LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Viewing-and-printing-a-spreadsheet-in-Calc/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Viewing and Printing a spreadsheet वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोतः |
00:11 | LibreOffice Calc मधे spreadsheets बघणे आणि |
00:13 | spreadsheets प्रिंट करणे. |
00:18 | या पाठासाठी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:32 | प्रथम LibreOffice Calc मधील Viewing options चे विविध पर्याय पाहू. |
00:38 | Calc मध्ये मुख्यतः दोन View पर्याय वापरले जातात. ते म्हणजे Normal आणि Page Break. |
00:46 | Normal हा पर्याय, प्रिंट केल्यावर spreadsheet कशी दिसेल हे दाखवतो. |
00:52 | data खूप जास्त असल्यास Page break हा पर्याय spreadsheet data वेगवेगळ्या पानांवर दर्शवतो. |
01:00 | प्रिंट करण्याचा data विविध पानांवर व्यवस्थितपणे आयोजित करण्यास यामुळे मदत होते. |
01:07 | Personal-Finance-Tracker.ods ही फाईल उघडा. |
01:12 | ही फाईल या पाठाच्या Code files लिंकमधे दिलेली आहे.
कृपया ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
01:22 | त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा. |
01:28 | column B च्या आतील टेक्स्टचा काही भाग नीट वाचता येत नाही. |
01:35 | हे जसे आहे तसे प्रिंट केल्यास ते टेक्स्ट प्रिंटआऊटमधे कापले जाईल.
प्रथम ही समस्या सोडवू. |
01:44 | column हेडर B च्या उजव्या कडेवर कर्सर ठेवा. |
01:49 | आता कर्सर double-sided arrow मधे बदललेला दिसेल. |
01:55 | आता माऊसचे डावे बटण क्लिक करून ते दाबून ठेवा. |
01:59 | column B ची रुंदी वाढवण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे माऊस थोडा उजवीकडे ड्रॅग करा. |
02:06 | आता column B मधील सर्व टेक्स्ट स्पष्ट दिसत आहे. |
02:12 | Normal View वर जाण्यासाठी menu bar मधील View menu वर क्लिक करून नंतर Normal वर क्लिक करा. |
02:20 | हा Calc मधील डिफॉल्ट व्ह्यू आहे. |
02:24 | Page Break वर जाण्यासाठी menu bar मधील View menu वर क्लिक करून नंतर Page Break वर क्लिक करा. |
02:34 | हे नीट दिसण्यासाठी झूम इन करू. |
02:38 | Page 1 आणि Page 2 नावाचे watermark दिसतील. |
02:45 | Calc विंडोवरील Normal view वर परत जाऊ. |
02:50 | Date आणि Account या columns मधून गेलेली उभी तुटक रेषा लक्षात घ्या. |
02:57 | हे उजवीकडील पेज मार्जिन दर्शवते. |
03:01 | आडवी तुटक रेषी दिसेपर्यंत खाली स्क्रॉल करा. |
03:06 | माझ्याकडे ही तुटक रेषा row क्रमांक 50 आणि 51 मधून गेली आहे. |
03:13 | तुमच्याकडे कदाचित हे वेगळे असू शकते. |
03:16 | ही पानाचे खालचे मार्जिन दाखवते. |
03:20 | या मार्जिन्समध्ये spreadsheet मधील किती data एका पानावर बसू शकतो हे पाहता येते. |
03:28 | वर स्क्रॉल करून पानाच्या वरील भागात परत जा. |
03:32 | आता आपण भरलेला data कॉपी करून तो खाली पेस्ट करू. |
03:37 | प्रथम cell A1 वर क्लिक करा.
आता कीबोर्डवरील Shift key दाबून ठेवून cell H8 वर क्लिक करा. |
03:47 | सर्व cells सिलेक्ट झाल्या आहेत. |
03:50 | आता सिलेक्ट केलेल्या cells वर कुठेही राईट क्लिक करून Copy पर्यायावर क्लिक करा. |
03:58 | cells डिसिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट केलेल्या भागाच्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
04:03 | आता खाली स्क्रॉल करून row क्रमांक 51 वर जाऊ. |
04:08 | तुमच्या पानाच्या खालच्या मार्जिनशी असलेल्या row क्रमांकापर्यंत पर्यंत खाली स्क्रॉल करा. |
04:14 | cell A51 वर राईट क्लिक करून नंतर paste पर्यायावर क्लिक करा. |
04:21 | cells डिसिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट केलेल्या भागाच्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
04:26 | वर स्क्रॉल करा आणि dotted line चे सिलेक्शन काढून टाकण्यासाठी Escape बटण दाबा. |
04:34 | आता View मेनूवर क्लिक करून Page Break पर्याय निवडा. |
04:38 | हे नीट दिसण्यासाठी झूम आऊट करू. |
04:42 | पेज ब्रेक्स बघण्यासाठी वर-खाली स्क्रॉल करा. |
04:47 | Page 1 खाली Page 2 हा watermark असलेले नवे पान दिसेल. |
04:53 | या पानांना संलग्न असलेली Page 3 आणि त्याखाली Page 4 देखील बघू शकतो. |
05:00 | View menu वर क्लिक करून पुन्हा Normal view वर परत जा. |
05:05 | या दोन पर्यायांव्यतिरिक्त full screen mode मधे देखील spreadsheet बघू शकतो. |
05:12 | menu bar मधील View menu वर क्लिक करून नंतर Full Screen पर्यायावर क्लिक करा. |
05:19 | Full screen mode चा उपयोग spreadsheets मधे बदल करण्यासाठी होतो. |
05:24 | तसेच प्रोजेक्टरवर प्रोजेक्ट करताना देखील याचा उपयोग होतो. |
05:29 | full screen mode मधून बाहेर पडण्यासाठी Full Screen बटणावर क्लिक करा किंवा Escape की दाबा. |
05:36 | Calc विंडोवरील Normal view वर परत आलो आहोत. |
05:40 | menu bar मधील Format वर क्लिक करा. नंतर Page पर्यायावर क्लिक करा. |
05:46 | Page Style:Default हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:51 | येथे विविध टॅब्ज आहेत. |
05:54 | Page टॅबवर क्लिक करा. |
05:57 | येथे Paper Format, Margins आणि Layout settings साठी विविध सेटिंग्ज आहेत. |
06:04 | Paper Format खाली Orientation फिल्डमधील Portrait पर्याय आधीच निवडलेला आहे. |
06:12 | पानाचे orientation बघण्यासाठी preview area मधे बघा. |
06:17 | आता Landscape पर्यायावर क्लिक करा. |
06:21 | पानाचे orientation कशाप्रकारे बदलले आहे हे बघण्यासाठी preview area पहा. |
06:27 | पुन्हा एकदा Portrait पर्यायावर क्लिक करा. |
06:31 | आता Sheet टॅबवर क्लिक करा. |
06:35 | Page Order खाली Top to bottom, then right हा पर्याय निवडलेला आहे. |
06:42 | Page break view मधे आपली पाने अशाचप्रकारे दाखवली जातात हे तुम्हाला आठवत असेल. |
06:49 | आता Left to right, then bottom वर क्लिक करा. नंतर खालील उजव्या कोपऱ्यातील OK वर क्लिक करा. |
06:57 | menu bar मधील View वर क्लिक करून नंतर Page break पर्यायावर क्लिक करा. |
07:02 | पानाच्या क्रमांकातील बदलांचे निरीक्षण करा. |
07:07 | Normal view वर परत जाऊ. |
07:11 | आता Zoom पर्याय कसा वापरायचा ते पाहू. |
07:15 | spreadsheet झूम किंवा magnify करण्याची सोपी पध्दत म्हणजे Zoom slider चा वापर. |
07:21 | हा Calc विंडोच्या उजव्या कोपऱ्यात खाली दिसेल. |
07:26 | अशाप्रकारे स्लायडरच्या दोन्ही बाजूला असलेल्या plus आणि minus आयकॉन्सचा उपयोग करू शकतो. |
07:34 | किंवा अशाप्रकारे Zoom head ड्रॅग करून magnification कमी जास्त करू शकतो. |
07:42 | झुम करण्याची दुसरी पध्दत जाणून घेऊ. |
07:45 | menu bar मधील View menu वर क्लिक करून Zoom वर क्लिक करा. |
07:50 | context menu मधे काही पर्याय दिसत आहेत. |
07:55 | येथे Optimal View वर क्लिक करा. |
07:59 | असे केल्यावर spreadsheet चा सर्वात सोयीस्कर magnified view मिळतो. |
08:05 | पुन्हा menu bar मधील View menu वर क्लिक करून Zoom वर क्लिक करा. |
08:12 | या वेळी context menu मधून Zoom पर्यायावर क्लिक करा. |
08:18 | Zoom & View Layout हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:23 | येथे Zoom Factor आणि View Layout ही दोन हेडिंग्ज आहेत. |
08:29 | spreadsheet किती मॅग्निफिकेशनने दाखवायची हे Zoom Factor सेट करते. |
08:35 | Zoom Factor खाली अनेक पर्याय दिसतील. |
08:39 | Fit width and height वर क्लिक करून नंतर उजवीकडचे खालील Ok बटण क्लिक करा. |
08:46 | या व्ह्यूमधे spreadsheet पानाच्या रुंदी आणि उंचीमधे मावेल अशी बसवली जाते. |
08:52 | खाली-वर स्क्रॉल करा. हे एकावेळी अनेक पाने दर्शवते. |
08:57 | पुन्हा Zoom & View Layout चा डायलॉग बॉक्स उघडा.
|
09:02 | Fit Width हा पुढील पर्याय आहे. |
09:05 | हा पानाला त्याच्या रूंदीप्रमाणे स्क्रीनवर मापात बसवतो. |
09:09 | 100% view पानाचा वास्तविक आकार दाखवितो. |
09:14 | हे दोन पर्याय तुम्ही वापरून बघा. |
09:18 | पुढचा महत्त्वाचा zoom पर्याय म्हणजे Variableहोय. |
09:23 | ज्या आकारात spreadsheet बघायची आहे तो zoom factor येथे टाईप करू शकतो. |
09:29 | उदाहरणार्थ Variable फिल्डमधे 75% ही व्हॅल्यू टाईप करा.
नंतर OK बटण क्लिक करा. |
09:40 | टेक्स्ट कसे zoomed झाले आहे हे पहा. |
09:43 | पाने नीट दिसण्यासाठी Optimal View वर परत जाऊ. |
09:48 | आता Print Preview बद्दल जाणून घेऊ. |
09:52 | Standard toolbar वरील Toggle Print Preview आयकॉन क्लिक करा. |
09:57 | preview mode मधे spreadsheet पाहू तेव्हा Print Preview bar दिसेल. |
10:03 | हे अधिक नीट दिसावे म्हणून हा view मोठा करू. |
10;07 | spreadsheet प्रिंट केल्यावर कशी दिसेल हे येथे दाखवले जाते. |
10:13 | spreadsheet मधील सर्व पाने दिसण्यासाठी खाली-वर स्क्रॉल करा. |
10:18 | Account हा column पुढील पानावर गेल्याचे दिसेल.
म्हणून आता हा data एका पानावरच नीट बसवण्याचा प्रयत्न करू. |
10:29 | Toggle Print View मधून बाहेर पडण्यासाठी वरील भागात असलेल्या Close Preview वर क्लिक करा. |
10:35 | येथे दाखवल्याप्रमाणे C ते H columns सिलेक्ट करा. |
10:41 | H या column हेडरच्या उजव्या बाजूच्या कडेवर कर्सर ठेवा. |
10:47 | आता कर्सर double-sided arrow मधे बदललेला दिसेल. |
10:52 | आता माऊसचे डावे बटण क्लिक करून ते दाबून ठेवा. |
10:56 | मार्जिन कमी करण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे मार्जिन थोडेसे डाव्या बाजूला ड्रॅग करू. |
11:02 | असे केल्याने, C ते H पर्यंतच्या सर्व columns चे आकार त्यांच्या प्रमाणात बदलले जातील. |
11:09 | असे करताना cells मधील काही data हा hashtags च्या मालिकेसारखा दिसू शकतो. |
11:16 | तसे झाल्यास zoom लेव्हल आणि columns चे आकार अशा प्रकारे बदला की पुन्हा data दिसू लागेल. |
11:24 | A to H columns मधील data आता तुटक रेषेने दाखवलेल्या पानाच्या सीमारेषेच्या आत आहे. |
11:32 | पुन्हा Standard toolbar मधील Toggle Print Preview वर क्लिक करा. |
11:38 | आता हा data दोन पानात नीट बसला आहे. |
11:42 | अशाप्रकारे प्रिंट करण्यापूर्वी data समायोजित करू शकतो जेणेकरून तो व्यवस्थित आणि सुसंगत दिसेल. |
11:51 | या स्क्रीनवरील Print आयकॉनवर क्लिक करून spreadsheet चे प्रिंटींग सुरू करता येते.
पण आपण आता तसे करणार नाही. |
12:01 | preview बंद करण्यासाठी Close Preview बटण क्लिक करा. |
12:06 | त्याचप्रमाणे menu bar मधील File menu वर क्लिक करून नंतर आपण Print Preview क्लिक करू शकतो. |
12:14 | आता आपली LibreOffice Calc spreadsheet कशी print करायची ते बघूया. |
12:19 | प्रथम, तुमच्या मशीनवर प्रिंटरचे कनेक्शन बरोबर कॉन्फिगर केल्याची खात्री करा. |
12:26 | संपूर्ण spreadsheet थेट प्रिंट करण्यासाठी Standard toolbar वरील Print आयकॉन क्लिक करा.
याला quick printing म्हणतात. |
12:36 | किंवा menu bar मधील File menu वर क्लिक करून Print वर क्लिक करा. |
12:44 | स्क्रीनवर Print चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
12:48 | या डायलॉग बॉक्समधे वेगवेगळी सेटिंग्ज असलेले दोन टॅब्ज आहेत. |
12:54 | ही सेटिंग्ज डिफॉल्ट रूपात आहेत तशीच ठेवू शकतो किंवा प्रिंटींगच्या गरजेनुसार त्यामधे बदल करू शकतो. |
13:02 | Printer च्या ड्रॉपडाऊन मधून Print to File पर्याय निवडा. |
13:07 | हा पर्याय मुख्यतः spreadsheet ही PDF file स्वरूपात प्रिंट करण्यासाठी वापरला जातो. |
13:14 | डायलॉग बॉक्सच्या खालील भागातील Print to File लिहिलेले बटण आहे. |
13:22 | pdf फाईल सेव्ह करण्यासाठी योग्य फोल्डर निवडून फाईलचे नाव टाईप करा. |
13:28 | उजवीकडील वरचे Save बटण क्लिक करा. |
13:33 | ही फाईल PDF स्वरूपात सेव्ह होईल.
ही फाईल तुम्ही कुठल्याही PDF viewer मधे उघडू शकता आणि नंतर प्रिंट करू शकता. |
13:44 | आता प्रिंटींगची आणखी काही फीचर्स बघूया. |
13:48 | कीबोर्डवरील Ctrl+P कीज दाबा.
Print चा डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी हा शॉर्टकट आहे. |
13:57 | आता Printer खालील यादीतून आपण कॉन्फिगर केलेल्या प्रिंटरचे नाव निवडा. |
14:03 | Range and Copies खाली Pages साठी 2 आणि Number of copies साठी 3 हा पर्याय निवडा. |
14:12 | अशाप्रकारे आपल्या spreadsheet च्या Page 2 च्या 3 कॉपीज प्रिंट करणार आहोत. |
14:18 | प्रिंटींग सुरू करण्यासाठी डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात खाली OK बटण क्लिक करा. |
14:25 | प्रिंटर योग्य प्रकारे कॉन्फिगर केलेला असल्यास नमूद केलेली पृष्ठे आणि प्रती आता प्रिंट होतील. |
14:33 | आता काही cells सिलेक्ट करून data चा काही भाग कसा प्रिंट करायचा हे पाहू. |
14:40 | येथे दाखवल्याप्रमाणे A1 पासून C8 पर्यंतचा data सिलेक्ट करा. |
14:47 | कीबोर्डवर Ctrl+P ह्या कीज दाबा. |
14:50 | Print डायलॉग बॉक्समधे From which या पर्यायाच्या शेजारील ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. |
14:57 | उपलब्ध पर्यायांमधून Print selected cells निवडा. |
15:02 | Print preview या भागात फक्त आपण निवडलेले cells दाखवले गेले आहेत. |
15:08 | आता प्रिटींग सुरू करण्यासाठी उजव्या कोपऱ्यात खाली OK बटणावर क्लिक करा. |
15:14 | आता Print चे इतर पर्याय कसे वापरायचे हे जाणून घेऊ. |
15:20 | menu bar मधील Tools menu वर क्लिक करा. नंतर Options वर क्लिक करा. |
15:26 | आधीपासून विस्तारीत नसल्यास LibreOffice च्या शेजारील बाणावर क्लिक करा. नंतर Print वर क्लिक करा. |
15:34 | आपल्याला निवडण्यासाठी डायलॉग बॉक्स विविध पर्याय दाखवेल.
गरजेनुसार पर्याय निवडा. |
15:43 | सर्व डिफॉल्ट सेटिंग्ज तशीच ठेवू. नंतर खालील OK बटण क्लिक करू. |
15:50 | LibreOffice Calc मधून भविष्यात होणाऱ्या सर्व प्रिंटसाठी ही सेटिंग्ज लागू होतील. |
15:56 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
15:59 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
16:05 | या पाठात आपण शिकलोः
LibreOffice Calc मधे spreadsheets बघणे आणि प्रिंट करणे. |
16:14 | असाईनमेंट म्हणून:
“Spreadsheet-Practice.ods” फाईल उघडा. |
16:19 | Landscape mode पर्याय वापरून Sheet 1 मधील data प्रिंट करा. |
16:23 | View मेनूमधून Full Screen पर्याय निवडा. |
16:27 | Full Screen पर्यायातून बाहेर पडा. |
16:30 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
16:38 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
16:47 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
16:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
16:57 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |