C-and-C++/C2/First-C-Program/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:32, 31 August 2013 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: First-C-Program

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.02 C program च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.06 आपण शिकणार आहोत.
00.08 C मध्ये साधा program लिहिणे.
00.11 तो compile करणे.
00.13 व execute करणे.
00.14 आपण common errors आणि त्यावरील solutions सुद्धा बघू.
00.19 ह्या ट्युटोरियलसाठी आपण
00.22 Ubuntu operating system 11.10 आणि gcc Compiler चे version 4.6.1 वापरू.
00.31 ट्युटोरियलच्या सरावासाठी
00.33 तुम्हाला Ubuntu OS आणि Editor ची माहिती असणे आवश्यक आहे.
00.39 vim आणि gedit हे एडिटर्स आहेत.
00.42 येथे आपण gedit वापरू.
00.46 संबंधित ट्युटोरियल्स दिलेल्या website वर बघू शकता.
00.51 उदाहरणाच्या सहाय्याने C program कसा लिहायचा ते पाहू.
00.56 Ctrl, Alt आणि T बटणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
01.07 text editor उघडण्यासाठी prompt वर लिहा.
01.12 gedit” space “talk” dot “c” space “&” साइन
01.20 ampersand (&), prompt ला मुक्त करते.
01.25 C files चे extension dot “c” असते.
01.31 एंटर दाबा.
01.33 टेक्स्ट एडिटर उघडेल.
01.37 प्रोग्रॅम लिहिण्यास सुरूवात करा.
01.39 double slash “//” space टाईप करा.
01.42 My first C program”.
01.48 ओळीस कमेंट करण्यासाठी double slash वापरतात.
01.52 प्रोग्रॅम समजण्यासाठी कॉमेंटसचा वापर होतो.
01.56 हे documentation साठी उपयोगी पडते.
01.58 ह्यात प्रोग्रॅमसंबंधी माहिती देतात.
02.01 double slash ला single line comment म्हणतात.
02.07 एंटर दाबा.
02.09 hash “ #include” space opening bracket , closing bracket टाईप करा.
02.17 प्रथम कंस पूर्ण करून नंतर त्यात लिहिणे ही चांगली सवय आहे.
02.24 कंसात “stdio” dot”.” “h” टाईप करा.
02.30 stdio.h म्हणजे header file
02.34 standard input/output functions वापरत असलेल्या प्रोग्रॅममध्ये ही header file आवश्यक आहे. एंटर दाबा.
02.43 int” space “main” opening bracket, closing bracket “()” असे टाईप करा.
02.50 main हे विशिष्ट function आहे.
02.53 प्रोग्रॅम नेहमी या ओळीपासून कार्यान्वित होतो.
02.58 opening bracket आणि closing bracket ला parenthesis म्हणतात.
03.04 main पुढे Parenthesis असणे म्हणजे main हे function असल्याचे दाखवते.
03.11 int main function कुठेलही argument घेत नाही.
03.15 हे integer टाईपची व्हॅल्यू देते.
03.19 data types आपण दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू.
03.23 main function बद्दल अधिक माहितीसाठी स्लाईडसवर जाऊ.
03.30 program मध्ये main function आवश्यक असते.
03.33 पण एकापेक्षा अधिक main function चालत नाहीत.
03.37 नाहीतर प्रोग्रॅमची सुरूवात compiler ला सापडणार नाही.
03.41 कंसाची रिकामी जोडी main function मधे argument नसल्याचे दाखवते.
03.47 arguments बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये पाहू.
03.52 program मध्ये जाऊ. एंटर दाबा.
03.58 opening curly brace “{” टाईप करा.
04.00 opening curly bracket main function ची सुरूवात दाखवते.
04.05 closing curly bracket “}” टाईप करा.
04.08 closing curly bracket main function संपल्याचे दाखवते.
04.13 आता ह्या कंसांमध्ये
04.14 दोन वेळा एंटर दाबून नंतर कर्सर एक ओळ वर न्या.
04.20 Indentation मुळे code सहज वाचता येतो.
04.23 errors ही पटकन सापडतात.
04.26 तीन वेळा स्पेस द्या.
04.29 टाईप करा “printf” आणि पुढे opening bracket closing bracket “()”
04.34 printf हे टर्मिनलवर आउटपुट दाखवणारे C चे standard फंक्शन आहे.
04.39 कंसात double quotes मधे
04.44 printf स्टेटमेंटमधील double quotes मधे असलेले काहीही टर्मिनलवर प्रिंट होते.
04.50 Talk To a Teacher backslash n” असे टाईप करा.
05.00 Backslash n “\n” म्हणजे नवी ओळ.
05.03 printf हे function कार्यान्वित झाल्यावर कर्सर नवीन ओळीवर जाईल.
05.11 C statement हे semicolon “;” ने संपविणे आवश्यक आहे.
05.15 ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा.
05.19 Semicolon स्टेटमेंट टर्मिनेटरचे कार्य करतो.
05.24 एंटर दाबून तीन वेळा स्पेस द्या.
05.28 return” space “0” आणि semicolon;” टाईप करा.
05.34 ही ओळ integer zero देईल.
05.38 ह्या function चा टाईप int असल्यामुळे ते integer व्हॅल्यू परत देते.
05.45 फंक्शनमधील return statement कार्यान्वित होणारे शेवटचे स्टेटमेंट असते.
05.51 returned values संबंधी दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू.
05.56 फाईल "Save" करा.
06.00 सेव्ह करणे ही चांगली सवय आहे.
06.03 वीज खंडित झाल्यास होणारे नुकसान टळते.
06.06 प्रोग्रॅम क्रॅश झाल्यास होणारे नुकसानही टळते
06.11 प्रोग्रॅम compile करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
06.15 टाईप करा “gcc” space “talk.c” space hyphen “-o” space “myoutput”
06.24 gcc हा compiler आहे.
06.27 talk.c हे filename .
06:30 -o myoutput सांगते की कार्यान्वित झालेले आऊटपुट myoutput ह्या फाईलमध्ये गेले पाहिजे.
06.37 एंटर दाबा.
06.39 प्रोग्रॅम compile झालेला दिसेल.
06.42 ls -lrt, टाईप केल्यावर सर्वात खाली myoutput ही फाईल तयार झालेली दिसेल.
06.54 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी dot slash “./myoutput” टाईप करून एंटर दाबा.
07.01 Talk To a Teacher” हे आऊटपुट दिसेल.
07.06 return ही कार्यान्वित होणारी शेवटची ओळ असते.
07.10 म्हणजेच return स्टेटमेंटनंतर काहीही कार्यान्वित होत नाही.
07.16 प्रोग्रॅमकडे परत जाऊ.
07.17 return statement नंतर अजून एक printf statement समाविष्ट करून टाईप करा. printf("Welcome \n")at the end type a semicolon.
07.35 सेव्ह करा.
07.37 टर्मिनलवर जाऊन compile आणि execute करा.
07.41 up arrow key दाबून पूर्वीच्या कमांडस परत मिळवू शकतो.
07.46 जे आता मी केले.
07.51 आपल्याला दिसेल की दुसरे welcome स्टेटमेंट कार्यान्वित झाले नाही.
07.58 प्रोग्रॅमकडे परत जाऊ.
08.00 'Welcome' statement हे return statement च्या वर लिहा.
08.07 सेव्ह करा.
08.09 compile आणि execute करा.
08.15 दुसरे printf statement, welcome कार्यान्वित झालेले दिसेल.
08.23 common errors पाहण्यासाठी प्रोग्रॅमकडे परत जाऊ.
08.29 समजा “stdio.h” मध्ये dot लिहिण्यास विसरलो. हे सेव्ह करा.
08.35 compile आणि execute करा.
08.42 हे बघा.
08.43 talk.c file च्या दुस-या ओळीवर fatal error मिळाली आहे.
08.48 compiler ला “stdioh” नावाची header file न मिळाल्याने no such file or directory ही error मिळाली.
08.59 हे compilation संपुष्टात आले.
09.03 ही एरर दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊन पुन्हा dot “.” समाविष्ट करून सेव्ह करा.
09.11 compile आणि execute करा. आता हे काम करत आहे.
09.19 आणखी एक error पाहू.
09.23 पुन्हा प्रोग्रॅमकडे जाऊ.
09.26 समजा आपण ओळीच्या शेवटी semicolon देण्यास विसरलो.
09.31 हे सेव्ह करूनcompile आणि execute करा.
09:42 talk.c ह्या file च्या ओळ क्रमांक सहा वर error दिसेल. printf च्या आधी semicolon अपेक्षित आहे.
09.51 पुन्हा प्रोग्रॅमकडे जाऊ. semicolon हे स्टेटमेंट टर्मिनेटर म्हणून काम करते.
09.59 हे पाचव्या ओळीच्या शेवटी आणि सहाव्या ओळीच्या सुरूवातीला शोधले जाईल.
10.07 ही सहावी ओळ आहे.
10.09 येथे शेवटी semicolon देऊ शकतो.
10.13 compiler ने देखील सहाव्या ओळीवर एरर दिली होती.
10.18 आता semicolon देऊन पाहू.
10.24 सेव्ह करा.
10.26 Compile आणि execute करा. हे कार्य करीत आहे.
10.33 पुन्हा प्रोग्रॅमवर जाऊ. ह्या ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा.
10.41 कारण ओळीच्या शेवटी semicolon टाईप करण्याची पध्दत आहे. सेव्ह करा.
10.49 Compile आणि execute करा. हे कार्य करत आहे.
10.55 स्लाईडस वर परत जाऊ.
10.57 Assignment
10.59 "Welcome to the World of C" असे प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा.
11.03 printf statement मध्ये “\n” समाविष्ट नसेल तर काय होते ते बघा.
11.09 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11.12 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11.15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11.18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11.22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11.25 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.28 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.32 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11.38 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.42 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11.48 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.51 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana