LibreOffice-Suite-Base/C2/Modify-a-simple-form/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Modify a Simple Form
Author: Manali Ranade
Keywords: Base
|
|
---|---|
00:00 | LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | Modifying a Form वरील ट्युटोरियलमध्ये आपण form मध्ये data कसा भरायचा आणि त्यात बदल कसा करायचा ते शिकणार आहोत. |
00:14 | मागील ट्युटोरियलमध्ये आपणLibreOffice Base मध्ये formकसा बनवायचा ते शिकलो. |
00:22 | आपण Library database मध्ये simple Books data entry form बनवला होता. |
00:29 | या formच्या सहाय्याने Books table मध्ये data कसा भरायचा ते पाहू. |
00:39 | जर LibreOffice Base हा प्रोग्रॅम चालू नसेल तर प्रथम तो सुरू करा. |
00:48 | आपला Library database उघडा. |
00:52 | जर बेस आधीपासून सुरू असल्यास आपण File menu मधील Open वर क्लिक करून Library database उघडू शकतो. |
01:03 | किंवा File menu मधील Recent Documents वर क्लिक करा. |
01:08 | आता आपण Library database मध्ये आहोत. |
01:12 | डावीकडील पॅनेलमधील database सूचीतील form या आयकॉनवर क्लिक करा. |
01:18 | या विंडोच्या मध्यभागी असलेल्या Forms खालील Books Data entry form, हायलाईट झालेला दिसेल. |
01:28 | या formच्या नावावर राईट क्लिक करा. आणि Open वर क्लिक करा. |
01:33 | blue background असलेली एक नवी विंडो दिसेल ज्यात Books table मधील fields शी संबंधित labels आणि text boxes आहेत. |
01:45 | tab key दाबत प्रत्येक फिल्डवर जा. शेवटच्या फिल्डवर क्लिक केल्यावर बेस पुढील record उघडेल. |
01:56 | अशा पध्दतीने आपण टेबलमधील records मधून पुढे पुढे जाऊ शकतो. |
02:00 | याशिवाय खालील black triangle आयकॉन वापरून सुध्दा आपण records मध्ये पुढे मागे प्रवास करू शकतो. |
02:10 | अन्यथा एखाद्या विशिष्ट record वर जाण्यासाठी खालील टूलबारमधे record number टाईप करून एंटर किंवा टॅब की दाबा. |
02:23 | आपण शेवटच्या म्हणजे पाचव्या record वर जाऊ या. |
02:29 | आता आपण नवीन record समाविष्ट करू या. |
02:34 | हे करण्यासाठी new record या आयकॉनवर क्लिक करा. ते खालील टूलबारवरील Last record या आयकॉनच्या उजवीकडील बटण आहे. |
02:46 | आपल्याला record number 6 असे खाली लिहिलेल्या Form वर रिकाम्या Text boxesदिसतील |
02:55 | आता आपण नव्या पुस्तकाची माहिती नवीन record मध्ये भरण्यासाठी तयार आहोत. |
03:03 | Title च्या text box मध्ये Paradise Lostअसे टाईप करा आणि पुढील fieldवर जाण्यासाठी tab या बटणाचा वापर करा. |
03:17 | author च्या पुढे John Milton असे टाईप करा. |
03:23 | PublishedYearच्या पुढे 1975 |
03:28 | Publisher म्हणून Oxford |
03:31 | आणि price च्या पुढे 200 |
03:36 | असे आपण Books Data Entry Form च्या सहाय्याने Books table मध्ये नवीन record समाविष्ट केले आहे. |
03:45 | ही विंडो बंद करू या. |
03:47 | आपण अशा पध्दतीने अधिक record किंवा Data समाविष्ट करू शकतो. |
03:53 | आत्ता आपण समाविष्ट केलेले शेवटचे record बेसने Books table मध्ये update केले की नाही हे बघू या. |
04:02 | त्यासाठी Base च्या मुख्य विंडोतील, उजव्या पॅनेलमधील Books table वर डबल क्लिक करा. |
04:12 | येथे Form च्या सहाय्याने आपण समाविष्ट केलेले new record दिसत आहे. |
04:18 | आता आपण ही विंडो बंद करू या. |
04:23 | पुढे आपण आपल्या Form मध्ये सोपे बदल कसे करायचे ते शिकणार आहोत. |
04:30 | त्यासाठी डाव्या पॅनेलमधील database सूचीतील Forms या आयकॉनवर क्लिक करा. |
04:37 | Books Data Entry form मध्ये बदल करण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा आणि मग edit वर क्लिक करा. |
04:47 | ही विंडो आपल्या परिचयाची आहे. |
04:51 | येथे जर आपण title वर क्लिक केले तर आपल्याला label आणि text box यांच्या भोवती green boxes उमटलेल्या दिसतील. |
05:03 | याचा अर्थ आपण form design विंडोमध्ये आहोत. |
05:08 | आणि आपण formचे स्वरूप त्यातील घटक आणि त्यांची कार्यप्रणाली यात बदल करू शकतो. |
05:17 | उदाहरणार्थ आपण लेबल्स आणि टेक्स्ट बॉक्सेसचे स्थान, आकार यात बदल करू शकतो. |
05:25 | याला properties असे म्हणतात. |
05:28 | title या लेबलवर क्लिक करा. |
05:31 | येथे properties नामक छोटी popup विंडो उघडेल. |
05:38 | येथे विविध घटक दिसत आहेत. |
05:48 | आता author या लेबलवर क्लिक करा. लक्षात घ्या की properties विंडो रिफ्रेश झाली असून ती author या लेबलच्या properties दाखवत आहे. |
06:01 | अशा प्रकारे आपण form वरील विविध घटकांवर क्लिक केल्यावर आपल्याला properties विंडो रिफ्रेश होऊन आपण निवडलेल्या घटकांच्या properties दाखवते. |
06:14 | Properties window चे title आता Properties MultiSelection झालेले दिसेल. |
06:21 | याचे कारण author हे लेबल आणि त्याचा शेजारील टेक्स्ट बॉक्स हे एका समूहात असून ते green boxes संचात बंदिस्त आहेत. |
06:34 | बेस form मध्ये आपोआप लेबल्स आणि त्याच्या संबंधित टेक्स्ट बॉक्सेसचा समूह बनतो. पण आपण हे वेगवेगळेही करू शकतो. |
06:44 | Titleच्या labelवर राईट क्लिक करून Group वर क्लिक करा आणि नंतर Ungroupवर क्लिक करा. |
06:54 | आपल्याला दिसेल की label title आणि त्याचा text box आता एका समूहात नाहीत. |
07:02 | अशा प्रकारे आपण form मधील प्रत्येक घटकाच्या properties मध्ये बदल करू शकतो. |
07:10 | आता title text box ला tool tip जोडू या. |
07:16 | Properties window च्या खालपर्यंत scroll करू या. |
07:22 | Help text या लेबलकडे लक्ष द्या. आणि येथे Enter the title of the book here असे टाईप करा. |
07:32 | आता वरील Fileमेनू खाली असलेल्या Save या आयकॉनवर क्लिक करून form सेव्ह करा आणि ही विंडो बंद करा. |
07:46 | आपण केलेल्या बदलानंतर आपला form कसा दिसतो याकडे एक नजर टाकू. |
07:54 | त्यासाठी बेसच्या मुख्य विंडोवर जाऊन डाव्या पॅनेलमधील Forms या आयकॉनवर क्लिक करा. |
08:03 | उजव्या पॅनेलमधील Books Data Entry Form वर क्लिक करा. |
08:10 | माऊसचा कर्सर टायटलच्या लेबलवर किंवा टेक्स्ट बॉक्सवर न्या. |
08:17 | Enter the title of the book here अशी tooltip आपल्याला दिसेल. |
08:24 | अशा प्रकारे आपण formमध्ये सोपे बदल कसे करायचे ते शिकलो. |
08:31 | बेस ट्युटोरियलच्या पुढील भागात formमध्ये अधिक बदल कसे करायचे हे आपण शिकणार आहोत. |
08:39 | आता assignment करू या. |
08:41 | Members table साठी simple form बनवा. |
08:46 | अशा प्रकारे आपण बेसमधील Modifying a Form या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:52 | थोडक्यात आपण formमध्ये Data कसा भरायचा आणि त्यात बदल कसा करायचा याबद्दल शिकलो. |
09:00 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
09:12 | सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. |
09:17 | *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
09:22 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |