LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Viewing-and-printing-a-spreadsheet-in-Calc/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Viewing and Printing a spreadsheet वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोतः
00:11 LibreOffice Calc मधे spreadsheets बघणे आणि
00:13 spreadsheets प्रिंट करणे.
00:18 या पाठासाठी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:32 प्रथम LibreOffice Calc मधील Viewing options चे विविध पर्याय पाहू.
00:38 Calc मध्ये मुख्यतः दोन View पर्याय वापरले जातात. ते म्हणजे Normal आणि Page Break.
00:46 Normal हा पर्याय, प्रिंट केल्यावर spreadsheet कशी दिसेल हे दाखवतो.
00:52 data खूप जास्त असल्यास Page break हा पर्याय spreadsheet data वेगवेगळ्या पानांवर दर्शवतो.
01:00 प्रिंट करण्याचा data विविध पानांवर व्यवस्थितपणे आयोजित करण्यास यामुळे मदत होते.
01:07 Personal-Finance-Tracker.ods ही फाईल उघडा.
01:12 ही फाईल या पाठाच्या Code files लिंकमधे दिलेली आहे.

कृपया ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.

01:22 त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
01:28 column B च्या आतील टेक्स्टचा काही भाग नीट वाचता येत नाही.
01:35 हे जसे आहे तसे प्रिंट केल्यास ते टेक्स्ट प्रिंटआऊटमधे कापले जाईल.

प्रथम ही समस्या सोडवू.

01:44 column हेडर B च्या उजव्या कडेवर कर्सर ठेवा.
01:49 आता कर्सर double-sided arrow मधे बदललेला दिसेल.
01:55 आता माऊसचे डावे बटण क्लिक करून ते दाबून ठेवा.
01:59 column B ची रुंदी वाढवण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे माऊस थोडा उजवीकडे ड्रॅग करा.
02:06 आता column B मधील सर्व टेक्स्ट स्पष्ट दिसत आहे.
02:12 Normal View वर जाण्यासाठी menu bar मधील View menu वर क्लिक करून नंतर Normal वर क्लिक करा.
02:20 हा Calc मधील डिफॉल्ट व्ह्यू आहे.
02:24 Page Break वर जाण्यासाठी menu bar मधील View menu वर क्लिक करून नंतर Page Break वर क्लिक करा.
02:34 हे नीट दिसण्यासाठी झूम इन करू.
02:38 Page 1 आणि Page 2 नावाचे watermark दिसतील.
02:45 Calc विंडोवरील Normal view वर परत जाऊ.
02:50 Date आणि Account या columns मधून गेलेली उभी तुटक रेषा लक्षात घ्या.
02:57 हे उजवीकडील पेज मार्जिन दर्शवते.
03:01 आडवी तुटक रेषी दिसेपर्यंत खाली स्क्रॉल करा.
03:06 माझ्याकडे ही तुटक रेषा row क्रमांक 50 आणि 51 मधून गेली आहे.
03:13 तुमच्याकडे कदाचित हे वेगळे असू शकते.
03:16 ही पानाचे खालचे मार्जिन दाखवते.
03:20 या मार्जिन्समध्ये spreadsheet मधील किती data एका पानावर बसू शकतो हे पाहता येते.
03:28 वर स्क्रॉल करून पानाच्या वरील भागात परत जा.
03:32 आता आपण भरलेला data कॉपी करून तो खाली पेस्ट करू.
03:37 प्रथम cell A1 वर क्लिक करा.

आता कीबोर्डवरील Shift key दाबून ठेवून cell H8 वर क्लिक करा.

03:47 सर्व cells सिलेक्ट झाल्या आहेत.
03:50 आता सिलेक्ट केलेल्या cells वर कुठेही राईट क्लिक करून Copy पर्यायावर क्लिक करा.
03:58 cells डिसिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट केलेल्या भागाच्या बाहेर कुठेही क्लिक करा.
04:03 आता खाली स्क्रॉल करून row क्रमांक 51 वर जाऊ.
04:08 तुमच्या पानाच्या खालच्या मार्जिनशी असलेल्या row क्रमांकापर्यंत पर्यंत खाली स्क्रॉल करा.
04:14 cell A51 वर राईट क्लिक करून नंतर paste पर्यायावर क्लिक करा.
04:21 cells डिसिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट केलेल्या भागाच्या बाहेर कुठेही क्लिक करा.
04:26 वर स्क्रॉल करा आणि dotted line चे सिलेक्शन काढून टाकण्यासाठी Escape बटण दाबा.
04:34 आता View मेनूवर क्लिक करून Page Break पर्याय निवडा.
04:38 हे नीट दिसण्यासाठी झूम आऊट करू.
04:42 पेज ब्रेक्स बघण्यासाठी वर-खाली स्क्रॉल करा.
04:47 Page 1 खाली Page 2 हा watermark असलेले नवे पान दिसेल.
04:53 या पानांना संलग्न असलेली Page 3 आणि त्याखाली Page 4 देखील बघू शकतो.
05:00 View menu वर क्लिक करून पुन्हा Normal view वर परत जा.
05:05 या दोन पर्यायांव्यतिरिक्त full screen mode मधे देखील spreadsheet बघू शकतो.
05:12 menu bar मधील View menu वर क्लिक करून नंतर Full Screen पर्यायावर क्लिक करा.
05:19 Full screen mode चा उपयोग spreadsheets मधे बदल करण्यासाठी होतो.
05:24 तसेच प्रोजेक्टरवर प्रोजेक्ट करताना देखील याचा उपयोग होतो.
05:29 full screen mode मधून बाहेर पडण्यासाठी Full Screen बटणावर क्लिक करा किंवा Escape की दाबा.
05:36 Calc विंडोवरील Normal view वर परत आलो आहोत.
05:40 menu bar मधील Format वर क्लिक करा. नंतर Page पर्यायावर क्लिक करा.
05:46 Page Style:Default हा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:51 येथे विविध टॅब्ज आहेत.
05:54 Page टॅबवर क्लिक करा.
05:57 येथे Paper Format, Margins आणि Layout settings साठी विविध सेटिंग्ज आहेत.
06:04 Paper Format खाली Orientation फिल्डमधील Portrait पर्याय आधीच निवडलेला आहे.
06:12 पानाचे orientation बघण्यासाठी preview area मधे बघा.
06:17 आता Landscape पर्यायावर क्लिक करा.
06:21 पानाचे orientation कशाप्रकारे बदलले आहे हे बघण्यासाठी preview area पहा.
06:27 पुन्हा एकदा Portrait पर्यायावर क्लिक करा.
06:31 आता Sheet टॅबवर क्लिक करा.
06:35 Page Order खाली Top to bottom, then right हा पर्याय निवडलेला आहे.
06:42 Page break view मधे आपली पाने अशाचप्रकारे दाखवली जातात हे तुम्हाला आठवत असेल.
06:49 आता Left to right, then bottom वर क्लिक करा. नंतर खालील उजव्या कोपऱ्यातील OK वर क्लिक करा.
06:57 menu bar मधील View वर क्लिक करून नंतर Page break पर्यायावर क्लिक करा.
07:02 पानाच्या क्रमांकातील बदलांचे निरीक्षण करा.
07:07 Normal view वर परत जाऊ.
07:11 आता Zoom पर्याय कसा वापरायचा ते पाहू.
07:15 spreadsheet झूम किंवा magnify करण्याची सोपी पध्दत म्हणजे Zoom slider चा वापर.
07:21 हा Calc विंडोच्या उजव्या कोपऱ्यात खाली दिसेल.
07:26 अशाप्रकारे स्लायडरच्या दोन्ही बाजूला असलेल्या plus आणि minus आयकॉन्सचा उपयोग करू शकतो.
07:34 किंवा अशाप्रकारे Zoom head ड्रॅग करून magnification कमी जास्त करू शकतो.
07:42 झुम करण्याची दुसरी पध्दत जाणून घेऊ.
07:45 menu bar मधील View menu वर क्लिक करून Zoom वर क्लिक करा.
07:50 context menu मधे काही पर्याय दिसत आहेत.
07:55 येथे Optimal View वर क्लिक करा.
07:59 असे केल्यावर spreadsheet चा सर्वात सोयीस्कर magnified view मिळतो.
08:05 पुन्हा menu bar मधील View menu वर क्लिक करून Zoom वर क्लिक करा.
08:12 या वेळी context menu मधून Zoom पर्यायावर क्लिक करा.
08:18 Zoom & View Layout हा डायलॉग बॉक्स उघडेल.
08:23 येथे Zoom Factor आणि View Layout ही दोन हेडिंग्ज आहेत.
08:29 spreadsheet किती मॅग्निफिकेशनने दाखवायची हे Zoom Factor सेट करते.
08:35 Zoom Factor खाली अनेक पर्याय दिसतील.
08:39 Fit width and height वर क्लिक करून नंतर उजवीकडचे खालील Ok बटण क्लिक करा.
08:46 या व्ह्यूमधे spreadsheet पानाच्या रुंदी आणि उंचीमधे मावेल अशी बसवली जाते.
08:52 खाली-वर स्क्रॉल करा. हे एकावेळी अनेक पाने दर्शवते.
08:57 पुन्हा Zoom & View Layout चा डायलॉग बॉक्स उघडा.


09:02 Fit Width हा पुढील पर्याय आहे.
09:05 हा पानाला त्याच्या रूंदीप्रमाणे स्क्रीनवर मापात बसवतो.
09:09 100% view पानाचा वास्तविक आकार दाखवितो.
09:14 हे दोन पर्याय तुम्ही वापरून बघा.
09:18 पुढचा महत्त्वाचा zoom पर्याय म्हणजे Variableहोय.
09:23 ज्या आकारात spreadsheet बघायची आहे तो zoom factor येथे टाईप करू शकतो.
09:29 उदाहरणार्थ Variable फिल्डमधे 75% ही व्हॅल्यू टाईप करा.

नंतर OK बटण क्लिक करा.

09:40 टेक्स्ट कसे zoomed झाले आहे हे पहा.
09:43 पाने नीट दिसण्यासाठी Optimal View वर परत जाऊ.
09:48 आता Print Preview बद्दल जाणून घेऊ.
09:52 Standard toolbar वरील Toggle Print Preview आयकॉन क्लिक करा.
09:57 preview mode मधे spreadsheet पाहू तेव्हा Print Preview bar दिसेल.
10:03 हे अधिक नीट दिसावे म्हणून हा view मोठा करू.
10;07 spreadsheet प्रिंट केल्यावर कशी दिसेल हे येथे दाखवले जाते.
10:13 spreadsheet मधील सर्व पाने दिसण्यासाठी खाली-वर स्क्रॉल करा.
10:18 Account हा column पुढील पानावर गेल्याचे दिसेल.

म्हणून आता हा data एका पानावरच नीट बसवण्याचा प्रयत्न करू.

10:29 Toggle Print View मधून बाहेर पडण्यासाठी वरील भागात असलेल्या Close Preview वर क्लिक करा.
10:35 येथे दाखवल्याप्रमाणे C ते H columns सिलेक्ट करा.
10:41 H या column हेडरच्या उजव्या बाजूच्या कडेवर कर्सर ठेवा.
10:47 आता कर्सर double-sided arrow मधे बदललेला दिसेल.
10:52 आता माऊसचे डावे बटण क्लिक करून ते दाबून ठेवा.
10:56 मार्जिन कमी करण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे मार्जिन थोडेसे डाव्या बाजूला ड्रॅग करू.
11:02 असे केल्याने, C ते H पर्यंतच्या सर्व columns चे आकार त्यांच्या प्रमाणात बदलले जातील.
11:09 असे करताना cells मधील काही data हा hashtags च्या मालिकेसारखा दिसू शकतो.
11:16 तसे झाल्यास zoom लेव्हल आणि columns चे आकार अशा प्रकारे बदला की पुन्हा data दिसू लागेल.
11:24 A to H columns मधील data आता तुटक रेषेने दाखवलेल्या पानाच्या सीमारेषेच्या आत आहे.
11:32 पुन्हा Standard toolbar मधील Toggle Print Preview वर क्लिक करा.
11:38 आता हा data दोन पानात नीट बसला आहे.
11:42 अशाप्रकारे प्रिंट करण्यापूर्वी data समायोजित करू शकतो जेणेकरून तो व्यवस्थित आणि सुसंगत दिसेल.
11:51 या स्क्रीनवरील Print आयकॉनवर क्लिक करून spreadsheet चे प्रिंटींग सुरू करता येते.

पण आपण आता तसे करणार नाही.

12:01 preview बंद करण्यासाठी Close Preview बटण क्लिक करा.
12:06 त्याचप्रमाणे menu bar मधील File menu वर क्लिक करून नंतर आपण Print Preview क्लिक करू शकतो.
12:14 आता आपली LibreOffice Calc spreadsheet कशी print करायची ते बघूया.
12:19 प्रथम, तुमच्या मशीनवर प्रिंटरचे कनेक्शन बरोबर कॉन्फिगर केल्याची खात्री करा.
12:26 संपूर्ण spreadsheet थेट प्रिंट करण्यासाठी Standard toolbar वरील Print आयकॉन क्लिक करा.

याला quick printing म्हणतात.

12:36 किंवा menu bar मधील File menu वर क्लिक करून Print वर क्लिक करा.
12:44 स्क्रीनवर Print चा डायलॉग बॉक्स उघडेल.
12:48 या डायलॉग बॉक्समधे वेगवेगळी सेटिंग्ज असलेले दोन टॅब्ज आहेत.
12:54 ही सेटिंग्ज डिफॉल्ट रूपात आहेत तशीच ठेवू शकतो किंवा प्रिंटींगच्या गरजेनुसार त्यामधे बदल करू शकतो.
13:02 Printer च्या ड्रॉपडाऊन मधून Print to File पर्याय निवडा.
13:07 हा पर्याय मुख्यतः spreadsheet ही PDF file स्वरूपात प्रिंट करण्यासाठी वापरला जातो.
13:14 डायलॉग बॉक्सच्या खालील भागातील Print to File लिहिलेले बटण आहे.
13:22 pdf फाईल सेव्ह करण्यासाठी योग्य फोल्डर निवडून फाईलचे नाव टाईप करा.
13:28 उजवीकडील वरचे Save बटण क्लिक करा.
13:33 ही फाईल PDF स्वरूपात सेव्ह होईल.

ही फाईल तुम्ही कुठल्याही PDF viewer मधे उघडू शकता आणि नंतर प्रिंट करू शकता.

13:44 आता प्रिंटींगची आणखी काही फीचर्स बघूया.
13:48 कीबोर्डवरील Ctrl+P कीज दाबा.

Print चा डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी हा शॉर्टकट आहे.

13:57 आता Printer खालील यादीतून आपण कॉन्फिगर केलेल्या प्रिंटरचे नाव निवडा.
14:03 Range and Copies खाली Pages साठी 2 आणि Number of copies साठी 3 हा पर्याय निवडा.
14:12 अशाप्रकारे आपल्या spreadsheet च्या Page 2 च्या 3 कॉपीज प्रिंट करणार आहोत.
14:18 प्रिंटींग सुरू करण्यासाठी डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात खाली OK बटण क्लिक करा.
14:25 प्रिंटर योग्य प्रकारे कॉन्फिगर केलेला असल्यास नमूद केलेली पृष्ठे आणि प्रती आता प्रिंट होतील.
14:33 आता काही cells सिलेक्ट करून data चा काही भाग कसा प्रिंट करायचा हे पाहू.
14:40 येथे दाखवल्याप्रमाणे A1 पासून C8 पर्यंतचा data सिलेक्ट करा.
14:47 कीबोर्डवर Ctrl+P ह्या कीज दाबा.
14:50 Print डायलॉग बॉक्समधे From which या पर्यायाच्या शेजारील ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
14:57 उपलब्ध पर्यायांमधून Print selected cells निवडा.
15:02 Print preview या भागात फक्त आपण निवडलेले cells दाखवले गेले आहेत.
15:08 आता प्रिटींग सुरू करण्यासाठी उजव्या कोपऱ्यात खाली OK बटणावर क्लिक करा.
15:14 आता Print चे इतर पर्याय कसे वापरायचे हे जाणून घेऊ.
15:20 menu bar मधील Tools menu वर क्लिक करा. नंतर Options वर क्लिक करा.
15:26 आधीपासून विस्तारीत नसल्यास LibreOffice च्या शेजारील बाणावर क्लिक करा. नंतर Print वर क्लिक करा.
15:34 आपल्याला निवडण्यासाठी डायलॉग बॉक्स विविध पर्याय दाखवेल.

गरजेनुसार पर्याय निवडा.

15:43 सर्व डिफॉल्ट सेटिंग्ज तशीच ठेवू. नंतर खालील OK बटण क्लिक करू.
15:50 LibreOffice Calc मधून भविष्यात होणाऱ्या सर्व प्रिंटसाठी ही सेटिंग्ज लागू होतील.
15:56 फाईल सेव्ह करून बंद करा.
15:59 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

16:05 या पाठात आपण शिकलोः

LibreOffice Calc मधे spreadsheets बघणे आणि प्रिंट करणे.

16:14 असाईनमेंट म्हणून:

Spreadsheet-Practice.ods” फाईल उघडा.

16:19 Landscape mode पर्याय वापरून Sheet 1 मधील data प्रिंट करा.
16:23 View मेनूमधून Full Screen पर्याय निवडा.
16:27 Full Screen पर्यायातून बाहेर पडा.
16:30 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

16:38 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

16:47 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
16:51 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
16:57 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali