PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-4/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: User-Registration-Part-4
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | "User Registration" च्या चौथ्या भागात स्वागत. ह्यात प्रोसेसेस नीट समजून घेऊ. "username" आणि "password" साठी सुरक्षा व चांगल्या चाचण्या वापरू. |
0:10 | ह्याबाबतच्या सूचना email किंवा "youtube" द्वारे पाठवू शकता . |
0:20 | युजर रजिस्ट्रेशन प्रोसेसमधे जाऊ. |
0:23 | प्रथम डेटाबेसला कनेक्ट करणे गरजेचे आहे. आपले टेबल उघडून त्यात व्हॅल्यूज भरू. |
0:29 | हे सोपे आहे असे तुम्हाला वाटेल. |
0:33 | प्रथम येथे "Success" हा मेसेज लिहू. |
0:39 | पेजवर जाऊ. आपण बनवलेल्या चाचण्या तपासू. |
0:48 | "Register" वर क्लिक करा. "Please fill in all the fields". हा मेसेज मिळाला. |
0:55 | जर वेगवेगळी फिल्डस भरली, एखादे विसरलो आणि रजिस्टरवर क्लिक केले तरी हाच मेसेज मिळाला आहे. |
1:04 | येथे "alex" लिहू. प्रथम fullname टाईप करून युजरनेम निवडणार आहोत. येथे "abc" पासवर्ड लिहिणार आहोत. |
1:16 | येथे मिश्र अक्षरे टाईप करा. registerवर क्लिक केले "Your passwords does not match" हा मेसेज मिळाला. |
1:26 | पुन्हा मागे जाऊन येथे "Alex Garrett" टाईप करू. युजरनेम निवडू आणि "abc" पासवर्ड निवडा. |
1:40 | हा पासवर्ड 6 अक्षरांपेक्षा कमी आहे. "Register" क्लिक केल्यावर - "Passwords must be between 25 and 6 characters" हा मेसेज मिळाला. ही चाचणी कार्य करत आहे. |
1:52 | आता "Alexxxxxx Garrettttttttttttttt" हे लांबलचक फुलनेम , "alex" हे युजरनेम आणि पूर्ण लांबीचा पासवर्ड लिहू. |
02:05 | म्हणजे 6 अक्षरांपेक्षा जास्त. "Register" वर क्लिक करा. "Length of the username or fullname is too long!" हा मेसेज मिळाला. |
2:15 | तुम्हाला हवे असल्यास हे checks लिहू शकता. हे मी तुमच्यावर सोडत आहे. |
2:20 | आत्ता यशस्वी फॉर्म validation मिळाले. |
2:27 | आता युजर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पुढे चालू ठेवू. |
2:32 | ह्या फॉर्म validation मधे उणीव आहे. प्रत्येक वेळी एरर मिळाल्यावर सर्व फिल्डस पुसली जातात. |
2:40 | युजरला ती परत टाईप करावी लागतात. |
2:43 | समजा आपल्याला fullname, username आणि password ही व्हेरिएबल्स येथे मिळाली आहेत. |
2:50 | हे php page विचारात घेता आपण येथील html codeमधे php कोड लिहू. |
2:58 | येथे fullname खाली लिहा "value equal to" मधे phptag ओपन करा . |
3:07 | पुढे php tag क्लोज करा. त्याच्या आत येथे fullnameकिंवा username एको करू. |
3:12 | आपण युजरनेमसाठीही असेच करू. म्हणजेच value equals, open php tags, close php tags आणि मधे username एको करू. |
3:23 | line terminator दिल्याची खात्री करा. |
3:28 | समजा येथे खूप मोठे नाव टाईप केले आणि "alex" हे युजरनेम टाईप केले. |
3:37 | आपल्याला पासवर्ड संचित करायचा नसेल. ते मी युजरवर सोडत आहे. |
3:43 | आपण खूप मोठे युजरनेम टाईप केल्यामुळे पुन्हा एरर मिळाली . |
3:49 | registerक्लिक केल्यावर आपले फुलनेम आणि युजरनेमही दिसत आहे. |
3.55 | हा नियम आहे. एरर मिळाली आणि आपले युजरनेम, फुलनेम, पासवर्ड किंवा आपले firstname, middle name, surnameयासारखी फॉर्ममधील अनेक फिल्डस पुन्हा टाईप करावी लागली तर, |
4:10 | हे पुन्हा पुन्हा लिहिणे त्रासदायक होऊ शकते. |
4:14 | याप्रकारे php tagsमधील php echoवापरून, html inputसाठी व्हॅल्यू घेण्याने आपला फॉर्म user friendly, उपयोगी व वापरण्यास सोपा झाला आहे. |
4.28 | ठीक. अन्यथा "Success!!" असे एको करू. आपण अजून successful फॉर्म दिलेला नाही. |
4:35 | टाईप करा "Alex Garret" आणि 6 पेक्षा अधिक 25 पेक्षा कमी अक्षरे असलेला पासवर्ड लिहा. |
4:44 | "Register" वर क्लिक करा. आपल्याला एरर मिळाली आहे! बघू या. |
4:50 | एरर आहे.... - जर पासवर्डची string length 25पेक्षा अधिक असेल..... |
4:56 | ...किंवा पासवर्डची string length 6पेक्षा कमी असेल.... तर पासवर्ड एको करणे पुरेसे आहे- पण आपल्याला तीच अडचण येत आहे. |
5:05 | माझ्या लक्षात आले की पासवर्डची व्हॅल्यू encrypted आहे. आणि md5 ने encryptकेलेली string खूप मोठी आहे. ती 25 अक्षरांपेक्षा जास्त आहे. |
5:19 | आता आपल्याला हा block of code,जो encrypt करत आहे तो येथून काढून "register the user" च्या खाली लिहू. |
5:31 | यावरून कळेल की गोष्टींचा क्रम महत्त्वाचा असतो. अशा एरर्स मिळाल्यास तुमचा कोड नीट तपासा. म्हणजे नेमके काय करत आहात ते कळेल. |
5:43 | चुका शोधण्यासाठी युजर्स कोडच्या मधे गोष्टी एको करून पहात असतात. |
5:49 | मी आता फॉर्मवर परत जाऊन योग्य लांबीचा पासवर्ड टाईप करत आहे. |
5:56 | "Register" वर क्लिक करा. आपल्याला "Success" मेसेज मिळाला आहे. |
6:03 | कोड तपासल्यामुळे अडचण सोडवण्यास मदत होऊ शकते. |
6:07 | ही चूक माझ्या पटकन लक्षात आली पण कधीकधी व्हिडिओ pauseकरून मला चुका शोधाव्या लागतात. पण दर्शकांना ताटकळत ठेवणे योग्य नाही. |
6:20 | तुम्हालाही चुका समजतील. आपल्याला "Success" मिळाला आहे. कमेंट लिहा "open database". |
6:29 | टाईप करा, variable connect equal to my "sql connect". |
6:37 | आणि लोकल होस्ट सर्व्हर म्हणजेच माझ्या संगणकाला कनेक्ट करत आहे, पुढे root आणि password काही नाही. |
6:45 | टाईप करा " mySQL select db". हे आपला डेटाबेस सिलेक्ट करेल. समजण्यासाठी "select data base" ही कमेंट टाईप करू. |
6:55 | अर्थातच येथे php login आहे जे आपल्या डेटाबेसचे नाव आहे. येथे query लिहू. |
7:04 | टाईप करा variable query reg equal to mysql_query". |
7:11 | हा ह्या पाठाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जेथे व्हॅल्यूज भरून आपले युजरनेम रजिस्टर करतो. |
7:18 | येथे खाली जाऊ म्हणजे नीट दिसेल. लिहा "INSERT INTO users". आपण पाहिले तर "php login" डेटाबेस निवडला आहे. हे आपले टेबल आहे. त्यामुळे "mySQL select db php login". |
7:38 | आपण डेटाबेसमधील "users" टेबलमधे डेटा समाविष्ट करत आहोत . |
7:44 | आणि पुढे लिहा values कंसात टेबलमधील प्रत्येक व्हॅल्यू म्हणजेच टेबलमधे उपलब्ध असलेले प्रत्येक फिल्ड. |
7:52 | त्यासाठी मागे जाऊन structure वर क्लिक करा. आपल्याला id, name, username, password, date दिसत आहेत. म्हणजे 1 2 3 4 5. |
8:05 | येथेही 1 2 3 4 5 फिल्डस आवश्यक आहेत. id हे ऑटो इन्क्रीमेंट करेल. ह्याबद्दल आपण मागील पाठात पाहिले होते. |
8:14 | येथे क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. |
8:18 | आपले name, username, password, date मिळाले आहे. येथे name, username, passwordआहे. repeat password नको. तो फक्त तपासण्यासाठी आहे. आणि ही date असणार आहे. |
8:33 | येथे ही व्हेरिएबल्स आहेत. जर खात्री नसेल तर आपण येथून fullname, username, password आणि date घेऊ शकतो. |
8:44 | हे बदलून fullname करा. आता ह्याने काम व्हायला हवे. नंतर "You have been registered" असे एको करणार आहोत. याऐवजी "die" फंक्शन वापरू. |
8:57 | त्यामधे "You have been registered return to login page" मेसेज लिहू. युजरला login करता यावे यासाठी index page वर नेणारी लिंक बनवू. |
9:10 | हे काही सेकंदात कार्यान्वित होत असल्याचे दिसेल. हे आपले आधीचे पेज आहे. |
9:16 | लिहा "Alex Garret". "alex" हे युजरनेम आणि हा पासवर्ड. "You have been registered. Return to login page" दिसेल. |
9:26 | आता डेटाबेस तपासण्यासाठी "browse" वापरू. आपल्याला दिसेल की "Alex Garret", आपला id 3 आणि युजरनेम "alex" आहे. |
9:37 | आपला पासवर्ड encrypted असून ही आपली date आहे. |
9:42 | ठीक आहे. पुढील भागात आणखी काही छोट्या गोष्टी एकत्र करू आणि login processची चाचणी घेऊ. |
9:50 | पुन्हा भेटू. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आवाज रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद . |