LibreOffice-Suite-Base/C3/Create-simple-queries-in-SQL-View/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:02 | LibreOffice Base वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत, |
00:09 | SQL View मध्ये Simple Queries बनवणे, simple SQLलिहिणे . |
00:16 | SELECT, FROM आणि WHERE ह्या clauses चा वापर. |
00:20 | fields आणि tables च्या नावांसाठी upper, lower किंवा mixed cases निवडणे. |
00:27 | SQL मध्ये Baseच्या सहाय्याने queries बनवण्यापूर्वी LibreOfficeBase बद्दल बोलू. |
00:35 | Base हे HSQL database engineवर चालते. |
00:41 | हे मुक्त database engine software असून ते Java मध्ये लिहिले आहे. HSQLDBच्या अधिक माहितीसाठी http://hsqldb.org.वर जा. |
01:02 | आता SQL बद्दल जाणून घेऊ. |
01:06 | SQL म्हणजे Structured Query Language. डेटाबेस access आणि manipulate करण्यासाठी वापरली जाणारी standard language. |
01:17 | ही आंतराष्ट्रीय ANSI standard द्वारे मान्यताप्राप्त आहे. |
01:23 | त्यामुळे हिचा वापर अनेक Database Management Systems म्हणजेच DBMSमध्ये होतो. |
01:31 | LibreOffice Base, MySQL, Microsoft SQL Server, Microsoft Access, Oracle, आणि DB2 ही त्याची काही उदाहरणे. |
01:47 | SQLचा सर्वसामान्य वापर म्हणजे डेटाबेसमधून डेटा retrieveकरणे. ह्यालाच डेटाबेस query करणे म्हणतात . |
01:58 | SQL चा वापर database मध्ये डेटा insert , update किंवा delete करणे ह्यासाठीही होतो. |
02:09 | Base द्वारे हे सर्व आपण मागील पाठांमध्ये केले आहे. |
02:16 | हे user friendly wizards आणि designing windows द्वारे केले होते. |
02:22 | पण SQLही languageआपल्याला query लिहिताना जास्त flexiblity आणि powerदेते. SQLचा उपयोग आपण डेटा बदलण्याशिवाय डेटाबेस आणि table structure बदलण्यासाठीही करू शकतो. |
02:43 | या पाठात SQLबद्दल सर्व माहिती समाविष्ट करू शकत नाही. येथे काही उपयोगी पाठ आणि वेबसाईटस दिल्या आहेत.<pause> . |
02:59 | HSQLDB चे स्वतःचे user guide आहे. ते online किंवा PDF file म्हणून computer वर download व saveकरू शकतो. |
03:14 | SQL बद्दल शिकू. आपले Library databaseचे उदाहरण बघू. |
03:23 | Library database उघडा. डाव्या पॅनेलमधील Queries listवर क्लिक करा. |
03:34 | Create Query in SQL View वर क्लिक करा. Query Design ही blank windowदिसेल. |
03:46 | येथे SQL मध्ये queries टाईप करणार आहोत. |
03:51 | आता पहिली simple query लिहू. आपल्याला लायब्ररीतील सर्व पुस्तकांची माहिती मिळवायची आहे. |
04:02 | त्यासाठी SELECT कीवर्डचा वापर करावा लागेल. आपण अशी queryलिहू. |
04:10 | SELECT * FROM Books. |
04:15 | येथे Books हे table name आहे. Booksमधील Bकॅपिटल आहे. |
04:23 | आपण आधी तयार केलेली table आणि column names जशीच्या तशी वापरू. |
04:29 | * हे wild card आहे. ह्याचा येथील अर्थ Books table मधील सर्व fields किंवा columns असा होतो. |
04:39 | आता हे कार्यान्वित करू. Edit menuतील Run Query वर क्लिक करा. |
04:48 | Booksच्या रेकॉर्डसची सूची top panelमध्ये दिसेल. |
04:53 | आपण लिहिलेली कुठलीही query तिला नाव देऊन सेव्ह करू शकतो. |
05:00 | ही पहिली simple query आहे. काही सूचना, |
05:06 | HSQLDB हे Database object names साठी केस सेन्सेटिव्ह आहे, जसे की tables and column names. |
05:17 | म्हणजेच B Capital असलेले Books हे Table चे नाव b small असलेले books सारखे नाही. |
05:27 | सोयीसाठी आपण सर्व upper cases किंवा lower cases वापरू शकतो. |
05:34 | उदाहरणार्थ capital letters मध्ये BOOKS किंवा smallमध्ये members. |
05:44 | पण mixed cases वापराने हे वाचायला आणि समजण्यास सोपे होते. उदाहरणार्थ Bआणि I ही capital letters असलेले BooksIssued. |
05:57 | किंवा capital R आणि D असलेले ReturnDate. |
06:03 | आपण ज्या पध्दतीने table किंवा column चे नाव बनवले आहे ते तसेच वापरणे आवश्यक आहे. |
06:11 | SQL कीवर्ड, जसा की SELECTसाठी आपण कुठलीही case किंवा mix case वापरू शकतो. नीट वाचता यावे म्हणून सर्व ठिकाणी त्याची समानता ठेवा. |
06:25 | उदाहरणार्थ कीवर्डसाठी सर्व letters upper caseमध्ये ठेवणार आहोत. |
06:31 | पुढील query पाहू. ही query नव्या विंडोमध्ये टाईप करू शकतो किंवा आधीच्या query वर overwrite करू शकतो. |
06:42 | आधीच्या query वर overwrite करू. |
06:47 | Books table मधील विशिष्ट column मिळवण्यासाठी SELECT Title, Author FROM Books . |
06:58 | query कार्यान्वित करा. Run Query चा icon वापरू शकता जो फाईल मेनूबार खाली आहे. किंवा कीबोर्डवरील F5चे बटण दाबा. |
07:13 | आपल्याला हव्या असलेल्या columns मधील ही रेकॉर्डस आहेत. |
07:19 | आता पुढे जाऊ. |
07:22 | आता query मध्ये conditions किंवा criteria समाविष्ट करू. |
07:27 | आपणास Cambridgeने प्रकाशित केलेली booksहवी आहेत. |
07:31 | त्यासाठी आपली query आहे SELECT * FROM Books WHERE Publisher = 'Cambridge' . |
07:46 | येथे WHEREहा कीवर्ड वापरला आहे. |
07:52 | त्याच्यापुढे Publisher equals Cambridge ही condition दिली आहे. |
07:59 | query कार्यान्वित करू. आपल्याला Cambridge ह्या publisher ची पुस्तके दिसत आहेत. |
08:08 | आपणquery मध्ये कितीही conditions किंवा criteria घालू शकतो. |
08:14 | दोन conditions असलेली query लिहू. |
08:18 | आपल्याला Cambridgeने 1975सालानंतर प्रकाशित केलेली पुस्तकेच हवी आहेत. |
08:29 | त्यासाठी SELECT * FROM Books WHERE Publisher = 'Cambridge' AND PublishedYear > 1975 ही query आहे. |
08:49 | WHERE कीवर्ड किवा क्लॉज़ नंतर दोन conditions दिसतील. |
08:55 | त्या आपण ANDने जोडल्या आहेत याकडे लक्ष द्या. येथे ANDहे logical operator आहे. |
09:04 | हे दोन conditions एकत्र करण्यासाठी वापरले आहे. OR हे दुसरे logical operator आहे. |
09:13 | वरील query मध्ये घालून ते वापरून बघा. |
09:18 | query कार्यान्वित करून येणारा रिझल्ट टॉप पॅनेलमध्ये पहा. |
09:23 | आपल्या conditions पूर्ण करणारी ही पुस्तके आहेत. |
09:29 | आता अनेक conditions समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत पाहू. |
09:36 | आपल्याला Cambridge किंवा Oxford किंवा दोघांनीही प्रकाशित केलेली पुस्तके हवी आहेत. |
09:46 | त्यासाठी ही query आहे
SELECT * FROM Books WHERE Publisher IN ( 'Cambridge', 'Oxford') |
10:09 | येथे INहा नवा कीवर्ड वापरला आहे. |
10:13 | INद्वारे single columnवरील condition एकत्र करता येतात. उदाहरणार्थ Publisher. |
10:21 | रिझल्ट कडे लक्ष द्या. |
10:25 | assignment |
10:27 | SQL queries लिहून त्या तपासून बघा. |
10:33 | 1. लायब्ररीच्या सर्व सभासदांची माहिती मिळवा. 2. दिडशे रूपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या सर्व पुस्तकांच्या नावाची सूची दाखवा. 3. William Shakespeare किंवा John Milton ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सूची मिळवा. |
10:56 | SQL बद्दल अधिक माहिती पुढील पाठात पाहू. |
11:01 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11:09 | आपण शिकलो, |
11:12 | SQL View मध्ये Simple Query बनवणे. |
11:17 | simple SQLलिहिणे. |
11:20 | SELECT, FROM आणि WHERE ह्या clauses चा वापर. |
11:25 | fields आणि tables च्या नावांसाठी upper, lower किंवा mixed cases निवडणे. |
11:35 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:47 | ह्या प्रॉजेक्टचे आयोजन स्पोकन ट्युटोरियल टीमने केले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:55 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मीरंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |