LibreOffice-Suite-Base/C2/Build-a-complex-form-with-form-controls/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Build a complex form with form controls

Author: Manali Ranade

Keywords: Base


Time Narration
00:00 LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 Complex Forms वरील ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
00:08 complex form बनवणे आणि त्या form मध्ये बदल करणे.
00:13 मागील ट्युटोरियलमध्ये आपण forms वापरून data कसा भरायचा आणि Baseच्या सहाय्याने form मध्ये बदल कसा करायचा ते शिकलो.
00:22 या ट्युटोरियलमध्ये complex form कसा बनवायचा हे जाणून घेऊ.
00:28 LibreOffice Base program सुरू नसल्यास प्रथम आपण तो सुरू करा.
00:44 आणि आपला Library database उघडू या.
00:47 बेस पूर्वीपासूनच सुरू असल्यास आपण File मेनूमधील Open वर क्लिक करून Library database उघडू शकतो.
00:57 किंवा File मेनूमधील Recent Documents वरही क्लिक करू शकतो.
01:03 आपण लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवणारा नवा form तयार करू या.
01:12 स्क्रीनवर दर्शवलेल्या image प्रमाणे आपण हा form डिझाईन करू या.
01:18 बेसच्या मुख्य विंडोवर जा.आणि डाव्या पॅनेलमधील Database सूचीतील Formsया आयकॉनवर क्लिक करा.
01:29 आणि नंतर Use Wizard to create form वर क्लिक करा.
01:34 आता येथे Forms विंडो आणि आपल्याला परिचित असलेला Form wizard स्क्रीनवर दिसेल.
01:41 आपण या wizard बद्दल तपशीलवार माहिती घेतली असल्यामुळे आपण पुढे जाऊ या.
01:49 Field Selection या Step 1 मध्ये, आपण Tables or queries च्या ड्रॉप डाऊन मधूनTables:BooksIssued निवडू या.
02:02 double arrow असलेल्या बटणाच्या सहाय्याने डावीकडील सर्व fields उजवीकडे स्थलांतरित करा. <pause>
02:10 Next वर क्लिक करा.
02:12 Step 2 आपण सोडून देणार आहोत. खालील Next वर क्लिक करा.
02:20 आता आपण step 5 वर आहोत. आपण Columnar Labels Left ही रचना निवडून Next वर क्लिक करा.
02:30 पुन्हा Next वर क्लिक करा कारण आपण Step 6 देखील सोडून देणार आहोत.
02:36 Step 7 मध्ये Ice blue निवडून Next वर क्लिक करा.
02:42 step 8 मध्ये form ला Books Issued to Members असे नाव द्या. <pause>
02:53 आणि Modify the form हा पर्याय निवडा.
02:57 पुढे Finish या बटणावर क्लिक करा.
03:00 Wizard popup विंडो बंद होऊन आपल्याला form design विंडो दिसू लागेल.
03:07 येथे form चा वापर data entry साठी करण्यापूर्वी त्यात आपण काही बदल करणार आहोत.
03:15 प्रथम आपण form वर दिसत असलेले सर्व घटक Ungroup करून घेऊ.
03:22 असे केल्याने form वरील प्रत्येक घटकाच्या properties मध्ये बदल करणे सोपे होते.
03:31 एकाच वेळी form वरील सर्व घटक Ungroup करण्यासाठी प्रथम आपल्याला हे सर्व घटक सिलेक्ट करणे आवश्यक आहे.
03:40 हे करण्यासाठी प्रथम Form Design टूलबार उघडू या.
03:46 त्यासाठी वरील View मेनूमधील Toolbars क्लिक करा आणि नंतर Form Design वर क्लिक करा.
03:56 या टूलबारमधील पहिल्या आणि सगळ्यात डावीकडे असलेल्या mouse pointer या आयकॉनवर एकदा क्लिक करा.
04:05 आपण यापुढे ह्याला Select आयकॉन असे संबोधणार आहोत.
04:11 याचा उपयोग Formमधील घटक क्लिक करून सिलेक्ट करण्यासाठी आणि ड्रॅग करण्यासाठी होतो.
04:18 आता Formच्या डाव्या बाजूला वरती क्लिक करून उजव्या बाजूला खाली तिरपे ड्रॅग करा.
04:26 आपल्याला आता एका आड एक काळ्या पांढ-या ओळी असलेला आयत दिसेल.
04:32 Formमधील सर्व घटक या आयतात असल्याची खात्री करून घ्या.
04:38 Form मधील घटकांचा समूह सिलेक्ट करण्यासाठी आपण ही पध्दत सतत वापरणार आहोत.
04:46 आता आपल्याला या सर्व घटकांभोवती हिरव्या रंगाच्या छोट्या चौकटी दिसतील.
04:53 आता आपण येथे कुठलीही कृती केली तर तिचा परिणाम या भागातील सर्व घटकांवर एकसारखा होईल.
05:02 आता माऊसचा pointer कुठल्याही लेबलवर फिरवा.
05:08 आपल्याला दिसेल की labels आणि text boxes वर माऊसचा pointer अधिकच्या चिन्हासारखा दिसत आहे.
05:18 मग लेबलवर राईट क्लिक करून Group मधीलUngroup वर क्लिक करा.
05:28 आता आपण form वरील सर्व घटकांच्या वरती दर्शवले जाणारे heading टाईप करा.
05:35 त्यासाठी form मधील घटक खाली सरकवून ते formच्या मध्यभागी आणा.
05:43 प्रथम down arrow चे बटण सात वेळा दाबा.
05:50 मग right arrow चे बटण चौदा वेळा दाबा.
05:57 आपल्याला दिसेल की सिलेक्ट केलेले form वरील सर्व घटक उजव्या बाजूला आणि मध्यभागी स्थलांतरित झाले आहेत.
06:07 आता आपल्याला जेथे heading टाईप करायचे आहे तिथे कर्सर न्या.
06:14 त्यासाठी form विंडोच्या डावीकडे वरती क्लिक करा.
06:21 आणि दोन वेळा एंटरचे बटण दाबा.
06:26 टॅबचे बटण चार वेळा दाबा. आणि मग Form to track Books Issued to Members असे टाईप करा.
06:38 आपण एकेका labels आणि text box वर क्लिक केले असता आपल्याला असे दिसेल की एकेक labels आणि text box वेगवेगळी हायलाईट होत आहे.
06:52 पुढे आपण form वरील BookId आणि MemberId या लेबल्सची नावे बदलू या.
07:00 आपण BookId या लेबलवर डबल क्लिक करू. ज्यामुळे आपल्याला परिचित असलेली Properties विंडो उघडेल.
07:12 लेबलसमोर Book Title असे टाईप करा.
07:18 आता form वरील MemberId या लेबलवर क्लिक करा.
07:25 आपल्याला दिसेल की Properties विंडो रिफ्रेश झाली आहे. पुन्हा येथे आपण लेबल समोर Member Name टाईप करू या.
07:34 आपण टॅब की दाबल्यावर form वर आपल्याला नवीन बदललेले लेबल आल्याचे दिसेल.
07:43 आता पुढे आपण ह्या घटकांचा font size बदलू या.
07:49 पुन्हा सर्व घटक select करा.
07:54 आपण click, drag आणि drop या पध्दतीचा वापर करू या.
07:59 आणि आता आपण कुठल्याही लेबलवर डबल क्लिक केल्यावर Properties विंडो उघडेल.
08:08 font शोधण्यासाठी खाली scroll करा आणि त्याच्या उजवीकडे असलेल्या चौकोनी बटणावर क्लिक करा.
08:18 उघडलेल्या नव्या popup विंडोमध्ये Bold वर आणि size मध्ये आठवर क्लिक करा.
08:26 आणि Ok या बटणावर क्लिक करा.
08:29 आपल्या लक्षात येईल की संपूर्ण form चा font Bold झाला असून त्याचा आकार बदलून आठ झाला आहे.
08:38 पुढे आपण form मधील सर्व घटक स्थलांतरित करून ते विंडोच्या मध्यभागी आणा.
08:45 त्यासाठी आपण सर्व घटक सिलेक्ट करू या.
08:49 आता कुठल्याही लेबलवर क्लिक करून ते form design विंडोच्या मध्यभागी drag करा.
09:00 आता form सेव्ह करा.
09:03 आणि ही विंडो बंद करा. आता आपला form कसा दिसतो हे बघण्यासाठी,
09:10 बेसच्या मुख्य विंडोवर जा आणि उजव्या पॅनेल मधील Books Issued to Members या formवर डबल क्लिक करा.
09:20 येथे data entry करण्यासाठी तयार असलेला form उघडेल.
09:26 आता या form मध्ये आपल्याला काही sample data दिसेल.
09:31 book title आणि member name समोर आपल्याला काही आकडे दिसतील.
09:37 प्रत्यक्षात हे Books आणि Members table मधील primary numbers आहेत, जे आपल्या ओळखीचे नसतात.
09:46 तुम्हाला येथे पुस्तकांची नावे बघणे जास्त आवडेल.
09:50 आपण हे कसे करू शकतो?
09:53 एक पध्दत म्हणजे List box नामक form control समाविष्ट करणे.
09:59 आपण पुढील ट्युटोरियलमध्ये List boxसमाविष्ट करणे आणि त्याचा वापर तसेच इतर form controls बद्दल जाणून घेऊ.
10:08 आपण Complex Forms वरील या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:13 आपण काय शिकलो ते थोडक्यात. Complex form बनवणे आणि त्या form मध्ये बदल करणे.
10:20 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
10:40 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Sneha