Firefox/C3/Bookmarks/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Mozilla Firefox मधील Organizing Bookmarks आणि Printing वरील पाठात स्वागत. |
00:07 | ह्या पाठात, Bookmarks बद्दल शिकू. |
00:11 | तसेच Bookmarks संघटित करणे, फायरफॉक्स पेज, प्रिव्ह्यू आणि प्रिंट सेटअप करणे जाणून घेऊ. |
00:18 | येथे आपण Ubuntu 10.04वरFirefox 7.0 वापरणार आहोत. |
00:26 | आता फायरफॉक्स ब्राउजर उघडू. |
00:29 | डिफॉल्ट रूपात yahoo चे होमपेज उघडेल. |
00:32 | वारंवार वापरल्या जाणा-या पेजेसवर जाण्यासाठी बुकमार्कसचा उपयोग होतो. |
00:37 | मागील पाठात Bookmarks बद्दल थोडक्यात जाणून घेतले होते. |
00:42 | येथे gmail साठीचा बुकमार्क समाविष्ट केला आहे. |
00:46 | gmail चे होमपेज उघडण्यासाठी ह्यावर क्लिक करा. |
00:50 | हे तुम्हास gmail होमपेज वर घेऊन जाईल. |
00:53 | Address बारमधील gmail च्या address च्या उजवीकडील पिवळी चांदणी दिसली का? |
00:59 | ही, सदर साईट बुकमार्क झाली असल्याचे दाखवते. |
01:03 | त्या चांदणीद्वारे बुकमार्कचे नाव बदलता येते तसेच ते दुस-या फोल्डरमधे संचित करता येते. |
01:09 | gmail चे नाव mygmailpage असे बदलून MyNewBookmarks या नव्या फोल्डरमधे संचित करु. |
01:18 | Address बारमधे पिवळ्या चांदणीवर क्लिक करा. |
01:22 | Edit This Bookmark हा डायलॉगबॉक्स उघडेल. |
01:25 | Name फिल्डमधे mygmailpage टाईप करा. |
01:29 | Folder च्या ड्रॉपडाऊन वर क्लिक करून Choose निवडा. |
01:34 | Bookmarks मेनू निवडून New Folder वर क्लिक करा. |
01:39 | New Folder तयार होईल. |
01:41 | फोल्डरचे नाव बदलून MyBookmarks करा. |
01:45 | Tags मधे email टाईप करा. |
01:49 | Tags द्वारे bookmarks चे वर्गीकरण होते . |
01:52 | एखाद्या बुकमार्कला अनेक टॅग्ज लावता येतात. |
01:55 | उदाहरणार्थ खरेदी संबंधित साईट बुकमार्क करताना, |
01:58 | तिला gifts, books किंवा toys असे tag देता येतील . |
02:03 | Done वर क्लिक करा. |
02:06 | किंवा 'CTRL D दाबु शकता. |
02:09 | पेज bookmark करण्यासाठी, |
02:12 | मेनूबारवरील Bookmarksवर क्लिक करा. |
02:16 | MyBookMarks फोल्डर Bookmarks मेनूत दिसेल. |
02:20 | cursor फोल्डरवर ठेवा. |
02:23 | mygmailpage हा बुकमार्क तिथे सेव्ह झालेला आहे. |
02:27 | Address बारमधे email असा tag टाईप करा |
02:31 | mygmailpage ही साईट सूचीमधे पहिला पर्याय म्हणून दाखवला जाईल. |
02:38 | आपण बुकमार्कचे नाव बदलले, दुस-या फोल्डरमधे सेव्ह केले आणि टॅगद्वारे शोधले. |
02:45 | आता www dot google dot com ही वेबसाईट बुकमार्क करू. <Pause> |
02:53 | < address बारमधे address निवडून तो डिलीट करा. |
02:56 | www dot google dot com टाईप करा. |
03:01 | Enter दाबा. |
03:03 | Address बारच्या उजव्या कोप-यातील चांदणीवर क्लिक करा. |
03:08 | google वेबसाईट बुकमार्क झाली आहे. |
03:12 | याच पध्दतीने Spoken Tutorial, Yahoo,Firefox Add-ons आणि Ubuntu ह्या आणखी चार साईटस् बुकमार्क करू. |
03:36 | हे बुकमार्कस फोल्डरमधे सेव्ह केलेले नाहीत. |
03:40 | एकदा बनवलेले बुकमार्क डिलीट कसे करू शकतो ? |
03:44 | Edit This Bookmark या डायलॉग बॉक्समधे Remove bookmark बटण आपण आधीच बघितले आहे. |
03:50 | www.google.com चा बुकमार्क डिलिट करू. |
03:55 | Address बारमधे www.google.com टाईप करून पिवळ्या चांदणीवर क्लिक करा. |
04:03 | Edit This Bookmark डायलॉग बॉक्स मधील Remove Bookmark वर क्लिक करा. |
04:09 | Menu बार वरील Bookmarks आणि MyBookmarks वर क्लिक करा. |
04:14 | google चा बुकमार्क आपल्याला Bookmark मेनूमधे दिसणार नाही. |
04:19 | बनवलेले बुकमार्क access कसे करता येतात? |
04:23 | आपण हे अनेक प्रकारे करू शकतो. |
04:26 | बुकमार्क केलेली जी साईट access करायची आहे तिचे नाव Address bar मधे टाईप करा.. |
04:33 | Address bar वर क्लिक करा. तेथील address सिलेक्ट करून तो डिलीट करा. |
04:39 | Address bar मधे G टाईप करा. |
04:43 | अक्षराने सुरू होणा-या वेबसाईटची सूची दिसेल. |
04:49 | ह्या साईटस आपण बुकमार्क, टॅग केलेल्या आणि भेट दिलेल्या आहेत. |
04:55 | Library विंडोमधे बुकमार्कस बघता येतात आणि त्यांचा क्रम लावता येतो. |
05:00 | Menu वरील Bookmarks वर क्लिक करून Show All Bookmarks निवडा. |
05:06 | Library विंडो उघडेल. |
05:09 | डिफॉल्ट रूपात बनवलेले सर्व बुकमार्क्स Unsorted Bookmarks फोल्डरमधे सेव्ह होतात. |
05:16 | Yahoo, Spoken Tutorial, Ubuntu, FireFox Add-on बुकमार्क्सची यादी येथे दिसत आहे. |
05:24 | Bookmarks मेनूमधे Yahoo India हा बुकमार्क समाविष्ट करू. |
05:29 | प्रथम स्क्रीनच्या मध्यभागी Library विंडो न्या. |
05:34 | आता Menu बार आणि पर्याय नीट दिसू शकतील. |
05:39 | Unsorted Bookmarks फोल्डरमधील Yahoo चा बुकमार्क निवडा. |
05:43 | माऊसचे डावे बटण दाबा आणि तो बुकमार्क Bookmarks मेनूवर ड्रॅग करा. |
05:49 | कर्सर Bookmarks मेनूवर असल्याची खात्री करा. |
05:53 | Bookmark मेनू विस्तारेल. |
05:56 | माऊसचा पॉईंटर मेनूवर नेऊन त्याचे डावे बटण सोडा. |
06:01 | Bookmark मेनूवर क्लिक करा. |
06:04 | Yahoo चा बुकमार्क Bookmark मेनूवर दिसेल. |
06:08 | Library विंडोतून बुकमार्क उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. |
06:15 | आता Library विंडो बंद करू. |
06:19 | फायरफॉक्स बुकमार्कस सॉर्ट करण्याची सुविधा देते. |
06:23 | आता नावानुसार बुकमार्कस सॉर्ट करू |
06:26 | Menu तील View वर क्लिक करून Sidebar निवडा. नंतरBookmarks वर क्लिक करा. |
06:32 | डाव्या पॅनेलमधे Bookmarks चा साईडबार उघडेल. |
06:37 | पुन्हा Google.com बुकमार्क करू. <Pause> |
06:42 | Bookmarks साईडबारवरील Unsorted Bookmarks फोल्डर निवडून त्यावर राईट क्लिक करा. |
06:48 | Sort By Name निवडा. |
06:51 | बुकमार्कस नावाप्रमाणे सॉर्ट होतील. |
06:54 | स्वतःही बुकमार्कसचा क्रम बदलू शकतो. |
06:57 | Bookmarks Sidebar वरील Bookmarks Menu फोल्डरवर क्लिक करून तो उघडा. |
07:03 | पुढे Unsorted Bookmarks फोल्डरवर क्लिक करून तो उघडा. |
07:08 | Spoken Tutorial च्या बुकमार्कवर माऊसचा कर्सर न्या. |
07:12 | आता माऊसचे डावे बटण दाबा. आणि तो बुकमार्क ड्रॅग करून Bookmarks Sidebar मधील Ubuntu आणि Free Software ह्या फोल्डरपर्यंत न्या. |
07:22 | माऊसचे बटण सोडून द्या. |
07:25 | हा बुकमार्क Ubuntu आणि Free Software फोल्डरमधे स्थलांतरित झाला आहे. |
07:30 | Bookmarks Sidebar मधे केलेले बदल Bookmarks मेनूतही दिसतील. |
07:35 | आपण बुकमार्कस आपोआप सॉर्टही करू शकतो. |
07:39 | Menu बारवरील Bookmarks वर क्लिक करून Show all bookmarks निवडा. |
07:45 | उघडलेल्या Library विंडोमधील डाव्या पॅनेलवरील Unsorted bookmarks निवडा. |
07:51 | आता Views खालील Sort मधील Sort by Added वर क्लिक करा. |
07:57 | ज्या क्रमाने बुकमार्कस समाविष्ट केले त्या क्रमाने address सॉर्ट होतील. Close क्लिक करा. |
08:04 | शेवटी हे वेबपेज कसे प्रिंट करायचे ते पाहू. |
08:08 | प्रथम हे वेबपेज प्रिंट करण्यासाठी सेट करू. |
08:12 | Firefox च्या मेनूबारमधील File वर क्लिक करून Page Setup सिलेक्ट करा. |
08:17 | Page Setup डायलॉगबॉक्स उघडेल. |
08:21 | A4 हा Paper Size सिलेक्ट करा. |
08:24 | Orientation मधे Portrait निवडा. |
08:28 | Apply वर क्लिक करा. |
08:30 | लागू झालेली सेटींग्ज तपासण्यासाठी File क्लिक करून Print Preview निवडा. |
08:36 | पेज कसे प्रिंट होईल ते आपण पाहू शकतो. |
08:40 | यातून बाहेर पडण्यासाठी Closeक्लिक करा. |
08:42 | Firefox च्या मेनूबारमधील File वर क्लिक करून Print सिलेक्ट करा. |
08:47 | स्क्रीनवर Print डायलॉगबॉक्स उघडेल. |
08:50 | येथे General Tab मधीलGeneric Printer हा पर्याय निवडू. |
08:55 | पुढे Range फिल्डमधे All Pages निवडा. |
09:01 | Copies मधे 1 निवडू. |
09:04 | Options वर क्लिक करून Ignore Scaling and Shrink To Fit Page Width निवडा. |
09:10 | Printवर क्लिक करा. |
09:12 | प्रिंटर योग्य पध्दतीने configureकेला असल्यास प्रिंट करण्यास सुरूवात करेल. |
09:17 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपण शिकलो, |
09:23 | Bookmarks. तसेच बुकमार्कस संघटित करणे, फायरफॉक्स पेज, प्रिव्ह्यू आणि प्रिंट सेटअप करणे. |
09:32 | असाईनमेंट. |
09:35 | Mozilla Firefox ची नवी विंडो उघडा. |
09:38 | पाच नव्या साईटस उघडा. |
09:41 | त्या बुकमार्क करा. |
09:43 | सर्व बुकमार्क नव्या फोल्डरमधे सेव्ह करा. |
09:47 | ते उतरत्या alphabeticalक्रमाने लावा. |
09:51 | बुकमार्क केलेल्या शेवटच्या साईटवर जा. |
09:55 | प्रिंट करण्यासाठी वेबपेज सेटअप करून प्रिंट करा. |
09:58 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:02 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:05 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:10 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:15 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:18 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:25 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:29 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:37 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:40 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
10:47 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
10:52 | सहभागासाठी धन्यवाद. |