Java/C2/For-Loop/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:23, 8 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: For-Loop

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:02 javaमधील for loopवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 for loopचा वापर Javaमध्ये कसा करायचा ते पाहू.
00:12 यासाठी
  • Ubuntu 11.10,
  • JDK 1.6 आणि
  • Eclipse 3.7.0 वापरणार आहोत.


00:24 आपल्याला Javaतील relational operators आणि if statement माहित असायला हवे.
00:32 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:40 हा for loop चा syntax आहे.
00:44 ह्यामध्ये initialization, loop condition आणि increment यांचा समावेश होतो.
00:51 loop condition true असेपर्यंत for block कार्यान्वित होत रहातो.
01:00 Eclipse मध्ये एक उदाहरण करून पाहू.
01:04 eclipse वर जाऊ.
01:07 आपण ForLoopDemo नावाचा class बनवला आहे.
01:12 main methodमध्ये for loop समाविष्ट करू.
01:17 main function मध्ये टाईप करा int i semicolon.
01:24 नंतर for कंसात i equal to 0 semicolon i less than 10 semicolon i equal to i plus 1.
01:45 हे statement, loop कसे कार्य करणार ते ठरवते.
01:53 i =0 ही loop ची starting condition आहे.
01:58 ही condition व्हेरिएबलला initialize करते.
02:05 i<10 ही loop ची running condition आहे.
02:09 condition जर true असेल तर for block कार्यान्वित होईल.
02:14 नसेल तर कार्यान्वित होणार नाही.
02:17 i ची व्हॅल्यू 10 किंवा त्यापेक्षा जास्त होईल तेव्हा block कार्यान्वित होणार नाही.
02:25 i= i+1 हे loop variable कसे बदलणार ते दाखवतो.
02:32 येथे i ची व्हॅल्यू 0 ने सुरू होते.
02:35 loop च्या प्रत्येक iteration ला i ची व्हॅल्यू 10 होईपर्यंत1 ने वाढत जाईल.
02:42 आता i संबंधात काही बदल करू.
02:46 open आणि close curly brackets काढा.
02:49 curly brackets मध्ये टाईप करा System dot out dot println आणि कंसात लिहा i गुणिले i.
03:06 हे 0 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक अंकाचा वर्ग print करेल.
03:11 आऊटपुट पाहू.
03:13 सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:17 लूप 0 ते 9 ह्या अंकांसाठी कार्यान्वित झाले.
03:23 प्रत्येक iteration मध्ये अंकाचा वर्ग print होईल.
03:28 आता 3 किंवा 5 च्या पटीत असलेल्या सर्व दोन अंकी संख्या print करू.
03:37 i ची व्हॅल्यू 10 ते 99 पर्यंत असली पाहिजे.
03:42 त्यासाठी i equal to 0 च्या जागी i equal to 10 करा.
03:48 आणि i less than 10 च्या जागी i less than 100 करा.
03:54 curly brackets मध्ये असे अंक print करणार आहोत जे 3 किंवा 5 च्या पटीत असतील.
04:03 टाईप करा
04:04 if कंसात i mod 3 equal equal to 0 किंवा कंसात i mod 5 equal equal to 0.
04:32 हे statement i ला 3 किंवा 5 ने भाग जातो की नाही ते तपासेल.
04:38 नंतर curly bracket मध्ये i ची व्हॅल्यू print करणार आहोत.
04:50 आता आऊटपुट पाहू.
04:52 त्यासाठी सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:56 हे अंक 3 किंवा 5 च्या पटीतील आहेत. अशाप्रकारे आपणJava मध्ये for loop वापरले .
05:11 हा पाठ येथे संपला.
05:14 Java मध्ये for loop वापरायला शिकलो.
05:20 assignment. तीन अंकी संख्येतील प्रत्येक अंकाच्या घनांची बेरीज त्या संख्येइतकी असल्यास तिला Armstrong Number म्हणतात.
05:29 उदाहरणार्थ 153 equal to 1 cube plus 5 cube plus 3 cube.
05:36 अशा सर्व 3 अंकी संख्या शोधा.
05:40 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05: 42 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:49 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:01 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
06:10 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:20 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:28 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana