KTouch/S1/Getting-Started-with-Ktouch/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | KTouch च्या प्राथमिक स्पोकेन tutorial मध्ये आपले स्वागत. |
00:04 | या tutorial मध्ये आपण K Touch आणि K Touch इंटरफेस विषयी शिकाल. |
00:10 | तुम्ही शिकाल कि: कॉम्पुटर कीबोर्ड ज्यात इंग्रजी अक्षर आहेत, स्पष्ट, जलद आणि निपुणतेने टाईप कसे कराल. |
00:18 | तसेच तुम्ही हे ही शिकाल कि. |
00:20 | कीबोर्डवर न बघता टाईप कसे करावे |
00:24 | KTouch म्हणजे काय? |
00:27 | KTouch टाईपिंग टयूटर असून, हे शिकवते की, कशाप्रकारे ऑनलाइन संवादात्मक कीबोर्ड वापरावा. |
00:33 | तुम्ही तुमच्या गतीने टाईपिंग शिकू शकता. |
00:36 | तुम्ही हळू हळू तुमच्या सोयीप्रमाणे टाईपिंगची गती वाढवू शकता. |
00:43 | KTouch मध्ये तुमच्या सरावासाठी विभिन्न स्थर, लेक्चर्स, टाइपिंग नमुने ही आहेत. |
00:50 | येथे आपण उबंटू लिनक्स 11.10 वर K Touch 1.7.1चा वापर करत आहोत . |
00:59 | तुम्ही उबुंटू सोफ्टवेर सेंटर वापरुन K Touch install करू शकता. |
01:03 | उबुंटू सोफ्टवेर सेंटरच्या अधिक महितीसाठी या वेबसाईटवर उबुंटू टूटोरियल्स बघा . |
01:11 | चला KTouch उघडूयात. |
01:13 | सर्वप्रथम डेश होमे वर click करा जे तुमच्या computer डेक्सटोपवर डाव्या बाजूला कोपऱ्यात सगळ्यात वरती गोल बटन आहे. |
01:21 | सर्च बॉक्स दिसेल. |
01:24 | सर्च बॉक्समध्ये KTouch टाईप करा. |
01:28 | सर्च बॉक्सच्या खाली KTouch आइकॉन दिसेल त्यावर click कारा. |
01:34 | K Touch विंडो दिसेल. |
01:36 | तुम्ही टर्मिनलचा वापर करून हि KTouch उघडू शकता. |
01:41 | टर्मिनल उघडण्यासाठी CTRT + ALT + T कीज एकत्र दाबा. |
01:47 | KTouch उघडण्यास टर्मीनल मध्ये कमांड K Touch टाईप करून enter दाबा. |
01:55 | आता आपण KTouch इंटरफेसचा परिचय करून घेऊ. |
01:59 | मुख्य मेनू मध्ये file, training, setting आणि help मेन्युझ आहेत. |
02:06 | टाईपिंगच्या आभ्यासासाठी Start New Session वर click करून नवीन session उघडा. |
02:11 | टाईपिंग करताना थांबण्यास pause session वर click करा. |
02:14 | lecture statistics वर क्लिक करून, टाइपिंग ची प्रगती जाणून घ्या. |
02:19 | टाईपिंगच्या वेळेस वापरण्यात आलेल्या keys संबंधी कठीणतेची पातळी level दर्शवते. |
02:27 | speed दर्शवते कि आपण १ मिनटात किती अक्षरे टाईप करू शकतो. |
02:32 | correctness संकेताक टाईपिंगच्या शुद्धतेची टक्केवारी दाखवतो. |
02:39 | New character in this level हे अक्षरे दर्शवितो ज्याना, तुम्हाला निवडक स्थरावर अभ्यासण्याची आवश्यकता आहे. |
02:47 | teacher‘s line टाईप करण्याची अक्षरे दर्शवते. |
02:51 | student‘s line कीबोर्डचा वापर करून तुम्ही टाईप केलेली अक्षर दर्शवते . |
02:58 | कीबोर्ड मध्यभागी दिसेल. |
03:02 | कीबोर्डची पहिली ओळ संख्या, विशेष अक्षरे आणि backspace दर्शवतो. |
03:09 | टाईप केलेली आक्षरे मिटवन्यासाठी backspace दाबा. |
03:13 | कीबोर्डच्या दुसऱ्या ओळी मध्ये अक्षरे, काही विशेष अक्षरे तसेच टॅब की समाविष्ट आहे. |
03:20 | कीबोर्डच्या तिसऱ्या ओळी मध्ये अक्षरे, कोलन, सेमिकॉलन आणि कॅप्स लॉक की आहेत. |
03:28 | टाईप करताना पुढील ओळीत जाण्यासाठी Enter key दाबा. |
03:33 | मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी capslock key दाबा. |
03:37 | कीबोर्ड key च्या चौथ्या ओळी मध्ये अक्षरे, विशेष अक्षरे आणि शिफ्ट की आहे. |
03:45 | मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी कुठलीही अक्षर key shift key सोबत दाबा. |
03:52 | keys च्या वरच्या बाजूला असलेली अक्षरे टाईप करण्यासाठी shift key सोबत दाबा. |
03:59 | उदाहरणार्थ, संख्या १ च्या key वरती उद्गारवाचक चिन्ह टाईप करण्यासाठी shift key ला १ अंक सोबत दाबा. |
04:11 | कीबोर्डच्या पाचव्या ओळी मध्ये CTRL, ALT आणि फंक्शन key तसेच spacebar समाविष्ट आहेत. |
04:20 | आता आपण बघूया कि, के-टच कीबोर्ड,laptop कीबोर्ड आणि डेक्सटोप कीबोर्ड माध्ये काय फरक आहे. |
04:29 | लक्षात घ्या , कि के-टच कीबोर्ड आणि laptop व डेस्कटॉप मध्ये वापरले जाणारे कीबोर्ड सारखेच आहेत. |
04:36 | आता कीबोर्डवर आपल्या हाताच्या बोटांचा योग्य क्रम बघूया. |
04:41 | या slide वर बघा .यात हातांची बोटे अन त्यांची नवे दर्शविली आहेत |
04:46 | डावीकडून उजवीकडील बोटांची नवे:करंगळी (little finger) |
04:51 | अनामिका (रिंग finger ) मध्य बोट (middle finger) |
04:54 | तर्जनी (इंडेक्स finger) आणि अंगठा (thumb) |
04:59 | किबोर्डवर तुमचा डावा हात किबोर्डच्या डाव्या बाजूने ठेवा . |
05:03 | खात्री करा कि तुमची करंगळी “A” या अक्षरावर आहे . |
05:07 | अनामिका अक्षर “S” वर असावी. |
05:10 | मध्य बोट “D” अक्षरावर असावे. |
05:13 | तर्जनी “F“ अक्षरावर असावी |
05:17 | आता तुमचा उजवा हात कीबोर्डच्या उजवीकडे ठेवा. |
05:20 | खात्री करा करंगळी कॉलन/सेमिकॉलन key वर असावी. |
05:25 | अनामिका अक्षर “L” वर असावी. |
05:28 | मध्य बोट “K” अक्षरावर असावे. |
05:30 | तर्जनी “J“ अक्षरावर असावी . |
05:34 | स्पेसबार दाबण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करा . |
05:37 | पाहिल्यांदा जेव्हा तुम्ही के-टच उघडाल तेव्हा Teacher’s line default टेक्स्ट दर्शवेल . |
05:44 | हा टेक्स्ट सूचनांना सूचीबद्ध करतो कि, पाठ निवडून टाईपिंग कसे सुरु करावे. |
05:51 | या ट्युटोरिअलच्या उद्देशासाठी ,आपण default टेक्स्ट टाईप करण्याचे सोडून lecture निवाडतो. |
05:57 | पण तुम्ही हे टयूटोरिअल थांबवून default टेक्स्ट हि टाईप करू शकता . |
06:02 | आता,पाठ टाईप करण्यासाठी आपण lecture निवडूया. |
06:07 | मुख्य मेनू मधील file निवडा ,open lecture वर click करा. |
06:12 | select training lecture file –kTouch डायलोग बॉक्स दिसेल. |
06:17 | खालील फोल्डरचा पाथ ब्रोउज करा.Root -> usr -> share-> kde4 -> apps -> KTouch. |
06:31 | english.ktouch.xml निवडून open वर click करा. |
06:36 | लक्षात घ्या,कि teacher’s line आता अक्षरांचे अन्य समूह दर्शवते. |
06:41 | आता टाइपिंग सुरु करा. |
06:43 | default स्वरुपात level १ सेट आहे आणि speed शून्यवर आहे. |
06:49 | new character in this level मध्ये जी अक्षरे आहेत ती आपण या level मध्ये शिकणार आहोत. |
06:55 | लक्षात घ्या कि, कर्सर student‘s line वर आहे . |
06:58 | कीबोर्डचा वापर करून teacher’s line मधील अक्षरे टाईप करा. |
07:09 | लक्षात घ्या, जसे तुम्ही टाईप कराल तसेच characters student‘s lineमध्ये दिसतील. |
07:14 | आता speed फिल्डमध्ये बघा. |
07:16 | तुमच्या टाइपिंगच्या गतीप्रमाणे संख्या कमी-जास्त होत आहे. |
07:22 | जर तुम्ही टाईपिंग थांबवलं तर speed ची संख्या कमी होईल. |
07:25 | आता संख्या ७ आणि ८ टाईप करा, जी कि teacher’s line मध्ये दाखवली नाही. |
07:31 | student line लाल झाली आहे. |
07:34 | का? कारण आपण चुकीच टाईप केले आहे किंवा टाइपिंग मध्ये काही चूक झाली आहे. |
07:40 | हे मिटवा आणि टाइपिंग पूर्ण करा. |
07:56 | पहिली ओळ संपल्यावर दुसऱ्या ओळीवर जाण्यासाठी एंटर की दाबा. |
08:02 | लक्षात घ्या, teacher’s line ,आता टाईप करण्यासाठी दुसरा अक्षर समूह दाखवते. |
08:07 | student’s line टाईप केलेला टेक्स्ट मधून मिटवण्यात आला आहे. |
08:11 | आता बघूया आपण किती बरोबर टाईप केले. |
08:14 | correctness फिल्ड तुमच्या टाइपिंग च्या शुद्धतेची टक्केवारी दर्शवतो.उदाहरणार्थ, हे ८० प्रतिशत दाखवेल. |
08:23 | आपण आपला पहिला टाइपिंग पाठ पूर्ण केला आहे. |
08:26 | प्रथम अचूक व सरावा साठी सावकाश टाइप करणे ही पद्धत योग्य आहे. |
08:31 | जेव्हा तुम्ही विनाचूक चांगली टाइपिंग शिकाल तेव्हा टाइपिंगची गती वाढवू शकता. |
08:37 | एक नवीन टाईपिंग session सुरु करूया. |
08:40 | Start new session वर click करा. |
08:42 | Start new session - KTouch डायालोग बॉक्समध्ये start from first level वर click कारा. |
08:50 | तुम्हाला काय दिसेल? |
08:52 | teacher’s line मध्ये अक्षरांचा एक समुह. |
08:55 | student line रिक्त असेन. |
09:00 | टाइपिंग सुरु करा. |
09:05 | जर तुम्ही टाइपिंग थांबवुन पुन्हा सुरू करू इच्छिता, |
09:09 | तुम्ही तुमचा सेशन कसे थांबवाल? |
09:12 | pause session वर click करून. |
09:14 | लक्षात घ्या कि गती कमी झालेली नाही. |
09:17 | लक्षात ठेवा, जर पहिला सेशन पॉज न करता तुम्ही टाइपिंग थांबवली तर गती कमी होईल. |
09:23 | टाइपिंग परत सुरु करण्यासाठी teacher’s line मधील पुढचा शब्द किंवा अक्षर टाईप करा. |
09:39 | एकदा का तुम्हीं टाइपिंग पूर्ण केले कि ,correctness फिल्ड तपासून बघा यात टाइपिंग ची शुद्धता दाखेवली जाते. |
09:46 | आता आपण के-टच ट्यूटोरियल च्या समाप्ती कडे आलोय. |
09:50 | या टयूटोरिअलमध्ये आपण के-टच इंटरफेस विषयी शिकलो,तसेच किबोर्डवर आपली बोटे कशी ठेवावी हेही शिकलो. |
09:59 | teacher’s line मध्ये बघुन टाईप करा आणि तुमचा पहिला session पूर्ण करा . |
10:04 | येथे तुमच्या साठी एक assignment आहे. |
10:06 | के-टच उघडा. level १ मध्ये टाइपिंग session पूर्ण करा.या लेवेलसह टाईपिंगचा आभ्यास करा. |
10:13 | keys साठी क्रमबद्ध बोटांचा वापर कारायचे लक्षात ठेवा. |
10:18 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
10:24 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर तुम्ही हे डाऊनलोड करूनहि बघू शकता. |
10:28 | स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्ट टीम : स्पोकन टयूटोरिअल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
10:37 | अधिक माहिती साठी contact@spoken-tutorial.orgवर संपर्क करा. |
10:43 | spoken tutorial प्रोजेक्ट talk to teacher प्रोजेक्टचा भाग आहे. |
10:47 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India.यांच्याकडून मिळाले आहे. |
10:55 | या संबंधीत माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:06 | या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर सविता यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे सहभागासाठी धन्यवाद. |