Health-and-Nutrition/C2/Importance-of-breastfeeding/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:08, 20 July 2021 by Latapopale (Talk | contribs)
|
|
00:00 | स्तनपानाचे महत्त्व ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : |
00:09 | स्तनपानाचे महत्त्व. |
00:12 | बाळ आणि मातांना स्तनपानाचे फायदे |
00:17 | स्तनपान ही एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. |
00:19 | हे मुलाच्या जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत किंवा त्याहून अधिक काळ सुरू राहते. |
00:26 | स्तनपानामुळे बाळाच्या आयुष्याची निरोगी सुरुवात होते. |
00:31 | हे मूल आणि आईचे भविष्यातील आरोग्य त्वरित ठरवते. |
00:38 | त्याचा फायदा ह्या दोघांसाठी आयुष्यभर टिकतो. |
00:43 | कुपोषित मातासुद्धा आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकतात. |
00:49 | गर्भधारणेदरम्यान, स्तनाचा आकार वाढतो. |
00:53 | हे दूध उत्पादनाच्या ऊतींच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आहे. |
00:59 | तथापि, स्तनांच्या अंतिम आकाराचा दुधाच्या उत्पादनावर परिणाम होत नाही. |
01:07 | जन्माच्या एका तासाच्या आत स्तनपान सुरू केले पाहिजे. |
01:13 | ह्यामुळे आईच्या दुधाचा पुरवठा वाढतो. |
01:17 | म्हणूनच, पहिल्या 6 महिन्यांत केवळ स्तनपानदेखील वाढते. |
01:24 | हे पुढे जाऊन स्तनपान 2 वर्षापेक्षा जास्त वाढविण्यात मदत करते. |
01:31 | एका तासाच्या आत स्तनपान करणार्या बाळांमध्ये नवजात मृत्यूचा धोका कमी असतो. |
01:39 | स्तनपानास विलंब केल्यामुळे नवजात शिशूंमध्ये आजार होण्याचा धोका वाढू शकतो. |
01:47 | उदाहरणार्थ, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब. |
01:53 | स्तनपानाची लवकर सुरुवात बाळाला कोलोस्ट्रम मिळते ह्याची खात्रीदेखील देते. |
02:00 | कोलोस्ट्रम हे बाळाला जन्म दिल्यानंतर आईने स्रावित केलेले पहिले दूध आहे. |
02:07 | मुलांसाठी, हे ऊर्जा आणि पोषक घटकांचे प्राथमिक स्रोत आहे. |
02:13 | त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. |
02:20 | यात मोठ्या संख्येने संसर्ग-लढाऊ घटक आहेत, |
02:24 | जीवनसत्त्व अ आणि |
02:26 | चांगली चरबी. |
02:28 | कोलोस्ट्रममध्ये वाढ आणि संरक्षणात्मकाचे असंख्य घटकही आहेत. |
02:35 | कोलोस्ट्रममध्ये गुणधर्म आहे जे आधीची विष्ठा जलद काढून टाकण्यास मदत करते. |
02:42 | दुसर्या ट्युटोरिअलमध्ये कोलोस्ट्रमचे फायदे ह्यांची विस्तृत चर्चा केली आहे. |
02:48 | कृपया अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या (वेबसाईट पहा). |
02:52 | लक्षात ठेवा की विशेष स्तनपान पहिल्या 6 महिन्यांपर्यंत दिले पाहिजे. |
02:59 | आईचे दूध एक अद्वितीय नैसर्गिक खाद्य आहे ज्याची दुसरी प्रत शक्य नाही. |
03:05 | जेव्हा बाळ 6 महिने पूर्ण करते तेव्हा पूरक अन्न सुरू केले पाहिजे. |
03:12 | हे आईच्या दुधासोबत द्यावे. |
03:16 | स्तनपान 2 वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ चालू ठेवले पाहिजे. |
03:22 | बाळांना स्तनपानाचे बरेच फायदे आहेत. |
03:27 | पोषक घटक आणि आईच्या दुधाची रचना बाळांकडून पचनास आदर्श आहे. |
03:34 | स्तनपानाद्वारे बाळांना प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) प्राप्त होतात. |
03:38 | प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) बाळाची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि संक्रमणाचा धोका कमी करते. |
03:46 | ह्या व्यतिरिक्त, ते बाळांमध्ये अॅलर्जिक प्रतिक्रिया प्रतिबंधित करते. |
03:52 | आईच्या दुधात वाढीचे घटकदेखील असतात. |
03:56 | ते बाळाच्या आतड्यांच्या अस्तराच्या वाढीस मदत करतात. |
04:02 | हे बाळाच्या आतड्यात चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस प्रोत्साहन देते. |
04:08 | अशाप्रकारे हे बाळाचे आतड्यांसंबंधी जळजळ आणि संसर्गापासून संरक्षण करते. |
04:16 | त्याचप्रमाणे, हे शरीराच्या इतर अवयवांच्या विकासास मदत करते. |
04:22 | स्तनपान अतिसाराचा धोका कमी करते. |
04:27 | इतर फायदे आहेत – कानातील संसर्ग रोखणे |
04:31 | आणि दात किडणे. |
04:33 | जबड्यांचा विकास आणि दातांचे योग्य संरेखन ही इतर काही उदाहरणे आहेत. |
04:41 | आयुष्यात नंतर काही आजार होण्याचा धोकाही कमी होतो. |
04:48 | उदाहरणार्थ, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि रक्त कर्करोग. |
04:56 | दमा आणि न्यूमोनियासारख्या श्वसन रोगांचा धोकादेखील कमी होतो. |
05:04 | स्तनपान केल्यामुळे एका वर्षाखालील मुलांमध्ये अचानक मृत्यूची शक्यता कमी होते. |
05:14 | स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये एटॉपिक एक्जिमा विकसित होण्याचा धोकाही कमी आहे. |
05:22 | एक्जिमा ही अशी स्थिती आहे ज्यात त्वचा लाल होते, त्वचेला खाज सुटते आणि खडबडीत चट्टे उठतात. |
05:30 | स्तनपान करणाऱ्या मुलांना आजारपण आणि संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्याची शक्यताही कमी असते. |
05:39 | स्तनपान करणार्या मुलांच्या भूकेवर अधिक चांगले नियंत्रण असते. |
05:44 | आईच्या दुधात भूक नियंत्रित करणारे संप्रेरक (हार्मोन्स) असतात. |
05:48 | अशा संप्रेरकांमुळे (हार्मोन्समुळे) मुलांना त्यांच्या शरीराची भूक आणि तृप्तीचे संकेत ऐकण्यास मदत होते. |
05:57 | स्तनपान न केलेल्या बाळांमध्ये हे स्वयं-नियमन विचलित झाले आहे. |
06:03 | अखेरीस यामुळे जास्त खाणे, |
06:07 | लठ्ठपणा आणि नंतर मधुमेह होऊ शकते. |
06:11 | स्तनपानाचा मेंदूवरही परिणाम होतो. |
06:15 | आईच्या दुधात असे घटक असतात जे मेंदूचा विकासात आणि परिपक्वतेत मदत करतात. |
06:23 | स्तनपान करणार्या मुलांचे बुद्ध्यांक आणि इतर कौशल्ये जास्त असतात. |
06:28 | आईच्या दुधाचा अकाली जन्मलेल्या बाळांना अधिक फायदा होतो. |
06:34 | स्तन चोखल्यामुळे अशा मुलांचे श्वासोच्छ्वास सुधारते. |
06:40 | ह्या मुलांना आतड्यांसंबंधी संसर्ग होण्याचा धोका असतो. |
06:47 | उदाहरणार्थ : अतिसार आणि नेक्रोटिझिंग एन्टरोकॉलिटिस ज्याला 'एनईसी' म्हणून ओळखले जाते. |
06:56 | 'एनईसी' ही एक आतड्यातील संसर्ग आणि क्षतीमुळे होणारी गंभीर स्थिती आहे. |
07:05 | आईचे दूध अकाली जन्मलेल्या बाळांना ह्या संसर्गापासून वाचवते. |
07:11 | अकाली जन्मलेल्या बाळांच्या मातांचे दूध संसर्ग लढाऊ प्रथिनांनी समृद्ध आहे. |
07:19 | यात आतड्यांसंबंधी संरक्षणात्मक वाढीस प्रोत्साहित करणारे घटकदेखील आहेत. |
07:25 | विशिष्ट अमीनो आम्ल आणि चांगले बॅक्टेरियादेखील (जीवाणू) उच्च प्रमाणात आहेत. |
07:33 | अकाली जन्मलेल्या अर्भकांच्या वाढीसाठी हे अमीनो आम्ल आवश्यक आहेत. |
07:40 | अशाप्रकारे, आईचे दूध संक्रमण रोखण्यात |
07:43 | आणि वजन वाढविण्यात मदत करते. |
07:46 | स्तनपानामुळे अकाली जन्मामुळे होणारी दीर्घकालीन समस्या कमी होतात. |
07:52 | उदाहरणार्थ, फुफ्फुस आणि डोळे यांच्या समस्या. |
07:57 | अशाप्रकारे, अकाली जन्मलेल्या बाळांना जास्तीत जास्त आईचे दूध मिळावे. |
08:04 | केएमसी म्हणून ओळखल्या जाणारी कंगारू मदर केअरदेखील अकाली जन्मलेल्या बाळांसाठी उपयुक्त आहे. |
08:12 | हे त्यांच्यात स्तनपान करण्याची वारंवारता आणि कालावधी सुधारते. |
08:18 | केएमसी दरम्यान आईचा व बाळाचा अनावृत्त स्पर्शादरम्यान बाळाच्या शरीराचे तापमान राखण्यात मदत होते. |
08:27 | हे बाळाच्या हृदयाचे ठोके आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी स्थिर करण्यास मदतदेखील करते. |
08:35 | दुसर्या ट्युटोरिअलमध्ये 'कांगारू मदर केअर' ची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. |
08:42 | बाळांव्यतिरिक्त, स्तनपान हे मातांसाठीदेखील फायदेशीर आहे. |
08:48 | फायदे त्वरित आणि दीर्घकालीन आहेत. |
08:53 | बाळंपणानंतर ताबडतोब स्तनपान दिल्यामुळे योनीतून रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. |
08:59 | हे शरीरात ऑक्सिटोसिन संप्रेरकची (हार्मोनची) पातळी वाढवते. |
09:05 | हे नाळ शरीरातून बाहेर काढण्यात मदत करते. |
09:09 | परिणामी गर्भाशयाचे आकुंचन सुधारते आणि योनीतून रक्तस्त्राव कमी होतो. |
09:17 | अशाप्रकारे, मातांमधील अशक्तपणा टाळता येतो. |
09:21 | मातांसाठी स्तनपानाचे मानसिक फायदे आहेत. |
09:27 | वारंवार आईचा व बाळाचा अनावृत्त स्पर्शाच्या संपर्कात राहण्यामुळे आई आणि तिचे बाळ यांच्यात संबंध वाढतात. |
09:35 | हे संबंध आईला स्तनपान देण्यास तयार करते. |
09:39 | शेवटी, यामुळे मातांमध्ये प्रसुतीनंतरचा ताण आणि नैराश्य कमी होते. |
09:46 | स्तनपानाचे मातांना दीर्घकालीन फायदेही आहेत. |
09:51 | हे नंतरच्या काळात हाडे कमकुवत होण्यापासून रोखते. |
09:56 | स्तन आणि बीजकोशाच्या कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो. |
10:02 | गर्भधारणेदरम्यान, स्त्रियांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या आसपासची चरबी वाढते. |
10:08 | जसे की पोट, आतडे आणि यकृत. |
10:12 | ही चरबी पोट किंवा ओटीपोटाच्या भागात लपलेली असते. |
10:18 | ह्या चरबीचे प्रमाण वाढल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स, |
10:23 | मधुमेह आणि लठ्ठपणा होऊ शकतो. |
10:26 | स्तनपान महिलांमधील ही चरबी कमी करण्यास मदत करते. |
10:31 | हे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी करते. |
10:37 | केवळ स्तनपान ही एक नैसर्गिक जन्म नियंत्रण म्हणून कार्य करू शकते. |
10:44 | तथापि, जोडप्यांनी प्रसुतीनंतर 6 आठवड्यांनंतर गर्भनिरोधक वापरावे. |
10:50 | हे दोन गर्भधारणेदरम्यान अवकाश राखण्यास मदत करते. |
10:56 | स्तनपानाचे काही आर्थिक फायदे आहेत. |
11:00 | आईचे दूध विनामूल्य उपलब्ध आहे आणि बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. |
11:07 | यात फॉर्मुला दूध, बाटल्या आणि प्लास्टिकच्या निप्पल्सवर खर्च केलेल्या पैशाचा समावेश नाही. |
11:14 | आईचे दूध तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळदेखील खर्च केला जात नाही. |
11:20 | आईचे दूध तयार करण्यासाठी गरम पाणी, भांडी आणि तापवण्यासाठी इंधन आवश्यक नाही. |
11:28 | घाणेरडे पाणी किंवा घाणेरड्या पाजायच्या बाटल्या बाळाला आजारी बनवू शकतात. |
11:35 | अशाप्रकारे, भविष्यात आई आणि बाळासाठी आरोग्यासाठी लागणारा खर्च कमी आहे. |
11:42 | स्तनपानाचे अनेक पर्यावरणीय फायदेदेखील आहेत. |
11:47 | सर्वप्रथम, स्तनपानात कोणतेही पॅकेजिंग किंवा वाहतूक समाविष्ट नाही. |
11:54 | यामुळे कोणताही कचरा, |
11:57 | धूर किंवा आवाज होत नाही |
12:00 | हे जागतिक संसाधने आणि ऊर्जा वाचवून प्रदूषण कमी करते. |
12:06 | म्हणूनच, स्तनपान हा एक उत्तम पर्याय आहे. |
12:10 | मातांनी बाळाला जन्मापासून 2 वर्षापर्यंत स्तनपान देण्याचे सुनिश्चित केले पाहिजे. |
12:18 | हे बाळ आणि आईच्याही चांगल्या आरोग्यासाठी आहे. |
12:24 | स्तनपानासाठी योग्य स्तनपानाच्या तंत्राची समज आवश्यक आहे. |
12:30 | त्याबरोबरच, कुटुंबाकडून पुरेसा आधार व मार्गदर्शनही आवश्यक आहे. |
12:38 | ह्या सगळ्याचे स्पष्टीकरण त्याच मालिकेच्या दुसर्या ट्युटोरिअलमध्ये दिले आहे. |
12:44 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. |