Health-and-Nutrition/C2/Indian-Law-to-Protect-Breastfeeding/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:12, 20 July 2021 by Latapopale (Talk | contribs)
|
|
00:00 | स्तनपान संरक्षित करण्याच्या भारतीय कायद्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: |
00:09 | बाळाच्या दुधाचे पर्याय किंवा आयएमएस. |
00:13 | आयएमएस कायदा. |
00:16 | सर्वप्रथम समजून घेऊ, बाळाच्या दुधाचे पर्याय काय आहेत? |
00:23 | पावडचे दूध(इन्फंट मिल्क) आयएमएसदेखील म्हणतात. |
00:29 | आयएमएस म्हणजे आंशिक म्हणून सादर केलेला शिशू आहार |
00:33 | किंवा आईच्या दुधाची पूर्णपणे बदली |
00:39 | त्यात 2 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सर्व बाळाचे विकतचे तयार खाद्यपदार्थांचा समावेश आहे. |
00:48 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण आयएमएसचा संदर्भ बाळाचे विकतचे तयार खाद्यपदार्थ किंवा शिशू आहार म्हणून घेऊ. |
00:58 | लोक बाळाचे विकतचे तयार खाद्यपदार्थ का वापरतात? |
01:03 | बाळांच्या विकतचे तयार खाद्यपदार्थाचा वापर लोकप्रिय होण्यासाठी 5 मोठी कारणे आहेत. |
01:11 | पहिले कारण म्हणजे दंतकथा जे बाळांच्या खाद्यपदार्थाची तुलना आईच्या दुधाशी करते. |
01:20 | असा विश्वास आहे की ते आईच्या दुधाइतकेच चांगले आहेत. |
01:26 | ते आईच्या दुधाला पूर्णतः पूरक म्हणून वापरू शकतात. |
01:31 | अपुरी माहिती असलेले काही लोक कदाचित आईच्या दुधापेक्षा ते चांगले मानू शकतात. |
01:40 | ही दंतकथा लोकप्रिय आहे कारण त्यामुळे होणारे नुकसान माहित नसते किंवा सहज दिसत नाहीत. |
01:48 | लोकांना त्यांच्या हानिकारक परिणामाविषयी योग्यप्रकारे मार्गदर्शन केले जात नाही. |
01:54 | तसेच, विपणन तंत्र ते आईच्या दुधाच्या बरोबरीचे आहे असे दर्शवितात. |
02:02 | आणि बर्याच डॉक्टरांना किंवा आरोग्यसेवेच्या कर्मचार्यांना त्यांच्या हानिकारक परिणामाविषयी माहित नसते. |
02:10 | स्तनपान न केल्यामुळे होणारे नुकसान त्यांना माहित नाही. |
02:17 | म्हणूनच, बहुतेक लोक बाळांचे विकतचे तयार खाद्यपदार्थ असुरक्षित मानत नाहीत. |
02:25 | बाळांच्या विकतच्या तयार खाद्यपदार्थांची सर्वसामान्य सामाजिक मान्यता आहे. |
02:32 | हे पाजणाऱ्या बाटल्या आणि कृत्रिम निप्पल्सनादेखील लागू आहे. |
02:39 | कोणतेही बाळांचे विकतचे तयार खाद्यपदार्थ हे स्तनपान समतुल्य असू शकत नाही. |
02:46 | ते आईच्या दुधाच्या सामान्य घटकांचे अनुकरण करू शकतात. |
02:52 | सामान्य घटकांमध्ये प्रथिने, उष्मांक किंवा चरबी समाविष्ट असतात. |
02:59 | तरीदेखील, त्यामध्ये आईच्या दुधाचे असंख्य घटक असू शकत नाहीत. |
03:06 | तसेच, प्रत्येक आई आणि तिच्या बाळासाठी आईचे दूध बदलते. |
03:13 | बाळांच्या विकतच्या तयार खाद्यपदार्थांमध्ये हा दर्जा नसतो. |
03:18 | सर्व माता आणि बाळांसाठी ते समान आहेत. |
03:24 | त्यांच्याकडे स्तनपानाचे मानसिक-भावनिक फायदेदेखील नाहीत. |
03:31 | त्यामुळे कुपोषण किंवा लठ्ठपणा येतो. |
03:38 | ते संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांनादेखील कारणीभूत होतात. |
03:44 | या रोगांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा समावेश आहे |
03:48 | आणि एलर्जीस (वावडे). |
03:51 | त्यांचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे त्यांना बाळांसाठी स्तनपानाचे महत्त्व वाटत नाही. |
03:59 | ते लोकांना स्तनपान फुकट आणि सर्वोत्तम आहे हे पाहण्यापासून रोखतात. |
04:08 | बाळांचे खाद्यपदार्थ वापरण्याचे दुसरे कारण म्हणजे तो एक सोपा शॉर्टकट(छोटा मार्ग) असल्यासारखे दिसते. |
04:16 | स्तनपान हे एक कौशल्य आहे. |
04:19 | स्तनपानाचे योग्य तंत्र शिकण्यासाठी किंवा त्यास मदत करण्यासाठी वेळ आणि प्रयत्न लागतात. |
04:28 | स्तनपान कसे द्यावे हे शिकताना समस्या येऊ शकतात. |
04:34 | घरी स्तनपान देण्यासाठी आईला कुटुंबाच्या आधाराची गरज भासते. |
04:40 | घराबाहेर किंवा कामावर स्तनपान देण्यासाठी तिला समाजाची साथदेखील आवश्यक आहे. |
04:49 | म्हणून, बाळांचे विकतच्या तयार खाद्यपदार्थांना सोयीस्कर पर्याय मानले जातात. |
04:57 | आता बाळांच्या विकतच्या तयार खाद्यपदार्थांच्या वापराच्या तिसर्या कारणाबद्दल चर्चा करू. |
05:04 | योग्य माहिती नसलेले आरोग्य सेवा देणारे कर्मचारी बाळाचे खाद्यपदार्थ एक सोपा मार्ग म्हणून वापरतात. |
05:12 | योग्य प्रकारे स्तनपान देण्यास मातांना कशी मदत करावी हे त्यांना कदाचित ठाऊक नसते. |
05:18 | तर, अशा समस्याप्रधान परिस्थितीत, ते मुलभूतपणे बाळांच्या विकतच्या तयार खाद्यपदार्थांची शिफारस करतात. |
05:27 | बाळांचे खाद्यपदार्थ वापरण्याचे चौथे कारण म्हणजे उत्पादकांकडून त्यांची जोरदार जाहिरात. |
05:36 | लोकांनी बाळांचे खाद्यपदार्थ खरेदी करावे यासाठी शास्त्रीय शब्द आणि बक्षिसांचा वापर करतात. |
05:44 | त्यांचा उपयोग आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचार्यांना बाळाचे आहार सहज लिहून देण्यासाठी पटवून देण्यासाठी केला जातो. |
05:52 | बाळांचे खाद्यपदार्थ खाण्याचे पाचवे कारण म्हणजे नवमातांची भावनात्मक दुर्बलता. |
06:01 | त्यांच्या चिंता त्यांच्या स्वतःच्या समस्यांदरम्यान वाढतात. |
06:06 | पूर किंवा कोविड -19 यासारख्या आपत्तींच्या काळातही त्या वाढतात. |
06:16 | त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांना असे वाटते की त्यांच्या बाळासाठी आईचे दूध पुरेसे नाही. |
06:23 | ते बाळांच्या खाद्यपदार्थांच्या उपयुक्ततेबद्दल चुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू लागतात. |
06:31 | मग ते बाळांचे विकतचे तयार खाद्यपदार्थ वापरण्यास सुरवात करतात. |
06:37 | आता बाळांच्या विकतच्या तयार खाद्यपदार्थांच्या जाहिरातीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात चर्चा करू. |
06:45 | त्याचा शोध लागल्यापासून, जाहिरातीमुळे स्तनपान महत्त्वपूर्ण नसल्याचे दिसून आले आहे. |
06:53 | त्यांच्या कंपन्या गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिला आणि आरोग्य कामगारांना थेट लक्ष्य करतात. |
07:02 | ते पोषण किंवा स्तनपानावरील कार्यशाळांद्वारे बाळांच्या खाद्यपदार्थांची जाहिरात करण्याचा प्रयत्न करतात. |
07:09 | पूर किंवा भूकंप यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत ते विनामूल्य उत्पादनाचे वितरण करतात. |
07:19 | किराणा दुकान आणि मेडिकल स्टोअरमध्ये (औषधांच्या दुकानांमध्ये) ते बाळांच्या खाद्यपदार्थांची जाहिरात करण्याचा प्रयत्न करतात. |
07:27 | बाळांचे विकतचे तयार खाद्यपदार्थ दुकानांमध्ये स्पष्टपणे दर्शविले जातात. |
07:33 | ते बाळांचे विकतचे तयार खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी लोकांना आमिष दाखविण्यासाठी प्रोत्साहन देतात. |
07:42 | हे डावपेच बालकांसाठी किती हानिकारक आहेत हे आरोग्य कार्यकर्त्यांना जाणवले. |
07:50 | बाल्यावस्था हा जीवनाचा असुरक्षित काळ आहे. |
07:55 | बाळाच्या खाद्यपदार्थांचा अयोग्य वापर करणे यासारख्या अयोग्य आहार पद्धती अतिशय धोकादायक असतात. |
08:05 | तर, बाळांच्या विकतच्या तयार खाद्यपदार्थांच्या जाहिरातींच्या नियमनात विशेष कायदे आवश्यक आहेत. |
08:14 | म्हणून, ब्रेस्टमिल्क सबस्टिट्यूट्सची आंतरराष्ट्रीय विपणन संहिता तयार केली गेली. |
08:23 | 1981मध्ये वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ने त्याला अंगिकारले होते. |
08:30 | सर्व देशांना बाळाच्या खाद्यपदार्थाच्या विपणनाचे नियमन करण्याचा आग्रह केला. |
08:39 | भारताने बालकांच्या दुधाला पर्यायी अन्न, दूध पाजण्याच्या बाटल्या आणि बालकांचे खाद्यपदार्थ (उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन) कायदा १९९२ आणि सुधारित कायदा २००३ लागू केला. |
08:57 | याला आयएमएस कायदा असेही म्हणतात. |
09:02 | कोड लागू करताना सर्व देशांनी असे बरेच कायदे केले आहेत. |
09:09 | सर्व कायद्यांपैकी, आयएमएस कायदा सर्वात कडक कायद्यांपैकी एक आहे. |
09:17 | आयपीएस कायद्यातील तरतुदी बीपीएनआय ने स्पष्टपणे मांडल्या आहेत. |
09:25 | बीपीएनआय म्हणजे ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया. |
09:32 | आता, आयएमएस कायद्याच्या 10 उल्लंघनांबद्दल चर्चा करू. |
09:39 | आयएमएस कायद्याचे उल्लंघन केले असे मानले जाते जर : |
09:44 | खाद्यपदार्थाची जाहिरात कोणत्याही प्रकारे विशेषतः 2 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी केली. |
09:53 | खाद्यपदार्थाच्या नावाने काही फरक पडत नसल्यास, |
09:57 | आयएमएस कायद्याच्या कक्षेत असलेल्या उत्पादनांची जाहिरात केल्यास, |
10:04 | यात बाळाच्या दुधाचे पर्याय, दूध पाजण्याच्या बाटल्या आणि बालकाच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. |
10:12 | कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही माध्यमातील कोणतीही जाहिरात आयएमएस कायद्याचे उल्लंघन करते. |
10:20 | त्यात टीव्ही, वर्तमानपत्रे, मासिके, जर्नल्स(पत्रिका), रेडिओ, एसएमएस जाहिरातींचा समावेश आहे. |
10:30 | यात प्रसारमाध्यम, जाहिरात फलके, फलके आणि इतर जाहिरातींचा समावेश आहे. |
10:39 | जर उत्पादन किंवा त्याचे नमुने कोणत्याही व्यक्तीस थेट वितरीत केले गेले तर. |
10:47 | यात गर्भवती महिला किंवा स्तनपान देणारी महिलांचा समावेश आहे. |
10:53 | उत्पादन वापरण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन दिल्यास, |
11:01 | प्रोत्साहन हे सवलत किंवा विनामूल्य भेटवस्तू इ. असू शकते. |
11:08 | आयएमएसच्या जाहिरातींशी संबंधित शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्यास, |
11:16 | या उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी लेबलांवर(खूणपट्टीवर) विशिष्ट चित्रे असल्यास, |
11:24 | ही चित्रे माता, बाळ, कार्टून(व्यंगचित्र), ग्राफिक्स इत्यादी असू शकतात. |
11:33 | एखाद्या रुग्णालय, शुश्रूषालय, औषधांचे दुकानाने कोणत्याही प्रकारे आयएमएसला प्रोत्साहन दिल्यास, |
11:41 | यात आयएमएस कंपन्यांचे फलक किंवा भित्तीपत्रिका प्रदर्शित करणे समाविष्ट आहे. |
11:49 | आयएमएसच्या जाहिरातीसाठी आरोग्य कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांना पैसे किंवा भेटवस्तू दिल्या गेल्या तर, |
11:58 | आयएमएस कंपनी किंवा त्याचे वितरक थेट किंवा अप्रत्यक्ष योगदान देत असल्यास, |
12:08 | यामध्ये चर्चासत्रे, |
12:11 | सभा, परिषद |
12:14 | किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी वित्तपुरवठा समाविष्ट आहे. |
12:17 | यात प्रायोजकत्व, |
12:21 | संशोधन अनुदान किंवा शिष्यवृत्ती ह्यांचादेखील समावेश आहे. |
12:25 | आरोग्य कर्मचारी किंवा त्यांच्या संघटनांच्या प्रायोजकत्वांनादेखील परवानगी नाही. |
12:33 | आयएमएसच्या विक्रीचे प्रमाण विक्री आयोग निश्चित करण्यासाठी आधार असल्यास, |
12:42 | असे केल्याने, आयएमएस कंपनी किंवा त्याचे उत्पादन वितरक आयएमएस कायद्याचे उल्लंघन करतात. |
12:51 | कृपया ह्या उल्लंघनांचा त्वरित अहवाल द्या. |
12:56 | त्यासाठी तुम्ही बीपीएनआय स्टेपन सुरक्षा मोबाइल एप्लिकेशन वापरू शकता. |
13:05 | हे एप्लिकेशन वापरकर्त्यासाठी खूप अनुकूल आहे. |
13:11 | उल्लंघनाचा अहवाल देण्यासाठी फक्त 2 सोप्या चरणांचा यात समावेश आहे. |
13:17 | तुम्हाला कोणतेही उल्लंघन आढळल्यास, एप्लिकेशन उघडा. |
13:23 | मेनूमधील 'Report promotion of baby foods or feeding bottles' टॅबवर क्लिक करा. |
13:32 | अहवाल पृष्ठ उघडेल. |
13:36 | नियुक्त कॉलममध्ये आवश्यक माहिती प्रदान करा. |
13:42 | तुमच्याकडे असलेले कोणतेही छायाचित्र किंवा कागदपत्र जोडा. |
13:48 | ते सबमिट करा. |
13:51 | लक्षात ठेवा, आयएमएस कंपन्या त्यांच्या जाहिरातींमध्ये स्तनपानाचे फायदे सांगू शकतात. |
13:59 | तथापि, अशी कोणतीही जाहिरात आईला स्तनपान देण्याच्या तिच्या योजनेवर संशय करते. |
14:07 | त्यांच्या जाहिराती शक्य तितक्या अनेक मातांना बाळांचे खाद्यपदार्थ विकण्यासाठी तयार केल्या आहेत. |
14:14 | जितक्या लवकर आई स्तनपान देणे थांबवेल तितके अधिक फॉर्मुला खरेदी केले जाईल. |
14:21 | म्हणूनच आयएमएस कंपन्या स्तनपानाला बिनमहत्त्वाचे करण्याचा प्रयत्न करतात. |
14:30 | कमीतकमी 2 वर्षापर्यंत मुलासाठी स्तनपान देणे आवश्यक आहे. |
14:38 | स्तनपानाचे योग्य तंत्र पुरेश्या प्रमाणात स्तनपान देण्याकरिता महत्त्वाचे आहे. |
14:45 | ह्याच मालिकेतील इतर ट्युटोरिअल्समध्ये ह्याची चर्चा आहे. |
14:51 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. |