PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-6/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:58, 2 January 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: User-Registration-Part-6

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 नमस्कार. पाठात स्वागत. यात नवीन शिकण्याऐवजी रजिस्ट्रेशन प्रक्रियेतील काही सुधारणा बघू.
0:08 कोणीतरी सूचना केल्याप्रमाणे आपल्याला एक प्रकार चेक करावा लागेल की या नावाचा युजर आधीच रजिस्टर झाला आहे काय.
0:19 येथे असलेल्या आपल्या फॉर्मवर जाऊ. येथे fullname टाईप करू शकतो. तसेच युजरनेम व पासवर्ड निवडू शकतो.
0:28 येथे लिहिलेल्या व्हॅल्यूज प्रथम काढून टाकू.
0:33 परंतु जेव्हा युजरनेम निवडतो...
0:37 उदाहरणार्थ "alex" हे युजरनेम रजिस्टर करत आहोत. डेटाबेसमधे हे आधीपासूनच उपस्थित आहे.
0:44 आता त्याचे अस्तित्व तपासू.
0:49 जर ते आधी उपस्थित असेल तर आपण युजरचे रजिस्ट्रेशन करणार नाही, कारण एकच युजरनेम दोन वेळा नको आहे.
1.01 जर येथे रजिस्टर करायचे असेल तर पासवर्ड लिहा. "alex" हे युजरनेम निवडा. डेटाबेसमधे हे आधीपासूनच उपलब्ध आहे.
1:13 येथे वेगळे फुलनेम टाईप करून register क्लिक करा. आपण यशस्वीरित्या registered झालो आहोत.
1:23 आता डेटाबेस पाहू. येथे alex युजरनेम असलेली दोन रेकॉर्डस आहेत. आता login करताना समस्या येऊ शकते.
1:33 या नावाचा पहिला युजर सापडताच त्याला login केले जाईल. आणि याच्याकडे कायमच दुर्लक्ष होऊन तो डेटाबेसमधे कधीच loginहोणार नाही.
1:45 हे डिलिट करू.
1:48 युजरनेमचे अस्तित्व बघण्यासाठी काही गोष्टी तपासाव्या लागतील.
1:53 हे अतिशय सोपे आहे. हे करण्याच्या अनेक पध्दती आहेत.
1:59 त्यातील सोपी आणि प्रभावी पध्दत वापरू.
2;04 प्रथम डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी हा कोड घेऊ.
2:11 डेटाबेस सिलेक्ट करा. जिथे submit बटण चेक करत आहोत तिथे पेस्ट करा.
2:21 हे डेटाबेसला कनेक्ट करत आहोत. आपण येथे आत आहोत.
2.26 नंतर येथे खाली युजरनेम तपासण्यासाठीचा कोड लिहू.
2:31 लक्षात घ्या की हे कुठेही तपासता येणार नाही. मी हे इथे ठेवतो आहे आणि उरलेले स्क्रिप्ट kill करतो आहे.
2.40 युजरनेम सापडल्यास हे कुठेही ठेवता येईल. वेबसाईटवर पूर्ण पेज वापरताना die फंक्शन उरलेला कोड सोडून देते. हे असे मला नको आहे.
2:51 मी सुचवेन की हा चेक पुढील स्टेटमेंटमधे समाविष्ट करावा. स्क्रिप्ट kill करण्यासाठी वापरू नये.
3:00 यावरून कल्पना येईल की आपल्याला जे करायचे आहे ते सामान्यपणे कसे करतात.
3:06 आपल्याला विशिष्ट युजरनेम असलेले रेकॉर्ड मिळवण्याची एकquery लिहायची आहे
3:18 येथे "namecheck query" लिहू. ह्याला व्हेरिएबल "namecheck" नाव देऊ. ज्याची व्हॅल्यू mysql query असेल.
3.28 सोपे करण्यासाठी "username" सिलेक्ट करू. ह्यामुळे सर्व डेटा सिलेक्ट केला जाणार नाही.
3:40 अशाप्रकारे users मधून युजरनेम सिलेक्ट करत आहोत, हे आपल्या टेबलचे नाव आहे.
3:47 पुढे लिहा where username is equal to... एखाद्या व्यक्तीचे युजरनेम, फॉर्मद्वारे submit केल्यावर ते व्हेरिएबल "username" मधे संचित होते.
3:57 त्यामुळे येथे खाली व्हेरिएबल "username" लिहा.
4:03 आपण "alex" नाव निवडल्यास डेटाबेसमधील "alex" युजरनेम असलेली सर्व रेकॉर्डस मिळतील. सध्या असे एक रेकॉर्ड आहे.
4:13 या केसमधे आपल्याकडे एक रेकॉर्ड आहे.
4:17 जर उदाहरणादाखल "Dale" हे युजरनेम घेतले, तर एकही रेकॉर्ड मिळणार नाही.
4:25 युजरनेम अस्तित्वात नसल्यास एकही रेकॉर्ड दिसणार नाही. रेकॉर्डची संख्या सांगणारे फंक्शन आपल्याला हवे आहे.
4:32 हे count व्हेरिएबलद्वारे करता येईल. "mysql num rows" वापरू. यामुळे "namecheck"या क्वेरीने दिलेल्या रेकॉर्डस किंवा rowsची संख्या मिळेल.
4:50 आता हे तपासू. आपण count एको करून नंतर स्क्रिप्ट kill करू. उर्वरित कोड कार्यान्वित होणार नाही.
4:57 register पेजवर जाऊ. "alex" हे फुलनेम लिहा. नंतर युजरनेम, मी येथे "Dale" लिहित आहे.
5:10 पासवर्ड तपासला जाणार नाही. त्यामुळे हे असेच सोडून देऊ शकतो.
5:18 तरी मी तो येथे लिहित आहे. Registerवर क्लिक करू. आपल्याला शून्य व्हॅल्यू मिळाली आहे.
5:29 कारण डेटाबेसमधे "Dale" हे युजरनेम उपलब्ध नाही.
5:35 जर यथे "alex" टाईप केले, ज्यात "a" हे अक्षर स्मॉल असेल.
5:43 आपल्याकडे strip tags आहेत. case sensitivity हाताळणे ..... हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे.
5:53 Account madhun युजरनेम मिळवताना ते नेहमी lowercase मधे रूपांतरित केले जाईल ह्याची खात्री करा. त्यासाठी येथे लिहा "str to lower".
6:07 आता पुढे Register क्लिक करा.
6:13 एक ही व्हॅल्यू मिळाल्याचे दिसेल. येथे तपासत आहोत. जर व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्य नसेल तर आपण व्हेरिएबल एको करू.
6:25 नंतर युजरला सांगणे गरजेचे आहे की तो registered आहे.
6:30 येथे साधे if स्टेटमेंट आणि त्याचा block लिहू.
6:36 येथे लिहू if कंसात count doesn't equal zeroम्हणजे आधी दिलेल्या युजरनेमचे रेकॉर्ड उपलब्ध आहे.
6:47 नंतर स्क्रिप्ट kill करून "Username already taken" किंवा याप्रकारचा मेसेज दर्शवू शकतो. मागे जाऊन रिफ्रेश करू.
6:56 येथे "alex" निवडू शकतो. पासवर्ड टाईप करून registerवर क्लिक करा. "Username already taken" अशी एरर मिळाली.
7:00 जर येथे "Dale" टाईप केले आणि नवीन नेम आणि पासवर्ड टाईप करून register वर क्लिक केल्यास आपण डेटाबेसमधे रजिस्टर झाल्याचे दिसेल. कारण युजरनेम उपलब्ध नव्हते.
7:16 आता हे असेच ठेवू. आपल्याला रजिस्टर झालेला युजर मिळाल्याचे दिसेल. गोष्टी सोप्या होण्यासाठी "str to lower" फंक्शन वापरणे उपयोगी आहे.
7:30 किंवा "str to lower" हे फंक्शन if स्टेटमेंटमधे वापरू शकतो. सर्व युजरनेम्स lowercase मधे रूपांतरित करण्याचा सल्ला मी देईन.
7:42 आपल्याला login script मधेही हे समाविष्ट करता येईल. युजर लॉगिन बॉक्समधे जे टाईप करतो ते lowercaseमधे रूपांतरित करू.
7:48 सरावासाठी हे हाताळून बघा. एरर्स शोधण्याची ही चांगली पध्दत आहे.
7:55 हे करून बघा. शंका असल्यास email करा. अधिक माहितीसाठी subscribe करा.
8:02 धन्यवाद. .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana