Jmol-Application/C3/Crystal-Structure-and-Unit-Cell/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Jmol मधील Crystal Structure and unit cell वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत: CIF म्हणजेच, क्रिस्टलोग्राफि ओपन डेटाबेस मधून क्रिस्टलोग्राफिक इन्फर्मेशन फाइल डाउनलोड करणे.
00:17 Jmol मध्ये CIF उघडणे.
00:20 Jmol पॅनेल वर unit cell आणि unit cell parameters दाखवणे.
00:25 आणि विविध क्रिस्टल सिस्टम्सचे क्रिस्टल स्ट्रक्चर्स दाखवणे. उदाहरणार्थ- Cubic, Hexagonal आणि Rhombohedral.
00:34 ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:42 नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:48 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यास, मी उबंटू OS वर्जन 14.04 वापरत आहे.
00:54 Jmol वर्जन 12.2.32
00:57 जावा वर्जन 7 आणि
01:01 Mozilla Firefox ब्राउज़र 35.0
01:04 Crystal structures, सात क्रिस्टल सिस्टम्स अंतर्गतांमध्ये समाविष्ट आहेत.
01:08 हा टेबल क्रिस्टल सिस्टम्सची सूची आणि त्यांच्या संबंधित लॅटीस पॅरमीटर्स दाखवते.
01:14 विविध संयुगे आणि खनिजेचे क्रिस्टल्ससाठी उदाहरणे येथे सूचीबद्ध आहेत.
01:20 आपण Jmol पॅनेल वर सोडियम क्लॉराइड, ग्रॅफाइट आणि कॅलसाइटचे क्रिस्टल स्ट्रक्चर्स दाखवू.
01:27 Jmol पॅनेल वर क्रिस्टल स्ट्रक्चर दर्शवण्यासाठी,
01:31 आपल्याला विशिष्ट क्रिस्टलची क्रिस्टलोग्रॅफिक इन्फर्मेशन फाईल डाउनलोड करणे आवश्यक आहे.
01:37 'CIF, क्रिस्टलोग्रॅफिक इन्फर्मेशन दर्शवण्यास एक मानक टेक्स्ट फाईल फॉर्मॅट आहे.
01:43 CIF फॉर्मॅटला ".cif" फाईल एक्सट्नशन असते.
01:48 क्रिस्टलोग्राफि ओपन डाटाबेस हा एक ओपन-एक्सेस डाटाबेस आहे.
01:53 डाउनलोडेबल CIF हे COD वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
01:58 दिलेल्या लिंक द्वारे वेबसाइट एक्सेस करू शकता.
02:03 आपण COD डेटाबेस वेबसाइट उघडून काही CIF फाइल्स डाउनलोड करू.
02:10 येथे, मी COD वेबसाइट उघडली आहे.
02:13 पेजच्या डाव्या बाजूला, विविध शीर्षकांच्या अंतर्गत माहिती विभागलेली आहे.
02:19 Accessing COD Data शीर्षकाच्या अंतर्गत, उप-शीर्षके आहेत जसे Browse, Search इत्यादी.
02:27 Search पर्यायवर क्लिक केल्यास, एक नवीन पेज उघडेल.
02:31 Search पेजवर, आपल्याला CIF फाइल्स शोधण्यास अनेक पर्याय मिळतील.
02:36 hints and tips लिंकवर क्‍लिक केल्याने search पर्याय प्रभावीपणे कसे वापरावे ह्यावरील माहितीकरिता एक पेज उघडेल.
02:46 Search पेज वर परत जा.
02:49 आपण COD ID वापरून क्रिस्टल स्ट्रक्चर शोधू शकतो.
02:54 OpenBabel Fastsearch किंवा टेक्स्ट बॉक्समध्ये रासायनिक व खनिजचे नाव टाईप करा.
03:01 उदाहरणार्थ, सोडियम क्लोराईडचे CIF फाइल शोधण्यास:
03:06 टेक्स्ट-बॉक्स मध्ये “Halite” टाईप करा जे सोडियम क्लॉराइडचे खनिज नाव आहे.
03:12 elements बॉक्स पर्यंत खाली स्क्रोल करा.
03:15 सोडियम साठी Na आणि क्लॉराइड साठी Cl सिंबल टाईप करा.
03:20 "Number of distinct elements.." बॉक्स पर्यंत खाली स्क्रोल करा.
03:24 येथे, आपल्याकडे मिनिमम आणि मॅक्सीमम एलिमेंट्स टाईप करण्यासाठी एक पर्याय आहे.
03:29 जर तुम्हाला क्रिस्टल स्ट्रक्चर फक्त दोन एलिमेंट्स सोडियम आणि क्लॉराइड हवे असतील, तर मिनिमम बॉक्स मध्ये '2' टाईप करा.
03:37 Send बटणवर क्‍लिक करा.
03:40 सोडियम क्लॉराइडसाठी क्रिस्टल स्ट्रक्चर डेटा फाइल्स सह एक वेब-पेज उघडते.
03:45 COD ID वर राइट-क्लिक करून open the link in a new tab वर क्‍लिक करा.
03:51 ह्या पेजवरील विशेष क्रिस्टल स्ट्रक्चर बद्दल सविस्तर माहिती आहे.
03:57 डेटाबेस वेब पेज वर परत जाऊ.
04:00 archive of CIF files लिंक वर क्‍लिक करा, जे पेजच्या उजव्या बाजूला स्थित आहे.
04:08 स्क्रीनवर एक डायलॉग-बॉक्स उघडेल. Open with पर्याय निवडून OK बटणवर क्‍लिक करा.
04:17 स्क्रीनवर सोडियम क्लोराईड क्रिस्टलसाठी अनेक CIF फाईल्स सह एक फोल्डर उघडेल.
04:23 तुम्हाला जी फाईल डाउनलोड करायची आहे ती निवडा.
04:28 टूलबार वरील Extract बटण वर क्लिक करा.
04:32 तुमच्या सिस्टमच्या सोयिस्कर स्थानावर फाईल्स सेव्ह करा.
04:37 Extract वर क्लिक करून विंडो बंद करा.
04:41 सर्च पेज वर परत जा.
04:43 आधी सारख्या पध्दतींचा वापर करून graphite आणि calcite साठी CIF फाईल्स डाउनलोड करा.
04:51 आता Jmol मध्ये सोडियम क्लोराईडचे CIF फाईल उघडू.
04:55 येथे, मी Jmol विंडो उघडले आहे.
04:59 टूलबार वरील “Open a file” आयकन वर क्लिक करा.
05:03 सोडियम क्लोराईडचे CIF फाईल, COD डेटाबेस मधून डाउनलोड केले होते ते शोधा.
05:12 Open वर क्लिक करा.
05:14 स्क्रीनवर सोडियम क्लोराईड क्रिस्टलचे Unit cell उघडेल.
05:19 Unit cell हा क्रिस्टल मध्ये एक छोटा पुनरावृत्त होणारा यूनिट आहे.
05:23 3 डायमेन्शन्स मध्ये हे यूनिट सेल्स एका वर एक जमतील तर क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतो.
05:29 Jmol पॅनलवर परत जाऊ.
05:32 युनिट सेल साठी संबंधित डेटा पॅनलच्या डाव्या बाजूला प्रदर्शित होईल.
05:37 data space group वर्गीकरणासह सुरु होतो.
05:41 सोडियम क्लॉराइड हे क्यूबिक लॅटीस सिस्टमच्या अंतर्गत येते. त्यामुळे वेकटर्स 'a', 'b' आणि 'c' समान आहेत.
05:50 angles अल्फा, बीटा आणि गॅमा 90 अंश आहेत.
05:55 पॉप-अप मेनू उघडण्यास राईट क्लिक करा.
05:59 Symmetry पर्याय पर्यंत खाली स्क्रोल करा.
06:01 सब-मेनू मध्ये, सममिती एलिमेंट्स दाखवण्यास पर्याय आहेत.
06:05 सब-मेनू मधील पर्याय वापरून युनिट सेल्सचे ब्लॉक्स दाखवू शकतो.
06:10 उदाहरणार्थ, Reload {1 1 1} पर्याय वर क्लिक करा.
06:15 पॅनलवर आपल्याकडे एक युनिट सेल ब्लॉक आहे जो फेस सेंटर क्यूबिक लॅटीस दर्शवतो.
06:21 डिस्पले बदलण्यास - पॉप-अप मेनू उघडा, Style पर्यंत खाली स्क्रोल करा, नंतर Scheme आणि CPK Spacefill वर क्लिक करा.
06:29 येथे, पॅनलवर, आपल्याकडे CPK डिस्पलेमध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर आहे.
06:34 पुन्हा पॉप-अप मेनू उघडा, symmetry पर्यंत खाली स्क्रोल करून Reload {4 4 4 6 6 6 1} पर्यायवर क्लिक करा.
06:44 हा पर्याय Jmol पॅनलवर 27 सेल ब्लॉक लोड करतो.
06:49 पॉप-अप मेनू उघडा, symmetry पर्यंत जाऊन, Reload {1 1 1} पर्यायवर परत जा.
06:56 सममिती एलिमेंट्स दाखवण्यास, पुन्हा पॉप-अप मेनू उघडा.
07:00 सब-मेनू मधील Symmetry पर्यंत खाली स्क्रोल करून mirrorplane (x z y) पर्यायवर क्लिक करा.
07:08 पॅनलवर, आपल्याकडे एक क्यूबिक लॅटीस सह mirrorplane (x z y) दिसेल.
07:16 आता graphite साठी CIF फाईल लोड करू जे षटकोनी क्रिस्टल सिस्टमच्या अंतर्गत आहे.
07:22 आधी दाखवल्याप्रमाणे, पॅनलवर ग्रॅफाइटसाठी CIF फाईल लोड करण्यास Open a file पर्याय वापरा.
07:29 पॅनलवर ग्रॅफाइटसाठी युनिट सेल उघडेल.
07:33 युनिट सेल परैमिटर्सना बघा:
07:35 वेक्टर्स- 'a' इक्वल टू 'b' बट नॉट इक्वल टू 'c'.
07:40 अँगल्स- अल्फा आणि बिटा इक्वल टू 90 डीग्रीस आणि गॅमा इक्वल टू 120 डीग्रीस.
07:47 पॉप-अप मेनू उघडा, Symmetry पर्यंत खाली स्क्रोल करून Reload {444 666 1} पर्यायवर क्लिक करा.
07:56 स्क्रीनवर अणूंचे 'हेक्सैगनल लॅटीस' व्यवस्था दर्शविली आहे.
08:01 डिस्पले बदलण्यास: पॉप-अप मेनू उघडा, Style , scheme पर्यंत जाऊन, Wireframe पर्यायवर क्लिक करा.
08:10 त्याचप्रमाणे, मी पॅनलवर calcite मिनरलचे CIF फाईल उघडली आहे.
08:16 Calcite हे rhombohedral क्रिस्टल सिस्टमच्या अंतर्गत आहे.
08:20 तुम्ही कोणत्याही क्रिस्टल सिस्टमची CIF उघडू शकता आणि स्ट्रक्चर आणि सममिती पर्यायांना अन्वेषण करू शकता.
08:27 थोडक्यात. ह्या ट्यूटोरियलमध्ये, आपण शिकलो: * क्रिस्टलोग्राफि ओपन डेटाबेस मधून CIF डाउनलोड करणे.
08:35 Jmol मध्ये CIF उघडणे.
08:38 unit cell आणि unit cell parameters दाखवणे.
08:41 सोडियम क्लोराईड, ग्रॅफाइट आणि कॅलसाइटचे क्रिस्टल स्ट्रक्चर्स दाखवणे.
08:47 असाइनमेंट साठी: COD डेटाबेस मधून quartz क्रिस्टलसाठी CIF डाउनलोड करा.
08:53 Jmol पॅनलवर 'युनिट सेल दाखवून सममिती पर्यायांना अन्वेषण करा.
08:59 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:02 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर, तुम्ही डाउनलोड करूनही पाहू शकता.
09:06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
09:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
09:18 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana