PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-6/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | नमस्कार. पाठात स्वागत. यात नवीन शिकण्याऐवजी रजिस्ट्रेशन प्रक्रियेतील काही सुधारणा बघू. |
00:08 | कोणीतरी सूचना केल्याप्रमाणे आपल्याला एक प्रकार चेक करावा लागेल की या नावाचा युजर आधीच रजिस्टर झाला आहे काय. |
00:19 | येथे असलेल्या आपल्या फॉर्मवर जाऊ. येथे fullname टाईप करू शकतो. तसेच युजरनेम व पासवर्ड निवडू शकतो. |
00:28 | येथे लिहिलेल्या व्हॅल्यूज प्रथम काढून टाकू. |
00:33 | परंतु जेव्हा युजरनेम निवडतो... |
00:37 | उदाहरणार्थ "alex" हे युजरनेम रजिस्टर करत आहोत. डेटाबेसमधे हे आधीपासूनच उपस्थित आहे. |
00:44 | आता त्याचे अस्तित्व तपासू. |
00:49 | जर ते आधी उपस्थित असेल तर आपण युजरचे रजिस्ट्रेशन करणार नाही, कारण एकच युजरनेम दोन वेळा नको आहे. |
01:01 | जर येथे रजिस्टर करायचे असेल तर पासवर्ड लिहा. "alex" हे युजरनेम निवडा. डेटाबेसमधे हे आधीपासूनच उपलब्ध आहे. |
01:13 | येथे वेगळे फुलनेम टाईप करून register क्लिक करा. आपण यशस्वीरित्या registered झालो आहोत. |
01:23 | आता डेटाबेस पाहू. येथे alex युजरनेम असलेली दोन रेकॉर्डस आहेत. आता login करताना समस्या येऊ शकते. |
01:33 | या नावाचा पहिला युजर सापडताच त्याला login केले जाईल. आणि याच्याकडे कायमच दुर्लक्ष होऊन तो डेटाबेसमधे कधीच loginहोणार नाही. |
01:45 | हे डिलिट करू. |
01:48 | युजरनेमचे अस्तित्व बघण्यासाठी काही गोष्टी तपासाव्या लागतील. |
01:53 | हे अतिशय सोपे आहे. हे करण्याच्या अनेक पध्दती आहेत. |
01:59 | त्यातील सोपी आणि प्रभावी पध्दत वापरू. |
02:04 | प्रथम डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी हा कोड घेऊ. |
02:11 | डेटाबेस सिलेक्ट करा. जिथे submit बटण चेक करत आहोत तिथे पेस्ट करा. |
02:21 | हे डेटाबेसला कनेक्ट करत आहोत. आपण येथे आत आहोत. |
02:26 | नंतर येथे खाली युजरनेम तपासण्यासाठीचा कोड लिहू. |
02:31 | लक्षात घ्या की हे कुठेही तपासता येणार नाही. मी हे इथे ठेवते आहे आणि उरलेले स्क्रिप्ट kill करते आहे. |
02:40 | युजरनेम सापडल्यास हे कुठेही ठेवता येईल. वेबसाईटवर पूर्ण पेज वापरताना die फंक्शन उरलेला कोड सोडून देते. हे असे मला नको आहे. |
02:51 | मी सुचवेन की हा चेक पुढील स्टेटमेंटमधे समाविष्ट करावा. स्क्रिप्ट kill करण्यासाठी वापरू नये. |
03:00 | यावरून कल्पना येईल की आपल्याला जे करायचे आहे ते सामान्यपणे कसे करतात. |
03:06 | आपल्याला विशिष्ट युजरनेम असलेले रेकॉर्ड मिळवण्याची एकquery लिहायची आहे |
03:18 | येथे "namecheck query" लिहू. ह्याला व्हेरिएबल "namecheck" नाव देऊ. ज्याची व्हॅल्यू mysql query असेल. |
03:28 | सोपे करण्यासाठी "username" सिलेक्ट करू. ह्यामुळे सर्व डेटा सिलेक्ट केला जाणार नाही. |
03:40 | अशाप्रकारे users मधून युजरनेम सिलेक्ट करत आहोत, हे आपल्या टेबलचे नाव आहे. |
03:47 | पुढे लिहा where username is equal to... एखाद्या व्यक्तीचे युजरनेम, फॉर्मद्वारे submit केल्यावर ते व्हेरिएबल "username" मधे संचित होते. |
03:57 | त्यामुळे येथे खाली व्हेरिएबल "username" लिहा. |
04:03 | आपण "alex" नाव निवडल्यास डेटाबेसमधील "alex" युजरनेम असलेली सर्व रेकॉर्डस मिळतील. सध्या असे एक रेकॉर्ड आहे. |
04:13 | या केसमधे आपल्याकडे एक रेकॉर्ड आहे. |
04:17 | जर उदाहरणादाखल "Dale" हे युजरनेम घेतले, तर एकही रेकॉर्ड मिळणार नाही. |
04:25 | युजरनेम अस्तित्वात नसल्यास एकही रेकॉर्ड दिसणार नाही. रेकॉर्डची संख्या सांगणारे फंक्शन आपल्याला हवे आहे. |
04:32 | हे count व्हेरिएबलद्वारे करता येईल. "mysql num rows" वापरू. यामुळे "namecheck"या क्वेरीने दिलेल्या रेकॉर्डस किंवा rowsची संख्या मिळेल. |
04:50 | आता हे तपासू. आपण count एको करून नंतर स्क्रिप्ट kill करू. उर्वरित कोड कार्यान्वित होणार नाही. |
04:57 | register पेजवर जाऊ. "alex" हे फुलनेम लिहा. नंतर युजरनेम, मी येथे "Dale" लिहित आहे. |
05:10 | पासवर्ड तपासला जाणार नाही. त्यामुळे हे असेच सोडून देऊ शकतो. |
05:18 | तरी मी तो येथे लिहित आहे. Registerवर क्लिक करू. आपल्याला शून्य व्हॅल्यू मिळाली आहे. |
05:29 | कारण डेटाबेसमधे "Dale" हे युजरनेम उपलब्ध नाही. |
05:35 | जर यथे "alex" टाईप केले, ज्यात "a" हे अक्षर स्मॉल असेल. |
05:43 | आपल्याकडे strip tags आहेत. case sensitivity हाताळणे ..... हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. |
05:53 | Account मधून युजरनेम मिळवताना ते नेहमी lowercase मधे रूपांतरित केले जाईल ह्याची खात्री करा. त्यासाठी येथे लिहा "str to lower". |
06:07 | आता पुढे Register क्लिक करा. |
06:13 | एक ही व्हॅल्यू मिळाल्याचे दिसेल. येथे तपासत आहोत. जर व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्य नसेल तर आपण व्हेरिएबल एको करू. |
06:25 | नंतर युजरला सांगणे गरजेचे आहे की तो registered आहे. |
06:30 | येथे साधे if स्टेटमेंट आणि त्याचा block लिहू. |
06:36 | येथे लिहू if कंसात count doesn't equal zeroम्हणजे आधी दिलेल्या युजरनेमचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. |
06:47 | नंतर स्क्रिप्ट kill करून "Username already taken" किंवा याप्रकारचा मेसेज दर्शवू शकतो. मागे जाऊन रिफ्रेश करू. |
06:56 | येथे "alex" निवडू शकतो. पासवर्ड टाईप करून registerवर क्लिक करा. "Username already taken" अशी एरर मिळाली. |
07:00 | जर येथे "Dale" टाईप केले आणि नवीन नेम आणि पासवर्ड टाईप करून register वर क्लिक केल्यास आपण डेटाबेसमधे रजिस्टर झाल्याचे दिसेल. कारण युजरनेम उपलब्ध नव्हते. |
07:16 | आता हे असेच ठेवू. आपल्याला रजिस्टर झालेला युजर मिळाल्याचे दिसेल. गोष्टी सोप्या होण्यासाठी "str to lower" फंक्शन वापरणे उपयोगी आहे. |
07:30 | किंवा "str to lower" हे फंक्शन if स्टेटमेंटमधे वापरू शकतो. सर्व युजरनेम्स lowercase मधे रूपांतरित करण्याचा सल्ला मी देईन. |
07:42 | आपल्याला login script मधेही हे समाविष्ट करता येईल. युजर लॉगिन बॉक्समधे जे टाईप करतो ते lowercaseमधे रूपांतरित करू. |
07:48 | सरावासाठी हे हाताळून बघा. एरर्स शोधण्याची ही चांगली पध्दत आहे. |
07:55 | हे करून बघा. शंका असल्यास email करा. अधिक माहितीसाठी subscribe करा. |
08:02 | धन्यवाद. . |