Health-and-Nutrition/C2/Feeding-expressed-breastmilk-to-babies/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | हाताने काढलेले स्तनदूध बाळांना पाजणे ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - साठवलेले दूध बाळाला पाजण्यासाठी कसे तयार करावे. |
00:14 | आणि बाळाला काढलेले स्तनदूध कसे पाजावे. |
00:19 | सुरूवात करू. काढलेल्या स्तनदूधाचे बाळ आणि आईसाठी बरेच फायदे आहेत. |
00:26 | हाताने स्तनदूध काढणे आणि ते सुरक्षितपणे साठवणे हे इतर ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केले आहे. |
00:34 | आता आपण साठवलेले स्तनदूध बाळासाठी पिण्यास कसे तयार करावे ते शिकू. |
00:42 | स्तनदूध हाताळण्यापूर्वी बाळाची काळजी घेणाऱ्याने - आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवावेत आणि हात व्यवस्थित कोरडे करून घ्यावे. |
00:52 | लक्षात ठेवा, सर्वात आधीचे साठवलेले स्तनदूध नेहमी आधी वापरावे. |
00:59 | गोठवलेले स्तनदूध वापरताना, फ्रीजच्या सर्वात खालच्या शेल्फवर रात्रभर ठेवून वितळवा. |
01:08 | आणि हे वितळवलेले दूध पुढील 24 तासात वापरा. |
01:15 | परंतू गोठवलेले स्तनदूध त्वरीत हवे असल्यास, फ्रीजच्या बाहेर प्रथम थंड पाण्याच्या भांड्यात ठेवून. |
01:25 | आणि नंतर ते कोमट पाण्याच्या भांड्यात ठेवून वितळवा |
01:31 | कोमट पाण्यात वितळवताना - स्तनदूधाचे भांडे अधूनमधून हलके हलवा. |
01:38 | ते जोरात आणि सतत हलवू नका. |
01:42 | वापरण्यापूर्वी भांडे बाहेरील बाजूने स्वच्छ कपड्याने कोरडे करा. |
01:48 | हे वितळवलेल्या स्तनदूधाचा वापर २ तासांच्या आत करा आणि न वापरलेले दूध फेकून द्या. |
01:56 | वितळवलेल्या स्तनदूधाचा वास आणि चव ही ताज्या स्तनदूधापेक्षा वेगळी असू शकते. |
02:03 | बाळ जर ते पित आहे तर ते दूध चांगले आहे. |
02:08 | काळजी घेणाऱ्याने नेहमी स्तनदुधाचा वास घेऊनच बाळाला दूध पाजावे. |
02:16 | जर दुधाला आंबट वास येत असेल तर ते वापरू नका. |
02:20 | कृपया लक्षात ठेवा- साठवलेल्या स्तनदूधाच्या वरच्या भागावर साय येते. |
02:28 | हे सामान्य आहे. वापरण्यापूर्वी दुधामध्ये साय पुन्हा मिसळण्यासाठी हलक्या हाताने हलवा. |
02:36 | बाळाला स्तनदूध पाजण्यापूर्वी ते हल्के गरम करण्यासाठी - स्तनदूधाचे भांडे कोमट पाण्याच्या वाडग्यात 20 ते 30 मिनिटे ठेवा. |
02:47 | दूध किती उबदार आहे हे पाहण्यासाठी मनगटाच्या आतील भागावर थोडेसे थेंब टाका. हल्के गरम वाटल्यास ते पाजण्यास योग्य आहे. |
02:56 | गरम पाण्यात स्तनदूध गरम करू नका. साठवलेले स्तनदूध फ्रीजमधून सरळ बाळाला पाजण्याचा प्रयत्न करा. |
03:05 | ह्यामुळे दूध अति तापणे आणि भाजण्यापासून वाचाल. |
03:12 | स्तनदूध थेट स्टोव्हवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करू नका. |
03:19 | थेट उष्णतेने स्तनदूधातील संसर्गाशी लढणाऱ्या अनेक घटकांचा नाश होईल. |
03:27 | जेव्हा स्तनदूध तयार होईल तेव्हा ते बाळाला द्या. |
03:32 | असे करण्यासाठी खालील भांडी वापरा : बोंडलं, छोटा कप, चमचा किंवा निफ्टी कप. |
03:42 | यांपैकी, बाळाला पाजण्यासाठी चमचा किंवा कप वापरणे अधिक सोयीचे आहे. |
03:49 | प्रथम, काळजी घेणाऱ्याने निवडलेले भांडे साबण आणि पाण्याने धुवावे आणि नंतर हवेने पूर्णपणे वाळवा किंवा स्वच्छ न वापरलेल्या कपड्याने कोरडे करा. |
04:02 | मग काळजी घेणाऱ्याने आपले हात व्यवस्थित धुवावेत आणि कोरडे करणे आवश्यक आहे. |
04:10 | त्यांनी निवडलेले भांडे अर्धे किंवा दोन तृतीयांश स्तनदूधाने भरावे. |
04:16 | मग त्यांनी बाळाला त्यांच्या मांडीवर वरच्या दिशेने उभे करावे. |
04:23 | त्यांनी हाताने बाळाच्या डोक्यावर आणि मानेला आधार द्यावा. |
04:28 | जर ते बाळाला पाजण्यासाठी बोंडलं वापरत असतील तर त्यांनी बाळाच्या तोंडाच्या आतील कोपऱ्यात बोंडल्याचे टोक ठेवावे. |
04:39 | हे बाळाच्या ओठांमधे हलकेच धरले पाहिजे. |
04:45 | बोंडल्याच्या निमुळत्या टोकाचा बाळाच्या वरच्या ओठांना हलका स्पर्श करावा. |
04:50 | ह्या स्थितीत, दूध बोंडल्याच्या टोकावर असले पाहिजे |
04:58 | जसे बाळ दूध गिळते तसे पाजणाऱ्याने दूध टोकावर येण्यासाठी बोंडलं किंचित झुकवावे. |
05:07 | जर बाळाला पाजण्यासाठी छोटासा कप वापरत असेल तर त्यांनी बाळाच्या ओठांच्या दरम्यान हा कप हलका ठेवावा. |
05:17 | कपाच्या काठाचा बाळाच्या वरच्या ओठांना हलकाच स्पर्श झाला पाहिजे. |
05:22 | दूध कपाच्या काठावर येईपर्यंत तो कप किंचित तिरपा करावा. |
05:28 | यामुळे बाळाला कपाच्या काठाने दूध पिता येईल. |
05:33 | जर बाळाला पाजण्यासाठी चमचा वापरत असेल तर त्यांनी चमचा बाळाच्या ओठांमधे ठेवावा. |
05:42 | चमच्याचा काठाचा बाळाच्या वरच्या ओठांना हलकाच स्पर्श झाला पाहिजे. |
05:47 | नंतर चमचा किंचित तिरपा करावा जेणेकरून दूध चमच्याच्या काठावर येईल. |
05:54 | जन्मानंतर चमच्याने पाजणे हे पहिल्या काही दिवसांसाठी चांगले आहे. |
05:59 | कारण या दिवसांमध्ये फक्त थोड्या दुधाची गरज असते. |
06:07 | जर बाळाला दूध पाजण्यासाठी निफ्टी कप वापरत असेल तर - त्यांनी निफ्टी कपाचा लहानसा भाग जिथे दूध एकत्र येते तो भाग बाळाच्या तोंडात राहिल असा ठेवावा. |
06:19 | बाळ दूध प्यायल्यावर कप जास्त झुकवावे त्यामुळे कपाचा अर्धा भाग दुधाने पुन्हा भरेल. |
06:31 | बाळाला स्तनदूध पाजताना, कधीही बाळाच्या तोंडात दूध ओतू नका. |
06:38 | यामुळे बाळाला गुदमरल्यासारखे वाटू शकते. |
06:40 | त्याऐवजी, दूध नेहमी कप किंवा चमच्याच्या काठावर आणून पाजा. |
06:47 | बाळ पूर्णणे जागे, सतर्क आणि पिण्यास उत्सुक आहे हे नेहमीच सुनिश्चित करा. |
06:54 | गरज असल्यास, बाळाला कपड्यात गुंडाळून घ्या जेणेकरून कपाला लाथ लागून पाजणाऱ्याच्या हातून कप पडणार नाही. |
07:03 | बाळाला नेहमीच त्याच्या स्वत:च्या गतीने दूध पिऊ द्या. |
07:08 | बाळाचे पोट भरले आहे ह्याचे संकेत पाहा. |
07:13 | जसे - तिने हात वर करणे. |
07:16 | झोपणे किंवा तिने तोंड बंद करणे. |
07:21 | लक्षात ठेवा, बाळाच्या खालच्या ओठांवर जास्त दाब देऊ नका. |
07:28 | भांड्याच्या काठाचा नेहमीच बाळाच्या वरच्या ओठांना हलकाच स्पर्श होऊ द्या. |
07:34 | कप, बोंडलं किंवा चमचा बाळाच्या तोंडात खूप आत घालू नका. |
07:41 | कधीही झोपलेल्या स्थितीत बाळाला पाजू नका. |
07:45 | बाळाला स्तनदूध पाजण्यासाठी दूधाची बाटली वापरू नका. |
07:51 | बाळाला पाजल्यानंतर कप, बोंडलं किंवा चमचा साबणाने आणि स्वच्छ पाण्याने चांगले धुवा आणि ते हवेत पूर्णपणे कोरडे होऊ द्या. |
08:04 | काही मुलं विशेषत: सुरवातीला नवीन माणसाकडून स्तनदूध पिण्यास नाखूष असतात. |
08:12 | जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने त्यांना दिल्यावर ते जास्त खूष नसतात. |
08:17 | जर बाळाने दूध पिले नाही तर काळजी करू नका. |
08:22 | आई कामावरून परत आल्यावर, बाळ बराच वेळ किंवा बऱ्याचदा स्तनपान करेल. |
08:32 | लक्षात ठेवा, स्तनदूध हे - हात, कंटेनर आणि भांडी धुवून, आवश्यक तितक्या लवकर दूध पाजून किंवा सुरक्षितपणे साठवून करून सुरक्षित ठेवा. |
08:44 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. |
08:47 | हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज क्राईस्ट ग्लोरी सर्व्हिसेस ह्यांनी दिला आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |