LibreOffice-Suite-Base/C2/Build-a-complex-form-with-form-controls/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Build a complex form with form controls
Author: Manali Ranade
Keywords: Base
|
|
---|---|
00:00 | LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | Complex Forms वरील ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत, |
00:08 | complex form बनवणे आणि त्या form मध्ये बदल करणे. |
00:13 | मागील ट्युटोरियलमध्ये आपण forms वापरून data कसा भरायचा आणि Baseच्या सहाय्याने form मध्ये बदल कसा करायचा ते शिकलो. |
00:22 | या ट्युटोरियलमध्ये complex form कसा बनवायचा हे जाणून घेऊ. |
00:28 | LibreOffice Base program सुरू नसल्यास प्रथम आपण तो सुरू करा. |
00:44 | आणि आपला Library database उघडू या. |
00:47 | बेस पूर्वीपासूनच सुरू असल्यास आपण File मेनूमधील Open वर क्लिक करून Library database उघडू शकतो. |
00:57 | किंवा File मेनूमधील Recent Documents वरही क्लिक करू शकतो. |
01:03 | आपण लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवणारा नवा form तयार करू या. |
01:12 | स्क्रीनवर दर्शवलेल्या image प्रमाणे आपण हा form डिझाईन करू या. |
01:18 | बेसच्या मुख्य विंडोवर जा.आणि डाव्या पॅनेलमधील Database सूचीतील Formsया आयकॉनवर क्लिक करा. |
01:29 | आणि नंतर Use Wizard to create form वर क्लिक करा. |
01:34 | आता येथे Forms विंडो आणि आपल्याला परिचित असलेला Form wizard स्क्रीनवर दिसेल. |
01:41 | आपण या wizard बद्दल तपशीलवार माहिती घेतली असल्यामुळे आपण पुढे जाऊ या. |
01:49 | Field Selection या Step 1 मध्ये, आपण Tables or queries च्या ड्रॉप डाऊन मधूनTables:BooksIssued निवडू या. |
02:02 | double arrow असलेल्या बटणाच्या सहाय्याने डावीकडील सर्व fields उजवीकडे स्थलांतरित करा. <pause> |
02:10 | Next वर क्लिक करा. |
02:12 | Step 2 आपण सोडून देणार आहोत. खालील Next वर क्लिक करा. |
02:20 | आता आपण step 5 वर आहोत. आपण Columnar Labels Left ही रचना निवडून Next वर क्लिक करा. |
02:30 | पुन्हा Next वर क्लिक करा कारण आपण Step 6 देखील सोडून देणार आहोत. |
02:36 | Step 7 मध्ये Ice blue निवडून Next वर क्लिक करा. |
02:42 | step 8 मध्ये form ला Books Issued to Members असे नाव द्या. <pause> |
02:53 | आणि Modify the form हा पर्याय निवडा. |
02:57 | पुढे Finish या बटणावर क्लिक करा. |
03:00 | Wizard popup विंडो बंद होऊन आपल्याला form design विंडो दिसू लागेल. |
03:07 | येथे form चा वापर data entry साठी करण्यापूर्वी त्यात आपण काही बदल करणार आहोत. |
03:15 | प्रथम आपण form वर दिसत असलेले सर्व घटक Ungroup करून घेऊ. |
03:22 | असे केल्याने form वरील प्रत्येक घटकाच्या properties मध्ये बदल करणे सोपे होते. |
03:31 | एकाच वेळी form वरील सर्व घटक Ungroup करण्यासाठी प्रथम आपल्याला हे सर्व घटक सिलेक्ट करणे आवश्यक आहे. |
03:40 | हे करण्यासाठी प्रथम Form Design टूलबार उघडू या. |
03:46 | त्यासाठी वरील View मेनूमधील Toolbars क्लिक करा आणि नंतर Form Design वर क्लिक करा. |
03:56 | या टूलबारमधील पहिल्या आणि सगळ्यात डावीकडे असलेल्या mouse pointer या आयकॉनवर एकदा क्लिक करा. |
04:05 | आपण यापुढे ह्याला Select आयकॉन असे संबोधणार आहोत. |
04:11 | याचा उपयोग Formमधील घटक क्लिक करून सिलेक्ट करण्यासाठी आणि ड्रॅग करण्यासाठी होतो. |
04:18 | आता Formच्या डाव्या बाजूला वरती क्लिक करून उजव्या बाजूला खाली तिरपे ड्रॅग करा. |
04:26 | आपल्याला आता एका आड एक काळ्या पांढ-या ओळी असलेला आयत दिसेल. |
04:32 | Formमधील सर्व घटक या आयतात असल्याची खात्री करून घ्या. |
04:38 | Form मधील घटकांचा समूह सिलेक्ट करण्यासाठी आपण ही पध्दत सतत वापरणार आहोत. |
04:46 | आता आपल्याला या सर्व घटकांभोवती हिरव्या रंगाच्या छोट्या चौकटी दिसतील. |
04:53 | आता आपण येथे कुठलीही कृती केली तर तिचा परिणाम या भागातील सर्व घटकांवर एकसारखा होईल. |
05:02 | आता माऊसचा pointer कुठल्याही लेबलवर फिरवा. |
05:08 | आपल्याला दिसेल की labels आणि text boxes वर माऊसचा pointer अधिकच्या चिन्हासारखा दिसत आहे. |
05:18 | मग लेबलवर राईट क्लिक करून Group मधीलUngroup वर क्लिक करा. |
05:28 | आता आपण form वरील सर्व घटकांच्या वरती दर्शवले जाणारे heading टाईप करा. |
05:35 | त्यासाठी form मधील घटक खाली सरकवून ते formच्या मध्यभागी आणा. |
05:43 | प्रथम down arrow चे बटण सात वेळा दाबा. |
05:50 | मग right arrow चे बटण चौदा वेळा दाबा. |
05:57 | आपल्याला दिसेल की सिलेक्ट केलेले form वरील सर्व घटक उजव्या बाजूला आणि मध्यभागी स्थलांतरित झाले आहेत. |
06:07 | आता आपल्याला जेथे heading टाईप करायचे आहे तिथे कर्सर न्या. |
06:14 | त्यासाठी form विंडोच्या डावीकडे वरती क्लिक करा. |
06:21 | आणि दोन वेळा एंटरचे बटण दाबा. |
06:26 | टॅबचे बटण चार वेळा दाबा. आणि मग Form to track Books Issued to Members असे टाईप करा. |
06:38 | आपण एकेका labels आणि text box वर क्लिक केले असता आपल्याला असे दिसेल की एकेक labels आणि text box वेगवेगळी हायलाईट होत आहे. |
06:52 | पुढे आपण form वरील BookId आणि MemberId या लेबल्सची नावे बदलू या. |
07:00 | आपण BookId या लेबलवर डबल क्लिक करू. ज्यामुळे आपल्याला परिचित असलेली Properties विंडो उघडेल. |
07:12 | लेबलसमोर Book Title असे टाईप करा. |
07:18 | आता form वरील MemberId या लेबलवर क्लिक करा. |
07:25 | आपल्याला दिसेल की Properties विंडो रिफ्रेश झाली आहे. पुन्हा येथे आपण लेबल समोर Member Name टाईप करू या. |
07:34 | आपण टॅब की दाबल्यावर form वर आपल्याला नवीन बदललेले लेबल आल्याचे दिसेल. |
07:43 | आता पुढे आपण ह्या घटकांचा font size बदलू या. |
07:49 | पुन्हा सर्व घटक select करा. |
07:54 | आपण click, drag आणि drop या पध्दतीचा वापर करू या. |
07:59 | आणि आता आपण कुठल्याही लेबलवर डबल क्लिक केल्यावर Properties विंडो उघडेल. |
08:08 | font शोधण्यासाठी खाली scroll करा आणि त्याच्या उजवीकडे असलेल्या चौकोनी बटणावर क्लिक करा. |
08:18 | उघडलेल्या नव्या popup विंडोमध्ये Bold वर आणि size मध्ये आठवर क्लिक करा. |
08:26 | आणि Ok या बटणावर क्लिक करा. |
08:29 | आपल्या लक्षात येईल की संपूर्ण form चा font Bold झाला असून त्याचा आकार बदलून आठ झाला आहे. |
08:38 | पुढे आपण form मधील सर्व घटक स्थलांतरित करून ते विंडोच्या मध्यभागी आणा. |
08:45 | त्यासाठी आपण सर्व घटक सिलेक्ट करू या. |
08:49 | आता कुठल्याही लेबलवर क्लिक करून ते form design विंडोच्या मध्यभागी drag करा. |
09:00 | आता form सेव्ह करा. |
09:03 | आणि ही विंडो बंद करा. आता आपला form कसा दिसतो हे बघण्यासाठी, |
09:10 | बेसच्या मुख्य विंडोवर जा आणि उजव्या पॅनेल मधील Books Issued to Members या formवर डबल क्लिक करा. |
09:20 | येथे data entry करण्यासाठी तयार असलेला form उघडेल. |
09:26 | आता या form मध्ये आपल्याला काही sample data दिसेल. |
09:31 | book title आणि member name समोर आपल्याला काही आकडे दिसतील. |
09:37 | प्रत्यक्षात हे Books आणि Members table मधील primary numbers आहेत, जे आपल्या ओळखीचे नसतात. |
09:46 | तुम्हाला येथे पुस्तकांची नावे बघणे जास्त आवडेल. |
09:50 | आपण हे कसे करू शकतो? |
09:53 | एक पध्दत म्हणजे List box नामक form control समाविष्ट करणे. |
09:59 | आपण पुढील ट्युटोरियलमध्ये List boxसमाविष्ट करणे आणि त्याचा वापर तसेच इतर form controls बद्दल जाणून घेऊ. |
10:08 | आपण Complex Forms वरील या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:13 | आपण काय शिकलो ते थोडक्यात. Complex form बनवणे आणि त्या form मध्ये बदल करणे. |
10:20 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
10:40 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |