Java/C2/For-Loop/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:02 | java मधील for loop वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | for loop चा वापर Java मध्ये कसा करायचा ते पाहू. |
00:12 | यासाठी
Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7.0 वापरणार आहोत. |
00:24 | आपल्याला Java तील relational operators आणि if statement माहित असायला हवे. |
00:32 | नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:40 | हा for loop चा syntax आहे. |
00:44 | ह्यामध्ये initialization, loop condition आणि increment यांचा समावेश होतो. |
00:51 | loop condition true असेपर्यंत for block कार्यान्वित होत रहातो. |
01:00 | Eclipse मध्ये एक उदाहरण करून पाहू. |
01:04 | eclipse वर जाऊ. |
01:07 | आपण ForLoopDemo नावाचा class बनवला आहे. |
01:12 | main method मध्ये for loop समाविष्ट करू. |
01:17 | main function मध्ये टाईप करा int i semicolon. |
01:24 | नंतर for कंसात i equal to 0 semicolon i less than 10 semicolon i equal to i plus 1. |
01:45 | हे statement, loop कसे कार्य करणार ते ठरवते. |
01:53 | i =0 ही loop ची starting condition आहे. |
01:58 | ही condition व्हेरिएबलला initialize करते. |
02:05 | i<10 ही loop ची running condition आहे. |
02:09 | condition जर true असेल तर for block कार्यान्वित होईल. |
02:14 | नसेल तर कार्यान्वित होणार नाही. |
02:17 | i ची व्हॅल्यू 10 किंवा त्यापेक्षा जास्त होईल तेव्हा block कार्यान्वित होणार नाही. |
02:25 | i= i+1 हे loop variable कसे बदलणार ते दाखवतो. |
02:32 | येथे i ची व्हॅल्यू 0 ने सुरू होते. |
02:35 | loop च्या प्रत्येक iteration ला i ची व्हॅल्यू 10 होईपर्यंत 1 ने वाढत जाईल. |
02:42 | आता i संबंधात काही बदल करू. |
02:46 | open आणि close curly brackets काढा. |
02:49 | curly brackets मध्ये टाईप करा System dot out dot println आणि कंसात लिहा i गुणिले i. |
03:06 | हे 0 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक अंकाचा वर्ग print करेल. |
03:11 | आऊटपुट पाहू. |
03:13 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:17 | लूप 0 ते 9 ह्या अंकांसाठी कार्यान्वित झाले. |
03:23 | प्रत्येक iteration मध्ये अंकाचा वर्ग print होईल. |
03:28 | आता 3 किंवा 5 च्या पटीत असलेल्या सर्व दोन अंकी संख्या print करू. |
03:37 | i ची व्हॅल्यू 10 ते 99 पर्यंत असली पाहिजे. |
03:42 | त्यासाठी i equal to 0 च्या जागी i equal to 10 करा. |
03:48 | आणि i less than 10 च्या जागी i less than 100 करा. |
03:54 | curly brackets मध्ये असे अंक print करणार आहोत जे 3 किंवा 5 च्या पटीत असतील. |
04:03 | टाईप करा if कंसात i mod 3 equal equal to 0 किंवा कंसात i mod 5 equal equal to 0. |
04:32 | हे statement i ला 3 किंवा 5 ने भाग जातो की नाही ते तपासेल. |
04:38 | नंतर curly bracket मध्ये i ची व्हॅल्यू print करणार आहोत. |
04:50 | आता आऊटपुट पाहू. |
04:52 | त्यासाठी सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:56 | हे अंक 3 किंवा 5 च्या पटीतील आहेत. अशाप्रकारे आपण Java मध्ये for loop वापरले . |
05:11 | हा पाठ येथे संपला. |
05:14 | Java मध्ये for loop वापरायला शिकलो. |
05:20 | assignment. तीन अंकी संख्येतील प्रत्येक अंकाच्या घनांची बेरीज त्या संख्येइतकी असल्यास तिला Armstrong Number म्हणतात. |
05:29 | उदाहरणार्थ 153 equal to 1 cube plus 5 cube plus 3 cube. |
05:36 | अशा सर्व 3 अंकी संख्या शोधा. |
05:40 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:42 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:49 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:56 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:01 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:04 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
06:10 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:20 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:28 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद . |