाशी Add button वर क्लिक करा. |
02:59 | Forum name course page वर forum ची लिंक म्हणून प्रदर्शित होईल. |
03:06 | मी टाईप करेन Interesting web resources on evolutes and involutes. |
03:13 | Description हे विद्यार्थ्यांना forum चे उद्देश्य स्पष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. मी येथे दर्शविल्याप्रमाणे टेक्स्ट टाईप करेन. |
03:23 | ह्या टेक्स्ट एरियाच्या खाली Display description on course page वर क्लिक करा. |
03:30 | पुढील पर्याय आहे Forum type. डीफॉल्टनुसार, Standard forum for general use निवडला आहे. |
03:40 | Moodle मध्ये 5 forum types आहेत. Forums च्या types बद्दल वाचण्यासाठी ड्रॉप-डाऊनच्या पुढे Help icon वर क्लिक करा. |
03:50 | आपल्या आवश्यकतेनुसार, तुम्ही Forum type निवडू शकता. मी निवडेन Standard forum displayed in a blog-like format. |
04:01 | खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Save and display बटणावर क्लिक करा. |
04:09 | आपण एका नवीन पृष्ठावर आलो आहोत. येथे,Add a new topic बटणावर क्लिक करा. |
04:17 | येथे दर्शविल्याप्रमाणे मी Subject आणि Message टाईप करेन. उर्वरित पर्याय त्या घोषणेप्रमाणेच आहेत. |
04:29 | खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Post to forum वर क्लिक करा. |
04:36 | यशस्वी संदेश प्रदर्शित झाला आहे. |
04:39 | लक्ष द्या की मेसेज म्हणतो post चा लेखक 30 मिनिटांच्या आत post संपादित करू शकतो. तथापि, केवळ non-teacher profiles साठी ट्रू आहे. |
04:54 | शिक्षक जो course चा नियामक आणि निर्माता आहे, कोणत्याही वेळी post एडिट आणि डिलीट करू शकतो. |
05:03 | मी आता विद्यार्थी म्हणून PriyaSinha लॉगिन करणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की विद्यार्थी हा forum कसा पाहतो. |
05:15 | चर्चा पाहण्यासाठी resources च्या सूचीमध्ये forum वर क्लिक करा. |
05:21 | विद्यार्थी म्हणून, मी एकतर Add a new topic किंवा Discuss this topic करू shakte. मी तळाशी उजव्या बाजूला Discuss this topic वर क्लिक करेन. |
05:35 | नंतर Reply लिंक वर क्लिक करा. दर्शविल्याप्रमाणे, मी एक कमेंट जोडेन. |
05:42 | खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Post to forum बटणावर क्लिक करा. तुम्ही ह्या थ्रेडच्या शेवटी कमेंट जोडली असल्याचे पाहू शकता. |
05:53 | विद्यार्थ्याने पोस्ट केलेली comment पाहण्यासाठी मी पुन्हा शिक्षक Rebecca म्हणून लॉगिन करते. |
06:01 | forum च्या नावावर क्लिक करा. येथे लक्ष द्या, ह्या चर्चेच्या विषयासाठी आपण 1 reply so far पाहू शकतो. |
06:12 | तळाशी उजवीकडे, Discuss this topic लिंकवर क्लिक केल्यानंतर वास्तविक संदेश पाहिला जाऊ शकतो. |
06:21 | येथे Split नावाचा दुसरा पर्याय आहे. जर शिक्षकांना असे वाटते की उत्तर वेगळ्या चर्चेस पात्र आहे, तर ती, चर्चा विभाजित करू शकते. |
06:34 | चर्चा विभाजित करणे नवीन चर्चा तयार करते. नवीन चर्चा आणि त्या थ्रेडमधील नंतरची पोस्ट्स, नवीन चर्चा थ्रेडवर हलविली जातील. मी ते तसेच राहू देईन. |
06:49 | Calculus कोर्सवर पुन्हा जाऊ. |
06:53 | पुढे आपण शिकणार आहोत - assignment कसे तयार करावे. |
06:58 | Moodle मधील Assignment :
ऑनलाईन सबमिट केले जाऊ शकते, जे पेपर वाचवते विद्यार्थ्यांना ऑडिओ, व्हिडिओ, पावरपॉईंट प्रेझेंटेशन इत्यादीसारख्या मिडिआ फाईल्स समाविष्ट करण्यास सक्षम करते. आणि विद्यार्थ्यांना न बघितलेले grade निवडून शिक्षकांना निष्पक्ष राहण्यास मदत करते. |
07:20 | पुन्हा ब्राऊझरवर जाऊ. |
07:23 | अधिक रिसोर्सेस जोडण्यासाठी Turn editing on var ja. |
07:28 | Basic Calculus सेक्शनच्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource वर क्लिक करा. |
07:35 | नवीन assignment जोडण्यासाठी सूचीमधून Assignment वर डबल-क्लिक करा. |
07:42 | येथे दाखविल्याप्रमाणे, मी assignment चे नाव देते. |
07:47 | पुढे, assignment चे सविस्तर वर्णन करा आणि विद्यार्थ्यांनी काय सबमिट करावेत ह्यांचा उल्लेख करा. |
07:55 | हा एक सोपा स्वरूपित text editor आहे, तुम्ही tables, images इ. समाविष्ट करू शकता. |
08:02 | AssignmentResource.odt फाईलमधून मी येथे टाईप केलेला टेक्स्ट तुम्ही कॉपी करू शकता. |
08:07 | हे ह्या ट्युटोरिअलच्या Code filesलिंकमध्ये उपलब्ध आहे. |
08:13 | Availability सेक्शन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
08:17 | पुढे, आपण तारीख आणि वेळ निर्दिष्ट करू, ज्यावरून सबमिशन्स केले जाऊ शकतात. Enable बॉक्स सक्षम करा. |
08:28 | तुम्ही तारीख निवडण्यासाठी कॅलेंडर आयकॉनदेखील वापरू शकता. मी ते 25 Nov 2018 म्हणून सेट करेन. |
08:39 | मग मी Due date म्हणून 15 Dec 2018 सेट करेन. |
08:46 | Cut-off date आणि Remind me to grade तारखे द्वारा अर्थ काढण्यासाठी Help icon वर क्लिक करा. |
08:54 | आवश्यक असल्यास सेट करा किंवा नसल्यास अक्षम करा. मी त्यांना अक्षम करेन. |
09:02 | Always show description चेकबॉक्स अनचेक करा. जर हे फिल्ड सक्षम असेल तर Allow submissions from date च्या आधी विद्यार्थी assignment चे वर्णन पाहू शकतात. |
09:17 | पुढील आहे Submission types सेक्शन. विद्यार्थ्यांना ऑनलाईन मजकूर सबमिट करण्याची परवानगी द्यायची किंवा त्यांना केवळ फाईल्स अपलोड करण्याची इच्छा आहे का ते ठरवा. |
09:30 | मी Online text आणि File submissions दोन्ही तपासेन. तुमच्या आवश्यकतेनुसार, तुम्ही एक किंवा दोन्ही पर्याय निवडू शकता. |
09:42 | मी Word limit' सक्षम करेन आणि येथे 1000 pravisht करेन. |
09:48 | आपण प्रत्येक विद्यार्थी अपलोड करू शकणाऱ्या फाईल्सची संख्यादेखील निर्दिष्ट करू शकता. याव्यतिरिक्त, आपण maximum फाईल आकार आणि फाईल्सचे types आपण स्वीकारू शकतो. |
10:03 | कृपया लक्षात ठेवाः
हे admin द्वारे सेट केलेले maximum फाईल आकार अधिलिखित(ओव्हरराईड) करेल, जे आपल्या बाबतीत 128 MB आहे. |
10:14 | Accepted file types' पुढे Help icon वर क्लिक करा. येथे आपण ह्या field ने स्विकारलेले file types बद्दल वाचू शकतो. |
10:26 | मी येथे टाईप करेन .pdf,.docx,.doc . |
10:34 | Feedback types आणि Submission settingsअंतर्गत fields चे रिव्ह्यूव्ह करा. तुम्ही तुमच्या आवश्यकतांनुसार ते सक्षम किंवा अक्षम करू शकता. |
10:46 | मी दर्शविल्याप्रमाणे सेटिंग्ज निवडले आहेत. |
10:50 | आता खाली स्क्रोल करा आणि ते vistrut करण्यासाठी Grade वर क्लिक करा. |
10:57 | डीफॉल्टनुसार, maximum grade 100 आहे. आपण हे आहे तसेच ठेवून देऊ. |
11:04 | नंतर मी Grade to pass म्हणून 40 एंटर करेन आणि Blind marking ला Yes सेट करेन. |
11:13 | हे मूल्यांकनकर्त्यांकडून विद्यार्थ्याची ओळख लपवेल. तर आता शिक्षक म्हणून मला माहित नाही की कोणत्या विद्यार्थ्याने assignment सबमिट केले आहे. |
11:26 | जे ग्रेडिंग करताना मला निष्पक्ष राहण्यास मदत करते. |
11:31 | कृपया लक्षात घ्या की,
Blind marking सेटिंग, कोणत्याही सबमिशननंतर ह्या असाईनमेंटसाठी बदलली जाऊ शकत नाही. |
11:40 | assignment साठी इतर अनेक सेटिंग्ज आहेत जे आपण स्वतः anveshan करू शकता. |
11:46 | आता खाली स्क्रोल करा आणि Save and display बटणावर क्लिक करा. |
11:52 | आपण येथे assignment बद्दल काही आकडेवारी पाहू शकता.
आणि View all submissions आणि Grade साठी लिंक. |
12:03 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो. सारांशित करूया. |
12:09 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलोत :
वेगवेगळ्या प्रकारचे forums forum कसे जोडायचे आणि Assignments कसे तयार करावेत ? |
12:20 | तुमच्यासाठी येथे एक लहान असाईनमेंट आहे.
आधी तयार केलेल्या forum चर्चेला रिप्लाय जोडा. ह्या रिप्लायने चर्चेस विभाजित करा. |
12:33 | assignment तयार करा जे केवळ ऑनलाईन टेक्स्ट सबमिशन स्वीकारते.
अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या. |
12:44 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करा आणि पहा. |
12:52 | Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
13:02 | कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध क्वेरी पोस्ट करा. |
13:06 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
13:20 | आय.आय.टी. बॉम्बेतर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. |
13:31 | सहभागासाठी धन्यवाद. |