Biogas-Plant/C2/Finance-options-for-Biogas-plant/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय यावरील पाठात आपले स्वागत.
00:10 आधीच्या भागात आपण बायोगॅस बद्दल आणि बायोगॅस संयंत्र असण्याचे फायदे जाणून घेतले होते.
00:18 या पाठात बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी लागणा-या कर्जासाठीचा अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊ.
00:29 बायोगॅस संयंत्र तुम्ही स्वखर्चाने किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारू शकता.
00:40 कर्जप्राप्तीसाठी आवश्यक पूर्वतयारी.
00:47 कर्जाच्या अर्जासोबत जोडावयाच्या दस्ताऐवजांची यादी.
00:55 संयंत्र उभारणीतील घटकांवरील खर्च.
01:00 खर्चाच्या अंदाजपत्रकातील सर्वसाधारण विभाजन
01:05 आणि बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली अनुदाने.
01:16 सुरूवात करण्यापूर्वी बायोगॅस संयंत्र तुम्ही स्वखर्चाने किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारू शकता हे माहित असणे आवश्यक आहे.
01:29 तसेच बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी खर्चाच्या अंदाजपत्रकाची माहिती असणे गरजेचे आहे.
01:38 बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी अंदाजे २०,०००/- ते २३,०००/- एवढा खर्च होतो.
01:50 बायोगॅस संयंत्र उभारणीची पहिली पायरी म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या संबंधित जिल्हा कार्यालयांना भेट देणे.
02:04 हे कार्यालय KVIC या नावानेही ओळखले जाते.
02:08 प्रत्येक KVIC ला ग्रामीण उर्जा तंत्र विभाग आहे.
02:14 उल्लेख केलेल्या विभागातील ग्रामीण उर्जा तंत्रज्ञाला म्हणजेच RET ला भेटा.
02:22 नियोजित बायोगॅस संयंत्र साईटला भेट देण्याची RET ला विनंती करा.
02:29 पुढे, RET प्रकल्पाला भेट देऊन कर्ज मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींचे निरीक्षण करेल.
02:38 कर्ज मिळण्यासाठीच्या आवश्यक गोष्टींची यादी अशाप्रकारे आहेः
02:45 जागेची उपलब्धता. उदाहरणार्थ १२ फूट बाय ८ फुटाचा बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी १२ फूट बाय १६ फुटाची जागा आवश्यक आहे.
03:00 बायोगॅस संयंत्राला दररोज देण्यासाठी पुरेसा पाणी पुरवठा.
03:06 गाईचे शेण आणि/किंवा विघटन होणा-या (म्हणजेच बायो-डिग्रेडेबल) कच-याच्या स्वरूपातील घनकच-याचे सरासरी प्रमाण.
03:17 कृपया लक्षात घ्या, संयंत्रातील कच-याचे प्रमाण हे संयंत्राच्या आकाराच्या प्रमाणात असते.
03:26 उदाहरणार्थ १२ फूट बाय ८ फूटाच्या बायोगॅस संयंत्रासाठी २५ किलो घनकचरा आणि २५ लिटर पाणी आवश्यक असते.
03:41 RET गाई गुरांची संख्या आणि त्यांचे वय देखील तपासतात.
03:47 उदाहरणार्थ २ घनमीटर बायोगॅस संयंत्रासाठी सरासरी १२ किलो शेण उत्पादित करणा-या कमीत कमी दोन गाईंची आवश्यकता असते.
04:03 ही तपासणी बायोगॅस संयंत्रासाठी २५ किलो शेणाच्या पुरवठ्याची खात्री करण्यासाठी आहे.
04:13 शेवटी, RET अर्जदाराचे बँक खाते/किंवा कर्ज खाते यांची तपासणी करेल.
04:23 जर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाली तर RET तांत्रिक व्यवहार्यता प्रमाणपत्र जारी करतो.
04:33 एकदा तांत्रिक व्यवहार्यता प्रमाणपत्र प्राप्त झाले की कर्जासाठी जवळच्या बँकेला भेट द्या.
04:43 तुम्ही खाजगी बँकांकडे जाऊ शकता जसे की- आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आणि युनियन बँक ऑफ इंडिया
04:57 सहकारी बँका जसे की- सारस्वत बँक, डोंबिवली नगरी सहकारी बँक, साऊथ कॅनरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (जी SCDCC नावानेही ओळखली जाते)
05:15 विविध राज्यातील ग्रामीण बँका आणि
05:19 डेव्हलटमेंट क्रेडिट बँक (जी DCB नावानेही ओळखली जाते)इत्यादी.
05:27 आता बँकेकडून एखाद्याला किती रकमेचे कर्ज मिळू शकते?
05:33 बँकेकडून तुम्हाला १००% कर्ज उपलब्ध होऊ शकते हे समजल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
05:42 तथापि बँकानुसार खालील गोष्टींमधे बदल होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे.
05:50 कर्जाची रक्कम, मंजूरीचा कालावधी, कर्जावरील व्याज आणि कर्जाची परतफेड
06:01 कर्जाच्या औपचारिकतेची सुरूवात विविध फॉर्म भरण्यापासून होते जसे की ‘कर्जाच्या अर्जाचा फॉर्म’.
06:11 RET ऑफिसर तुम्हाला फॉर्म भरायला मदत करेल.
06:18 येथे दाखविल्याप्रमाणे- अर्जात खालील तपशील भरलेला असायला हवा.
06:26 कर्जाचे कारण म्हणजेच कर्ज कशासाठी हवे
06:30 अर्जदाराचे नाव आणि पत्ता
06:35 संबंधित गावात किती सालापासून रहिवासी
06:44 कामाचे स्वरूप
06:47 वय आणि लिंग
06:51 गट-SC/ST/OBC आणि अशा प्रकारचा इतर तपशील
07:02 आता मी अर्जामधे आवश्यक तो तपशील भरणार आहे.
07:11 भरलेला अर्ज अशाप्रकारे दिसेल.
07:16 कर्जाच्या अर्जासोबत जोडावे लागणारे इतर दस्ताऐवज -
07:25 तांत्रिक व्यवहार्यता प्रमाणपत्र
07:29 जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे
07:33 शिधापत्रिकेची छायाप्रत आणि
07:39 वार्षिक उत्पन्नाचा दाखला
07:42 अर्ज भरून झाल्यावर तो बँक अधिका-याकडे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक असते.
07:53 आपल्याला शाखा व्यवस्थापक किंवा निरीक्षक अधिका-याचा संदर्भ आणि कर्ज मंजूरी प्राप्त होईल.
08:03 संयंत्र उभारणीतील खर्चाच्या घटकांबद्दल चर्चा करू या-
08:10 संयंत्र निर्मितीचा खर्च या घटकांवर अवलंबून असतो- कच्च्या मालाचा खर्च, गवंड्यांचे शुल्क, हार्डवेअरच्या दुकानापासून प्रकल्पाच्या ठिकाणापर्यंत होणारा वाहतूक खर्च.
08:29 गवंड्याच्या शुल्काबरोबरच कच्चा माल आणि वाहतूकीच्या खर्चात प्रदेशानुसार बदल होऊ शकतो.
08:42 खर्चाच्या अंदाजपत्रकाची विभागणी अशा प्रकारे असेलः
08:48 अंदाजे ४,०००/- रू. गवंडी आणि त्याच्या कामगारांसाठी
08:55 अंदाजे १,३००/- रू. बायोगॅस बर्नर शेगडीसाठी
09:03 अंदाजे १५०००/- रू. कच्च्या मालासाठी आणि
09:10 अंदाजे २,०००/- रू हार्डवेअरच्या दुकानापासून ते प्रकल्पापर्यंतच्या वाहतुकीचा खर्च.
09:20 बायोगॅस संयंत्र उभारण्याची योजना करत असलेल्यांसाठी एक चांगली बातमी - भारत सरकार बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी अनुदान देते.
09:34 अर्जदारांना दिले जाणारे अनुदान अशाप्रकारे आहेः ९,०००/- रू. सर्वसाधारण गटासाठी, ११,०००/- रू. SC/ST गटासाठी, १७,०००/- रू. उत्तर पूर्वीय राज्यांसाठी
09:56 बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडलेले असल्यास १,२००/- रू चे अतिरिक्त अनुदान मिळते.
10:07 अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बायोगॅस संयंत्र उभा राहिल्यावर एक अर्ज भरणे आवश्यक असते.
10:15 हा अर्ज स्थानिक ग्राम पंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असतो.
10:22 आता मी अर्जातील आवश्यक तपशील भरणार आहे.
10:27 भरलेला अनुदानाचा अर्ज अशाप्रकारे दिसेल.
10:33 कृपया याची नोंद घ्यावी की बायोगॅस संयंत्राचे पुरेसे पुरावे सादर केल्यावरच अनुदान मंजूर केले जाते. जसे की,
10:45 बायोगॅस संयंत्राचे तांत्रिक व्यवहार्यता प्रमाणपत्र आणि
10:51 बायोगॅस संयंत्रासोबत अर्जदाराचे छायचित्र.
10:57 बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी बँकांव्यतिरिक्त शेतक-यांचे गट देखील आर्थिक मदत करू शकतात.
11:06 देशातल्या विविध राज्यातील स्थित कार्यालयांसाठी दिलेली ही लिंक बघा-
11:16 या पाठात शिकलो ते थोडक्यातः
11:23 बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी लागणा-या कर्जासाठी अर्ज करणे.
11:30 बायोगॅस संयंत्र तुम्ही स्वखर्चाने किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारू शकता.
11:42 कर्जप्राप्तीसाठी आवश्यक पूर्वतयारी.
11:49 तसेच आपण हे सुद्धा शिकलो,
11:52 कर्जाच्या अर्जासोबत जोडावयाच्या दस्ताऐवजांची यादी.
12:00 संयंत्र उभारणीतील घटकांवरील खर्च.
12:06 खर्चाच्या अंदाजपत्रकातील सर्वसाधारण तपशील.
12:12 आणि बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली अनुदाने.
12:23 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
12:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:43 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana