LibreOffice-Suite-Base/C3/Create-simple-queries-in-SQL-View/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:31, 4 October 2013 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Create Simple SQL Queries

Author: Manali Ranade

Keywords: Base


Visual Clue
Narration
00:02 LibreOffice Base वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:09 SQL View मध्ये Simple Queries बनवणे, simple SQLलिहिणे .
00:16 SELECT, FROM आणि WHERE ह्या clauses चा वापर.
00:20 fields आणि tables च्या नावांसाठी upper, lower किंवा mixed cases निवडणे.
00:27 SQL मध्ये Baseच्या सहाय्याने queries बनवण्यापूर्वी LibreOfficeBase बद्दल बोलू.
00:35 Base हे HSQL database engineवर चालते.
00:41 हे मुक्त database engine software असून ते Java मध्ये लिहिले आहे. HSQLDBच्या अधिक माहितीसाठी http://hsqldb.org.वर जा.
01:02 आता SQL बद्दल जाणून घेऊ.
01:06 SQL म्हणजे Structured Query Language. डेटाबेस access आणि manipulate करण्यासाठी वापरली जाणारी standard language.
01:17 ही आंतराष्ट्रीय ANSI standard द्वारे मान्यताप्राप्त आहे.
01:23 त्यामुळे हिचा वापर अनेक Database Management Systems म्हणजेच DBMSमध्ये होतो.
01:31 LibreOffice Base, MySQL, Microsoft SQL Server, Microsoft Access, Oracle, आणि DB2 ही त्याची काही उदाहरणे.
01:47 SQLचा सर्वसामान्य वापर म्हणजे डेटाबेसमधून डेटा retrieveकरणे. ह्यालाच डेटाबेस query करणे म्हणतात .
01:58 SQL चा वापर database मध्ये डेटा insert , update किंवा delete करणे ह्यासाठीही होतो.
02:09 Base द्वारे हे सर्व आपण मागील पाठांमध्ये केले आहे.
02:16 हे user friendly wizards आणि designing windows द्वारे केले होते.
02:22 पण SQLही languageआपल्याला query लिहिताना जास्त flexiblity आणि powerदेते. SQLचा उपयोग आपण डेटा बदलण्याशिवाय डेटाबेस आणि table structure बदलण्यासाठीही करू शकतो.
02:43 या पाठात SQLबद्दल सर्व माहिती समाविष्ट करू शकत नाही. येथे काही उपयोगी पाठ आणि वेबसाईटस दिल्या आहेत.<pause> .
02:59 HSQLDB चे स्वतःचे user guide आहे. ते online किंवा PDF file म्हणून computer वर download व saveकरू शकतो.
03:14 SQL बद्दल शिकू. आपले Library databaseचे उदाहरण बघू.
03:23 Library database उघडा. डाव्या पॅनेलमधील Queries listवर क्लिक करा.
03:34 Create Query in SQL View वर क्लिक करा. Query Design ही blank windowदिसेल.
03:46 येथे SQL मध्ये queries टाईप करणार आहोत.
03:51 आता पहिली simple query लिहू. आपल्याला लायब्ररीतील सर्व पुस्तकांची माहिती मिळवायची आहे.
04:02 त्यासाठी SELECT कीवर्डचा वापर करावा लागेल. आपण अशी queryलिहू.
04:10 SELECT * FROM Books.
04:15 येथे Books हे table name आहे. Booksमधील Bकॅपिटल आहे.
04:23 आपण आधी तयार केलेली table आणि column names जशीच्या तशी वापरू.
04:29 * हे wild card आहे. ह्याचा येथील अर्थ Books table मधील सर्व fields किंवा columns असा होतो.
04:39 आता हे कार्यान्वित करू. Edit menuतील Run Query वर क्लिक करा.
04:48 Booksच्या रेकॉर्डसची सूची top panelमध्ये दिसेल.
04:53 आपण लिहिलेली कुठलीही query तिला नाव देऊन सेव्ह करू शकतो.
05:00 ही पहिली simple query आहे. काही सूचना,
05:06 HSQLDB हे Database object names साठी केस सेन्सेटिव्ह आहे, जसे की tables and column names.
05:17 म्हणजेच B Capital असलेले Books हे Table चे नाव b small असलेले books सारखे नाही.
05:27 सोयीसाठी आपण सर्व upper cases किंवा lower cases वापरू शकतो.
05:34 उदाहरणार्थ capital letters मध्ये BOOKS किंवा smallमध्ये members.
05:44 पण mixed cases वापराने हे वाचायला आणि समजण्यास सोपे होते. उदाहरणार्थ Bआणि I ही capital letters असलेले BooksIssued.
05:57 किंवा capital R आणि D असलेले ReturnDate.
06:03 आपण ज्या पध्दतीने table किंवा column चे नाव बनवले आहे ते तसेच वापरणे आवश्यक आहे.
06:11 SQL कीवर्ड, जसा की SELECTसाठी आपण कुठलीही किंवा mix case वापरू शकतो. नीट वाचता यावे म्हणून सर्व ठिकाणी त्याची समानता ठेवा.
06:25 उदाहरणार्थ कीवर्डसाठी सर्व letters upper caseमध्ये ठेवणार आहोत.
06:31 पुढील query पाहू. ही query नव्या विंडोमध्ये टाईप करू शकतो किंवा आधीच्या query वर overwrite करू शकतो.
06:42 आधीची query overwrite करू.
06:47 Books table मधील विशिष्ट column मिळवण्यासाठी SELECT Title, Author FROM Books .
06:58 query कार्यान्वित करा. Run Query चा icon वापरू शकता जो फाईल मेनूबार खाली आहे. किंवा कीबोर्डवरील F5चे बटण दाबा.
07:13 आपल्याला हव्या असलेल्या columns मधील ही रेकॉर्डस आहेत.
07:19 आता पुढे जाऊ.
07:22 आता query मध्ये conditions किंवा criteria समाविष्ट करू.
07:27 आपणास Cambridgeने प्रकाशित केलेली booksहवी आहेत.
07:31 त्यासाठी आपली query आहे SELECT * FROM Books WHERE Publisher = 'Cambridge' .
07:46 येथे WHEREहा कीवर्ड वापरला आहे.
07:52 त्याच्यापुढे Publisher equals Cambridge ही condition दिली आहे.
07:59 query कार्यान्वित करू. आपल्याला Cambridge ह्या publisher ची पुस्तके दिसत आहेत.
08:08 आपणquery मध्ये कितीही conditions किंवा criteria घालू शकतो.
08:14 दोन conditions असलेली query लिहू.
08:18 आपल्याला Cambridgeने 1975सालानंतर प्रकाशित केलेली पुस्तकेच हवी आहेत.
08:29 त्यासाठी SELECT * FROM Books WHERE Publisher = 'Cambridge' AND PublishedYear > 1975 ही query आहे.
08:49 WHERE कीवर्ड किवा क्लॉज़ नंतर दोन conditions दिसतील.
08:55 त्या आपण ANDने जोडल्या आहेत याकडे लक्ष द्या. येथे ANDहे logical operator आहे.
09:04 हे दोन conditions एकत्र करण्यासाठी वापरले आहे. OR हे दुसरे logical operator आहे.
09:13 वरील query मध्ये घालून ते वापरून बघा.
09:18 query कार्यान्वित करून येणारा रिझल्ट टॉप पॅनेलमध्ये पहा.
09:23 आपल्या conditions पूर्ण करणारी ही पुस्तके आहेत.
09:29 आता अनेक conditions समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत पाहू.
09:36 आपल्याला Cambridge किंवा Oxford किंवा दोघांनीही प्रकाशित केलेली पुस्तके हवी आहेत.
09:46 त्यासाठी ही query आहे

SELECT * FROM Books WHERE Publisher IN ( 'Cambridge', 'Oxford')

10:09 येथे INहा नवा कीवर्ड वापरला आहे.
10:13 INद्वारे single columnवरील condition एकत्र करता येतात. उदाहरणार्थ Publisher.
10:21 रिझल्ट कडे लक्ष द्या.
10:25 assignment
10:27 SQL queries लिहून त्या तपासून बघा.
10:33 1. लायब्ररीच्या सर्व सभासदांची माहिती मिळवा. 2. दिडशे रूपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या सर्व पुस्तकांच्या नावाची सूची दाखवा. 3. William Shakespeare किंवा John Milton ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सूची मिळवा.
10:56 SQL बद्दल अधिक माहिती पुढील पाठात पाहू.
11:01 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:09 आपण शिकलो,
11:12 SQL View मध्ये Simple Query बनवणे.
11:17 simple SQLलिहिणे.
11:20 SELECT, FROM आणि WHERE ह्या clauses चा वापर.
11:25 fields आणि tables च्या नावांसाठी upper, lower किंवा mixed cases निवडणे.
11:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:47 ह्या प्रॉजेक्टचे आयोजन स्पोकन ट्युटोरियल टीमने केले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:55 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मीरंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana