Firefox/C3/Bookmarks/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Mozilla Firefox मधील Organizing Bookmarks आणि Printing वरील पाठात स्वागत.
00:07 ह्या पाठात, Bookmarks बद्दल शिकू.
00:11 तसेच Bookmarks संघटित करणे, फायरफॉक्स पेज, प्रिव्ह्यू आणि प्रिंट सेटअप करणे जाणून घेऊ.
00:18 येथे आपण Ubuntu 10.04वरFirefox 7.0 वापरणार आहोत.
00:26 आता फायरफॉक्स ब्राउजर उघडू.
00:29 डिफॉल्ट रूपात yahoo चे होमपेज उघडेल.
00:32 वारंवार वापरल्या जाणा-या पेजेसवर जाण्यासाठी बुकमार्कसचा उपयोग होतो.
00:37 मागील पाठात Bookmarks बद्दल थोडक्यात जाणून घेतले होते.
00:42 येथे gmail साठीचा बुकमार्क समाविष्ट केला आहे.
00:46 gmail चे होमपेज उघडण्यासाठी ह्यावर क्लिक करा.
00:50 हे तुम्हास gmail होमपेज वर घेऊन जाईल.
00:53 Address बारमधील gmail च्या address च्या उजवीकडील पिवळी चांदणी दिसली का?
00:59 ही, सदर साईट बुकमार्क झाली असल्याचे दाखवते.
01:03 त्या चांदणीद्वारे बुकमार्कचे नाव बदलता येते तसेच ते दुस-या फोल्डरमधे संचित करता येते.
01:09 gmail चे नाव mygmailpage असे बदलून MyNewBookmarks या नव्या फोल्डरमधे संचित करु.
01:18 Address बारमधे पिवळ्या चांदणीवर क्लिक करा.
01:22 Edit This Bookmark हा डायलॉगबॉक्स उघडेल.
01:25 Name फिल्डमधे mygmailpage टाईप करा.
01:29 Folder च्या ड्रॉपडाऊन वर क्लिक करून Choose निवडा.
01:34 Bookmarks मेनू निवडून New Folder वर क्लिक करा.
01:39 New Folder तयार होईल.
01:41 फोल्डरचे नाव बदलून MyBookmarks करा.
01:45 Tags मधे email टाईप करा.
01:49 Tags द्वारे bookmarks चे वर्गीकरण होते .
01:52 एखाद्या बुकमार्कला अनेक टॅग्ज लावता येतात.
01:55 उदाहरणार्थ खरेदी संबंधित साईट बुकमार्क करताना,
01:58 तिला gifts, books किंवा toys असे tag देता येतील .
02:03 Done वर क्लिक करा.
02:06 किंवा 'CTRL D दाबु शकता.
02:09 पेज bookmark करण्यासाठी,
02:12 मेनूबारवरील Bookmarksवर क्लिक करा.
02:16 MyBookMarks फोल्डर Bookmarks मेनूत दिसेल.
02:20 cursor फोल्डरवर ठेवा.
02:23 mygmailpage हा बुकमार्क तिथे सेव्ह झालेला आहे.
02:27 Address बारमधे email असा tag टाईप करा
02:31 mygmailpage ही साईट सूचीमधे पहिला पर्याय म्हणून दाखवला जाईल.
02:38 आपण बुकमार्कचे नाव बदलले, दुस-या फोल्डरमधे सेव्ह केले आणि टॅगद्वारे शोधले.
02:45 आता www dot google dot com ही वेबसाईट बुकमार्क करू. <Pause>
02:53 < address बारमधे address निवडून तो डिलीट करा.
02:56 www dot google dot com टाईप करा.
03:01 Enter दाबा.
03:03 Address बारच्या उजव्या कोप-यातील चांदणीवर क्लिक करा.
03:08 google वेबसाईट बुकमार्क झाली आहे.
03:12 याच पध्दतीने Spoken Tutorial, Yahoo,Firefox Add-ons आणि Ubuntu ह्या आणखी चार साईटस् बुकमार्क करू.
03:36 हे बुकमार्कस फोल्डरमधे सेव्ह केलेले नाहीत.
03:40 एकदा बनवलेले बुकमार्क डिलीट कसे करू शकतो ?
03:44 Edit This Bookmark या डायलॉग बॉक्समधे Remove bookmark बटण आपण आधीच बघितले आहे.
03:50 www.google.com चा बुकमार्क डिलिट करू.
03:55 Address बारमधे www.google.com टाईप करून पिवळ्या चांदणीवर क्लिक करा.
04:03 Edit This Bookmark डायलॉग बॉक्स मधील Remove Bookmark वर क्लिक करा.
04:09 Menu बार वरील Bookmarks आणि MyBookmarks वर क्लिक करा.
04:14 google चा बुकमार्क आपल्याला Bookmark मेनूमधे दिसणार नाही.
04:19 बनवलेले बुकमार्क access कसे करता येतात?
04:23 आपण हे अनेक प्रकारे करू शकतो.
04:26 बुकमार्क केलेली जी साईट access करायची आहे तिचे नाव Address bar मधे टाईप करा..
04:33 Address bar वर क्लिक करा. तेथील address सिलेक्ट करून तो डिलीट करा.
04:39 Address bar मधे G टाईप करा.
04:43 अक्षराने सुरू होणा-या वेबसाईटची सूची दिसेल.
04:49 ह्या साईटस आपण बुकमार्क, टॅग केलेल्या आणि भेट दिलेल्या आहेत.
04:55 Library विंडोमधे बुकमार्कस बघता येतात आणि त्यांचा क्रम लावता येतो.
05:00 Menu वरील Bookmarks वर क्लिक करून Show All Bookmarks निवडा.
05:06 Library विंडो उघडेल.
05:09 डिफॉल्ट रूपात बनवलेले सर्व बुकमार्क्स Unsorted Bookmarks फोल्डरमधे सेव्ह होतात.
05:16 Yahoo, Spoken Tutorial, Ubuntu, FireFox Add-on बुकमार्क्सची यादी येथे दिसत आहे.
05:24 Bookmarks मेनूमधे Yahoo India हा बुकमार्क समाविष्ट करू.
05:29 प्रथम स्क्रीनच्या मध्यभागी Library विंडो न्या.
05:34 आता Menu बार आणि पर्याय नीट दिसू शकतील.
05:39 Unsorted Bookmarks फोल्डरमधील Yahoo चा बुकमार्क निवडा.
05:43 माऊसचे डावे बटण दाबा आणि तो बुकमार्क Bookmarks मेनूवर ड्रॅग करा.
05:49 कर्सर Bookmarks मेनूवर असल्याची खात्री करा.
05:53 Bookmark मेनू विस्तारेल.
05:56 माऊसचा पॉईंटर मेनूवर नेऊन त्याचे डावे बटण सोडा.
06:01 Bookmark मेनूवर क्लिक करा.
06:04 Yahoo चा बुकमार्क Bookmark मेनूवर दिसेल.
06:08 Library विंडोतून बुकमार्क उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
06:15 आता Library विंडो बंद करू.
06:19 फायरफॉक्स बुकमार्कस सॉर्ट करण्याची सुविधा देते.
06:23 आता नावानुसार बुकमार्कस सॉर्ट करू
06:26 Menu तील View वर क्लिक करून Sidebar निवडा. नंतरBookmarks वर क्लिक करा.
06:32 डाव्या पॅनेलमधे Bookmarks चा साईडबार उघडेल.
06:37 पुन्हा Google.com बुकमार्क करू. <Pause>
06:42 Bookmarks साईडबारवरील Unsorted Bookmarks फोल्डर निवडून त्यावर राईट क्लिक करा.
06:48 Sort By Name निवडा.
06:51 बुकमार्कस नावाप्रमाणे सॉर्ट होतील.
06:54 स्वतःही बुकमार्कसचा क्रम बदलू शकतो.
06:57 Bookmarks Sidebar वरील Bookmarks Menu फोल्डरवर क्लिक करून तो उघडा.
07:03 पुढे Unsorted Bookmarks फोल्डरवर क्लिक करून तो उघडा.
07:08 Spoken Tutorial च्या बुकमार्कवर माऊसचा कर्सर न्या.
07:12 आता माऊसचे डावे बटण दाबा. आणि तो बुकमार्क ड्रॅग करून Bookmarks Sidebar मधील Ubuntu आणि Free Software ह्या फोल्डरपर्यंत न्या.
07:22 माऊसचे बटण सोडून द्या.
07:25 हा बुकमार्क Ubuntu आणि Free Software फोल्डरमधे स्थलांतरित झाला आहे.
07:30 Bookmarks Sidebar मधे केलेले बदल Bookmarks मेनूतही दिसतील.
07:35 आपण बुकमार्कस आपोआप सॉर्टही करू शकतो.
07:39 Menu बारवरील Bookmarks वर क्लिक करून Show all bookmarks निवडा.
07:45 उघडलेल्या Library विंडोमधील डाव्या पॅनेलवरील Unsorted bookmarks निवडा.
07:51 आता Views खालील Sort मधील Sort by Added वर क्लिक करा.
07:57 ज्या क्रमाने बुकमार्कस समाविष्ट केले त्या क्रमाने address सॉर्ट होतील. Close क्लिक करा.
08:04 शेवटी हे वेबपेज कसे प्रिंट करायचे ते पाहू.
08:08 प्रथम हे वेबपेज प्रिंट करण्यासाठी सेट करू.
08:12 Firefox च्या मेनूबारमधील File वर क्लिक करून Page Setup सिलेक्ट करा.
08:17 Page Setup डायलॉगबॉक्स उघडेल.
08:21 A4 हा Paper Size सिलेक्ट करा.
08:24 Orientation मधे Portrait निवडा.
08:28 Apply वर क्लिक करा.
08:30 लागू झालेली सेटींग्ज तपासण्यासाठी File क्लिक करून Print Preview निवडा.
08:36 पेज कसे प्रिंट होईल ते आपण पाहू शकतो.
08:40 यातून बाहेर पडण्यासाठी Closeक्लिक करा.
08:42 Firefox च्या मेनूबारमधील File वर क्लिक करून Print सिलेक्ट करा.
08:47 स्क्रीनवर Print डायलॉगबॉक्स उघडेल.
08:50 येथे General Tab मधीलGeneric Printer हा पर्याय निवडू.
08:55 पुढे Range फिल्डमधे All Pages निवडा.
09:01 Copies मधे 1 निवडू.
09:04 Options वर क्लिक करून Ignore Scaling and Shrink To Fit Page Width निवडा.
09:10 Printवर क्लिक करा.
09:12 प्रिंटर योग्य पध्दतीने configureकेला असल्यास प्रिंट करण्यास सुरूवात करेल.
09:17 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपण शिकलो,
09:23 Bookmarks. तसेच बुकमार्कस संघटित करणे, फायरफॉक्स पेज, प्रिव्ह्यू आणि प्रिंट सेटअप करणे.
09:32 असाईनमेंट.
09:35 Mozilla Firefox ची नवी विंडो उघडा.
09:38 पाच नव्या साईटस उघडा.
09:41 त्या बुकमार्क करा.
09:43 सर्व बुकमार्क नव्या फोल्डरमधे सेव्ह करा.
09:47 ते उतरत्या alphabeticalक्रमाने लावा.
09:51 बुकमार्क केलेल्या शेवटच्या साईटवर जा.
09:55 प्रिंट करण्यासाठी वेबपेज सेटअप करून प्रिंट करा.
09:58 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:15 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:37 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:40 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
10:47 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
10:52 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana