Geogebra/C3/Relationship-between-Geometric-Figures/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 21:35, 17 December 2013 by Nancyvarkey (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Relationship between different Geometric Figures

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
00:00 नमस्कार.
00:01 Relationship between different Geometric Figures in Geogebra च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 तुम्हाला Geogebraची प्राथमिक माहिती आहे असे मी गृहीत धरतो.
00:11 नसल्यास “Introduction to Geogebra” हे ट्युटोरियल पहा.
00:18 ख-या कंपास बॉक्सची जागा घेण्याचा या ट्युटोरियलचा उद्देश नाही.
00:24 GeoGebra तील रचनांचा उद्देश आकृतींचे गुणधर्म जाणून घेण्याचा आहे.
00:29 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
00:32 चक्रीय चौकोन आणि अंतर्वर्तुळ काढणे
00:35 या ट्युटोरियलसाठी आपण Linux operating system
00:39 Ubuntu Version 10.04 LTS
00:43 आणि Geogebra चे Version 3.2.40.0 वापरणार आहोत.
00:48 रचना करण्यासाठी आपण खालील Geogebra tools वापरणार आहोत.
  • compass
  • segment between two points
  • circle with center through point
  • polygon
  • perpendicular bisector
  • angle bisector and
  • angle


01:02 Geogebraच्या विंडोवर जाऊ या.
01:05 त्यासाठी applications मधीलEducation आणि नंतर Geogebra वर क्लिक करा.
01:13 या विंडोचा आकार बदला.
01:18 आकृती स्पष्ट दिसण्यासाठी options मेनूतील font size वर क्लिक करून 18 point हा पर्याय निवडा.
01:25 चक्रीय चौकोन काढू .
01:27 त्यासाठी टूलबारवरील "Regular Polygon" हे टूल निवडा. नंतर ड्रॉईंग पॅडवर कुठेही दोन बिंदू काढा.
01:38 '4' ही default value असलेला एक डायलॉग बॉक्स उघडेल.
01:42 OK वर क्लिक करा.
01:43 'ABCD' हा चौरस तयार होईल.
01:46 डाव्या कोप-यात असलेल्या “Move” टूलच्या सहाय्याने आपण हा चौरस थोडा तिरका करू या.
01:51 टूलबारमधील Move टूल सिलेक्ट करण्यासाठी Moveवर क्लिक करा.
01:56 माऊस 'A' किंवा 'B' वर न्या. मी B बिंदू निवडत आहे.
02:01 माऊस Bवर नेऊन तो ड्रॅग करा. चौरस आपल्याला तिरका झालेला दिसेल.
02:10 आता रेषाखंड 'AB' वर लंबदुभाजक काढू या.
02:15 त्यासाठी टूलबारवरील Perpendicular bisector हे टूल निवडा.
02:20 Perpendicular bisector वर क्लिक करा.
02:22 बिंदू 'A' वर क्लिक करा.
02:24 नंतर 'B' वर क्लिक करा.
02:26 आपल्याला लंबदुभाजक काढलेला दिसेल.
02:30 आता दुसरा लंबदुभाजक रेषाखंड 'BC' वर काढण्यासाठी
02:36 टूलबारवरील Perpendicular bisector वर क्लिक करा.
02:42 बिंदू 'B' वर क्लिक करा.
02:44 नंतर 'C' वर क्लिक करा.
02:46 आपल्याला दोन्ही लंबदुभाजक एका बिंदूत छेदताना दिसतील.
02:50 तो बिंदू 'E' म्हणून मार्क करा.
02:54 आता 'E' मध्यबिंदू असलेले आणि C बिंदूतून जाणारे वर्तुळ काढू या.
03:01 आता टूलबारवरील circle with centre through point हे टूल सिलेक्ट करा.
03:09 मध्यबिंदू 'E' वर क्लिक करून मग 'C' बिंदूतून जाण्यासाठी त्या बिंदूवर क्लिक करा.
03:18 हे वर्तुळ चौकोनाच्या सर्व शिरोबिंदूतून गेलेले दिसेल. अशा प्रकारे चक्रीय चौकोन तयार झाला आहे.
03:29 चक्रीय चौकोनाचे क्षेत्रफळ त्याच मापांच्या बाजू असलेल्या चौकोनाच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त असते.
03:37 आकृती हलवण्यासाठी Move टूलचा वापर करू या.
03:42 त्यासाठी टूलबारवरील Move टूलवर क्लिक करून माऊस 'A' किंवा 'B' वर न्या. मी 'A' बिंदू निवडत आहे.
03:52 आकृती हलवण्यासाठी माऊस 'A' वर नेऊन तो ड्रॅग करा.
03:58 आपली रचना योग्य आहे का हे बघा.
04:01 आता फाईल सेव्ह करू.
04:04 फाईल मेनूमधील Save As वर क्लिक करा.
04:07 फाईलला cyclic_quadrilateral असे नाव द्या.
04:21 सेव्ह वर क्लिक करा.
04:23 अंतर्वर्तुळ काढण्यासाठी geogebra ची नवी विंडो उघडू.
04:28 त्यासाठी फाईल मेनूमधील New वर क्लिक करा.
04:35 आता त्रिकोण काढण्यासाठी टूलबारवरील Polygon टूल निवडा.
04:44 त्रिकोण काढण्यासाठी बिंदू A,B,C आणि पुन्हा बिंदू A वर क्लिक करा.
04:52 त्रिकोणाच्या कोनांचे माप मोजू .
04:55 त्यासाठी टूलबारवरील Angle टूल सिलेक्ट करा.
05:00 आता बिंदू 'B,A,C' , 'C,B,A' आणि 'A,C,B' वर क्लिक करा.
05:15 आपल्याला कोनांचे माप मिळेल.
05:18 आता कोनदुभाजक काढू या.
05:21 टूलबारवरील Angle bisector निवडण्यासाठी
05:25 Angle bisector वर क्लिक करून मग 'B,A,C' या बिंदूंवर क्लिक करा.
05:32 दुसरा कोन दुभाजक काढण्यासाठी पुन्हा Angle bisector निवडू.
05:39 Angle bisector वर क्लिक करून नंतर A,B,C वर क्लिक करा.
05:48 हे दोन कोनदुभाजक एका बिंदूत छेदतील.
05:52 तो बिंदू 'D' म्हणून मार्क करा.
05:55 आता D बिंदूतून जाणारा रेषाखंड AB वर एक लंब काढू.
06:02 टूलबारवरील perpendicular line हे टूल निवडून बिंदू D वर क्लिक करा आणि नंतर रेषाखंड AB वर क्लिक करा.
06:12 लंब आणि रेषाखंड एकमेकांना या बिंदूत छेदतील.
06:17 तो बिंदू 'E' म्हणून मार्क करा.
06:20 आता D हा मध्यबिंदू असणारे आणि 'E' बिंदूतून जाणारे वर्तुळ काढू या.
06:27 टूलबारवरील कंपास हे टूल निवडून D या मध्यबिंदूवर आणि त्रिज्या DE वर क्लिक करू.
06:37 त्यासाठी बिंदू Dवर क्लिक करा. आणि नंतर 'E' वर क्लिक करून आकृती पूर्ण करण्यासाठी पुन्हा बिंदू Dवर क्लिक करा.
06:46 त्रिकोणाच्या सर्व बाजूंना वर्तुळ स्पर्श करत आहे.
06:50 अशाप्रकारे आपण अंतर्वर्तुळ काढले.
06:53 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:57 थोडक्यात
07:02 या ट्युटोरियलमध्ये आपण
07:05 चक्रीय चौकोन, अंतर्वर्तुळ
07:07 Geogebra टूलच्या सहाय्याने काढायला शिकलो.
07:10 आता असाईनमेंट म्हणून ABC त्रिकोण काढा.
07:15 रेषाखंड BC वर D बिंदू काढून AD जोडा.
07:19 ABC, ABD आणि CBD या त्रिकोणांमध्ये अनुक्रमे r, r1 आणि r2 त्रिज्यांची अंतर्वर्तुळे काढा.
07:28 BE ही उंची h म्हणू.
07:30 त्रिकोण ABC चे शिरोबिंदू हलवून
07:33 खालील सूत्र तपासा.
07:35 (1 -2r1/h)*(1 - 2r2/h) = (1 -2r/h)
07:43 तुमची असाईनमेंट अशी दिसणे आवश्यक आहे.
07:52 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे.
07:55 *ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:57 *आपण तो download  करूनही पाहू शकता.
08:02 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:06 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:09 अधिक माहीतीसाठी contact@spoken-tutorial.org ला लिहा.
08:16 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
08:19 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
08:25 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
08:29 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana