Jmol-Application/C3/Crystal-Structure-and-Unit-Cell/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Jmol मधील Crystal Structure and unit cell वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत: CIF म्हणजेच, क्रिस्टलोग्राफि ओपन डेटाबेस मधून क्रिस्टलोग्राफिक इन्फर्मेशन फाइल डाउनलोड करणे. |
00:17 | Jmol मध्ये CIF उघडणे. |
00:20 | Jmol पॅनेल वर unit cell आणि unit cell parameters दाखवणे. |
00:25 | आणि विविध क्रिस्टल सिस्टम्सचे क्रिस्टल स्ट्रक्चर्स दाखवणे. उदाहरणार्थ- Cubic, Hexagonal आणि Rhombohedral. |
00:34 | ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:42 | नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:48 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यास, मी उबंटू OS वर्जन 14.04 वापरत आहे. |
00:54 | Jmol वर्जन 12.2.32 |
00:57 | जावा वर्जन 7 आणि |
01:01 | Mozilla Firefox ब्राउज़र 35.0 |
01:04 | Crystal structures, सात क्रिस्टल सिस्टम्स अंतर्गतांमध्ये समाविष्ट आहेत. |
01:08 | हा टेबल क्रिस्टल सिस्टम्सची सूची आणि त्यांच्या संबंधित लॅटीस पॅरमीटर्स दाखवते. |
01:14 | विविध संयुगे आणि खनिजेचे क्रिस्टल्ससाठी उदाहरणे येथे सूचीबद्ध आहेत. |
01:20 | आपण Jmol पॅनेल वर सोडियम क्लॉराइड, ग्रॅफाइट आणि कॅलसाइटचे क्रिस्टल स्ट्रक्चर्स दाखवू. |
01:27 | Jmol पॅनेल वर क्रिस्टल स्ट्रक्चर दर्शवण्यासाठी, |
01:31 | आपल्याला विशिष्ट क्रिस्टलची क्रिस्टलोग्रॅफिक इन्फर्मेशन फाईल डाउनलोड करणे आवश्यक आहे. |
01:37 | 'CIF, क्रिस्टलोग्रॅफिक इन्फर्मेशन दर्शवण्यास एक मानक टेक्स्ट फाईल फॉर्मॅट आहे. |
01:43 | CIF फॉर्मॅटला ".cif" फाईल एक्सट्नशन असते. |
01:48 | क्रिस्टलोग्राफि ओपन डाटाबेस हा एक ओपन-एक्सेस डाटाबेस आहे. |
01:53 | डाउनलोडेबल CIF हे COD वेबसाइटवर उपलब्ध आहेत. |
01:58 | दिलेल्या लिंक द्वारे वेबसाइट एक्सेस करू शकता. |
02:03 | आपण COD डेटाबेस वेबसाइट उघडून काही CIF फाइल्स डाउनलोड करू. |
02:10 | येथे, मी COD वेबसाइट उघडली आहे. |
02:13 | पेजच्या डाव्या बाजूला, विविध शीर्षकांच्या अंतर्गत माहिती विभागलेली आहे. |
02:19 | Accessing COD Data शीर्षकाच्या अंतर्गत, उप-शीर्षके आहेत जसे Browse, Search इत्यादी. |
02:27 | Search पर्यायवर क्लिक केल्यास, एक नवीन पेज उघडेल. |
02:31 | Search पेजवर, आपल्याला CIF फाइल्स शोधण्यास अनेक पर्याय मिळतील. |
02:36 | hints and tips लिंकवर क्लिक केल्याने search पर्याय प्रभावीपणे कसे वापरावे ह्यावरील माहितीकरिता एक पेज उघडेल. |
02:46 | Search पेज वर परत जा. |
02:49 | आपण COD ID वापरून क्रिस्टल स्ट्रक्चर शोधू शकतो. |
02:54 | OpenBabel Fastsearch किंवा टेक्स्ट बॉक्समध्ये रासायनिक व खनिजचे नाव टाईप करा. |
03:01 | उदाहरणार्थ, सोडियम क्लोराईडचे CIF फाइल शोधण्यास: |
03:06 | टेक्स्ट-बॉक्स मध्ये “Halite” टाईप करा जे सोडियम क्लॉराइडचे खनिज नाव आहे. |
03:12 | elements बॉक्स पर्यंत खाली स्क्रोल करा. |
03:15 | सोडियम साठी Na आणि क्लॉराइड साठी Cl सिंबल टाईप करा. |
03:20 | "Number of distinct elements.." बॉक्स पर्यंत खाली स्क्रोल करा. |
03:24 | येथे, आपल्याकडे मिनिमम आणि मॅक्सीमम एलिमेंट्स टाईप करण्यासाठी एक पर्याय आहे. |
03:29 | जर तुम्हाला क्रिस्टल स्ट्रक्चर फक्त दोन एलिमेंट्स सोडियम आणि क्लॉराइड हवे असतील, तर मिनिमम बॉक्स मध्ये '2' टाईप करा. |
03:37 | Send बटणवर क्लिक करा. |
03:40 | सोडियम क्लॉराइडसाठी क्रिस्टल स्ट्रक्चर डेटा फाइल्स सह एक वेब-पेज उघडते. |
03:45 | COD ID वर राइट-क्लिक करून open the link in a new tab वर क्लिक करा. |
03:51 | ह्या पेजवरील विशेष क्रिस्टल स्ट्रक्चर बद्दल सविस्तर माहिती आहे. |
03:57 | डेटाबेस वेब पेज वर परत जाऊ. |
04:00 | archive of CIF files लिंक वर क्लिक करा, जे पेजच्या उजव्या बाजूला स्थित आहे. |
04:08 | स्क्रीनवर एक डायलॉग-बॉक्स उघडेल. Open with पर्याय निवडून OK बटणवर क्लिक करा. |
04:17 | स्क्रीनवर सोडियम क्लोराईड क्रिस्टलसाठी अनेक CIF फाईल्स सह एक फोल्डर उघडेल. |
04:23 | तुम्हाला जी फाईल डाउनलोड करायची आहे ती निवडा. |
04:28 | टूलबार वरील Extract बटण वर क्लिक करा. |
04:32 | तुमच्या सिस्टमच्या सोयिस्कर स्थानावर फाईल्स सेव्ह करा. |
04:37 | Extract वर क्लिक करून विंडो बंद करा. |
04:41 | सर्च पेज वर परत जा. |
04:43 | आधी सारख्या पध्दतींचा वापर करून graphite आणि calcite साठी CIF फाईल्स डाउनलोड करा. |
04:51 | आता Jmol मध्ये सोडियम क्लोराईडचे CIF फाईल उघडू. |
04:55 | येथे, मी Jmol विंडो उघडले आहे. |
04:59 | टूलबार वरील “Open a file” आयकन वर क्लिक करा. |
05:03 | सोडियम क्लोराईडचे CIF फाईल, COD डेटाबेस मधून डाउनलोड केले होते ते शोधा. |
05:12 | Open वर क्लिक करा. |
05:14 | स्क्रीनवर सोडियम क्लोराईड क्रिस्टलचे Unit cell उघडेल. |
05:19 | Unit cell हा क्रिस्टल मध्ये एक छोटा पुनरावृत्त होणारा यूनिट आहे. |
05:23 | 3 डायमेन्शन्स मध्ये हे यूनिट सेल्स एका वर एक जमतील तर क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतो. |
05:29 | Jmol पॅनलवर परत जाऊ. |
05:32 | युनिट सेल साठी संबंधित डेटा पॅनलच्या डाव्या बाजूला प्रदर्शित होईल. |
05:37 | data space group वर्गीकरणासह सुरु होतो. |
05:41 | सोडियम क्लॉराइड हे क्यूबिक लॅटीस सिस्टमच्या अंतर्गत येते. त्यामुळे वेकटर्स 'a', 'b' आणि 'c' समान आहेत. |
05:50 | angles अल्फा, बीटा आणि गॅमा 90 अंश आहेत. |
05:55 | पॉप-अप मेनू उघडण्यास राईट क्लिक करा. |
05:59 | Symmetry पर्याय पर्यंत खाली स्क्रोल करा. |
06:01 | सब-मेनू मध्ये, सममिती एलिमेंट्स दाखवण्यास पर्याय आहेत. |
06:05 | सब-मेनू मधील पर्याय वापरून युनिट सेल्सचे ब्लॉक्स दाखवू शकतो. |
06:10 | उदाहरणार्थ, Reload {1 1 1} पर्याय वर क्लिक करा. |
06:15 | पॅनलवर आपल्याकडे एक युनिट सेल ब्लॉक आहे जो फेस सेंटर क्यूबिक लॅटीस दर्शवतो. |
06:21 | डिस्पले बदलण्यास - पॉप-अप मेनू उघडा, Style पर्यंत खाली स्क्रोल करा, नंतर Scheme आणि CPK Spacefill वर क्लिक करा. |
06:29 | येथे, पॅनलवर, आपल्याकडे CPK डिस्पलेमध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. |
06:34 | पुन्हा पॉप-अप मेनू उघडा, symmetry पर्यंत खाली स्क्रोल करून Reload {4 4 4 6 6 6 1} पर्यायवर क्लिक करा. |
06:44 | हा पर्याय Jmol पॅनलवर 27 सेल ब्लॉक लोड करतो. |
06:49 | पॉप-अप मेनू उघडा, symmetry पर्यंत जाऊन, Reload {1 1 1} पर्यायवर परत जा. |
06:56 | सममिती एलिमेंट्स दाखवण्यास, पुन्हा पॉप-अप मेनू उघडा. |
07:00 | सब-मेनू मधील Symmetry पर्यंत खाली स्क्रोल करून mirrorplane (x z y) पर्यायवर क्लिक करा. |
07:08 | पॅनलवर, आपल्याकडे एक क्यूबिक लॅटीस सह mirrorplane (x z y) दिसेल. |
07:16 | आता graphite साठी CIF फाईल लोड करू जे षटकोनी क्रिस्टल सिस्टमच्या अंतर्गत आहे. |
07:22 | आधी दाखवल्याप्रमाणे, पॅनलवर ग्रॅफाइटसाठी CIF फाईल लोड करण्यास Open a file पर्याय वापरा. |
07:29 | पॅनलवर ग्रॅफाइटसाठी युनिट सेल उघडेल. |
07:33 | युनिट सेल परैमिटर्सना बघा: |
07:35 | वेक्टर्स- 'a' इक्वल टू 'b' बट नॉट इक्वल टू 'c'. |
07:40 | अँगल्स- अल्फा आणि बिटा इक्वल टू 90 डीग्रीस आणि गॅमा इक्वल टू 120 डीग्रीस. |
07:47 | पॉप-अप मेनू उघडा, Symmetry पर्यंत खाली स्क्रोल करून Reload {444 666 1} पर्यायवर क्लिक करा. |
07:56 | स्क्रीनवर अणूंचे 'हेक्सैगनल लॅटीस' व्यवस्था दर्शविली आहे. |
08:01 | डिस्पले बदलण्यास: पॉप-अप मेनू उघडा, Style , scheme पर्यंत जाऊन, Wireframe पर्यायवर क्लिक करा. |
08:10 | त्याचप्रमाणे, मी पॅनलवर calcite मिनरलचे CIF फाईल उघडली आहे. |
08:16 | Calcite हे rhombohedral क्रिस्टल सिस्टमच्या अंतर्गत आहे. |
08:20 | तुम्ही कोणत्याही क्रिस्टल सिस्टमची CIF उघडू शकता आणि स्ट्रक्चर आणि सममिती पर्यायांना अन्वेषण करू शकता. |
08:27 | थोडक्यात. ह्या ट्यूटोरियलमध्ये, आपण शिकलो: * क्रिस्टलोग्राफि ओपन डेटाबेस मधून CIF डाउनलोड करणे. |
08:35 | Jmol मध्ये CIF उघडणे. |
08:38 | unit cell आणि unit cell parameters दाखवणे. |
08:41 | सोडियम क्लोराईड, ग्रॅफाइट आणि कॅलसाइटचे क्रिस्टल स्ट्रक्चर्स दाखवणे. |
08:47 | असाइनमेंट साठी: COD डेटाबेस मधून quartz क्रिस्टलसाठी CIF डाउनलोड करा. |
08:53 | Jmol पॅनलवर 'युनिट सेल दाखवून सममिती पर्यायांना अन्वेषण करा. |
08:59 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:02 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर, तुम्ही डाउनलोड करूनही पाहू शकता. |
09:06 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
09:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
09:18 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |