Biogas-Plant/C2/Finance-options-for-Biogas-plant/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय यावरील पाठात आपले स्वागत. |
00:10 | आधीच्या भागात आपण बायोगॅस बद्दल आणि बायोगॅस संयंत्र असण्याचे फायदे जाणून घेतले होते. |
00:18 | या पाठात बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी लागणा-या कर्जासाठीचा अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊ. |
00:29 | बायोगॅस संयंत्र तुम्ही स्वखर्चाने किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारू शकता. |
00:40 | कर्जप्राप्तीसाठी आवश्यक पूर्वतयारी. |
00:47 | कर्जाच्या अर्जासोबत जोडावयाच्या दस्ताऐवजांची यादी. |
00:55 | संयंत्र उभारणीतील घटकांवरील खर्च. |
01:00 | खर्चाच्या अंदाजपत्रकातील सर्वसाधारण विभाजन |
01:05 | आणि बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली अनुदाने. |
01:16 | सुरूवात करण्यापूर्वी बायोगॅस संयंत्र तुम्ही स्वखर्चाने किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारू शकता हे माहित असणे आवश्यक आहे. |
01:29 | तसेच बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी खर्चाच्या अंदाजपत्रकाची माहिती असणे गरजेचे आहे. |
01:38 | बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी अंदाजे २०,०००/- ते २३,०००/- एवढा खर्च होतो. |
01:50 | बायोगॅस संयंत्र उभारणीची पहिली पायरी म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या संबंधित जिल्हा कार्यालयांना भेट देणे. |
02:04 | हे कार्यालय KVIC या नावानेही ओळखले जाते. |
02:08 | प्रत्येक KVIC ला ग्रामीण उर्जा तंत्र विभाग आहे. |
02:14 | उल्लेख केलेल्या विभागातील ग्रामीण उर्जा तंत्रज्ञाला म्हणजेच RET ला भेटा. |
02:22 | नियोजित बायोगॅस संयंत्र साईटला भेट देण्याची RET ला विनंती करा. |
02:29 | पुढे, RET प्रकल्पाला भेट देऊन कर्ज मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींचे निरीक्षण करेल. |
02:38 | कर्ज मिळण्यासाठीच्या आवश्यक गोष्टींची यादी अशाप्रकारे आहेः |
02:45 | जागेची उपलब्धता. उदाहरणार्थ १२ फूट बाय ८ फुटाचा बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी १२ फूट बाय १६ फुटाची जागा आवश्यक आहे. |
03:00 | बायोगॅस संयंत्राला दररोज देण्यासाठी पुरेसा पाणी पुरवठा. |
03:06 | गाईचे शेण आणि/किंवा विघटन होणा-या (म्हणजेच बायो-डिग्रेडेबल) कच-याच्या स्वरूपातील घनकच-याचे सरासरी प्रमाण. |
03:17 | कृपया लक्षात घ्या, संयंत्रातील कच-याचे प्रमाण हे संयंत्राच्या आकाराच्या प्रमाणात असते. |
03:26 | उदाहरणार्थ १२ फूट बाय ८ फूटाच्या बायोगॅस संयंत्रासाठी २५ किलो घनकचरा आणि २५ लिटर पाणी आवश्यक असते. |
03:41 | RET गाई गुरांची संख्या आणि त्यांचे वय देखील तपासतात. |
03:47 | उदाहरणार्थ २ घनमीटर बायोगॅस संयंत्रासाठी सरासरी १२ किलो शेण उत्पादित करणा-या कमीत कमी दोन गाईंची आवश्यकता असते. |
04:03 | ही तपासणी बायोगॅस संयंत्रासाठी २५ किलो शेणाच्या पुरवठ्याची खात्री करण्यासाठी आहे. |
04:13 | शेवटी, RET अर्जदाराचे बँक खाते/किंवा कर्ज खाते यांची तपासणी करेल. |
04:23 | जर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाली तर RET तांत्रिक व्यवहार्यता प्रमाणपत्र जारी करतो. |
04:33 | एकदा तांत्रिक व्यवहार्यता प्रमाणपत्र प्राप्त झाले की कर्जासाठी जवळच्या बँकेला भेट द्या. |
04:43 | तुम्ही खाजगी बँकांकडे जाऊ शकता जसे की- आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आणि युनियन बँक ऑफ इंडिया |
04:57 | सहकारी बँका जसे की- सारस्वत बँक, डोंबिवली नगरी सहकारी बँक, साऊथ कॅनरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (जी SCDCC नावानेही ओळखली जाते) |
05:15 | विविध राज्यातील ग्रामीण बँका आणि |
05:19 | डेव्हलटमेंट क्रेडिट बँक (जी DCB नावानेही ओळखली जाते)इत्यादी. |
05:27 | आता बँकेकडून एखाद्याला किती रकमेचे कर्ज मिळू शकते? |
05:33 | बँकेकडून तुम्हाला १००% कर्ज उपलब्ध होऊ शकते हे समजल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. |
05:42 | तथापि बँकानुसार खालील गोष्टींमधे बदल होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. |
05:50 | कर्जाची रक्कम, मंजूरीचा कालावधी, कर्जावरील व्याज आणि कर्जाची परतफेड |
06:01 | कर्जाच्या औपचारिकतेची सुरूवात विविध फॉर्म भरण्यापासून होते जसे की ‘कर्जाच्या अर्जाचा फॉर्म’. |
06:11 | RET ऑफिसर तुम्हाला फॉर्म भरायला मदत करेल. |
06:18 | येथे दाखविल्याप्रमाणे- अर्जात खालील तपशील भरलेला असायला हवा. |
06:26 | कर्जाचे कारण म्हणजेच कर्ज कशासाठी हवे |
06:30 | अर्जदाराचे नाव आणि पत्ता |
06:35 | संबंधित गावात किती सालापासून रहिवासी |
06:44 | कामाचे स्वरूप |
06:47 | वय आणि लिंग |
06:51 | गट-SC/ST/OBC आणि अशा प्रकारचा इतर तपशील |
07:02 | आता मी अर्जामधे आवश्यक तो तपशील भरणार आहे. |
07:11 | भरलेला अर्ज अशाप्रकारे दिसेल. |
07:16 | कर्जाच्या अर्जासोबत जोडावे लागणारे इतर दस्ताऐवज - |
07:25 | तांत्रिक व्यवहार्यता प्रमाणपत्र |
07:29 | जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे |
07:33 | शिधापत्रिकेची छायाप्रत आणि |
07:39 | वार्षिक उत्पन्नाचा दाखला |
07:42 | अर्ज भरून झाल्यावर तो बँक अधिका-याकडे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक असते. |
07:53 | आपल्याला शाखा व्यवस्थापक किंवा निरीक्षक अधिका-याचा संदर्भ आणि कर्ज मंजूरी प्राप्त होईल. |
08:03 | संयंत्र उभारणीतील खर्चाच्या घटकांबद्दल चर्चा करू या- |
08:10 | संयंत्र निर्मितीचा खर्च या घटकांवर अवलंबून असतो- कच्च्या मालाचा खर्च, गवंड्यांचे शुल्क, हार्डवेअरच्या दुकानापासून प्रकल्पाच्या ठिकाणापर्यंत होणारा वाहतूक खर्च. |
08:29 | गवंड्याच्या शुल्काबरोबरच कच्चा माल आणि वाहतूकीच्या खर्चात प्रदेशानुसार बदल होऊ शकतो. |
08:42 | खर्चाच्या अंदाजपत्रकाची विभागणी अशा प्रकारे असेलः |
08:48 | अंदाजे ४,०००/- रू. गवंडी आणि त्याच्या कामगारांसाठी |
08:55 | अंदाजे १,३००/- रू. बायोगॅस बर्नर शेगडीसाठी |
09:03 | अंदाजे १५०००/- रू. कच्च्या मालासाठी आणि |
09:10 | अंदाजे २,०००/- रू हार्डवेअरच्या दुकानापासून ते प्रकल्पापर्यंतच्या वाहतुकीचा खर्च. |
09:20 | बायोगॅस संयंत्र उभारण्याची योजना करत असलेल्यांसाठी एक चांगली बातमी - भारत सरकार बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी अनुदान देते. |
09:34 | अर्जदारांना दिले जाणारे अनुदान अशाप्रकारे आहेः ९,०००/- रू. सर्वसाधारण गटासाठी, ११,०००/- रू. SC/ST गटासाठी, १७,०००/- रू. उत्तर पूर्वीय राज्यांसाठी |
09:56 | बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडलेले असल्यास १,२००/- रू चे अतिरिक्त अनुदान मिळते. |
10:07 | अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बायोगॅस संयंत्र उभा राहिल्यावर एक अर्ज भरणे आवश्यक असते. |
10:15 | हा अर्ज स्थानिक ग्राम पंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असतो. |
10:22 | आता मी अर्जातील आवश्यक तपशील भरणार आहे. |
10:27 | भरलेला अनुदानाचा अर्ज अशाप्रकारे दिसेल. |
10:33 | कृपया याची नोंद घ्यावी की बायोगॅस संयंत्राचे पुरेसे पुरावे सादर केल्यावरच अनुदान मंजूर केले जाते. जसे की, |
10:45 | बायोगॅस संयंत्राचे तांत्रिक व्यवहार्यता प्रमाणपत्र आणि |
10:51 | बायोगॅस संयंत्रासोबत अर्जदाराचे छायचित्र. |
10:57 | बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी बँकांव्यतिरिक्त शेतक-यांचे गट देखील आर्थिक मदत करू शकतात. |
11:06 | देशातल्या विविध राज्यातील स्थित कार्यालयांसाठी दिलेली ही लिंक बघा- |
11:16 | या पाठात शिकलो ते थोडक्यातः |
11:23 | बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी लागणा-या कर्जासाठी अर्ज करणे. |
11:30 | बायोगॅस संयंत्र तुम्ही स्वखर्चाने किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारू शकता. |
11:42 | कर्जप्राप्तीसाठी आवश्यक पूर्वतयारी. |
11:49 | तसेच आपण हे सुद्धा शिकलो, |
11:52 | कर्जाच्या अर्जासोबत जोडावयाच्या दस्ताऐवजांची यादी. |
12:00 | संयंत्र उभारणीतील घटकांवरील खर्च. |
12:06 | खर्चाच्या अंदाजपत्रकातील सर्वसाधारण तपशील. |
12:12 | आणि बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली अनुदाने. |
12:23 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे. |
12:35 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:43 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |