Filezilla/C2/Introduction-to-Filezilla/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 FileZilla चा परिचय यावरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअल मध्ये आपण FileZilla बद्दल शिकूया.
00:13 FileZilla चे वैशिष्ट्य
00:16 FileZilla कसे इन्स्टॉल करणे.
00:19 FileZilla इंटरफेस
00:22 FileZilla वापरून फाइली अपलोड व डाउनलोड करणे
00:27 FileZilla काय आहे?
00:30 हे एक Free आणि Open Source Software आहे.
00:34 नेटवर्कवर फाइली आणि फोल्डर शेयर करण्यासाठी वापरले जाते.
00:39 हे वापरण्यास सोपे आहे.
00:42 सर्व operating systems वर कार्य करते.
00:46 FileZilla चे वैशिष्ट्य.
00:49 FTP, FTP over FTPs, SSH आणि IPv6 ला समर्थन देते.
00:59 सोप्यापद्धतीने फाइल ट्रान्सफर करण्यासाठी drag and drop ला समर्थन देते.
01:04 फाइल नेम फिल्टर्सची सुविधा आहे - वापरकर्ते त्या विशिष्ट फायली फिल्टर करू शकतात, जी त्यांच्या अटी पूर्ण करतात.
01:13 स्थानिक आणि दुरुस्थ डिरेक्टरीजची तुलना करण्यासाठी Directory comparison. (डियरेक्टरी तुलना)
01:19 Bookmarks ला समर्थन करते.
01:22 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS व्हर्जन 14.04 वापरत आहे.
01:30 FileZilla व्हर्जन 3.10.2
01:35 आणि चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन.
01:38 या ट्युटोरियलचा सराव करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही एका ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
01:45 Linux OS बद्दल जाणून घेण्यासाठी, कृपया या वेबसाईट वरील Linux spoken tutorials पहा.
01:53 Ubuntu Linux OS वर खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा उपयोग करून FileZilla इन्स्टॉल केली जाऊ शकते.
02:02 Ubuntu Software Centre किंवा Synaptic Package manager वर जा, 'FileZilla ' ला शोधा आणि इन्स्टॉल करा.
02:12 किंवा Terminal मध्ये “sudo apt-get install FileZilla” टाईप करा आणि Enter दाबा.
02:22 कोणत्याही OS(ऑपरेटिंग सिस्टिम) वर FileZilla इन्स्टॉल करण्याची दुसरी पद्धत आहे कि, https://filezilla-project.org वर जा.
02:36 त्या विशिष्ट ओएस साठी FileZilla Client डाउनलोड करा.
02:41 windows OS वर, डाउनलोड केलेल्या setup file वर डबल क्लीक करा आणि इन्स्टॉल करा.
02:48 मी आधीच माझ्या Linux मशीनवर इंस्टॉलेशन केले आहे.
02:53 आपण FileZilla उघडू.
02:56 Ubuntu Linux मध्ये, तुमच्या Desktop वरील डाव्या कोपऱ्यात, Dash Home वर क्लीक करा.
03:04 Search बॉक्स मध्ये, FileZilla टाईप करा.
03:08 तुम्ही FileZilla आइकन पाहू शकता. उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
03:16 Windows मध्ये, Start Menu वर क्लिक करा आणि FileZilla शोधा.
03:23 या सूचित, FileZilla उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
03:27 अन्यथा, जर तुमच्याकडे Desktop वर FileZilla shortcut icon आहे, तर फक्त त्यावर डबल क्लिक करा.
03:36 अशा प्रकारे FileZilla इंटरफेस दिसतो.
03:41 यात - वरती Menu bar आहे.
03:45 Shortcut icons bar सामान्यतः menu आइटम्सच्या वापरासाठी
03:50 Quick Connect Bar
03:52 Details pane
03:54 Local Site pane
03:56 Remote Site pane
03:58 Status Pane
04:00 Quick Connect bar मध्ये निम्न साठी फिल्ड्स आहे,
04:04 Host – ज्यात आपण रिमोट लोकेशन आईपी किंवा साईट ऍड्रेसचा host तपशील प्रविष्ट करूया.
04:12 Username – जिथे आपल्याला host चे युजरनेम द्यायचे आहे.
04:18 Passwordhost user साठी पासवर्ड फिल्ड.
04:23 Port - संवादासाठी प्रोटोकॉल प्रकार
04:28 Quick Connect button – रिमोट लोकेशनशी कनेक्ट करण्यासाठी.
04:33 A drop Down – यात पूर्वीपासून कनेक्ट झालेल्या लोकेशनची सूची असते.
04:39 Details pane मध्ये रिमोट मशीनवर कनेक्टिव्हिटी, तांत्रिक तपशील आणि कार्यान्वित कमांडस आहेत.
04:47 Local Site pane हे आमच्या सिस्टिमची फाईल स्ट्रक्चर दाखवते.
04:53 Remote Site pane कनेक्ट केलेल्या रिमोट सिस्टमचे फाइल स्ट्रक्चर प्रदर्शित करते.
05:00 हे दोन्ही, फाइल्स आणि फोल्डर्सना ब्राउज करणे आणि लॉकेट करण्यात आपली मदत करतील.
05:05 Status Pane, file transfer status दाखवते.
05:11 त्यामध्ये ३ टॅब्ज आहेत: Queued files – फाइल्सच्या सूची दाखवते, ज्या ट्रान्सफरसाठी क्यू मध्ये आहे.
05:21 Failed Transfer – त्या फाइल्सची सूची दाखवतो, ज्यांचे ट्रान्सफर अयशस्वी झाले.
05:28 Successful Transfer – त्या फाईल्स दाखवतो, ज्यांचे ट्रान्सफर यशस्वीरित्या झाल्या आहेत.
05:35 पुढे आपण रिमोट सिस्टीमशी कसे कनेक्ट करणे आणि त्यामध्ये कोणतीही फाईल कशी ट्रान्सफर करायची ते पाहणार आहोत.
05:42 Host बॉक्स मध्ये, मी remote machine's IP address टाईप करेल.
05:49 तुम्ही त्या मशीनचा IP address देऊ शकता, ज्यात तुम्हाला ऍक्सेस करायचे आहे.
05:55 त्यानंतर रिमोट मशीनसाठी username & password एंटर करा.
06:01 port 22 असे टाईप करा.
06:04 आणि Quick Connect वर क्लिक करा.
06:07 तुम्हाला एक मेसेज(संदेश) मिळेल - Unknown host key.
06:12 चेकबॉक्स वर क्लिक करा: Always trust this host, add this key to the cache आणि Ok बटणवर क्लिक करा.
06:23 Details pane मध्ये एक यशस्वीरीत्या मेसेज दिसून येतो.
06:28 हे पुष्टी करते की रिमोट मशीन आणि आपले मशीन नेटवर्कशी कनेक्ट झाले (जोडलेले) आहे.
06:35 जर मशीन कनेक्ट होत नसेल तर, नंतर connection failed मेसेज येतो.
06:41 आता आपल्या मशीन मधून रिमोट मशीन मध्ये एक फाइल ट्रांसफर करू.
06:47 असे करण्यासाठी, प्रथम ती फाइल ब्राउज करा, जी तुम्हाला Local Site pane मध्ये ट्रांसफर करायची आहे.
06:55 मी माझ्या मशीनवर Desktop फोल्डर वर जाईल आणि sample.pdf निवडेल.
07:03 नंतर फाइल वर राईट-क्लिक करा आणि Upload निवडा.
07:08 Status pane मध्ये, तुम्ही file transfer status पाहू शकता.
07:13 आपल्या नेटवर्क गतीवर आधारीत, यास काही वेळ लागू शकतो.
07:18 एकदा ट्रांसफर पूर्ण झाल्यानंतर, प्रोग्रेस बार Queued files टॅबमधून अदृश्य होईल.
07:26 Successful transfer टॅब वर क्लिक करा. येथे आमची एन्ट्री आहे.
07:31 Status pane दर्शवते की फाइल ट्रांसफर झाली आहे.
07:35 आता कोणत्या लोकेशन मध्ये फाइल ट्रांसफर झाली आहे ते पाहूया.
07:40 डिफॉल्ट रूपात, फाइली त्या लोकेशन मध्ये ट्रांसफर होतील, जे Remote Site pane मध्ये उघडल्या जातील.
07:48 येथे आपली फाइल sample.pdf आहे.
07:52 जर हे प्रदर्शित नसेल तर, Shortcut icons bar मध्ये जा आणि Refresh बटण वर क्लिक करा.
07:59 पुढे आपण आपल्या फाइल्स किंवा फोल्डर एका विशिष्ट लोकेशनवर कसे अपलोड करावे ते शिकू
08:07 Remote Site pane मध्ये, मी Desktop फोल्डरसाठी ब्राउज करेल.
08:13 त्यानंतर Desktop फोल्डर मध्ये, राईट-क्लिक करा आणि Create directory निवडा.
08:20 एक विंडो उघडेल.
08:22 मी SpokenTutorial म्हणून डायरेक्टरीला नाव देईल आणि Ok बटण वर क्लिक करेल.
08:29 Desktop वर, तुम्ही पाहू शकता कि SpokenTutorial फोल्डर तयार झाले आहे.
08:36 आता यात काही फाइल अपलोड करू.
08:40 माझ्या Desktop वर, intro.ogv नावाची माझी एक फाइल आहे.
08:46 आपण हि फाइल अपलोड करू.
08:49 फाइलवर क्लिक करा. Remote Site pane मध्ये SpokenTutorial मध्ये ही फाइल ड्रॅग करा आणि ड्रॉप करा.
08:58 आम्ही ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत किंवा राईट-क्लिक करून नंतर Upload निवडून फाईली आणि फोल्डर्सना अपलोड करू शकता.
09:08 येथे लक्ष द्या - SpokenTutorial फोल्डरमध्ये intro.ogv फाइल अपलोड केली आहे.
09:16 आता रिमोट मशीनमधून फाइल किंवा फोल्डर डाउनलोड करणे शिकूया.
09:22 असे करण्यासाठी, Remote pane मधून फाइल लोकल मशीन मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
09:29 अन्यथा, राईट-क्लिक करा आणि Download निवडा.
09:34 आता, SpokenTutorial नामक फोल्डर रिमोट मशीन मधून आपल्या लोकल मशीन मध्ये डाउनलोड झाले आहे.
09:43 तसेच, आपण आपल्या मशीनवरून कोणत्याही रिमोट मशीनमध्ये सहजपणे फाईली अपलोड किंवा डाउनलोड करू शकता.
09:51 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
09:57 या ट्युटोरिअलमध्ये, आपण FileZilla बद्दल शिकलो.
10:02 FileZilla चे वैशिष्ट्य
10:05 FileZilla कसे इन्स्टॉल करणे.'
10:08 FileZilla इंटरफेस
10:10 FileZilla वापरून फाइली अपलोड व डाउनलोड करणे.
10:15 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
10:24 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
10:35 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का??? कृपया या साईटला भेट द्या.
10:40 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.

10:48 आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
10:53 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:02 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:08 या ट्युटोरिअलचे भाषांतर आणि आवाज मी रंजना उके ने दिला असून आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana